इतकेच मला जाताना - मिल्या

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 23:52

गीत/स्वर: मिल्या (मिलिंद छत्रे)


प्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

इतकेच मला जाताना परदेशी कळले होते
’माय नेम इज खान’ म्हणूनच गोऱ्याने छळले होते

ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही
मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते

मी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का?
मी पैसे ’कोल्ह्याकडुनी’ आधीच उकळले होते

त्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली?
लावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते?

स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली
अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते

माघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे
करणार काय लोकांचे जर पित्त खवळले होते?

झालेल्या नामुष्कीला सारेच चला विसरू या
पाऊल घसरले होते डोकेही चळले होते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हझल!! Happy हाही एक माबोकोशातला शब्द दिसतोय!
वा! झकास जमलंय पण!

मी खा-शा असून सुद्धा मज खास समजले नाही?
शब्दं असे आंग्लीय मी काय बरळले होते?
Happy