वेळ कुठाय?

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago

वेळ कुठाय मला?
रोजचा हाच एक प्रश्न.. हेच एक उत्तर
मी किनई खूप बिझी आहे.
का?
का म्हणजे काय? खूप खूप काम आहे,
नक्की काय काम आहे..
माझं काम तुला सांगून समजणार आहे का?
बरंच काही करायचय. बर्‍याच ठिकाणी धावायचय.
अजून थोडं अडखळायचय.
अजून थोडं ठेचकळायचय.
निवांत थांबायला
श्वास घ्यायला, तुझी विचारपूस करायला,,,,,
मला वेळ कुठाय?
रोजचंच हे धावणं. रोजचंच हे पळणं.
कुठे न थांबता... कुणाकडे न बघता..
स्वत्:च्याच पाठून स्वतः धावायचं आणि वर स्वतःलाच विचारायचं.
थांबायला
मला वेळ कुठाय?

विषय: 
प्रकार: 

स्वत्:च्याच पाठून स्वतः धावायचं आणि वर स्वतःलाच विचारायचं.
थांबायला!! मला वेळ कुठाय?

अगदी बरोबर.