"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ७

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:50

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

"दिव्या दिव्या दीपत्कार"

झब्बू म्हणून कुठल्याही प्रकारच्या दिव्याचे छायाचित्र देऊ शकता. उदा : निरांजन, समई, पणती, टेबल लॅम्प, स्ट्रीट लॅम्प.

zabbu_jyot1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दीड वर्षाने पहिल्यांदा घरी गेले तेव्हा लहान बहिणीने पहाटे चार वाजता असं स्वागत केलं होतं. डोळ्यात पाणी तसंही येणारच होतं, ते घळघळा वहायलाच लागलं एकदम! Happy

IMG_0110.jpg

नकुल, रस्ता नाही (तो झब्बू निराळा Happy ) माथेरानला हॉटेलमधे रात्री एक मिनी-डिस्को होता... त्याचे दिवे आहेत.

IMG_3277.JPG

आमच्या यूनिवर्सिटीतल्या मराठी विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या गणपतीच्या आराशीचा काही भाग

समई

समीर, झकास फोटो! कुठला आहे?

ही सँटा फे, न्यू मेक्सिकोमधली ख्रिसमसनिमित्त केलेली 'फॅरोलितोज'ची रोषणाई. कागदी/खाकी पिशव्यांत थोडी वाळू भरून त्यात मेणबत्ती ठेवून पेटवायची ही खास न्यू मेक्सिकोतली परंपरा.
Santa_Fe_122407 138

पॅरीसः

paris.jpg

गेल्या दिवाळीची माझ्या घरातली(म्हणजे लिटरली घरातली..काय करणार अंगण नाही! त्यामुळे हॉलमधे काढलेली) रांगोळी

Pages