जय हेरंब - आरती गणनायका - सौ. माधुरी करमरकर

Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 23:58

गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: सौ. माधुरी करमरकर


सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है! सुरवातीची बासरी फार फार सुंदर.
तुमचं आतापर्यंतच प्रत्येक गाणं वेगळ झालंय कुठेही तोच तो पणा नाही जाणवला. एवढ्या सुंदर कलाकृतींबद्दल तुम्हा सगळ्यांचच खूप खूप अभिनंदन

श्यामलीला मोदक... प्रत्येक गाणं वेगळं आणि तितकच सुंदर. सौ. माधुरी करमरकरांचा आवाज अतिशय सुंदर लागलाय, खूप समजून गायल्यात, अप्रतिम फिरत आहे. (नक्की शास्त्रीय संगीताची बैठक आहे).
सुरेख गीत आणि संगीतासोबत संगीत नियोजनासाठी अजय जोगळेकरांचं खरच कौतुक.
नक्की विकत घेणार.

मनापासून धन्यवाद मैत्रहो!
श्यामलि, बासरी चं डिझाईन अजय जोगळेकरांचं आणि वाजवलीय अमर ओक नी. त्यांना कळवतो नक्की! आणि हो, ह्या संग्रहातील सर्व कलाकरांची नावे
http://www.jayheramb.com/Jay_Heramb_Mr/artists.html
येथे दिली आहेत.
सी. डी (उसगाव आवृत्ती :-)) चं कव्हर डिझाईन सौ. सुवर्णा तुळशीबागवाले, पुणे यांचं आहे.
जय हेरंब!