फोटो कंपोझिशन चे नियम

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

चंदन च्या फोटोग्राफी च्या पोस्ट वर प्रतिक्रिया लिहल्यानंतर फोटो कंपोझिशन वर काही तरी लिहावं हे डोक्यात आलं म्हणुन हे पोस्ट.. तसे नेट वर सर्च केले तर या विषयी खुप काही वाचयला मीळेल , पण हे माहित असलेले नियम आणि त्यांचे अपवाद येकत्रित मांडण्याचा छोटा प्रयत्न.

कोणतेही चित्र/प्रकाश चित्र बनते ते खालिल घटकानी.
१.रेषा- उभ्या , आडव्या, तीरक्या, नागमोडी... येखादा लांबलचक रस्ता , किंवा येखाद्या आकाराची कडा, किंवा क्षितीज या फोटोचा विचार करता रेषाच तर खांब , तारा हे लिनीअर ओब्जेक्ट्स या ही रेषाच
आकाशात उड्णारे बगळ्यांचा समुह हा सुद्धा फोटोच्या दृष्टीने रांगच

२. आकार - नैसर्गीक उदा. झाडं, ढग ,डोंगर माणसं, ढोरं --मानवनिर्मीत उदा घर. गाडी
काही आकारांचा समुहा ने रेषा (लिनिअर ओब्जेक्ट) तयार होउ शकतो उदा. डोंगर रांगा ही येक रेष असु शकते

३. जागा (स्पेस - चित्रात व्यापलेली जागा -पॉझीटीव्ह स्पेस आणि रिकामी जागा- निगेटीव्ह स्पेस)

४. कलर व्हॅल्यु- रंगित फोटो जर श्वेत धवल केला तर आपल्याला प्रत्येक रंगाच्या छटे प्रमाणे काळ्या पांढर्‍या रंगाच्या वेगवेगळ्या छटा मिळतात यालाच कलर व्ह्यॅल्यु म्हणतात..( आणि माहिती साठी कलर थिअरीचा थोडा अभ्यास करवा लागेल)

५. रंग (hue) आणि त्यांचे satuaration आणि contrast
६. पोत- खडबडीत, गुळ्गुळीत इ...
आता मी आधिच इथे प्रसिद्ध केलेल्या प्रकाश चित्रा वरुन या बाबिंचा विचार करुया.

elements.jpg

यात पाण्याच्या पात्राचे काठ , तसेच बाहुच्या जमिनि वरुन जिथे झाडी आहे तो भाग हे रेषांच काम करतात तर झाडं, मुलं हे आकार आहेत.
यात जमिनिचा पोत दिसतोय तर फोटोत निगेटिव्ह स्पेस नाहिये. हाच फोटो b/w केला तर कलर व्हॅल्यु कळुन येतील

आता हे घटक या चित्राला कसे पुरक आहेत ते बघु

१.रेषा या नजरेला येक दिशा देतात आणि त्या या फोटोतली मुल आणि झाडं या आकाराक्डे नजर आपसुक नेतात-

या बाबतीत येक नियम आहे तो म्हणजे रेषा या चित्राच्या आत दिशा देणार्‍या असाव्यात ( i.e. it should not lead you out of frame)या बाबतीत चित्रकार John Lovett यांचे वाक्य लक्षात ठेवण्या सारखे lines are like sentence and shapes (objects) are like punctuation marks.
शेप्स मुळे फोकल पॉईंट तयार व्हायला हवा आणि त्यामुळे नजर तीथे थोडावेळ तरी थांबायला हवी.

२. नियम २- बॅलंस -- खुप जास्त निगेटईव्ह स्पेस, येकाच जागी सग्ळ्या ऑब्जेक्ट्स ची गर्दी याने चित्राचा बॅलंस जातो
या चित्राचा विचार करता पाण्याच्या प्रवाहाच्या दोन्ही बाजुला झाड आहे, मागे झाडाचे बुंधे दिसतायत तर मुलांच्या घोळक्याच्या मागे दोन व्यक्ती दिसतात यामुळे हे चित्र व्यवश्तीत बॅलंस झालेय
या शिवाय कलर बॅलंस ही महत्वाचा असतो पण इथे ते समजावने थोडे कठीण आहे

३. कलर व्हॅल्युज- प्रकाश चित्र द्विमीती अस्लायने कलर व्ह्य्ल्युज मुळे तीसरी मीती म्हणजे डेप्थ मीळवावी लागते. ईथे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या व्ह्यॅल्युज मुळे ती डेप्थ मीलते तर पुढच्या भागात आणखी लाईटर व्हॅल्यु असल्याने ही डेप्थ अधोरेखित होते, शक्य असेल तीथे डाय्गोनल लाईट पकडला तर डेप्थ मिळवणे सहज शक्य होते

४. रंग- यात हिरव्या रंगाचे प्राबल्या असले तरी कॉन्ट्रास्ट कलर चे कपडे घातलेला मुलगा चट्कन डोळ्यात भरतो

५. पोत- फोटो द्विमिती असल्याने पोत जाणवायला त्याप्रमाणे प्रकाषाचा वापर करता आला पाहिजे, म्हणजे जर प्रकाश खुप फ्लॅट असेल तर हा दगडांचा पोत या फोटोत जाणवणार नाही

