धावून ये गणेशा - जयवी

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 23:41

गीत: जयवी (जयश्री अंबासकर)
संगीत/स्वर: सुबोध साठे


शब्दः
धावून ये गणेशा

काळोख पातकांचा
दाही दिशांत झाला
घेऊन सूर्य दुसरा
धावून ये गणेशा

स्वार्थात अंध झाले
सारेच मत्त झाले
वाली कुणी न आता
सारेच माजलेले
उन्माद आवराया
देवा तुझी प्रतिक्षा
घेऊन सूर्य दुसरा
धावून ये गणेशा

जगतावरी फिरुनी
साम्राज्य दानवांचे
धरबंद राहिले ना
कोणासही कशाचे
बेबंद दानवांचा
नि:पात तू करावा
घेऊन सूर्य दुसरा
धावून ये गणेशा

तू पाप, ताप, दु:खा
हरिले सदैव देवा
भक्तांस तारिले तू
अन्‌ रक्षिलेस देवा
विश्वास आमुचा हा
तोडू नकोस देवा
घेऊन सूर्य दुसरा
धावून ये गणेशा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम जबरद्स्त कविता ....... चाल हि सुंदर आहे, आवाज ही सुरेख आहे, वाह सहीच एकदम......!

अगदी सुरेख!! सुंदर शब्दातलं आर्जव / धावा / आर्तता याला चालीनी आणि गायनानी मस्तं न्याय दिलाय यात शंकाच नाही.
जयवी अन् सुबोध मस्तंच.. नक्की याचं प्रॉपर संयोजन आणि रेकॉर्डिंग करून घ्या

जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर. मला जरा "दुसरा" सुर्य हि कल्पना समजाउन सांगणार का ?
आहे तो सुर्य झाकोळला, निष्प्रभ झाला, असे आहे का ?

भारतात असल्यामुळे आणि इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे धन्यवाद पोचवायला खूप उशीर झाला त्यामुळे आधी सगळ्यांची माफी मागते.
इतक्या छान छान प्रतिक्रिया आवर्जून दिल्यात.......तहे दिल से शुक्रिया दोस्तांनो Happy