अरेच्या ! हे काय नविनच.. नात्यांच्या पलिकडे जाऊन काय शोधण्याचा हा प्रयत्न? हा तर निव्वळ वेडेपणा असच म्हणाल ना तुम्ही? मग मला सांगा तुम्हीतरी आज किती नाती टिकवली आहेत अन कुठपर्यंत? एखादी व्यक्ती येते आपल्या आयुष्यात अन त्या व्यक्तीचा स्वार्थ अन आपला स्वार्थ एवढेच काय ते एकमेकांना ओळखतात, सोबत राहतात, वेळ घालवतात अन मग एकदा का स्वार्थ संपला की त्या नात्याचा अर्थ लावण्याअधीच वेगळे होतात. मग काही दिवस जातात मतंरलेल्या लाघव वेळांच्या सानिध्यात अन ना ती व्यक्ती पुन्हा भेटते ना तो क्षण आठवांच्या पारावर पिंगा घालताना दिसतो. अरे हे तर ज्याला ओळखत नव्हतो, काहीच माहीत नव्हतं अश्या लोकांविषयी पण आपण ज्याला ओळखतो, जे आपल्या जन्माच कारण आहेत असे आपले आई-वडील ज्या नात्याला जगात सर्वश्रेष्ठ समजलं जातं असं नातं, पण आज त्या नात्यात कितीसा पारदर्शकपणा राहीला आहे? मुलांकडून ह्या नात्याची लक्तरे तोडली जाताना आपण रोज वृत्तमानपत्रात, बातम्यात ऐकतोच. "मुलानेच स्वार्थासाठी आई-बापाच्या खूनाची सुपारी दिली" , "आईनेच मुलाच्या त्रासाला कंटाळून ठार केले" , बापाच्या व्यसनापाई आईचा खून करून मुलाची आत्महत्या.. " शी.. किती निर्लज्ज गोष्ठ आहे ही.. ! जिथे रक्तच विषापेक्षाही जहाल झालं आहे तीथे रक्ताची नाती म्हणजे नागव्या देहाचा चापून केलेला लिलाव फक्त
आज रक्ताच्या नात्यांचा जो बाजार मांडलेला दिसतो ना त्यावरून एकच शेर॑ आठवतो..
रिश्तों कि इस नये दोर मे, यहा अपने ही दूर हो गये..
परायोंपर क्या करे विश्वास, जहाँ जज्बात हि कमजोर हो गये..
आज जखमांवर फुंकर घालायला तर सोडाच पण जखमांतून वाहणारं रक्त हे आपलंच आहे हे मान्य करायलाही काही जण नकारतात अन मग त्या जखमा भरेपर्यंत मने पार पार गोठून गेलेली असतात. आज सख्खा भाऊ वैरी बनतो फक्त कागदी नोटांच्या घोडेबाजारासाठी. दुर्दैव याचं गोष्टीचं वाटतं क्षणिक सुखाच्या या मृगजळामागे धावताना आपण काय सोडून धावतो आहे हे मागे वळून पाहण्याइतकी सुद्धा लाज उरलेली नसते आपल्यात. अरे असे असेल तर या दुनियेत अनाथ म्हणून जन्माला आलेलच बरं निदान नाती जोडण्याचा आनंद अन ती जपण्याच्या धडपडीतून जे सुख मिळतं ना ते देव भेटल्यावरही मिळणार नाही असच असतं अगदी.. पुर्वी नात्यांचा गुंता हा हवाहवासा वाटायचा, नात्यांच्या गोंधळातही मन रमायचं, सण उत्सव याचे खरे महत्व अन खरा आनंद फक्त अन फक्त नात्यांच्या एकत्र सानिध्यातून मिळायचा. आज मात्र सण आले कि दीपोत्सवाला अंगण नसतं, साजरे करायला घर असतं पण मुक्या भिंतींच, डोईवर छप्पर असतं पण या नात्यांच्या विभक्तीकरणाच्या अट्टहासापोटी ते केव्हाच जाळीदार झालेलं असतं मग दु:खात आसवांची रांग लागते ना तसं ते छप्पर केव्हाही उर बडवून भोकाड पसरत राहतं अन त्याला गप्प करायला कोणीच नसतं असतात फक्त डोळे मिटून स्वार्थ सुखाचे हिंदोळे घेणारे ते मानवी युगुलांचे असंख्य झोके अन छपराकडे पाठ करून चालणारे ते चाळे.. ! फक्त एवढ्यासाठीच हवी असते ना प्रायव्हसी..
