"परस्पर संबंध ओळखा" स्पर्धा क्रमांक ३

Submitted by संयोजक on 26 August, 2009 - 00:11

स्पर्धेची रूपरेषा :
दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
पहिल्या दिवशी एक कोडं दिलं जाईल. स्पर्धकांनी आपले प्रतिसाद तिकडेच नोंदवायचे आहेत. दुसर्‍या दिवशी एक किंवा दोन क्लू दिले जातील. आणि तिसर्‍या दिवशी सकाळी त्या कोड्याचे विजेते जाहीर होतील. त्याच्या दुसर्‍या दिवशी नविन कोडं दिले जाईल.

स्पर्धेचे नियम :
१. दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
२. एका आयडीला दिवसभरात कितीही वेळा उत्तर देता येईल.
३. ज्यांनी सर्वांनी बरोबर उत्तर दिली असतील ते सगळे विजेते म्हणून घोषित केले जातील.

--------------------------------------------------------------------------------------

कोडं क्रमांक ३ :

ह्या तीनही चित्रांमधून सूचित होणार्‍या व्यक्तींमधे २ समान धागे आहेत. ते ओळखा.

quiz3_1.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहीला -टिचर्स डे--भारता चे दुसरे प्रेसीडन्ट सर्वपल्ली राधाक्रीशनन चा जन्म दिवस. तिसरा...डॉ. झाकीर हुसेन-- भारता चे तीसरे प्रेसीडन्ट. दुसरा???:(

चिउ बरोब्बर..

दुसरे चित्र ISRO चा लोगो आहे. (Indian Space Research Organisation), ज्या मधे आपले राष्ट्रपती A.P.J Abdul Kalaam होते.

तेव्हा पहिला संबंध: भारताचे राष्ट्रपती
दुसरा संबध : या तिघाही लोकाना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे

आयला, कस्ल कठीण होत हे!
शिक्षक वा गुरू चा सम्बन्ध कळला होता, पण हा "राष्ट्रपती" अन भारतरत्न चा सम्बन्ध नवता डोक्यात आला Happy
व्वा केदार Happy

अतिशय अचूक उत्तर!

चिऊ, उत्तराच्या दिशेने वाटचाल करणारी सुरवात!
चिऊ, केदार_जपान, चिऊ अभिनंदन!! Happy