"" सीमोल्लंघन २०१० ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 24 October, 2010 - 04:12

ज्येष्ठ गझलकार डॉ.श्रीकृष्ण राउत यांना,बांधन जनप्रतिष्ठान्,मुंबई या संस्थेचा,गझल क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल,''जीवन गौरव'' पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. श्रीकृष्ण राउत यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

डॉ.राउत यांनी संपादित केलेल्या ऑनलाईन गझल विशेषांकात '' सीमोल्लंघन २०१० "' माबो वरील एक लोकप्रिय गझलकार श्री.गंगाधरजी मुटे यांच्या गझला समाविष्ट आहेत तसेच माझ्याही गझला अंतर्भूत आहेत.

हा अंक इथे वाचता येईल. http://gazalakar.blogspot.com

या संबंधी बातमी सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली आहे.

श्री.मुटेजी यांचेही अभिनंदन.

बातमी इथे वाचता येईल.

http://72.78.249.107/esakal/20101023/4683465695920189343.htm

गुलमोहर: 

डॉ.श्रीकृष्ण राउत , श्री गंगाधर मुटे आणि डॉक्टर कैलाश यांचे मनपूर्वक अभिनंदन. ब्लॉग वाचतच आहे, जेवढा वाचला तेवढा फार आवडला..

ज्येष्ठ गझलकार डॉ.श्रीकृष्ण राउत यांचे मनपूर्वक अभिनंदन.

.......

<< माबो वरील एक लोकप्रिय गझलकार श्री.गंगाधरजी मुटे यांच्या >>

डॉक्टर साहेब आभारी आहे पण....

दुधात जरा साखर जास्तच झाली असे वाटत आहे. कारण मला स्वतःला तसे अजिबात वाटत नाही,आणि तसे वाटण्याचे कारणही नाही. मी तसा गणित विषयाचा विद्यार्थी. आणि गणितात फक्त समिकरणांचा पडताळा असतो. "बाप दाखव नाही तर श्राध्द कर" अशा स्वरूपाचा. त्यात भावनेला किंचितही स्थान नसते. त्यामुळे "माबो वरील एक लोकप्रिय" हा शब्द मला हाजमोला घेऊनही पचण्याची शक्यता नाही. Happy

उदा. माबोबर १० हजारापेक्षा जास्त सभासद असावेत. त्यापैकी माझ्या विचारांशी जुळणारांची किंवा माझे लेखन रुचणार्‍यांची संख्या ५०० पेक्षा जास्त नाही. (आकडा कितिही फुगवून फुगवला तरीही)

परंतू माझे लेखन न आवडणार्‍यांची माबोबरील संख्या मात्र ५०० पेक्षा नक्किच जास्त आहे, यापेक्षाही जास्त संख्या अनुल्लेख करणार्‍यांची आहे.
शिवाय मला माझ्या लेखनीसह पाताळात गाडू इच्छीणारांची माबोबरील संख्याही बरीच मोठी आहे.

अशा परिस्थीतीत "माबो वरील एक लोकप्रिय गझलकार श्री.गंगाधरजी मुटे" हे वाक्य वस्तुस्थितीला धरून आहे, असे वाटत नाही. Happy

गंगाधरदादा, तुमचे साहित्य न आवडणार्‍या ५०० जणांपेक्षा तुमचे साहित्य आवडणारे ५ जण जास्ती महत्वाचे नाही का?
कोणी वाचो न वाचो त्यामुळे तुमच्या लिखाणाची प्रत गुणवत्ता कमी होणार आहे का? Happy