आज एक होतकरू मुलगा मोठ्या शहरात स्वत:च्या कमाईचा एखादा ब्लॉक, सुगरण नसली तरी चालेल पण कमवणारी अशी बायको, सुट्टीच्या दिवशी काही तासांचा फेरफटका मारून येता येईल अशी एखादी बुडाखाली दोन चाकांची फटफटी अन रात्रीच्या वेळी कटाक्षाने पाळलेली ती कुटुंब नियोजनासाठी लावून घेतलेली अचूक सवय..! इथे आई - बाप गेले कुठे, भावंड गेली कुठे? मित्र - मैत्रिणींचा तो जुना रम्यकाळ गेला कुठे ? अहो, तुमच्याकडे आनंद आहे पण अमर्याद नाही, सुख आहे पण पारंपार नाही तुमच्या पिढिपर्यंत किंवा तुमच्या पिढीतच संपेल एवढंच सुख तुम्ही आयुष्यात मिळवणार असाल तर जन्माला येऊन तुम्ही असं मिळवलं तरी काय ? काहीच नाही ना? अरे सख्या बहिणीला राखी बांधायची असेल तर आज जमणार नाही ताई , एक काम कर तू राख्या पोस्टाने पाठव .. , अरे दादा मी परदेशात आहे ना रे,मग भाऊबीजेला नाही येऊ शकणार..
, "दादा, बाबा गेले तेव्हा तूला किती फोन केले, पण तू तुझ्या प्रोजेक्ट मधे असल्याने तुझ्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला रे" , अगं मला कळल्यावर खूप वाईट वाटलं बघ ना माझा प्रोजेक्ट सुद्धा सर्वोत्तम म्हणून सिलेक्ट झाला, कदाचित बाबांचीच इच्छा असावी" अरे गिधाडा, बापाने तुझ्या लाख इच्छा पुरवल्या पण तो जाताना त्याची शेवटची इच्छा सुद्धा तू पुरवू शकला नाहीस तर उभ्या आयुष्यात त्या आई-बापाच्या पोटी जन्माला येऊन काय कमवलस?
कोणीतरी म्हटलय ते खरं आहे ना " हळूहळू जग जवळ येत चाललयं, पण ह्या जगातली माणसं एकमेकांपासून दुरावत चाललीये" आज नवीन मित्र मिळवायचा झाला तर एका क्लिकवर मिळतो अन त्या मैत्री सोबत दोन-चार मैत्रीणीसुद्धा अगदी फुकटात मिळतात अन काही दिवस उधळत, हसत, खिदळत मैत्री टिकवण्याचा हट्ट चालतो पण उगाच एखादं प्लॅस्टीकचं मोरपिसं गाली फिरवून अप्सरा मनामधे भरली कि मैत्रींच्या झांजा वाजल्याच म्हणून समजा. मग रोज रोज न विसरता येणारे ते फोन कॉल्स आपोआप डायव्हर्ट होतात, रोजच्या शिव्या, रांगडं वागणं , कट्ट्यावरची ती रात्र जागरणं, उंच टेकडीवर सिगरेटच्या धुराच्या रेषा वर चांदण्या आकाशात काढण्याचं ते सगळं सगळं संपून जातं अन त्या नात्याला आडवा येतो तो फुगा. अहो फुगा कसला कंडोममधे हवा भरलेला एक गुब्बाराच तो. अजून किती फुगवायचा अन केव्हा फुटेल याचा नेम नाही पण केवढा मोठा फुग्गा ! हे समाधान मानून मन त्याच्याशीच खेळत बसतं, त्याच्यातच रमतं अन वेडं खूळं होतं, देहाकर्षणाच्या जाळ्यात मग आपल्यासारखा मासा अडकतो अन जाळं तुटण्याचं दुखः सहन करता येणार नाही म्हणून गुदमरून मरतो. तेव्हा प्रत्येकाने नात्यांच्या पलिकडे जाऊन प्रेम करावं, गोर्या रंगाचं, काळ्या केसांचं, चिकण्या सौंदर्याची स्थळे बाजूला ठेवून ऐकमेकांचं आयुष्य कसं फुलवता येईल, आयुष्यातले उणे कसे भरून काढता येईल, आपलं आयुष्य एकत्त्रित सांभाळता सांभाळता नात्यांच्या परीघात आणखी किती माणसे येतात याचा विचार करून त्या माणसांना आपलंस कसं करता येईल याचा विचार करायलाच हवा.
