''वाटतो जरी प्रसन्न मी वरुन''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 15 October, 2010 - 00:01

वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आत भरभरुन

झाकले उघड कसे करायचे?
ठेवले बरेच आज आवरुन

जिंकली असंख्य सौख्यसाधने
डाव जीवनात सारखे हरुन

धूम अश्व दौडतो मनातला
मी तसाच बांधतो पुन्हा धरुन

पोहणे न ज्ञात जाहले मला
जीवनात मी तरी असे तरुन

शुष्क भावना......... तरी तुझ्या सवे,
घाम का फुटे उगाच दरदरुन?

गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन

काळ यायची अवेळ जाहली
वाट पाहतो स्वतःस सावरुन

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन

काळ यायची अवेळ जाहली
वाट पाहतो स्वतःस सावरुन

हे खुप आवडले Happy

वा वा! कैलासराव,

चांगली गझल! आवडलीच! अभिनंदन! खालील शेर अधिक आवडले.

पोहणे न ज्ञात जाहले मला
जीवनात मी तरी असे तरुन

शुष्क भावना......... तरी तुझ्या सवे,
घाम का फुटे उगाच दरदरुन?

गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन

छानच!

-'बेफिकीर'!

>>जिंकली असंख्य सौख्यसाधने
>>डाव जीवनात सारखे हरुन
त्रिवार सत्य..

मस्त गझल केलीस, कैलास.

वाटतो जरी प्रसन्न मी वरुन,
दु:ख साचलेय आत भरभरुन

गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन

हे शेर फारच सुरेख. विशेषतः फुलाचा शेर अतिशय सच्चा आहे.
अभिनंदन ! Happy

क्या बात हैं डॉ. मस्त गझल...

सर्व शेर छान पण मतला आणि फुलांचा शेर विशेष आवडले...

<<जिंकली असंख्य सौख्यसाधने
डाव जीवनात सारखे हरुन<<<
खुप सुंदर डॉक!!! Happy

फुलाचा शेर खूप आवडला. अतिशय देखणी गझल. या संकेतस्थळावर, ज्यांच्या गझला वाचाव्या असे वाटते त्या मोजक्या गझलकारांत आपला समावेश आहे.मिल्या,ज्ञानेश्,बेफिकिर ,हबा ही आणखी काहीच नावे आहेत ज्यांच्या गझला''दर्जात्मक'' असतात. त्यात आपला समावेश आहे हे आवर्जून नमुद करतो.
आपले साहित्य प्रकाशित झाले आहे काय? असल्यास कृपया माहीती द्यावी.

खुप छान गझल.....
हल्लीच वाचायला लागली आहे....
अर्थही उलगडताहेत्...... आवडली....

सावरी

अमित्,भूषणजी,मंदार्,राजेश्वर्,किश्या,विजय पाटील्,सानी,कोमल्,आर्या,अनिल्,गणेश्,हबा,मुटेजी,अजयजी,स्मिता,देशी,सावरी.... आपले मनःपूर्वक आभार.

मिल्या,ज्ञानेश,... आपणां द्वयीस ही गझल आवडली याचा विशेष आनंद झाला. आभार.

बाळकवी,आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभार... माझे साहित्य केवळ इंटरनेटवरच प्रकाशित झालेय. नुकतंच
सीमोल्लंघन २०१०'' या गझल विशेषांकात्,माझ्या ५ गझल प्रकाशित झाल्या आहेत.

http://gazalakar.blogspot.com इथे आपण या गझल वाचू शकता. Happy

कौतुका,तुझे विशेष धन्यवाद. Happy

शुष्क भावना......... तरी तुझ्या सवे,
घाम का फुटे उगाच दरदरुन?

गंध काय आज जाणले जरी,
दु:ख जाहले फुलास कुस्करुन

काळ यायची अवेळ जाहली
वाट पाहतो स्वतःस सावरुन
हे लेखन आवडलेले आहे.
लिहा.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद रुणुझूणू.. Happy

मुक्तेश्वर्,धन्यवाद.

सम्यक नाना,आपले मनःपूर्वक आभार Happy