आता काही देणे घेणे उरले नाही
१) तृप्ततेची चमक
तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत
तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे
दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच
तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे
जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी
तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही
हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!
२) मर्यादा सहनशीलतेची
तू "काय रे" म्हणालास, मी "नमस्कार" म्हणालो
तू "चिमटा" घेतलास, मी "आभार" म्हणालो
तू "डिवचत" राहिलास, मी ''हसत'' राहिलो
तू "फाडत" राहिलास, मी "झाकत" राहिलो
माझी सोशिकता संपायला आली.. पण
मर्कटचाळे, तुझे काही सरले नाही
बस कर मित्रा, हा घे शेवटचा रामराम माझा
तुझे-माझे... आता काही... देणे घेणे.... उरले नाही
३) हे मृत्यो..!
जगायचे होते ते जगून झाले
करायचे होते ते करून झाले
द्यायचे होते ते देऊन झाले
घ्यायचे होते ते घेऊन झाले....!
हे मृत्यो..! तुला यायचे असेल तर ये
कधीही.....; तुझ्या सवडीने
तुला टाळावे असे आता कारण उरले नाही
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!
४) आयुष्याची दोरी
आयुष्याच्या दोरीची अंतिम किनार
माझी मला दिसायला लागली
जीव घाबरा अन् नाडी मंदावून
श्वासेही घरघरायला लागली
बराच पुढे निघून आलोय मी आता
रामनाम सत्याशिवाय काही उरले नाही
मोह,माया; मद,हेवा; काम-क्रोध यांचेशी
मला आता काही देणे घेणे उरले नाही
५) आत्मप्रौढी
मी फ़ूले मागितली, तू काटे दिलेस
फ़ुंकरी ऐवजी धपाटे दिलेस
तुझ्या पौरुषी अहंकारात
माझे अस्तित्वच नाकारले गेले
तुझ्या आत्मप्रौढी समोर
माझे आत्मक्लेश पुरले नाही
म्हणून मलाही तुझ्या अहंमन्यतेशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!
६) फ़टाकडी
तू आलीस आणि घुसलीस
हृदयाची सारी दारे ओलांडून
थेट ....... हृदयाच्या केंद्रस्थानी
तू असतेस..... तेंव्हा तू असतेस
तू नसतेस..... तेंव्हाही तूच असतेस
मला कसे एकटे म्हणुन सोडतच नाहीस तू
त्यामुळे.. हो त्याचमुळे....."त्या फ़टाकडीशी"
माझे आता, काही देणे घेणे उरले नाही.....!!
गंगाधर मुटे
..........................................................
सुंदर. मला २ , ३ ,५ जास्त
सुंदर.
मला २ , ३ ,५ जास्त आवडल्या
जबरदस्त आहे. -हरीश
जबरदस्त आहे.
-हरीश
सगळ्याच अफलातून
सगळ्याच अफलातून !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!:)
सर्वच कविता आशयाशी निगडित
सर्वच कविता आशयाशी निगडित आहेत.
विशेषत्वाने ३री आणि ५वी अधिक आवडली.
मस्त, सरजी
मस्त, सरजी
ह्या सगळ्या कविता गणेशोत्सव
ह्या सगळ्या कविता गणेशोत्सव स्पर्धेत पाठवल्या असत्या तर बक्षिस मिळालं असतं की हो मुटे.
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.
शर्विलकजी, गणेशोत्सव स्पर्धेत पाठवल्या होत्या. पण पुरस्कार एकाच कवितेला मिळणार असतो.
आणि परीक्षकाच्या नजरेत जी रचना सर्वोत्तम असते तीला पुरस्कार मिळतो.
सर्वांना पुरस्कार तर देणे शक्य नसते.
तुमचे प्रतिसाद हा सुद्धा पुरस्कार असतोच की.
अप्रतिम हि कविता तुमची काय
अप्रतिम हि कविता तुमची
काय प्रतिसाद द्यावे कळले नाही
तुम्ही कविता दिली, मी प्रतिसाद दिले
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!!!
--------
मुटेजी, एकदम झक्कास्स कविता... फोडतय....
वरचे प्रतिसाद निव्वळ मज्जा म्हणुन दिले.....
तसे तुमच्या कडुन आणि तुमच्या कवितेतुन घेण्यासारखे खुप काहि आहे...
त्यामुळे (देणे) घेणे उरले नाही बोलुन कसे चालेल....???
धनेषजी, तुम्ही दिलेले
धनेषजी, तुम्ही दिलेले प्रेम
अजून पावतर सरले नाही
मंग मीबी कसा म्हणू ब्बॉ की
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!!
मुटेसर, मस्त आहेत भारी
मुटेसर, मस्त आहेत भारी नाद्खुळा
सर्वच मस्त.
सर्वच मस्त.
मुटेजी, जबरदस्त ! खास कविता !
मुटेजी,
जबरदस्त !
खास कविता !
खूप छान !!
खूप छान !!
सर्वच कविता आवडल्या देणे घेणे
सर्वच कविता आवडल्या
देणे घेणे खुप आहे बाकी
सगळे कांही सरले नाही.
मुटे बक्कळ लिहीत रहा,
आजुन माप भरले नाही.
प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.
प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.
अर्थपुर्ण आणि प्रत्येक कविता
अर्थपुर्ण आणि प्रत्येक कविता आपला बाज राखुन आहे
सुरेख.
मुटेजी, आंतून आलेल्या सुंदर
मुटेजी,
आंतून आलेल्या सुंदर कविताना
पुरस्काराचं देणं घेणं उरलं नाही !!
अरे ही कशी वाचायची
अरे ही कशी वाचायची सुटली...
छान...वेगळी तुमच्या नेहमीच्या शैलीपेक्षा..
प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.
प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.
भाऊ, माझ्यासारख्या सामान्य माणसाला मायबोलीकरांनी प्रतिसाद देऊन कवी बनविले, यापेक्षा मोठ्ठा पुरस्कार कोणता असू शकतो.
http://ranmewa.blogspot.com/p/blog-page.html
गंगाधर मुटेजी !! छानच कविता
गंगाधर मुटेजी !!
छानच कविता आहे.!आणि आपण कविता छानच करता
आपल्या आजूबाजूच्या लोकांची पाठीवरची थाप
आपले मन फुलवते.मी आपणास काय सांगावे.?
आपणास खूप शुभेच्छा !!
छान !
छान !
सुंदर! कविता आवडली(ल्या)...
सुंदर!
कविता आवडली(ल्या)...
मुटे टच... आवडली...
मुटे टच... आवडली... आवडल्या...
खुप छान...... मस्त
खुप छान...... मस्त
प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.
प्रतिसादाबद्दल खूप आभारी आहे.
मुटेजी, ह्या सुन्दर कवितांना
मुटेजी, ह्या सुन्दर कवितांना प्रतिसाद सुध्दा तेवढ्याच
सुन्दर शब्दात द्यायला हवा, पण इतके सुन्दर शब्द
माझ्याकडे नाहीत. काय करू?
गंगाधर मुटेजी तुमचा प्रेमभंग
गंगाधर मुटेजी तुमचा प्रेमभंग झाला का
पण काव्य उत्तमच मरणाची घाई नको
मुटेजी, सब्कुछ बढिया
मुटेजी,
सब्कुछ बढिया