अन जमत नाही ना तुम्हाला ह्या सगळ्यात गुरफटायला तर सरळ सरळ त्यागाचा, समाज बांधिलकी जपण्याचा मार्ग स्वीकारावा. आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय राजकारणात जायचं काय? छे हो राजकारणात फक्त वस्त्रहरण चालते, तिथे नात्यांवर फक्त आकडे लावले जातात, आपला आकडा जिंकला तर आपण जुगार जिंकलो अन आकडा चुकला तर एका चांगल्या नात्याला मुकलो एवढेच चालते तिथे..
नाती टिकवायचीयेत ना मनापासून तर मग देशाशी नातं जोडा, सीमेवर लढणार्या जवांनाशी नातं जोडा, त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या आनंदाचं कारण कसं होता येईल याचा विचार करा. प्रत्येक अनाथ मुलांच्या संपर्कात राहणं कठीण जाईल तेव्हा एखाद्या तरी अनाथाचा नाथ होऊन आनंद द्विगुणित कसा करता येईल याचा विचार करा. नाते जोडायला मनुष्यदेहच लागतो हा विचार डोक्यातून काढून टाका. मुक्या प्राण्यांशी नातं जोडून त्यांच्यावर प्रेम कर करा, त्यांचे मुके संवाद जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मदर तेरेसा सारख्या स्त्रीने आयुष्यात आणखी काय केले? आज ती व्यक्ती खरोखर नात्यांच्या पलीकडे आपल्या मनात एक वेगळाच ठसा उमटवून गेली आहे. गुरू होता नाही आलं तर शिष्य बनून गुरु-शिष्याचं नातं अनूभवून पहा. वृक्षांवर, वेलींशी नाते जोडू पहा पण बांडगुळासारखं स्वार्थी नातं नाही तर निस्वार्थ नातं तेव्हाच ते नातं एका विशिष्ट संज्ञेच्या अन संकल्पनेच्या बाहेर पडेल अन अशी नाती बनवण्याचा अन ती जपण्याचा अत्यानंद आपल्या आयुष्यात अनुभवता येईल. पण अशी नाती जोडताना, आपल्या रक्ताच्या, मैत्रीच्या नात्यांना कधीच दुखवू नका.
कारण तशीही आता रक्ताची नाती अन दुधाचे दात यांची एकच व्यथा बनली आहे ती म्हणजे दुधाचे दात एकदा पडले कि परत ते दुधाचे म्हणून उगवत नाही अन रक्ताचं नातं जिथं मोडलं जातं तिथे पुन्हा ते सांधणं खूप कठीण होऊन बसतं.
तेव्हा काळोखाच्या डोहात बुडालेल्या ह्या नात्यांच्या संज्ञेला नात्यांच्या पलिकडचा असा सुर्योदय दाखवा की जो कधीच अस्ताला जाणारच नाही...
- सुर्यकिरण..
लेखनाचा गाभा तात्विक आहे!
लेखनाचा गाभा तात्विक आहे! आवडलं!
छान लिहीला आहे लेख प्रत्येक
छान लिहीला आहे लेख
प्रत्येक नात्याचे एक नशिब असते, त्याप्रमाणे ते वाढते, बदलते वा संपते. आपल्या प्रयत्नांनी किंवा इच्छेने (कितीही प्रामाणिक असली तरीही) तुम्ही ते आहे तसे टिकवू शकत नाही. आणि यात मित्रांपासून आई-वडीलांपर्यंत सगळीच नाती येतात>>>>>>>>>>>>>अनुमोदन.
कौतुक यांची ही पोष्ट पटली.
धन्यवाद सगळ्यांचे.. बित्तू,
धन्यवाद सगळ्यांचे.. बित्तू, दिनेशदा, रचू, श्री, विशाल... मलाही इथले प्रतिसाद पटतायेत पण मी ज्या अनुषंघाने विचार केला ती एक बाजू आहेच ना नात्यांच्या जाळ्यातली.
असोत, नात्यांविषयीचा आदर हा प्रत्येकाला असतोच, अन तो असावाच हे माझे प्रामाणिक मत.
आजकाल गाडी स्टेशन सोडते अन पुन्हा त्या स्टेशनावर येतेच, पण गाडीतली बहुंतांश माणसं स्टेशनं बदलतात याचं मला वाईट वाटतं.
आगाऊ आणि शिल्पा बडवे यांना
आगाऊ आणि शिल्पा बडवे यांना अनुमोदन.
जर घाई होत्ये लेखात निर्णयाप्रत यायला. Human lives are complex.
Pages