Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 02:50
कोडं क्रमांक ४ :
खाली चार चित्रे आहेत. याच मालिकेतले पाचवे चित्र काय असेल ? पाचवे चित्र द्या.
कोडं क्रमांक ४ च्या हिंटस् :
पहिल्या चित्रासाठी : डेहराडूनचा ओरांगउटान
दुसर्या चित्रासाठी : सर्दीसाठी उटी
तिसर्या आणि चौथ्या चित्रासाठी :
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अवघड आहे. मनन करतो, परत येतो.
अवघड आहे. मनन करतो, परत येतो.
पहिले चित्र वगळता बाकि
पहिले चित्र वगळता बाकि चित्रात नदी हा कॉमन फ्याक्टर आहे
तर चौथे चित्र सरस्वती देवी, अर्थात पुन्हा एका नदीचेच सूप्त रूप
पहिले चित्र ऐतिहासिक्/पुराणकाळ दर्शविते, मानवाची उपस्थिती दर्शविते
मानवाचि उपस्थिती व वस्ती आदिम काळापासून नदीच्या तीरावरच जास्त होती
दुसर्या चित्रात नदीकिनारी वस्तीचे उदाहरण दिसते, तसेच कालौघाचे प्रतिक म्हणून दोन चाके दिसतात
तर तिसर्या चित्रात, अवकाशातून घेतलेले नदीचे चित्र जी सागरास मिळते ते दिसते
चौथ्या चित्रात नदीबद्दल भरतखण्डातील मानवाने दिलेली देवीरुपातील मान्यता दिसते
अर्थात चौथे चित्र हे नदी जिथे जाऊन मिळते त्या सागराचे हवे
रामसेतूचे देखिल चालू शकेल
नसल्यास, गन्गानदीचा उगम शन्कराच्या जटेतून होतोय असे मानून शन्कराचे चित्र हवे
नदीकिनारी असलेल्या मन्दिराचे चित्र देखिल चालू शकेल असे वाटते
मला तर हे शन्ख,चक्र्,पाणी,अस
मला तर हे शन्ख,चक्र्,पाणी,अस देवान्च्य हातात असत त्याच चित्र आहे.
हे घ्या कमळ माझ्या तर्फे...:)
(No subject)
लिंब्या आणि चिउ छान लॉजिक
लिंब्या आणि चिउ छान लॉजिक लावले आहे... हे कोडे अवघड आहे..
मला तर हे श्री गणेश पंचायतनाशी संबंधित वाटते आहे..
हा घ्या श्री लक्ष्मी चा फोटो.
बिटू माझ्याबी डोक्यावरुन
बिटू माझ्याबी डोक्यावरुन इवाईन गेल भो.
चार चार या आकड्याशी देखिल
चार
चार या आकड्याशी देखिल सम्बन्ध लागतोय
कवटीस चार सूळे
अष्टकोनी घराच्या चार बाजू दिसताहेत, नॉर्मली घर चौकोनीच अस्ते
नदीचा चतुर्भुजप्रदेश दिस्तोय
देवीला चार हात आहेत
आता एक नुस्ते चौकोनाचे चित्र टाकले पाचवे तरी चालेल
किन्वा चार पाय असलेला कोणताही प्राणी
चारचाकी गाडी देखिल चालायला हरकत नाही
कवटीस चार सूळे >> लिंबू अरे
कवटीस चार सूळे
>> लिंबू अरे मला तो कुठलातरी अर्धवट बनलेला साचा वाटतोय.. आता तू मुर्तीकार आहेसच.. तुच याच्यावर थोडा प्रकाश टाक (आणि चित्र पण )
लिंब्या.. नदीच्या मुखाशी..
लिंब्या.. नदीच्या मुखाशी.. त्रिभुज प्रदेश असतो .. चतुर्भुज नाही..
रच्याकने.. तसा जर विचार केला तर पहिल्या चित्रात एकच मुखवटा आहे. दुसर्या चित्रात दोन चाकं दिसतायेत.. तिसर्या चित्रात त्रिभुज प्रदेश आहे. आणि चवथ्या चित्रात चार हात असलेली सरस्वती देवी आहे.. म्हणजे पाचव्या चित्रात.. पाच असलेले कोणतेही चित्र चालेल बहुतेक.. पंचानन.. किंवा पंचकोन.. किंवा पाच टोके असलेला तारा...