आता हे घटक ( building blocks) बघितल्यावर काही नियम थोड्क्यात बघुयात.
१. फोटो चे ओरीयेंटेशन -
आपण आपल्या डोळ्यानी लँड्स्केप ओरिएंटेशन मधेच बघतो तसेच बाकिची दृष्य माध्यमं जसे टी वी, चित्रपट यात सगले चित्रण लँडस्केप ओरिएंटेशन मधेच असते , त्या मुळे फोटो ही लँड्स्केप ओरिएंटेशन मधेच काढली जातात मात्र काहि उंच इमारती, उंच झाडं ज्यात उंची हायलाईट करायची असते अशा चित्राना विशेष करुन वन पॉईंट पर्स्पेक्टीवने काढलेले रस्ते, गल्ल्या अशा चित्रात पोर्ट्रेट ओरिएंटेशन सुद्धा छान दिसते
२.रुल ऑफ थर्डस आणि क्षितीज रेषा - आपल्या फ्रेम चे समान तीन भाग करणार्‍या दोन रेषा काढल्या आणि आडवे समान तीन भाग करणारर्‍या तीन रेषा काढल्या तर चार इंटर से़क्शन बिंदु मिळतील, चित्रातला फोकल पॉईंट शक्यतो या बिंदु पैकी येकावर किंवा त्या जवल आला तर ती कंपोझिशन सुंदर दिसते, तसेच horizon लाइन ही या पैकी आडव्या रेषे वर आली तर उत्तम
रुल ऑफ थर्ड चा मोठा धोका म्हणजे बर्‍याचदा खुप सारी निगेटिव्ह स्पेस तयार होते आणि चित्राचा बॅलंस जातो
3rd.jpg

या चित्रात नांगर हा रुल ऑफ थर्ड प्रमाणे योग्य जागी आहे, क्षितीज रेषा मध्य रेषेच्या खुप वर आहे ( ती थोडी खाली सुद्धा चालली असती)
मात्र येक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे जर क्षितीजावर दुरवर छोट्या छोट्या बोटींमुळे हे प्रकाशचित्र बॅलंस खालेय अन्यथा खुप सारी अनावश्यक निगेटिव्ह स्पेस तयार झाली असती जी इथे खुप मारक ठरली असती
३. पार्श्वभाग/व्ह्यु हा clutter free असावा- जर याच चित्रात अधे मधे खुप माणस किंवा मधेच येखादी मोठी बोट असती तर चित्रात खुप सारे फोकल पॉईंट तयार झाले असते जे मारक ठरले असते.

शेवटी हे नियम फक्त येक guidelines असतात. येकदा समजले तर त्याची मोडतोड करुन सुद्धा चांगली कंपोझिशन करता येते.
हल्ली कॅमेरा चे मिटर बर्‍यापैकी प्रगत असलयाने योग्य येक्स्पोजर हा फारसा प्रोब्लेम राहीला नाही त्यामुळे आपले चित्र वेगळे आणि उठुन दिसायचे असेल तर कंपोझिशन कडे विषेश लक्ष द्यायला हवे.

प्रकार: 

बापरे इतक्या खोलवर जाणे आपल्याला ज्याम कठीण आहे.. Happy
पण खुप धन्यवाद.. माहितीसाठी.. खोली तर कळाली.. Happy कधीतरी प्रयत्न करेनच..

पाटील तूम्ही इतक्या आपुलकीने लिहिले आहे म्हणून शंका विचारायचे धाडस करतोय.
पहिल्या चित्रात नदी जिथे जातेय, तिथे थोडासा गूढरम्य भाग असता, किंचीत अंधार असता तर !
त्या झाडांपैकी, एका झाडाच्या हिरवाईच्या छटेत किंचीत फरक असता तर ! किंवा पाण्याचा रंग आणखी नितळ असता तर !
दुसर्‍या फोटोत, बाहेरची पांढरी जागा, आपल्या उजव्या बाजूने आत घुसल्यासारखी वाटतेय. याच चित्राला काळी बॉर्डर असती तर. किंवा फोटो जरा उशीरा काढला असता, तर किंचीत अंधाराचाही फायदा झाला असता.
जमले (आणि त्या योग्यतेच्या वाटल्या तर ) या शंकांचे निरसन कराल का ?

दिनेशदा- आणि येखाद्या रंगाचे किंवा छटांचे झाड असते तर मोनोटोनी ब्रेक व्हायला मदतच झाली असती. पॅटर्न्स आणि ते ब्रेक करण्याचे सुद्धा काही गाईड्लाईन्स आहेत. मात्र येकाच फोटोत सगळे घटक येकत्र मीळणे कठीण असते आणि उपलब्ध घटकांचा योग्य वापर करणे जास्त म्हत्वाचे.

चित्राला बॉर्डर करण्या बाबत वेगवेगळ्या विचारधारा आहेत त्याबाबत कधितरी लिहिन

अतिशय मस्त आणि उपयुक्त माहिती.

तुम्ही एक्पर्ट लोक वेळात वेळ काढुन इथे लिहिता याबद्दल आभार मानायलाही कसेतरीच वाटते... आभारापलीकडचे आहे हे सगळे.

धन्यवाद, पाटिलजी.. फोटोग्राफीविषयीचे माहीतीपुर्ण लेख केवळ अन केवळ यामुळेच मायबोलीमुळे मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली आहे Happy सर्वांचे धन्यवाद.

सावलीचे फोटोग्राफीविषयीचे माहीतीपुर्ण लेख, योगेश२४ , चंदन , गिरीविहार यांच्यासारखे फोटोग्राफर्स या सर्वांमुळे कोणीही फोटोग्राफीच्या प्रेमात पडेल.