Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कुसुमाग्रज

Hitguj » Language and Literature » पद्य » कुसुमाग्रज « Previous Next »

  Thread Posts Last Post
Vedaat marathe veer daudle saat08-14-07  10:43 am
Archive through March 10, 199914 03-10-99  1:11 pm
Archive through April 03, 200012 04-03-00  1:02 pm
Archive through February 07, 200120 02-07-01  7:10 pm
Archive through May 21, 200117 05-21-01  1:59 pm
Archive through May 08, 200235 05-08-02  5:57 pm
Archive through May 01, 200335 05-01-03  10:41 am
Archive through November 28, 200535 11-28-05  11:02 pm
Archive through October 23, 200620 10-23-06  7:49 am

Shirishk
Wednesday, February 21, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Can somebody complete/correct the following?

गवताचं पातं वार्‍यावर डोलतं
डोलताना म्हणतं खेळायला चला
खेळायला चला!

झिम्माड पावसात गारांची बरसात
बरसात म्हणते वेचायला चला
वेचायला चला!

झर्‍याचं पाणी खुदुखुदु हसतं
हसताना म्हणतं ला ला ला ल ला
ला ला ला ल ला


Mayurlankeshwar
Monday, March 12, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही आणखी एक सुंदर कविता.
------------------------------

क्षितीजाचे तट फोडून धावे
अश्व सनातन मार्गावरती.
पायतळी चुरल्या काळाचा
चुरा पथावर उडतो भवती.

रवी-शशीचे परजीत पलिते
स्वार तयावर बसला आहे.
अश्व न जाणे स्वार न जाणे
प्रवास कुठला कसला आहे.
-----------------------------


Niwedita
Tuesday, May 29, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धर्मा ला देव लागतो
देवाला धर्म लागत नाही
म्हणून धर्म देवाच्या अलीकडे
आणि देव धर्माच्या पलीकडे

कुसुमाग्रज


Niwedita
Tuesday, May 29, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक छान कविता आहे कुसुमाग्रजांची इथे आठवतेय तशी लिहिलीय
चू.भू.दे.घे.

परवाच्या पावसात
झोपडपट्टीतील एक मूल
वाहून गेले बुडून मेले

बूडाले तर बुडू द्या
मूल बुडाले म्हणजे काही
सात तारयाचे ताजमहाल
किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम बुडाले नाही

आणि झोपडपट्टीतील त्या उघड्या नागड्या मूलाचे
असे मूल्य तरी किती?
साधे गणित येत असेल तर करता ये ईल हिशेब
उत्तर अर्थात पैशातच

हे मत तुमचे माझेच अहे असे नव्हे
त्याच्या आईचेही तेच असावे
कारन मूलाचे कलेवर मांडीवर घेऊन
ती फोडीत बसली असता
एक कर्कश हंबरडा
वस्तीवर एक वार्ता येऊन कोसळली
यावेळी मात्र करुणामय मेघासारखी

वार्ता:
नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी
कुजलेल्या धान्याची पोती
ओतीत सुटला आहे उकिरड्यावर

बाईने आपला हंबरडा आवरला
घशात अर्ध्यावरच
अन मांडीवरचे कलेवर खाली टाकून
घरातल्या उरल्या सुरल्या पिशव्या गोळा करुन
ती बेफाम धावत सुटली
उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी

कुसुमाग्रज
Sagarghalsasi
Friday, July 06, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निवेदीता
Great Poem
Taking Printout of this
Versatile MP

Ashashwini
Wednesday, August 01, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला "हासरा नाचरा जरासा लाजरा, सुन्दर साजिरा श्रावण आला" ह गाणे हवे आहे.. असेल तर मेल कराल का?
ash.t05@gmail.com

Sarvesh_srujan
Friday, August 10, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुसुमाग्रजांची वाचण्यात आलेली अर्धवट कविता खाली देत आहे. कोणितरी पुर्ण करील काय?

नवतेजाची एक पताका सान्ध्यघनांच्या जंगलामध्ये जळते आहे
त्या तेजाची गहन एकता ईथे किनार्‍यावरती मजला कळते आहे

ईथे जळाच्या खोल तळशी इन्द्रधनुचे गाव असावे
दर्यावर मग मोरपिसांचे विशाल पंखे का न दिसावे?

चु.भु.दे.घे.Satishmadhekar
Monday, October 29, 2007 - 8:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुसुमाग्रजांची पानिपत युद्धावरची कविता कोणी पोस्ट करेल का?Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators