"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १२

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:17

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"धबाबा लोटल्या धारा..."

Niagara_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Trevi Fountain, Rome

trevi.jpg

अरे.. कसले सही झब्बू आलेत एक एक.. मी फारच मजा हरवली आहे इतके दिवस.. हा माझा रात्रीचा नायगरा..

From SLAP

लालु, एकदम सही... Jurassic Park आठवला!

हा, siver falls पचमढी (मध्य प्रदेश),

मस्त फोटो आहेत..
पाणी म्हटले की मला नायगाराच आठवतो हल्ली.

ज्यांनी नायगारा पाहिला नाहीये त्यांच्यासाठी - ही बोट अशी हॉर्स-शु धबधब्याजवळ घेउन जातात आणि चांगली १० मिनिटे उभी करतात. तेव्हा जे काय दिसते, ऐकु येते तो आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव असतो.

DSC03427.JPG

हा ब्राझिलचा फोझ दो इग्वाझू (इग्वाझू चा धबधबा). Foz do Igvacu.
नायगारा पेक्षा मोठा. २.३ कि.मी. लांबी मधे २७७ धबधबे आहेत. सरासरी ६४ मिटर उंचीचे. ब्राझिल व अर्जेंटीनामधे विभागलेले. पॅराग्वेची बॉर्डर जवळच आहे. याच इग्वाझू नदीवरच जवळच १४००० मेगावॉट क्षमतेच विद्युत निर्मिती केंद्र आहे. हा फोटो फारसा चांगला नाही. नंतर कधीतरी चांगला टाकीन, पण तोवर माहिती जालावर अवश्य पहा.
अवर्णनीय दृष्य. अगदी खास ते पहाण्यासाठी ब्राझिलला यावे असे.IMG00163.jpg

>> तेव्हा जे काय दिसते, ऐकु येते तो आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव असतो.
मी पाहिलेला मोठ्ठा धबधबा म्हणजे जबलपुर जवळ भेडाधाटचा धुवांधार... नाव सार्थ करणारा.. धबधबा दिसायच्या आधिच आवाज ऐकु येतो...

हा, पचमढीचा बी फॉल्स,

वॉव!!

फोझ दो इग्वाझू - ब्राझिल.
डावीकडे ब्राझिल तर उजवीकडे अर्जेंटीनाची बाजू.DSC01551.JPG

waterfall.JPG

small-fall

फोझ दो इग्वाझू - ब्राझिल.
अगदी जवळून
DSC01544.JPG

वॉव, गारठलेल्या नायगार्‍याचा आणि इग्वाझू फॉल्सचे फोटोज सहीच.
ह्या फोटोत डावीकडे अमेरिकन फॉल्स आणि समोर नायगाराचा मुख्य धबधबा - हॉर्स शू फॉल

American and Horse-shoe Falls

Pages