अष्टविनायक दर्शन : श्री वरदविनायक

Submitted by पल्ली on 27 August, 2009 - 00:36

mahad_0.jpgश्री वरद विनायक- महड/मढ, जि. रायगड

मार्ग- कर्जत-खोपोली रस्त्यावर. मुंबई-पुणे रस्त्याने खोपोलीजवळ १.५ कि.मी चा फाटा. पाताळ गंगेपासूनही १.५ कि.मी.

यात्रा- भाद्रपद व माघ या दोन्ही मासात शु. प्रतिपदा ते पंचमी अशी यात्रा असते.

मूर्ती- दगडी सिंहासनावर बसलेली, सिंहासनावर दोन हत्ती कोरलेले.

मंदिर- देऊळ लहानसेच. गाभार्‍याच्या द्वारावर ऋद्धी-सिद्धी कोरलेल्या, आतला व बाहेरचा असे दोन सभामंडप. देवळाच्या चारी बाजूना हत्तीच्या प्रत्येकी दोन आकृती कोरलेल्या. मंदिरात अखंड नंदादीप.

इतिहास- देवळाच्या मागे एक तळे आहे. इ.स. १६९० साली पौडकर नावाच्या गणेशभक्ताला या तळ्यात गणेशमूर्ती सापडली. त्याने ती दगडी कोनाड्यात बसवली. पुढे बिवलकर आडनावाच्या एका गृहस्थांनी तिच्यावर मंदिर बांधले (इ.स. १७२५).

Group content visibility: 
Public - accessible to all site users