हिम्सकूल, तुमचे लॉजिक १०० %
हिम्सकूल, तुमचे लॉजिक १०० % पटले... चला आता ५ नंबर चे टाका चित्र..
चित्र क्र.१ मानव निर्माण
चित्र क्र.१ मानव निर्माण झाला.
चित्र क्र.२ जमिनीवर घर बांधलं.
चित्र क्र.३ पाण्यावर पण वर्चस्व निर्म्माण केलं.
चित्र क्र.४ सरस्वतीची उपासना केली.
चित्र क्र.५ भाषा. अर्थात आपली मायबोली.
परफेक्ट हिम्या हे लॉजिकपण
परफेक्ट हिम्या हे लॉजिकपण बरोबर वाटतय......
आयला, पण त्रिभुज ची दुरुस्ती कशी करू? ती केली तर माझ लॉजिक बिघडतय ना
पहिले चित्र वगळता बाकि
पहिले चित्र वगळता बाकि चित्रात नदी हा कॉमन फ्याक्टर आहे
>>>>>>>>>>>>
लिंबुदा दुसर्या चित्रातपण नदी नाहिये.
मला वाटतय, पहिली तीन चित्रे पूथ्वीतलावरील आहेत. चौथे चित्र स्वर्गातले आहे.
पाचवे चित्र अवकाशाचे पाहिजे.
चित्र क्र.१ मानवाने टोळीयुध्द
चित्र क्र.१ मानवाने टोळीयुध्द केल. बळी तो मिशी पिळी या तत्वाने अस्तित्व निर्माण केलं.(जे मेले त्यांचे सांगाडे सदरच्या चित्रात दिसतात)
चित्र क्र.२ जे दोन चक्र दिसतात त्याच्या सहाय्याने मानवाले प्रगती केली. ( पहा: आउद्योगिक क्रांती).
चित्र क्र.३ समुदावर स्वारी करुन, देशोदेशीच पाणी प्याला.
चित्र क्र.४ सरस्वतीची उपासना केली. ज्ञान मिळवलं. अनेक भाषा शिकला.
चित्र क्र.५ ज्ञानाच्या बळावर जगावर हुकुमत गाजविनार्या अमेरीकेच चित्र पाहिजे.
(No subject)
सेनापती, आहे, चित्र सेव्ह
सेनापती, आहे, चित्र सेव्ह करुन एन्लार्ज करुन बघा, उजवीकडील झाडान्ना समान्तर असे नदीचे पात्र मला तरी दिसते आहे
चु.भु.दे.घे.
लिंबुदा रस्ताये तो. थांबा
लिंबुदा रस्ताये तो.
थांबा थांबा थांबा !!!!! परकासने बाड दिलय ते पाहुन सांगतो.
सरसेनापती , असो अजून कुणी ५
सरसेनापती :), असो अजून कुणी ५ या अंकाविषयीचा फोटो नाही टाकला..
मी टाकतो.. घ्या ऑलिंपिक चे बोध चिन्ह
बर सेनापती, पण आता मला वेगळच
बर सेनापती, पण आता मला वेगळच सुचतय
कवटीला कवळ्यान्चे (दातान्चे) दोन थर
बन्गल्याला मजले दोन
खाली दिसणार्या नद्याही दोनच
फक्त देवी एक, तिला चार हात
मग आता सहा हातवाल कोण त्याच्या फोटू टाका पाचवा हा.का. ना.का.
पाचवा फोटो गणपतीचा पाहिजे.
पाचवा फोटो गणपतीचा पाहिजे.
संयोजक आता हिंट द्या ! लई
संयोजक आता हिंट द्या ! लई डोके खाजवले ...........!
नकाशाचा भूप्रदेश हा
नकाशाचा भूप्रदेश हा आंध्रप्रदेश च्या समुद्रकिनार्याचा आहे असे दिसते. विजयवाडा, राजमहेन्द्रीच्या आसपासचा. आणि नध्या कृष्णा व गोदावरी असाव्यात .त्यावरून काही ताणता येईल का?
हे नद्यांशी संबंधीत
हे नद्यांशी संबंधीत दिसतय.
सिंधू (मोहेनजोदडो संस्कृति), ??(दुसर्या चित्रात कालवा) , कृष्णा-गोदावरी, सरस्वती,.
