अष्टविनायक दर्शन : श्री बल्लाळेश्वर

Submitted by पल्ली on 25 August, 2009 - 23:49

pali_0.jpg
श्री बलाळेश्वर
- पाली, जि. रायगड

मार्ग- खोपोली-शीळ फाट्यापासून पडघवली रस्त्याने ४० कि.मी., नागोठण्यापासून ११.२ कि.मी. अलिकडे.

यात्रा- माघ शु. चतुर्थी. यात्रेकरूंच्या भोजनाची व्यवस्था १२ घरांकडे आहे. पुजारी ब्राम्हण व गुरव आहेत.

मूर्ती- स्वयंभू. ३ फूट उंचीची. डाव्या सोंडेची. जरा रुंद. कपाळाचा भाग काहीसा खोलगट.

मंदिर
- श्रीकारी धाटणीचे. सुबद्ध. पूर्वाभिमुख. दिशासाधन आहे. याच्याच मागच्या बाजुला स्वयंभू ढुंढी विनायकाचे मंदिर. प्रशस्त सभामंडप. मोरोबा दादा फडणीस यांनी इ. स. १७७० च्या सुमारास मुख्य मंदिराचा जीर्णोद्धार केला. पोर्तुगीज बनावटीची मोठी घंटा पेशव्यांनी इथे टांगली.

इतिहास
- कल्याण श्रेष्ठींचा मुलगा बल्लाळ याच्या भक्तीस्तव गणपती इथे प्रकट झाला व त्याच्याच विनंतीवरून इथे राहिला. म्हणुन त्याचे नाव बल्लाळेश्वर असे पडले. इथले पहिले लाकडी देऊळ बल्लाळानेच बांधले अशी कथा आहे. दगडी देऊळ त्यानंतरचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर पल्ली! ती मूर्ती, सोनेरी झळाळ असलेले किरिट आणि खाली दगडातून प्रत्यक्ष झालेली जिवंत वाटणारी मूर्ती! बाप्पाने तुला सुंदर देणगी दिली आहे, यात शंकाच नाही.