जय हेरंब - गजानन करी नर्तन - कु.प्रीति ताम्हनकर

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 23:29

गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: कु.प्रीति ताम्हनकर


सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवळ गोsssssड... मधूर गायलियेस, प्रीती. जियो!
किती सुंदर गायलीये ही मुलगी. तालाचं अचुक ज्ञान. सुरेल किती! त्यातले "ताथै ताताथै" तिनं इतकं सुंदर म्हटलय की पुढे आलेला अख्खा बोल तिनेच म्हणायला हवा होता... (ह्यात ज्यांनी म्हटलाय त्यांची माफी मागून).
गीत आणि चालही सुंदर.

cute!

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या! प्रोत्साहन मिळाले (मलाही :-), आणि मी प्रीतिलाही दिले).
तुम्हा सर्वांचा आशिर्वाद ही कळवतो तिला!

कथ्थकातील नंतरच्या बोला मागे विचार असा होता की बाल गणपती नाचतो आहे आणि बरोबरचा वाद्यवृंदामधील कोणी (नारद!) ते बोल बोलतंय म्हणून तो आवाज दुसरा घेतला. सुरुवातीचे बोल हे नर्तनाचे वर्णन करणारी गायिकाच वर्णनपर बोलते. (म्हणजे अशी कल्पना करा की आपण गजाननाचे नर्तन पहाताना , ते वर्णन ऐकतो आहे.. म्हणजे लाईव्ह मॅच टी व्ही वरच्या कॉमेंट्री सकट पाहतोय असा दृश्य परिणाम साधायचाय या गीतातून Happy )

आणि बाय द वे (जाता जाता?) , ते नंतरचे बोल या गीत संग्रहाचे जे संगीत संयोजक, श्री. अजय जोगळेकर, त्यानी गायलेत. वर लिहिलेल्या कल्पनेनुसार आता ऐकलेत, तर मस्तंच वाटतील!

गीताच्या परिणामकारिकते मधे संगीत संयोजकाचा, संगीत दिग्दर्शकाइतकाच मोठा वाटा असू शकतो बरं का! आणि या संग्रहात अजय नी ते काम फारच अप्रतिम केलंय असं माझं मत आहे! त्यामुळे मी अजय ला देखील तुमच्या प्रतिक्रिया पोचवीन! या गाण्यात सनई, पखवाज,आणि इतर वाद्यांचा किती छान वापर त्यानी केलाय ना?

जय हेरंब!

लोकहो, एक आग्रहाची सूचना..
गाण्याचा ताल आणि राग संयोजकांना इ-मेल करून कळवायचा आहे. कृपया, आपली उत्तरे इथे लिहू नकात.
धन्यवाद. Happy

फार फार लाघवी!! काय आवाज आहे.. एकदा ऐकले की गाणं दिवसभर मनात वाजतय!!!
एक मस्त ठेहराव आहे गाण्याला.. कुठे ही घाई, गडबड नाही!! क्लास!!! Happy

कसली गोड गायलीये प्रिति.....!! जियो !!
उपासक.....तुमचं गीत , संगीत पण मस्तच !! पण पोर फ़ारच गोड गायलीये Happy

खरच मी पण खुपदा ऐकलय, किती सुंदर आवाज , निकोप, ताल आणि स्वराची जाण तर केवळ अप्रतिम
आम्ही सगळ्यांनीच ऐकल गाण, गीत संगित पण मस्त Happy

किती सुरेल गायलीय. आणि स्पष्ट, खणखणीत आवाज. केवढी आहे ?
खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद Happy