उत्तर - गंगा- कावेरी प्रकल्प.?
मला पहिला फोटो श्री
मला पहिला फोटो श्री विष्णुच्या वराह अवतारातला वाटतोय. प्रूथ्वी तोंडावर तोलुन धरल्यासारखा.
सध्या डोकं दोन दिशेने चाललेलं
सध्या डोकं दोन दिशेने चाललेलं आहे,
१. १ डोळा, २ चाकं, त्रिभुज प्रदेश आणि चतुर्भुज देवी.. हिम्सकूलाने दर्शविल्याप्रमाणे.
पण मग १ अंकच दर्शवायचा असेल तर शिवापिथेकसचा डोळा दाखवायची गरज काय असा प्रश्न आहे.
२. वर विक्रमने म्हंटलं आहे तसा नद्यांशी संबंध,
पहिलं मोहेंजोदाडो नाही, हे सिंधू खोर्यात सापडलेले (ओरांगउटान सदृश) आदिमानवाचे अवशेष. त्याला शिवापिथेकस (किंवा रामापिथेकस) म्हणतात. दुसरं चित्र उटीचं आहे .. टेलिस्कोप टॉवर का काहीसं नाव आहे. त्याचा संबंध कळला नाही पण.. तिसरं गोदावरी खोर्याचं आणि चौथं सरस्वतीचं.. असं असेल तर यांत गंगा नाही. म्हणजे गंगेचं चित्र पाचवं असू शकेल.
पण हे काही पटत नाहीये...
क्ष, तू म्हणतोस ते बरोबर
क्ष, तू म्हणतोस ते बरोबर वाटतय!
पण हूडाने सान्गितल्या तर्काला धरुन थोड वेगळ
"प्राचिनता" हा दुवा असू शकतो
पहिली कवटी, एकतर आदिमानवाचीच वाटते, नाकाच्या ठेवणीवरुन
नद्यान्चा फोटो देखिल प्राचिनतम भूप्रदेशाची/नद्यान्च्या प्रवाहाची जाण करुन देतो
सरस्वतीचा फोटो तर "सरस्वती देवी" या पुरातन सन्कल्पनेशीच निगडीत आहे
रहाता राहिला दुसरा फोटो, यातिल दोन चाके, शो करता लावलेली, हा देखिल प्राचिन काळाशी दुवा दाखवतो
तसेच अष्टकोनी रचाना देखिल प्राचिन भारतीयच
तेव्हा असच काही "प्राचिन" म्हणून पाचव दाखवा हव तर हिमालयाचा फोटु टाका
क्ष, तुमचे बरोबर आहे. नं २
क्ष, तुमचे बरोबर आहे. नं २ उटीचे टेलिस्कोप हाउस आहे. म्हणजे कावेरी खोरे.
सिंधु खोरे, कावेरी खोरे, कृष्णा- गोदा खोरे, गंगा खोरे.
राहता राहिले नर्मदा खोरे. कुणीतरी नर्मदेचा फोटो टाका, पटकन.
क्ष, आपण पहिली ३ चित्र बरोबर
क्ष, आपण पहिली ३ चित्र बरोबर ओळखली आहेत.
सरस्वतीच्या चित्रावर अजून अगदी सरळ, सहज विचार करा.
कोडं क्रमांक ४ च्या हिंटस् :
पहिल्या चित्रासाठी : डेहराडूनचा ओरांगउटान
दुसर्या चित्रासाठी : सर्दीसाठी उटी
तिसर्या आणि चौथ्या चित्रासाठी :
माझा अतर्क्य तर्क... चित्र
माझा अतर्क्य तर्क...
चित्र १: चेहरा... दात... घासा (नाहीतर दात पदतिल आणि चेहरा असा दिसेल)
चित्र २: अंगाला उटी लावा...(सर्क्युलर मोशन मधे (चाक) म्हणजे रक्ताभिसरण वाढेल)
चित्र ३: नदीवर जाऊन पाण्याने अंघोळ करा...
चित्र ४: सरस्वती ची उपासना करा...
चित्र ५: आता फलाहार करा......
LOL लाजो सन्योजक, डोके चालत
LOL लाजो
सन्योजक, डोके चालत नाहीये काही
Pages