कायापालट स्पर्धा "रंग नभाचे" प्रवेशिका ६ : मुख्य पाहुण्यांचे भाषण - mkarnik

Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 20:44

प्रवेशिका ६ : मुख्य पाहुण्यांचे भाषण

मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी

रंग सभेचे क्षणाक्षणाला बदलत होते
सभाध्यक्ष अस्वस्थ असावे समजत होते

हे काय अचानक मुख्य पाहुण्या झाले आहे?
जे भांग चढवल्यापरी कसेही बरळत होते

याचीच लोक किति करीत होते चर्चा तेथे
कोणालाही न कुणाचे म्हणणे उमगत होते

पाहुणे पाजळत होते अक्कल आपली सारी
’भगिनींनो’ मधल्या ’भ’ वर टिंब उठवत होते

पहिल्या धारेची दारू रात्री कडकच होती
साध्या शब्दांवरही म्हणुनच अडकत होते

नव्हते झालेले पाठ तयांचे भाषण म्हणुनी
रात्रीच्या बालांच्या तालावर तरळत होते

अजूनही तो दौलतजादा आठवत होता
सभ्यपणावर म्हणून काजळ पसरत होते
.................
.................
नकळत कानाखाली बसली थप्पड जेव्हा
तारे त्यांच्या डोळ्यांच्या पुढती चमकत होते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy