ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - अंतीम भाग - भाग २४

Submitted by बेफ़िकीर on 25 October, 2010 - 07:25

ओल्ड मंकची झिंग संपली. अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेले हे कथानक मुळातच मला अजिबात माहीत नसलेल्या 'होस्टेल लाईफ'शी संबंधीत होते. मायबोली प्रशासनाचा मी ऋणी आहे की हे कथानक मला प्रकाशित करण्याची परवानगी दिली. त्या सर्व वाचकांचा, प्रतिसादकांचा मी ऋणी आहे, ज्यांनी वेळोवेळी प्रतिसादातून / एस्.एम.एस्.मधून / दूरध्वनीवरून आधार दिला, तसेच ज्यांनी स्पष्टपणे प्रतिसाद दिले व ज्यांनी मनसोक्त टीका केली.

या कथानकात 'माणसांचा आधार' न मिळाल्यास एखाद्या मुलाचे काय होऊ शकते अशा विषयाबाबत लिखाण होते.

आशा आहे की शेवटचा पेगही ठीक वाटेल.. आवडल्यास, न आवडल्यास जरूर कळवावेत...

सर्वांचे पुन्हा मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

============================================

दुर्दैवी वळण!

या दोन शब्दांशिवाय आत्म्याच्या आयुष्याचे आत्ता इतर काहीही वर्णन होऊ शकत नव्हते. कितीही झाले तरी त्याचा अपराध तसा मर्यादीत होता व झालेली घटना फारच गंभीर!

आणि मिळालेली शिक्षा तर त्याहून!

पकडल्याच्या चवथ्याच दिवशी बुवा ठोंबरेंनी जमेल तितक्या वर्तमानपत्रामध्ये डिक्लरेशन दिले.

'आत्मानंद ठोंबरे या माझ्या मुलाशी मी माझे सर्व संबंध तोडत आहे. त्याने केलेल्या कोणत्याही गैरकृत्यास, कर्जास, उधारीस अथवा इतर कोणत्याही आर्थिक व्यवहारास मी जबाबदार नाही.

- कीर्तनकार बुवा ठोंबरे'

यावर आणखीन मीठ चोळले वार्ताहरांनी आणि पोलिसांनी! पोलिसांनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली व कित्येक तास सतत तयची चौकशी चालू ठेवली. धड आंघोळ नाही ना धड आहार ना धड व्यवस्था! आत्मा कोठडीत नुसता पडून होता. बोलावले की उठून आतल्या एका अंधार्‍या खोलीत जायचे अन शिव्यांची लाखोली वाहणार्‍या तीन चार खाकी वर्दीवाल्यांच्या भयानक चौकशीस सुचतील ती उत्तरे द्यायची!

पोलिसांनी कीर्तनकाराचा मुलगा असून तू असा कसा यावरून त्याची जहरी टिंगल केली. घरात बहीण असून असा कसा वागलास यावरून दम भरला.

मात्र, केवळ सव्वा महिन्यात आत्मा त्यातून सुटला. त्याच्यावर चोरून एका घरात प्रवेश इतकाही आरोप लागला नाही. त्यासाठी बुवा ठोंबरेंना झोळी प्रचंड रिकामी करावी लागली. नुसते जालनाच नाही तर जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, शिर्डी व बीड येथील यच्चयावत पेपरांमध्ये य आत्महत्येचा किस्सा मसालेदार पद्धतीने छापून आला होता.

नाटेकर काका मात्र अडकले. आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवला गेला.

आणि सव्वा महिन्याने पोलीस व न्यायालयीन अशा दोन्ही कोठड्यांचा बकाल व तिरस्करणीय अनुभव गाठीस घेऊन एका अत्यंत शुद्ध घराण्यातले हे दिवटे स्वतःच्या घरी परतले.

आजीने तोंड फिरवले. आजोबांनी उंबर्‍यातच कधी नव्हे ती खाडकन कानसुलात भडकावली. त्रिवेणीच्या नजरेत असलेला तिरस्कार आत्म्याला पाहवेनाच! आणि सर्व पातळ्यांवर मुलामुळे बदनाम झालेले कीर्तनकार बुवा ठोंबरे भकास नजरेने त्याच्याकडे पाहात म्हणाले..

"मेलास तू आजपासून या घराला.. ठोंबरे आडनाव लावू नकोस.. आणि आज, या क्षणी.. या घरातून तुला जे काय हवे असेल.. ते एकदाच घेऊन जा.. मी एका अक्षराने विचारणार नाही की सोने का घेतोस आणि पैसे कसे उचलतोस... मात्र एकदाच.. परत नाही... परत या घरात यायचे नाही... पाय ठेवायचा नाही... त्रिवेणीच्या लग्नाला फिरकायचे नाही... माझे नांव लावायचे नाही... आमच्याशी तुझा संबंध ... आजपासून संपला..."

सामान्यतः अशा परिस्थितीत रडू आले असते मुलाला, वडिलांच्या पावलांवर अक्षरश लोळण घेऊन त्याने माफी मागीतली असती...

... आत्म्याने नाही मागीतली.. आत्मा मान खाली घालून फक्त क्षणभर उभा राहिला.. पुढे होऊन आजी आजोबांच्या पावलांवर दोन्ही हात ठेवून नमस्कार केला... त्रिवेणीची अजिबात इच्छा नसतानाही तिच्या डोक्यावर थोपटले.. बुवा ठोंबरेंसमोर वाकताना मात्र त्याचा धीर सुटला.. त्याच्या दोन्ही हातांबरोबरच दोन दोन आसवेही पडली वडिलांच्या पावलांवर... आणि.. आत्मानंद ठोंबरे त्या घरातील सर्वात मौल्यवान वस्तू घेऊन.. कायमचे बाहेर पडले... आईचा फोटो... !!

आईचा फोटो छातीशी धरून आत्मा वाट फुटेल तिकडे चालत होता. कसे कुणास ठाऊक, खिशात तीनशे बहात्तर रुपये राहिलेले होते. कोठडीत राहूनही हे पैसे गेले नाहीत याचेच आश्चर्य वाटत होते त्याला! आणि कुठे जात आहोत, का जात आहोत याचे कसलेही भान नव्हते. पण अंतर्मनाने मात्र संदेश दिला होता..

... गुडबाय टू जालना...

जालना सोड तू! असा संदेश दिला होता. आपण जालन्यात असेपर्यंत बाबा एक क्षणही सुखाने जगू शकणार नाहीत आणि आपणही! सतत घराची आठवण येईल. इतक्या लांब जायचे की किमान एका रात्रीचा प्रवास केल्याशिवाय जालन्याला पोचताच येऊ नये! नकोच... नकोच ते घर ... जे आपण बाटवले. त्या दिवशीची सुधाची, म्हणजे नाटेकर काकूंच्या मुलीची ती नजर! कसली नजर होती ती! जणू गजांआड एखादा लांडगा पकडून ठेवला असावा तशी आपल्याकडे बघत होती ती! त्यात तिरस्कारही नव्हता, रागही नव्हता, काहीच नव्हते! होती फक्त एक भावना, जणू एखादे हिंस्त जनावर पकडण्यात यश मिळाले आहे पण ते पकडण्याआधी त्या जनावराने आपले आयुष्य बरबाद केलेले आहे.

आता तिला समजले असेल! की त्या दिवशी तिला आपला जो हेतू वाटत होता त्याहूनहीखरे तर हीन दर्जाचा हेतू होता आपला! अत्यंत हीन दर्जाचा!

एकच फक्त... फक्त एकच झाले असते तर किती चांगले झाले असते! फक्त, त्या दिवशी आपल्याला ती बुद्धी व्हायला नको होती.

पण ते झाले! आपले प्राक्तन हेच आहे. आजवर केलेल्या सर्व दुष्कृत्यांचे फळ मिळाले.

आत्मानंद?? तू आता एकटा आहेस! स्वतःच्या बापानेच जिथे तुला लांब केले आहे तिथे इतर कुणाची अपेक्षा ठेवणार???

'एक पुणे'!

हे दोन शब्द आपण का बोललो, कसे बोललो आणि पुण्यात जाऊन आपण नेमके काय करणार आहोत यावर विचार करायला आत्म्याच्या मनातील एक कोपराही उरलेला नव्हता. कंडक्टरने फक्त पैसे घेऊन तिकीट दिले आणि आत्मा सगळ्यात शेवटच्या सीटवर खिडकीपाशी बसला!

संध्याकाळचे साडे सात वाजलेले होते. ही गाडी व्यवस्थित गेली तर पहाटे अडीच वाजता शिवाजीनगरला पोचणार होती. म्हणजे रिक्षेतून रूमवर जायला सव्वा तीन! आणि मग... हजारो प्रश्नांची उत्तरे! तीही पटणार नाहीत. कुणी ऐकूनच घेणार नाही. दिलीप, अशोक आणि वनदास... हे तिघेही तीन प्रश्न बनतील स्वतःच!

धड झोपही लागत नव्हती आणि जागेही राहावत नव्हते. औरंगाबाद, तिकडचे पंढरपूर, वडाळा बहिरोबा करत करत रात्री सव्वा बाराला गाडी अहमदनगरला पोचली आणि ... आत्म्याच्या मनात विचार आला. कर्जत?? कर्जतला जावे? वन्याच्या आई वडिलांना भेटावे का? पण..कशासाठी?? त्यांना का त्रास द्यायचा?? असुदेत.. तिकीटही पुण्याचे काढलेच आहे... आता पुण्यालाच जाऊ! पैसे काय? कुणीतरी देईलच कॉलेजमधले!

आई! फोटोतील आई अजूनही हसतच होती. आणि, तिच्या डोळ्यातले ते भाव बघताना मात्र अचानकच...
... हळूहळू निघालेल्या व अंधार होत असलेल्या गाडीत आत्मा हमसाहमशी रडू लागला. आवाज कुणाला येऊ नये म्हणून शर्टचा बोळा तोंडात कोंबून!

आई! मी असा नाही आहे गं! असा नव्हतोच! पण झालो हे खरे आहे... तुझ्यापासून खूप खूप लांब राहिला ना नंदू! त्यामुळे ... त्यामुळे सगळे सगळे विसरून गेला... वाहवत गेला गं! आई... तू असशील तिथे.... असशील तिथे केवळ... केवळ एक आई आहेस म्हणून.. करशील माफ??? एकदा???

आत्म्याचा विलाप समजायला जागे कोण होते??

भरधाव चाललेल्या गाडीत मध्येच डुलकी लागलेल्या आत्म्याच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर नाटेकर काकूंचे ते भयाण आणि निर्जीव डोळे येत होते. मध्येच एखाद्या राक्षसाप्रमाणे दिसणार्‍या पोलिसाचा भयानक चेहरा आणखीनच भयानक होऊन कसलीतरी चौकशी करायचा! मध्येच काकूंच्या घराची बेल ऐकू येत होती... तर... मध्येच दिल्या फटके लावत होता.

"अय... ऊठ.. शिवाजीनगर आलं... "

कंडकटरचा हात खांद्यावर पडला अन पोलिसांच्या भीतीने आत्मा किंचाळत जागा झाला. खूप बरे वाटले त्याला! की तो हात कंडक्टरचा होता.

कसाबसा आईचा फोटो घेऊन आत्मा बसमधून बाहेर आला आणि रिक्षेवाल्याने हाफ रिटर्न लावून एकंदर एकशे वीस रुपये मागीतले!

अर्थातच आत्म्याने तो बेत कॅन्सल केला आणि शिवाजीनगरलाच सकाळी सहापर्यंत बसून राहिला.

पहिल्या पी.एम.टींने सात वाजता कॉलेजवर पोचलेल्या आत्म्याकडे काही चेहर्‍यांनी नेहमीप्रमाणेच पाहिले तर काहींनी आश्चर्याने! आणि शेवटी रूम नंबर २१४ आली.

सव्वा महिन्याने आत्मानंद ठोंबरे... जेथे त्यांच्या आयुष्याला असली वळणे लागायला सुरुवात झाली तेथेच पुन्हा उभे होते... आणि.. त्याला पाहून दिल्या, अशोक आणि वनदास... काही क्षण श्वास घ्यायलाही विसरले होते...

हा आत्म्या?? असा?? कित्येक दिवसात आंघोळ झालेली नसावी... तेच कपडे कित्येक दिवस अंगावर असावेत.. प्रचंड ओढलेला चेहरा... धड खाल्ले नसावे कित्येक दिवसात... डोळे भकास आणि खोल गेलेले.. आधीच्याच कृश अंगकाठीवर आणखीनच हाल झाल्याच्या खुणा! हा... हा आत्म्या???

आत्मा - ... नमस्कार... .... ... मी.... मी आलो.....

आत्मा सरळ आत येऊन स्वतःच्या पलंगावर बसला. सगळे बघतच बसले होते.

एक मिनिटभराने अशोकने विचारले..

अशोक - काय झालं?? केसचं???
आत्मा - सोडलं.. निर्दोष... हे कात्रण... पेपरचं..
अशोक - ... पण.. पण.. इथे .. कसा काय आलास??

खाडकन आत्म्याची नजर वर झाली. अशोक ती नजर पाहून शहारलाच! सगळेच शहारले. एका भयानक कालावधीतून तावून सुलाखून निघालेली नजर होती ती!

आत्मा - इकडे कसा आलो?? इकडे आलो कारण... आता.. हेच माझं घर.. हे दुसरं कात्रण पहा.. मला.. माझा त्याग केलाय माझ्या घरच्यांनी...

ते कात्रण तिघांनीही वाचले.

अशोक - .... मग.. आता???
आत्मा - ... आता इथेच...
अशोक - आत्मा... तुला माहीत नाही???

अशोकचा स्वर फारच गंभीर होता. काहीतरी फारच गंभीर ऐकावे लागणार याची आत्म्याला खात्री पटलेली होती. त्याने फक्त अपेक्षेने अशोककडे पाहिले...

अशोक - तुझ्या वडिलांनी.. इथले तुझे नांव काढले... या वर्षाची परिक्षाही देऊ शकणार नाहीस तू आता... कारण तीही वेळ गेली.. चवथ्या वर्षाला... तू इथे नाही आहेस आत्मा.. आता.. इथे तू राहूही शकत नाहीस...

दोन मिनिटे! पूर्ण दोन मिनिटे आत्मा चष्मा नसलेल्या डोळ्यांनी अशोककडे पाहात होता. होय! चष्म या सर्व महिन्या सव्वा महिन्यात कुठेतरी गेला होता. काही समजत नव्हते कुठे गेला. पोलिसांनी पैसे तसेच ठेवले असले तरीही चष्मा मात्र चौकशिच्या काळात कुठे गेला काही समजत नव्हते. आणि विचारल्यावर समजले की 'चष्मा विसर आता.. बापाकडून पैसे घेऊन नवा कर'!

आत्म्याला किंचित अंधुक दिसत होते. अंदाजानेच समजत होते! पण इतकाही प्रॉब्लेम नव्हता. पण जाड चष्मा असणार्‍यांना जर कुणी चष्म्याशिवाय पाहिले तर त्या माणसाचा खूप खूप वेगळा चेहरा वाटतो.

आत्म्याच्या लक्षात आता सगळेच आले होते. चवथ्या वर्षाची फीच भरली नव्हती बुवांनी! आणि दिलीप, अशोक आणि वनदासला सांगून ठेवले होते. तुम्ही जर त्याला काही मदत केलीत तर त्याच्या परतफेडीची अपेक्षा माझ्याकडून करू नका.

एखाद्या प्रेताप्रमाणे उठून उभा राहिला आत्मा! सगळ्यांकडे बघत म्हणाला..

आत्मा - नाटेकर काकूंना तसे पाहण्यासाठी गेलो होतो. त्यांनी आत्महत्या केली. भलत्याच प्रश्नात अडकलो. पण... त्याची शिक्षा मिळालेली आहे. आता मी ठोंबरे आडनाव लावू शकत नाही. बुवा हे नाव वडिलांच्या नावाच्या जागी लावू शकत नाही. मला एका पैशाचीही मदत यापुढे होणार नाही त्यांच्याकडून! त्रिवेणीला मी भेटूही शकत नाही. मी या वर्षी परिक्षेला बसू शकत नाही. मला सव्वा महिना अत्यंत भयानक परिस्थितीला तोंड द्यावे लागले. आता.. मला वाटले होते की माझी शिक्षा संपली असेल.. पण... तुमचे सगळ्यांचे चेहरे.. त्यावरचे भाव पाहून वाटते.. की आत्मानंद नावाची ही व्यक्ती... आता तुम्हाला नकोशी झालेली आहे.. हे खरे आहे ना???

तिघेही त्याच्याकडे पाहात होते. पण 'छे रे, असे काही नाही' असे कुणीही म्हणत नव्हते.

आत्मा - मिळाले उत्तर! तुमच्या तिघांना अडचणीत आणणार नाही. आत्मानंद... निघाला.. जाण्यापुर्वी एकदा.. फक्त एकदाच... मी या क्षणी कितीही अस्वच्छ असलो तरीही... एकदा मिठी माराल?? ज्या तीन वर्षांच्या मैत्रीमधून माझ्यात आमुलाग्र बदल झाले.. ज्या मैत्रीसाठी मी अलका देव यांनाही सोडायची तयारी दाखवली.. अशा तुमच्या जुन्या मित्राला.. एकदाच मिठी माराल??

नो वन! नो वन रिस्पॉन्डेड! कुणीही उठले नाही.

अत्यंत जड पावलांनी आत्मा निघाला होता. तेवढ्यात कानावर शब्द पडले.

"आत्मा... मी तुला एकदा वचन दिले होते... आयुष्यात केव्हाही मदत लागली तर मला आवाज दे... 'नाही' हा शब्द ऐकू येणार नाही... मी.. मी आज तुला एक हजार रुपये देत आहे... त्या पैशातून तू काहीतरी चांगली व्यवस्थ कर... त्यानंतर मात्र... मी दिलेले वचन संपले.. यानंतर माझ्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस... "

दिलीप राऊत! आत्म्याला पाठमोरा असतानाच त्या आवाजातील अगतिकता समजली. एका गुन्हेगाराची सोबत कुणालाच नको होती.

आत्मा - धन्यवाद राऊत.. फक्त एकच विनंती आहे.. हे हजार रुपये... मला.. मला आज तरी नको आहेत.. फक्त... मी... एक दिवस.. एकच मदत मागेन.. ती मदत पैशाचीच असेल असे नाही... ती मदत आपल्याला कोणतेही गैर कृत्य करायला भाग पाडणारी नसेल.. ती आपल्याला सहज शक्यही असेल... पण.. ती.. ज्यावेळेस मागेन... तेव्हा कराल काय??? तेवढी मदत???

तो काय बोलला आणि त्या बोलण्याची ग्रॅव्हिटी काय आहे हे डोक्यात शिरण्याच्या आधीच...

..... आत्मानंद ठोंबरे कक्ष क्रमांक २१४ मधून ताडताड बाहेर गेलेले होते...

रशिदाचे अशोकशी इतक्या विरोधानंतरही जमवून देऊ शकणारा... दीपा आणि वन्याचे जमवणारा.. दिलीप आणि सुरेखाचेच काय तर दिलीपचे त्याच्या स्वतःच्या आईशी जमवून देणारा... स्वतःच्या अभ्यासामुळे इतरांनाही उत्तीर्ण करणारा... या मैत्रीसाठी स्वतःच्या प्रेमावर पाणी सोडायला तयार होणारा आत्मा... आज एकटा बाहेर निघाला होता...

कुणीच नसणे म्हणजे काय याचा अनुभव घेत!

जगात आपले कुणीही नसणे... !!!!!

=============================================

१४ जून, १९९५!

तीन वर्षे झाली त्या घटनेला!

आता बरेचसे लागीलाग लागलेले आहे.

अशोक पवार सॅंडविक कंपनीत काम करतो. सिनियर इंजीनियर - प्रॉडक्शन म्हणून! तो आणि रशिदा आता धनकवडीमध्येच राहतात! तिची आई मात्र गेली. अशोकच्या घरचे सगळे आहेत. ते अधूनमधून येतात इकडे! आजूबाजूच्या घरांमध्ये या जोडप्याबद्दल आधी जरा कुतुहलच होते. पण रशिदाचा हसरा व मनमोकळा स्वभाव आणि अशोकचा दिलदार स्वभाव यामुळे शेजारी पाजारीही आता छान वागवतात यांना सर्व सोहळ्यांमध्ये यांना निमंत्रण असतेच! फ्लॅट दोन खोल्यांचाच आहे, पण स्वतःचा आहे. आणि हो, अशोकच्या भावाला मुलगा झाला त्याला दोन वर्षे झाली... पण... अशोकच्या स्वतःच्या घरी कालच गोड बातमी मिळाली आहे.. आजही दोघेही संध्याकाळचे फिरायला म्हणून मोटरसायकलवरून बाहेर पडले की हमखास अशोक कॉलेजच्या रस्त्यावरून फिरून आणतो तिला! रोज! आंगन आता खूपच दर्जेदार झाले आहे. अंजुली मात्र बंद पडले. कॉलेजही आता खूप मोठे झाले आहे. मात्र! हॉस्टेल होते तसेच आहे. रोज हे सगळे पाहून अशोकला आठवते...

"शिक्षणाच्या हेतूने प्रेरित होऊन मी येथे आगमन केले आहे व मला हा कक्ष मिळाला आहे... तर मी आता... काही मूलभूत मतभेद नसले तर... या कक्षात आपल्या सर्वांच्या संमतीने.. पाय ठेवू का???"

"यांना मानसोपचाराची गरज आहे... ते भिंत दिसली की असे करतात..."

"पण.. भिंत तर कुठेही असणारच की??"

"तेच... तेच त्यांना क्लीअर होत नाही आहे अजून..."

"बरी लागते तशी.... नाही?????"

खळ्ळकन डोळे भरतात अशोकचे मोटर सायकल चालवता चालवता! मग.. हळूच रशिदाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने पुढे बसून अशोक उजव्या मनगटाने डोळे पुसतो..

" आता या रेश्माताई राहणार आहेत का इथे काही दिवस?? "

"सुवर्णा मॅडम या शिक्षिका आहेत... आपण त्यांचा आदर ठेवायला हवा..."

"... त्या .. त्या अलका देव आहेत ना... त्यांच्याबद्दल बोलतोय मी..."

"बाहेर बघा... आपल्या मातु:श्री खुद्द आलेल्या आहेत राऊत..."

"रशिदा.. मला सारख्या हासत होत्या.. माझी ही भाषा.. इतकी हास्यास्पद आहे.. पण.. त्यात माझा काय दोष????"

मग अशोक हळ्च उलटा वळतो आणि घरी पोचतात दोघे! आता येणार्‍या बाळाची स्वप्ने रंगवणे हा मोठाच कार्यक्रम असतो... भयंकर काळजी घेतो रशिदाची तो...

"माणसाला जगायला चारच गोष्टी लागतात.. हवा.. पाणी... मद्य ... आणि धुम्रकांडी..."

हसून अशोक झोपून जातो. हवा आणि पाणी ठीक आहे.. पण.. मद्य आणि धुम्रकांडी अजिबात नाही लागत! मी कुठे घेतलीय तीन वर्षात?? अजिबात नाही... स्पर्शही नाही केलेला...

मात्र! दर शनिवारी दिल्याला आणि वन्याला फोन मात्र करतो अशोक! शेवटी.. इतकी गाढ मैत्री आहे म्हंटल्यावर.. तेवढे तरी होणारच ना??

आत्म्याला शोधावे असे मात्र अजिबात म्हणजे अजिबात वाटत नाही. विकृत साला! घाणेरडा नीच माणूस होता! कसा काय अशा घरात जन्माला आला काय माहीत!

आपण आपल्याला मुलगा झाला तर त्याला कधीही हॉस्टेलवर पाठवायचे नाही. अजिबात म्हणजे अजिबात!

पण... चवथ्या वर्षी आपण... जेमतेम मार्क्स मिळवून पास झालो... तेही त्याच नालायकामुळे.. कारण तो रूममध्ये जोरजोरात वाचायचा नाही ना..आपला आपण अभ्यास केला... वन्याचेही तेच साल्याचे.. आणि दिल्या?? तो तर पास कसा झाला हे गौडबंगाल समजतच नाही.. बहुधा 'एकदाचा हा बाहेर जावा' म्हणून पास केला की काय त्याला असेच वाटते...

अरे हो! दर दोन महिन्यातून करतो तसा एक बुवांना आणि त्रिवेणीला फोन करायला हवा! मागच्याच वेळेस म्हणत होते.. हिला पुण्यातले एखादे चांगले स्थळ असले तर बघा म्हणून... आत्म्याचे मात्र नांवही निघत नाही फोनवर!

आत्मा... असेल कुठे पण???? की.... नको.. असला विचारच नको मनात यायला.. जिथे असेल तिथे.. जिवंत आणि समाधानी असूदेत भो***!

असे कसे वाटते पण आपल्याला?? खरच.. जान होता जान रूम नंबर २१४ ची तो म्हणजे! अक्षरशः जान! काय ती भाषा, काय ते सोंग, काय ते पिणे! भर परिक्षेच्या काळातही प्यायचं लेकाचं! अचाट माणूस! मेला नसावा एवढीच इच्छा!

रशिदाला तर चालतंच नाही त्याचं नांव काढलेलं! अबोलाच धरते! आता हिला काय सांगायचं! नोकरी, नोकरी आणि नोकरी! इतकेच आयुष्य राहिले आहे आता आपले! घरी यायला वाजतात रात्रीचे नऊ! तोवर रशिदा हिरमुसलेली असते. सकाळी साडे सातला निघावे लागते. प्रमोशन घ्यायला पाहिजे या वर्षी! आपल्याला मूल होणार म्हंटल्यावर! काय लाईफ आहे सालं! आणि ते?? ते काय लाईफ होतं! रशिदाबरोबर आनंद भेळ वाल्याकडे फक्त तीन भेळींवर दिड तास काढायचा! रूमवर परत आल्यावर लगेच धिंगाणा सुरूच!

"मला ओल्ड मंक लार्ज... ऑन द रॉक्स..."

दिल्याचा आवाज घुमला की पाठोपाठ चकणा, कांदे आणि सोडा फुटायचा!

"आपण आत्ता त्यांना इतक्या वारंवारतेने भेटल्यावर विवाहानंतर काही उत्सुकताच राहणार नाही असे नाही का वाटत आपल्याला????"

"चीअर्स.... "

लग्न झाल्यानंतर रशिदाला सांगीतलं आपण! तुझे कपडे त्या दिवशी आत्म्यानेच चोरले होते. आत्यंतिक स्वरुपाचा तिरस्कार दिसला तिच्या डोळ्यांमध्ये! नंतर कितीही सारवासारवी केली तरी तो कमी होईना!

काही म्हणा... आत्मा तो आत्माच! तसा माणूस पुन्हा पाहिलाच नाही.. होतं हे एवढसंच... पण अफाट प्यायचं... अफाट बोलायचं.. त्याची एकट्याची खेचणे या एकमेव विरंगुळ्यावर तीन वर्षे काढली आपण कॉलेजची! शेवटचं वर्ष इतकं अभद्र आणि घाणेरडं गेलं की काय बोलावं! वन्या तर शब्द काढायचा नाही रूममध्ये!

किती बेदरकार, बेफिकीर आयुष्य ते! आत्म्या म्हणालाच होता एकदा... दहा वर्षांनी अशोक यांना लामखडे भेटतील रस्त्यात... मग दिलीप यांचा विषय निघेल.. शपथ चालूच... आत्मा कुठे असावा यावर अंदाज वर्तवतील... शपथ चालूच... आणि मग एक दिवस... सगळे मिळून.. सारसबागेत तेरा वर्षापुर्वी दिलेल्या शपथा विसरतील... आणि मग पुन्हा... ओल्ड मंकचा एक खंबा फुटेल... चीअर्सची आरोळी घुमेल.. तेव्हा आत्मा... कोणत्यातरी देशी दारूच्या दुकानात...

पटकन अशोकने विचार थांबवले काल! नकोच ते विचार! साला आयुष्यावर व्यापलाय आपल्या! रशिदा आपल्याला मिळवून दिली... आणि शपथ घेतल्यापासून एकदा म्हणजे एकदा साधे तोंडही दाखवले नाही.

खरंच... जिवंत असेल ना?? की.....???????

आणि... दिल्याकडे तो... मागणार काय होता??? कुणास ठाऊक!!!
===============================================

"सुरेखा... गाडी अन ड्रायव्हर तूच घेऊन जा.. रोहन बरोबर आहे तुझ्या... मी जातो आपला बुलेटवरून..."

तेच ते राकट, पुरुषी आणि गोरंपान सौंदर्य! गणेशनगरमधील आपल्या बंगल्यामधून तुफान वेगाने बुलेट चालवत धनंजय राऊत उर्फ दिलीप उर्फ 'दिल्या' निघाला आहे. आई केव्हाच गेल्या! आता राजा, राणी आणि राजपूत्र! रोहन! वय वर्षे पावणे दोन!

कोल्हापूरचे सगळे वैभव तसेच ठेवून दिल्याने इकडे एक बंगला घेतला आणि टेल्कोच्या व्हेंडर्सकडून वेल्डिंगची कामे मिळवली अन भोसरीत युनिट टाकले. आश्चर्य म्हणजे क्रोन्हे मार्शल कंपनीत वन्या गेले तीन वर्षे आहे! तीच भोसरी एम. आय्.डी.सी.! पण दिल्या तिथेच असून दोघे सहा सहा महिन्यात काय वर्षातही भेटत नाहीत. वन्याला शेवटचे भेटूनच आता दिड वर्ष झाले होते. मात्र फोन असतो रेग्युलर!

आज त्याला कात्रज घाटापलीकडे असलेल्या शिंदेवाडीतील एका व्हेंडरचे थकलेले पेमेंट काढायला जायचे होते. लांब जायचे म्हणून कार घेऊन निघाला तर सुरेखा म्हणाली तिला डेक्कनला जायचे आहे. आम्हाला जाताना सोड आणि येताना आम्ही रिक्षेने येऊ! पण रोहन आणि अनेक पिशव्या एवढे घेऊन रिक्षेतून येणे बरे नाही म्हणून दिल्याने कार आणि ड्रायव्हर सुरेखासाठी ठेवले आणि... बुलेटने स्वारगेटला पोचला तेव्हा...

'च्यायला आत्म्याच्या बापाला इथे सोडला आपण त्या रात्री... अन आला की लेकाचा तासाने परत रूमवर.. म्हणे पिशवी बदललीय... पण.. तेव्हा आत्म्या पीतच नव्हता खरे तर... प्यायचो आपण.. तो उगाचच बदनाम झाला बापाकडून...'

'हां! हीच ती बिल्डिंग... अश्क्या इथे राहतो नाही का?? रशिदा कॅरिंग आहे म्हणे.. चला.. एकेक जण लागतोय संसाराला म्हणायचा.. आपण तरी काय?? सिंह होतो सिंह... आता गळ्यात पट्टा बांधलेला पॉमेरियन झालो आहोत... कशाला लग्न करतात लोक काय समजत नाही... रोज नवीन प्रश्न... आज रोहनला असं होतंय.. उद्या मला तसं होतंय.... प्रेम.. नुसतं प्रेम... एक प्रेम असतं ज्यासाठी माणूस हे सगळं सहन करत असतो... पोपट झालो आहोत आपण पोपट... सुरेखा करेल ते खायचं.. एक थेंब दारू प्यायली नाही तिच्यायला लग्नापासून... साधी विडी नाय ओढली तर??? '

'आलं... आलं आपलं कॉलेज.. इथेच हायवेवर अंजुली ढाबा होता.. पाडला आता.. कसला भन्नाट अपघात घडवला आत्म्याने त्या गुण्याला... पडलंवतं हॉस्पीटलमध्ये महिनाभर... काही म्हणा.. हे असलं तर आपल्यालाही जमलं नसतं... आत्म्या म्हणजे आत्म्याच... आपला मार खायचं तरी पोपटागत बोलतच बसायचं... अन काय ते पिणं... एकदा तर चक्क दोन क्वार्टर पिऊन ब्येणं निवांत चालतंय.. हा भो*** कल्याणी ऑटोवाला आज पेमेंट काढतोय का नाही?? नाहीतर बसूनच राहायचं तिथे... कटकट आहे कटकट संसार म्हणजे... काय आयुष्य होतं ते... सुरेखा नुसती खिडकीतून लांबवर दिसली तरी अख्खा दिवस मस्त जायचा... आणि ति प्रसंग???? "बाहेर बघा... तुमच्या मातु:श्री आल्या आहेत"... आहाहाहाहा... आई.. गेली बिचारी... बापाने कधी सुख दिलं नाही.. पण... निदान आपण तरी देऊ शकलो... पण.. आपण देऊ शकलो त्याला कारणीभूत तो हरामखोर आत्माच...'

'गेलं मागे कॉलेज... आता काही वेळाने घाट येईल.... मा**** गुणे... इथे घालतोस होय पाठीत गज माझ्या?? आं?? तुला आत्म्याने ढकलला तेव्हाच मरायला हवा होतास तू... हल्ली म्हणे मुंबईला असतो... काहीतरी नोकरी करतो... काय ती दुष्मनी... काय ते लाईफ...'

'अरे?? हे शिर्केचं घर नाही का?? विसरलोच होतो आपण.. डॉली.. बापाच्या सांगण्यावरून धडकली आपल्याला.. हा हा हा हा.. काय बाप आणि काय तितकीच निर्लज्ज मुलगी... त्याही दिवशी... रूमवर... आत्म्यानेच तेल लावले होते आपल्याला... आपण काय लावले त्याला??? व्यसन... व्यसन लावले... '

'आत्मा, आत्मा, आत्मा... डोक्यातून जात का नाही हा माणूस?? सुरेखाला तर त्याचे नांवही घेतलेले खपत नाही तोंडाने... पण.. अगदी .. म्हणजे अगदी मनापासून जर विचार केला तर... आत्म्याने.. आपला काय नुकसान केलेले होते??? आणि... मदत काय काय केली होती??? तो प्यायचा... ठीक आहे... तो नाटेकर बाईच्या घरात विकृतासारखा घुसला.. ठीक आहे.. आपले नुकसान काय?? आपल्याला तर भडव्याने कायम मदतच केली.... आला एकदाचा घाट... आपल्याला तर मदतच केली त्याने.. आई मिळवून दिली.. सुरेखा मिळवून दिली... चौकीवर खोट्या आरोपात मारले तेव्हाही त्यानेच रुग्णसेवा केली.. तिच्यायला रुग्णसेवा.. अजून त्याची भाषा तोंडात बसली आहे.. काय ती भाषा.. म्हणे त्या अलका देव आहेत ना.. त्या मला आवडतात.. अलका कुठे असते काय माहीत... पण.. मूळ प्रश्न असा आहे की...

.... आत्मा कु... कुठे असतो... की... ... की... तो... नाहीच आहे... आता??????

आणि... एकदाही आला कसा नाही भेटायला...काय मागणार होता तो आपल्याकडे???'

भर कात्रज घाटात दिल्यासारखा माणूस हेलावला.

=============================================

"रशिदाला दिवस गेलेत... आज फोन आला होता.."

"हो का? अरे वा? अश्क्याला पार्टी मागायला पाहिजे.. पण.. मला काय वाटतं दीपू... आता... आता तरी तू नंबर लावायला हवास..."

"ए चल्ल... आला लाडात... आई आहेत अजून घरात..."

वन्याचे वडील गेल्यावर आई आणि वनिता पुण्यातच आल्या होत्या. चिंचवडला एका दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये वन्या राहात होता आणि वनिताचे लग्न ठरवण्याच्या खटपटीत होता. सोने परत करण्याचा शब्द दिल्यामुळे पगारातील बराच भाग तो सेव्हिंगलाच टाकत होता. आई फक्त दिवसातून दोन वेळा देवळात जाऊन यायची तेवढेच! इथले ट्रॅफिक तिला सोसायचेच नाही. वनिता मात्र एका लायब्ररीत कामाला होती. महिना पंधराशे तिलाही मिळायचे.

"आधी बहिणीच्या लग्नाचे बघ... मग आपला संसार.."

"तू तिचा इतका तिरस्कार का करतेस?

"तिरस्कार कसला आलाय? मला नाही आवडत सारखी गाणी ऐकणं या वयात.. वयाला शोभेलसे राहायला नको का? आणि आई त्यात आणखीन.. आत्ताच म्हणे तिचं वय आहे... एकदा लग्न होऊन सासरी गेल्यावर कोण करणार आहे लाड?? मग आमचे काय माहेरी लाड झाले होते?? मला काय असली बोलणी समजत नाहीत??? तू असतोस कंपनीत.. इथे या दोघी माझं डोकं खात असतात... सतत तो रेडिओ नाहीतर टेप लावलेला... आणि यांचा जप.. दोघीतली एक मला मदत करत नाही... मी म्हणजे काय कामासाठी लग्न करून आणलेली बायको आहे का?? आणि हे सगळं परत आपल्याच पैशांवर..."

"दीपा SSSSSSSS"

"ओरडतोस कशाला?? काय खोटं बोलले??"

हातातला पेपर आपटून वन्या बिडी मारायला बाहेर निघून गेला. दीपाचे आणि त्याचे लग्नानंतर एकदा कडाक्याचे भांडण झाल्यानंतर त्याने स्पष्ट सांगून टाकले होते. तू अशी वागणार असलीस तर माझ्यावर बंधने आणायची नाहीत. आणि तेव्हापासून तो आठवड्यातून एखादवेळेला ड्रिन्क घेत होता आणि स्मोकिंग मात्र रेग्युलर करत होता. फक्त घराच्या बाहेर्करत होता घरात आई असल्यामुळे!

हे रोजचंच झालं होतं! वनितावरून दीपा भांडणे काढायची! ते कॉलेजमध्ये असतानाचे प्रेम वगैरे सगळे संपलेले होते. केव्हाच! आता चालू होता फक्त संसार! लग्नानंतर आबा वारला आणि आई आणि बहिणीला वन्याला इकडे आणावेच लागले. वनिता ग्रामीण भागातिल असल्याने तिचे लगही पटकन ठरत नव्हते. आता वीस वर्षाची होती ती!

आणि त्या दोघींच्या उपस्थितीत संसार रेटायला लागल्यामुळे दीपा कायम वैतागलेली होती. त्यातल्या त्यात अधेमधे रशिदा आणि सुरेखाचा फोन यायचा आणि कॉलनीतही एक मैत्रिण झालेली होती हे सोडले तर तिला आता काही आयुष्यच उरलेले नव्हते.

वन्या बाहेर आला आणि नेहमीच्या चहाच्या टपरीवर गेला.

'काय लाईफ आहे सालं... सारखीच ही वैतागणार... काय कविता केली होती आपण?? हां.. म्हणे तुझे डोळे कमळासारखे आणि हात पाहून टिळकांच्या मार्गावर जायची स्फुर्ती मिळेल... बकवास नुसता.. त्यावेळेस फार सिरियस होतो आपण कवितेच्या बाबतीत.. आत्मा एकटाच आपल्याला सहाय्य करायचा.. तिच्यायला.. काय शब्द बसलेत तोंडात.. म्हणे सहाय्य.. आपण साधं हेल्प किंवा मदतही म्हणू शकत नाही.. आत्मा एकटाच आपल्या बाजूने.. दिल्या बडवून काढायचा.. पण.. किती गोड वाटायचा तो मारही आपल्याला.. ती... ती कविता... दीपाला आत्म्याने दाखवली होती... नालायक माणूस.. नसती दाखवली तर ही असली भांडकुदळ बायको आपल्या नशीबी.. छे.. काय विचार करतोय आपण.. तिच्याही कलाने घ्यायलाच पाहिजे.. आपलं माहेर सोडून आपल्यासाठी इकडे आलीय ती.. आपली आई आणि बहीण आपल्याला जेवढ्या प्यार्‍या आहेत तेवढ्या तिला कशा असतील?? एकदा समजूत घालायला पाहिजे तिची... स्साला.. समजूत घालायलाही आत्माच बेस्ट होता कुणाचीही.. अश्क्याच्या बापाला आणि मोठ्या भावाला कसला फिरवला होता अक्षयमध्ये रशिदासाठी.. तेच काय?? स्वतःच्याही बापाला लेक्चर दिलं साल्याने... आणि... आपल्याही बापाचे मत बदलवून दाखवले आईबद्दल.. ग्रेट.. ग्रेट माणूस.. केवळ ग्रेट... काय प्यायचा.. काय बोलायचा.. खरे तर.. असे का होते कुणास ठाऊक.. पण... अशोक आणि दिल्याची येत नाही तेवढी आठवण आपल्याला... आत्म्याची का येते??? ... बरोबर... कारण तो नेहमी आपल्या चांगल्याचेच बोलायचा.. आपले चांगलेच पाहायचा.. तो नसतानाचे शेवटचे वर्ष किती भकास गेले होते रूमवर.. कोण कुणाशी बोलत नाय.. काय नाय.. भिक्कार गेले ते वर्ष..आत्मा म्हणजे जान होता जान रूमची... कुठे असेल?? की?? ... न... नसेलच??? बुवांनाही भेटलेला नाही.. अश्क्या अन दिल्याला तो नुसता दिसला तरी पहिला फोन आपल्याला करतील भो***... आणि.. आपल्यालाही भेटलेला नाही.. आपण.. आपण आत्म्यासाठी काहीही केले नाही.. त्याने मात्र... जे काय केले.. ते फक्त आपल्याचसाठी केले.. नालायक होता साला नालायक.. त्या नाटेकर बाईच्या घरात कशाला घुसला काय माहीत.. आपलं वय काय.. आपण काय करतोय.. अक्कलच नाही काही... गेला अटकेत.. हेच होणार असं केलं की... काय म्हणायचा तो?? हां! जेवढ्या धुम्रकांड्या गार वार्‍यात पेटू शकल्या तेवढ्याच ओढल्या.. काय जगायचा... मस्त.. आपण बसलोयत... संसारात मन मारून.. खरे आहे राव.. तेही एक आयुष्य होतं...

पण तो... दिल्याकडे... काय मागणार होता??? समजत नाही.. कधी मागीतलेही नाही...

==============================================

काय साली भिकारचोट माणसे असतात.. फुकटची मिळते म्हणून एवढी?? एवढी प्यायची?? आणि मग.. इथेच ओकणार.. इव्हिनिंग पार्क... झालं की व्हॉमिटिंग पार्क...

"ए... ए संद्या चु**.... हे उचल.. चल उचल हे...टाक तिकडे... "

पटवर्धन बागेमागे झालेल्या प्रचंड मोठ्या रस्त्यवर झालेले इव्हिनिंग पार्क हे हॉटेल हे एक प्रतिष्ठित बार आणि रेस्टॉरंट होते. अती उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू असेच लोक येथे यायचे. किवा बिझिनेसमेन! किंवा मग कॉर्पोरेट डिनर आयोजीत व्हायचे! टायमिंग संध्याकाळी सात ते रात्री दिड! दिड म्हणजे काय? समजा एखादा दोन वाजता निघाला तर दोन! गिर्‍हाईकाला कसे म्हणणार आता जा म्हणून! हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ना?

पार्किंगला भरपूर जागा आणि अत्यंत थंडगार हवा आणि भरपूर प्रशस्त लॉन! इव्हिनिंग पार्कचे युनिक सेलिंग प्रपोझिशन एक, म्हणजे युनिक नव्हते! तीन होती! एकमेकांच्या डोळ्यांमध्ये डोळे मिसळून तासनतास बसलेली आणि कॅन्डल लाईटमध्ये जेवणाकडे दुर्लक्ष अधिक करणारी जोडपी, तावातावाने बोलणारे बिझिनेसमन लोक, उच्च पातळीवरचे अधिकारी जे कंपनीच्या पैशाने पिता येत आहे म्हणून उल्टी होईस्तोवर प्यायचे आणि एखादाच.. खूप खूप श्रीमंत माणूस.. जो एकटाच यायचा.. कारण भग्नहृदयी असायचा...!!!!

आत्मानंद! सॉरी.. ठोंबरे नाही! नुसताच आत्मानंद! येथे कॅप्टन झाला होता दिड वर्षात! दिड वर्षापुर्वी कसाबसा येथे 'वेटर' म्हणून नोकरीला लागला. गंमतच होती सगळी!

रूममधून निघाला आणि सारसबागेत जाऊन बसला. खिशात उरलेले होते दोनशे चाळीस रुपये! यात किमान तीन ते चार दिवस पोट तरी सहज भरले असते. पण झोपणार कुठे??

अर्थातच, सारसबाग! आणि उठवलं की पोलिसाने रात्रीच! "चल्ल, हितं झोपायला धर्मसाळाय होय रे ***??"

बिचारा आत्मा! स्वतःच्या दुष्कृत्यांमुळेच या पातळीवर आला होता. तरीही.. या क्षणीमात्र तो 'बिचाराच' होता. खरे तर त्याला आत्ताही प्यायची होती. पण त्याला दोन गोष्टी माहीत होत्या. एक म्हणजे प्यायल्यानंतर त्याला हक्काची झोप अत्यावश्यक असते आणि ती आज नेमकी कुठे मिळेल किंवा मिळेलच असे काहीही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे... ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती...

... खिशात आहेत त्या पैशात जोपर्यंत आपण स्वकमाईच्या सत्तर रुपयांची भर घालत नाही.. तोपर्यंत क्वार्टर घ्यायचीच नाही...

हा विचार फार म्हणजे फारच उशीरा सुचला होता त्याला! हाच विचार नोकरीला लागल्यानंतर सुचला असता तर? किती बरे झाले असते??

आत्म्याची कृश अंगकाठी आणि घाणेरडा अवतार पाहून पोलिसाने त्याला दंडुका मारला नाही, पण आत्मा दहा पावले पुढे गेल्यावर त्याला पुन्हा बोलावले मात्र!

पोलिस - हितं झोपणं बेकायदेशीर आहे... दंड आहे..
आत्मा - माफ करा.. कल्पना नव्हती.. पुन्हा नाही येणार इथे..
पोलिस - आत्ताचं काय पण??
आत्मा - म्हणजे??
पोलिस - पावती फाड *** दिडशेची..
आत्मा - पा... वती???
पोलिस - हा.. दंड आहे...
आत्मा - हे.. हे इकडे इतके जण झोपले आहेत ते???
पोलिस - ती गोष्ट वेगळी आहे....
आत्मा - कशी काय??
पोलिस - थोबाड चालवलंस तर ** **न
आत्मा - साहेब.. माझी एकदाच चूक झाली.. आता नाही येणार मी इथे...
पोलिस - पन्नास दे.. चल्ल..
आत्मा - नका ना घेऊ..
पोलिस - चौकीवर यायचंय काय??

चौकीवर जाणे या प्रकाराची भयानक दहशत असलेल्या आत्म्याने मुकाट पन्नासची नोट काढून पोलिसाच्या हातात दिली आणि अतीव दु:खाने जायला निघाला..

पोलिस - अय.. हिकडं ये..
आत्मा - .... काय??
पोलिस - चारशे महिना दिलास तर रोजचाबी झोपू शकशील.. हित्तंच..
आत्मा - चा...
पोलिस - मात्र... अ‍ॅडव्हान्स पायजेल..
आत्मा - साहेब.. या क्षणी माझ्याकडे नाहीत.. तीन... तीन दिवसात चालतील का दिले तर??
पोलिस - चवथ्या रात्री आणले नसशील तर तीन रात्रींचे दिडशे सेपरेट घेऊन **त लाथ घालून हाकल्न देईल मी..
आत्मा - नक्की... नक्की आणतो... ... झो...पू???
पोलिस - ... हा.. त्या तिकडं झोप.. हितं किडे लय असतात...

आता कुणाच्या बापाची फिकीर राहिलेली नव्हती. स्वतः शासनदरबारच 'हितं झोप' म्हणतंय म्हंटल्यावर काय??

चारशे रुपये कुठून आणायचे?? आणखीन एक चोरी केली अन पकडले गेलो तर... संपलंच सगळं! आतच घालतील! आधीच एक केस झालेली आहे आपल्यावर...

सकाळी आठला उठून महापालिकेच्या अत्यंत स्वच्छ टॉयलेटमध्ये व एका नळावर कशीबशी आंघोळ व विधी उरकून पुन्हा तेच कपडे घालून आत्मा बाहेर पडला. किंचित तरी फ्रेश वाटत होते. काम! काम शोधायला पाहिजे! तृतीय वर्ष उत्पादन अभियांत्रिकीला अभियंता म्हणत नाहीत. किमान.. पाउणशे टक्के अभियंता तरी??

दुपारी दोन वाजेस्तोवर नुसताच फिरला आत्मा! सारसबाग एरिया म्हणजे काही भोसरी औद्योगीक वसाहत नव्हती की काम मागता यावे! मग काहीतरी खाल्ले! वडापाव वगैरे! एक आपली चैन म्हणून दोन ब्रिस्टॉल घेतल्या अन बसून फकाफका ओढल्या. किकही बसली, ताजेतवानेही वाटले आणि भूकही भागल्यासारखे झाले. मस्त! सिगारेटचा हा उपयोग फारच भारी आहे. भूक लागली की ओढायची! आत्म्याने एक अख्खे पाकिट घेऊन ठेवले मग!

उन्हात वणवण करताना त्याच्या मनात विचार आले.

काय झाले आपले? काय केले आपण? उघड्या जगात आज आपण पोरके! एका दुकानवाल्याने आईचा फोटो ठेवून घेतला हेच उपकार म्हणायचे! आता काय? पैसे आहेत तोवर ओढतोय विड्या? पुढे?

हा म्हणतो ऑर्डर घे आणि आत सांग! इथे आठशे मिळतील! लेको माहितीय का? मी सहाव्वा आलो होतो सहावा! कुणीतरी वर्षाची फी जरी भरली आपली तरीही अभियंता होऊ शकू आपण! पण.. आपले नेमके कोण आहे जगात? बाबा तर नाहीतच! दोस्तांनीही परत पाठवले. सर्व प्रशस्तीपत्रके घरी जालन्याला! काय करायचे?? पुण्यात एकही अशी असामी माहीत नाही की जी आपल्यावर विश्वास ठेवायला तयार होईल! आणि आपला इतिहास समजला तर ठेवलेल्या विश्वासाच्या तिप्पट अविश्वास दाखवून घालवतील आपल्याला! दिलीप यांनी दिलेले हजार रुपये आपण घेतले असते तर? नाही! इतकी क्षुल्लक मदत कशाला घ्यायची? जर नाक घासून मदत मागावीच लागंणार असली.. तर अशी मदत तरी मागावी.. जी आपले आयुष्य बदलेल... आयुष्य... खरच की... आयुष्य बदलू शकणारी एक व्यक्ती मात्र होती... आपली आई... आता नाही आहे ती.. घेतलं असतं पदरात... उपाशी तरी राहू दिलं नसतं... तसं तर काय?? बाबाही म्हणाले होते हवे ते घेऊन जा.. आपण कपाटातून पैसेच घेतले असते तर?? ते काही नाही म्हणालेच नसते.. पण.. आपल्यालाच लाज वाटत होती... आत्मानंद?? जगातल्या प्रत्येक माणसाचे बौद्धिक घेऊ शकण्याच्या हातोटीचा तुम्हाला जो गर्व होता... तो नाटेकरकाकूंच्या प्रसंगामुळे व्यर्थ ठरलेला आहे बरं?? आता या जगात तुम्ही एखाद्या बेवारस कुत्र्यासारखे आहात.. अन्न दिसेल तिथे शेपूट हालवायची आणि जिभल्या चाटायच्या.. समोर पडेल तो तुकडा चावून गिळायचा.. शिळा असो.. खराब असो.. शिव्या देऊन टाकलेला असो... कसाही... कुणाचीच गरज नसल्याच्या थाटात वागत असणार्‍या तुम्हाला भगवान शंकरांनी असा धडा शिकवला आहे... की... आता तुमचे हाल काही विचारू नका...

पण.. पण मी इतका अगतिक नक्की आहे का?? जगायचेच आहे ना? मग माझा मी कसाही जगलो तरी कुणाला त्याच्याशी काय देणेघेणे?? ज्यांना काही वाटेल ते थोडीच मला मदत करतायत?? मग मी काहीही केले तरी काय झाले??

अरे?? चित्रपटगृह?? काय नांव आहे?? नीलायम! केवढं प्रचंड आहे. त्रिवेणी तर नुसतं चित्रपटगृह पाहूनच खुष झाली असती..

आत्मा आत गेला. तिकिटे फाडण्याचे काम मिळेल का विचारले. काम नाही समजल्यामुळे आला बाहेर! काही वेळ खारे दाण्यांच्या गाडीपाशी उभा राहून पुन्हा चालायला लागला. मोठा पूल होता. पर्वती! दोन चारदा आपण गेलो होतो इथे! शिवायलात बसायचो. मस्त दिसतं वरून पुणं! चला.. त्यापेक्षा पुलावर्न खालीच जाऊ! वर जाऊन काय होणार आहे?

दिशाहीन भरकटतानाच मावळती झाली आणि थकलेली पावले पर्याय नसल्याप्रमाणे सारसबागेकडे वळली. एका पाणीपुरीवाल्याला आत्म्याने विचारले..

आत्मा - .. मला.. जर काम हवे असेल तर.. कोणत्या भागात जायला लागेल??
तो - काम?? शिक्षण??
आत्मा - अभियांत्रिकी..
तो - ... काय???
आत्मा - इंजीनीयरिंग...

त्याने आत्म्याकडे अविश्वासाने पाहिले.

तो - भोसरीत कंपन्या असतात खूप.. आणि पिंपरी चिंचवड!

दुसर्‍या दिवशी तिकडे गेले साहेब! अंगावरच्या कपड्यांचे काय करावे हे समजत नव्हते. मग मध्येच थांबून एका नेपाळ्याकडुन एक रंगीबेरंगी शर्ट घेतला तीस रुपयाला! निदान तो शर्ट नवीन असल्यामुळे तरी बरा दिसत होता. जुना शर्ट नेपाळ्याकडे ठेवून 'जाताना घेऊन जाईन' असे सांगीतले. पँटचे काही इतके नाही. मळखाऊच कापड आहे... चालेल अजून दोन दिवस! तोवर मिळेल काम!

भोसरी हा अत्यंत रुक्ष प्रदेश तहानलेल्या अवस्थेत तुडवेपर्यंत पुन्हा संध्याकाळ झाली होती. आता पुन्हा बसचे तिकीट आणि रात्रीचे जेवण! म्हणजे खिशात राहणार शंभरच्या आसपास रुपये! उद्या शेवटचा दिवस! फार फार तर परवा!

अरे???? आपण काल आणि आज ... मद्यच घेतले नाही?? किती?? किती महिन्यांनी? सव्वा महिना तर आतच होतो. पण त्या आधी?? रोजच घ्यायचो... आज... आज घ्यायचं का थोडं???

सारसबागेपाशी पोचायला आठ वाजले. सगळे स्टॉल्स हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर होते. एक ज्योतिषी तेवढा बसलेला होता पोपटाला घेऊन! दोन दिवसात त्याला आत्मा हात वगैरे करायला लागला होता. आत्ता त्याला तिथेच पाहून आत्मा त्याच्याकडे गेला.

आत्मा - काय?? लोकांची भविष्ये सांगता सांगता तुमचे भविष्य काय होणार??

हा प्रश्न गैरवाजवी होता. पण तो माणूस आत्म्याचे मन ओळखू शकत होता. तो चिडला नाही.

तो - माझे काय? हा पोपट मेला की दुसरा उद्योग करायचा...
आत्मा - .. म्हणजे.. तुमचा उदरनिर्वाह या पक्ष्यावर अवलंबून आहे??
तो - .. हं..

सुन्न झालेला आत्मा बागेत आत गेला. उद्या रात्री त्या पोलिसाला चारशे रुपये द्यायलाच लागणार होते. त्यामुळे आज शक्य तितके लवकर झोपून उद्या शक्य तितके उशीरा उठायचे ठरवले होते त्याने! असे केले की उद्याची झोप जरा लांबेल! आणि मग पहाटे पहाटे कुठे टेकलो तरी कोणी हुसकावणार नाही. व्वा आत्मानंद व्वा!

दोन दिवसांची अर्धवट उपासमार, कुठेही झोपल्यामुळे झालेला त्रास आणि वणवण या सर्व बाबी तिसर्‍या दिवशी त्याच्या चेहर्‍यावर आणखीनच तीव्रतेने जाणवू लागल्या.

एकही असा माणूस नाही? की कधीतरी आपण ज्याचे चांगले केले असेल आणि आत्ता तो त्याची परतफेड करेल? साजिद शेख? ते काय करणार? आपले दोस्तच काही करत नाहीत तर ते काय करणार? सुरेखा वहिनी, दिलीप यांच्या मातु:श्री, रशिदाताई.. दीपा... अल.... अलका?? अलका?? खरच की??

आपल्या डोक्यात त्यांचा विचारही येऊ नये इतके अमाप भयानक प्रकार कसे घडले आपल्या बाबतीत?

आत्मा तडक कॉलेजला गेला. बाहेरच थांबला. कधीतरी दुपारी चार वाजता अलका तिच्या लुनावरून जायला निघालेली दिसली.

आत्मा सरळ वाटेत उभा राहिला. अलकाने त्याला पाहून क्षणभर लुना स्लो केली आणि... तुच्छ कटाक्ष टाकून... अलका देव निघून गेली...

आजवर... गेल्या सव्वा महिन्यात एकदाच.. फक्त बाबांच्या पाया पडताना रडला असेल ते सोडून.. आत्मा कॉलेजच्या रस्त्यावरून पहिल्यांदाच हमसाहमशी रडत चालत चालला होता... परत सारसबागेकडे...

आणि मागून खांद्यावर हात पडला...

"काय हो?? लय दिसांत.. आपला तर बंदच झाला ढाबा.. पर आता घाटाकडं नवीन टाकलाय.. राजगड नावानं.. या एखाद दिवस?? काय?? तुम्ही वशाट तर खात नाय.. पर एकदा व्हेज रश्याची टेस्ट तर करा???

अंजुली ढाब्याचा पहिलवान!

संपूर्ण भकास, निर्जीव डोळ्यांनी त्याच्याकडे पाहात आत्म्याने तो प्रश्न विचारला..

"राजगड ढाबा?? ... काम मिळेल का त्या ढाब्यावर??"

आजवर त्याने अंजुली ढाब्यावर केलेली पैशाची उधळण, धनराज गुप्तेच्या केसला अपघात दर्शवण्यात केलेली मदत आणि त्याच्यावर गुदरलेले प्रसंग या सर्वांची व्यवस्थित जाण ठेवून पहिलवानाने त्याला चक्क राजगड ढाब्यावर नेमला.. तेही... सरळ सरळ मॅनेजर म्हणूनच.. नाहीतरी पहिलवानाचा दुधाचा व्यवसाय त्याला करायचाच होता.. तिकडे लक्ष घालायचे म्हणजे इकडे एक माणूस पाहिजे.. आणि आत्मा कसा आहे हे त्याला अतिशय नीट माहीत होते...

सहा महिने.. ! फक्त सहा महिने! ढाब्यावरचा एक पैसा इकडचा तिकडे नाही... स्टॉकमध्ये कसलीही खोट नाही... आणि...व्यवस्था एकदम व्यवस्थित...

महिना अठराशे! म्हणजे रोजचे झाले साठ रुपये! जेवणखाण, राहणे तिथेच...

आत्म्याचा मूळ स्वभाव जागृत झाला. स्टॉकमध्ये भानगड दिसू नये म्हणून.. एखाद्या गिर्‍हाईकाला जर जास्त वगैरे झाली तर पटकन त्याचे टेबल तो पोराला साफ करायला सांगायचा.. आणि साफ केल्यावर एका ठिकाणी ठेवलेल्या ग्लासेसमधील ड्रिंकचा ग्लास.. एका घोटात रिकामा करायचा.. या पद्धतीने त्याला दिवसभरात चक्क एक क्वार्टर पिता येऊ लागली.. तोच मॅनेजर असल्यामुळे विचारणार कोण?? पण ते कॉकटेल व्हायचे.. पण ठीक होते... मग हळूहळू विश्वास बसल्यावर तो स्टॉकमध्ये किंचित फेरफार करायचा आणि दोन तीन दिवसाकाठी एखादी क्वार्टर सील्ड कंडिशनमध्ये मिळवायचा स्वतःसाठी...

मजेत होता आत्मा! ते तिघे भेटेपर्यंत! कारण... ते तिघे भेटल्यानंतर...

... तो तिप्पट मजेत राहायला लागला..

इव्हिनिंग पार्कचा मॅनेजर आणि दोन कॅप्टन मजा करायला म्हणून आज गिर्‍हाईक बनून राजगड ढाब्यावर आले होते. आणि आत्मा त्यांच्याशी बोलत असताना त्यांना समजले की याची भाषा भलतीच भन्नाट आहे.

'तंदुर भट्टीत भाजलेल्या ग्रामीण स्वरुपाच्या कोंबडीचे काही स्वादिष्ट तुकडे सुरुवातीस हवे आहेत काय??'

'सेवेत अथवा स्वच्छतेत काही कमतरता आढळल्यास मला जरूर सांगावेत'

'कोळंबी ताजे नसल्यामुळे मी आपल्याला ते घेण्याचा आग्रह करणार नाही.. त्या ऐवजी.. सुरमई आमच्याकडे आजच आलेला आहे.. आपण सुरमईबाबत आज्ञा करावीत..आपल्याला हव्या त्या पद्धतीने तो आपल्यासमोर सादर केला जाईल.."

खरे तर परिसरामध्ये आत्म्याची ती भाषा ही राजगड ढाब्यावरील पार्टीतील एक विरंगुळ्याचा भाग बनलेली होती. ज्यांना ते माहीत होतं ते लोक आत्म्याशी किमान तीन ते चार वाक्ये बोलल्याशिवाय जायचेच नाहीत. आणि आत्म्याला ते समजल्यापासून तोही मुद्दाम सर्वांशी स्वतःच जाऊन बोलायचा. त्यात तो मॅनेजर असल्यामुळे पियक्कड लोकही त्याचा अपमान वगैरे करायचे नाहीत.

मात्र, या सर्वामध्ये, आजवर शुद्ध शाकाहारी असलेला आत्मा आता सर्रास कोंबडी व सुरमईबाबत टिपणे करू लागला होता.

पण त्या तिघांसाठी ते नवीन होते. सुरुवातीला ते आपापसात खूप हासले. मग ते आत्म्याशी आणखीन बोलले. मग पुन्हा आपापसात हासले. मग त्यांच्यातील मॅनेजर म्हणाला..

'हे पोरगं पार्कवर आलं तर धमाल येईल ना??'

झालं! आता उगाचच आत्म्याला पगार, ड्युटी अवर्स वगैरेबाबत उत्तरे द्यायला लागली.

आणि.. दोन तासांनी.. जेव्हा त्या तिघांना भरपूर चढलेली होती.. त्यातील एकाने आत्म्याला ऑफर दिली..

एक तारखेपासून जॉईन हो.. दोन हजार महिना, राहण्यासाठी कॉमन रूम, जेवणखाण सगळे तिथेच... आणि कामाचे तास फक्त सात ते दिड असे साडे सहा तास! नो सुट्टी!

'वडिलांनी माझा पुन्हा स्वीकार केला आहे' अशी थाप पहिलवानाला मारून आत्मा वेटर म्हणून फक्त वाढीव दोनशे रुपयांसाठी इव्हिनिंग पार्कला जॉईन झाला आणि पहिल्याच पंधरवड्यात तुफान पॉप्युलर झाल्यामुळे आता स्टाफमधे सतत एकच चर्चा चालू झाली... आत्मानंद... आत्मानंद... आत्मानंद...

पोरगं अफलातून होतंच! या सर्व घटनाचक्रातही सतत लक्ष ठेवून होतं सगळ्यांवर! दिलीप यांच्या लग्नाला आपल्याला बोलावलेनाही, अलका या अजून शिकतच आहेत, एम. ई करत आहेत, लामखडेंचे तीर्थरूप गेले, आपण भेटायला जावे की नाही? अशोक धनकवडीला राहतात ....

... आणि दिड वर्षात आत्मानंद कॅप्टन झाला! त्यामागे त्याची तल्लख बुद्धी आणि चांगले वागणे होते. मात्र! झोपायच्या आधी किमान दोन पेग लावल्याशिवाय तो झोपायचा नाही. या गोष्टीचा कुणालाही त्रास होत नाही म्हणून तेही सोडून देण्यात आले. तसेच, ते आता तो स्वतःच्या पैशाने करत होता. हॉटेलचाच युनिफॉर्म असल्यामुळे कपड्यांची खरेदी आता करावीच लागत नव्हती.

मात्र.. या कालावधीत एक मोठा बदल मात्र झाला होता.. मिळालेल्या एक प्रकारच्या स्थैर्यामुळे आणि सततच्या आजूबाजूच्या वातावरणामुळे.. आत्म्याची भाषा पूर्ण बदललेली होती.. आता आत्मानंद ज्या कारणासाठी इथे आणण्यात आला होता ती भाषा तो फक्त कस्टमर्सबरोबरच वापरत होता.. इव्हिनिंग पार्कमधील वास्तव्यात त्याला बुरख्यांआडचे अनेक भयाण चेहरे दिसले जे एरवी उच्चभ्रू म्हणून वावरायचे..

आणि... एक दिवस जालन्याच्या एका खूप जुन्या मित्राचा फोन नंबर त्याला मिळाल्यामुळे त्याने फोन लावला आणि समजले.. त्रिवेणीचे लग्न ठरण्यात आलेले आहे.. पुण्याचेच स्थळ आहे..

आत्मा त्या दिवशी दुपारी खूप खूप रडला.. आपला बाबांनी साधा शोधही घेतलेला नाही.. आपण इतके वाइट आहोत?? आजवर आपण कुणालाही आपला त्रास होऊ दिलेला नाही... असे का?? असे का?? का असे??

शेवटी डोळे पुर्ववत करून सात वाजता युनिफॉर्ममध्ये आत्मानंद तयार झाला... आणि..

==============================================

"आजच... फक्त एक दिवस..."

"अगं जुने मित्रं आहेत... ओनली वन्स... तुलाही यायचंय.."

"अगं आपल्यालाच मूल होणार त्याची पार्टी द्यायचीय आपण... मग... एकदा घेतली तर काय झालं?"

वन्या, दिल्या आणि अश्क्या आपापल्या परिवारासह आले होते... बायकांना कन्व्हिन्स करून..

इव्हिनिंग पार्कला! अश्क्याला लुटायचेच ठरवले होते आज...

सगळे पुढच्या गार्डनमध्ये बसले होते. नेमका आत्मा आज मागच्या बाजूला होता. आणि... आत्मा दोन्ही गार्डनच्यामध्ये असलेल्या ए.सी. हॉलमध्ये स्वतःहून शिफ्ट झाला. मॅनेजरला रिक्वेस्ट करून! कारण काय विचारले तर 'नंतर सांगेन' म्हणे!

पण.. आज तो मागच्या गार्डनमध्ये सर्व्हिस देणे शक्यच नव्हते..

मागच्या बाजूला.. त्रिवेणी.. तिचा होणारा नवरा... आणि ...

.... अलका देव.. तिघे बसले होते...

आणि पुढच्या गार्डनमध्ये... दिल्या, सुरेखा, रोहन, अशोक, रशिदा, वन्या आणि .. दीपा...

इकडे त्रिवेणी सारखी मुसमुसत होती. अलका आणि त्रिवेणीचा होणारा नवरा तिला परोपरीने समजावत असावेत असे वाटत होते.

आत्म्याने सहज इकडच्या गार्डनमध्ये पाहिले तर... स्फोटच झाला.. आज तिघेही पहिल्यांदाच.. इतक्या वर्षांनी.. जणू.. रूम नंबर २१४च.. आणि.. चीअर्स???? ओल्ड मंक???

स्वतःच्या रूममध्ये जाऊन ओक्साबोक्शी रडला आत्मा! ओक्साबोक्शी!

सगळ्यांना साल्यांना माहीत आहे.. मी इथे कामाला आहे.. तरीही भेटायला आले नाहीत.. आज मुद्दाम आले आहेत.. मेहुणा दाखवायला.. हे.. हे सगळे ठरवून चाललेले आहे..

कुणीतरी हाक मारल्याने पुन्हा वर जावेच लागले...

थोडे काम करून मागच्या गार्डनच्या मागच्या बाजूने आत्मा त्रिवेणीच्या टेबलच्या मागे असलेल्या झाडीच्या मागे उभा राहिला..

अस्पष्टच ऐकू येत होते.. पण.. 'तो तसा नाही आहे गं.. तुलाही माहीत आहे.. पण.. बाबा ऐकत नाहीत..' असं काहीतरी असावं नक्कीच....

मग साहेब पुढच्या गार्डनच्या बाहेर आले तिसरीचकडून.. आणि पार्किंग लॉटमध्ये उभे राहून ऐकायचा प्रयत्न करू लागले..

दिल्या, अश्क्या आणि वन्याचा ग्रूप... आपापल्या बायकांच्या कपाळावर पिण्यामुळे आणि आत्म्याच्या सतत होणार्‍या उल्लेखामुळे पडणार्‍या आठ्यांच्या जाळ्याला फाट्यावर टाकून आत्म्याचे जोक्स आठवून आठवून हासत होता...

वन्या - आणि नंतर काय म्हणाला?? कंबरेला विळखा न घालू देण्याचे काही तर्कशास्त्रीयदृष्ट्या योग्य असे कारण आहे का? हा हा हा हा हा हा....

अशोक - नाही नाही.. अन ते आठवलं का?? ए रशिदा.. तू थांब गं जरा... काय म्हणाला.. हे विश्व त्या नियंत्याने बनवलेले आहे.. तो जे दाखवेले ते ते पाहायचे...

दिल्या - हा हा हा हा... बर का रशिदा?? सही करताना सुवर्णा मॅडम..

अशोक - ए गप्पे... च्यायला आत्ता कुठे जरा आमचा संसार चालू होतोय...

दिल्या - मला म्हणे.. आपण पुरेशी वस्त्रे का परिधान करत नाही आहात??? खीक खीक..

अशोक - खंडुजी उमरेंच्या स्नुषा काटक आहेत... ही ही ही ही...

वन्या - ते जाऊदेत.. सुरेखावहिनी... म्हणे.. मी आणि वहिनींनी आज चहा प्राशन केला..

सुरेखा - ई... प्राशन काय.. काय बोलायचा नाही तो???

दिल्या - म्हणे अशा वेळेस काय तुम्हाला बोलवणार काय मी?? उशीला आकार द्यायला??

टेबलवरची हास्याची कारंजी उसळत उसळत पार्किंग लॉटमध्ये पोचत होती.. आणि... आत्म्याच्या डोळ्यांमधून निघणार्‍या कारंज्यांमध्ये मिसळत मिसळत जमीनीत मुरत होती...

अचानक कुणीतरी विचारले..

"कुणालाच नाही भेटला?? ... तो... तो .. आहे कुठे पण???"

" खरंय अश्क्या.. आत्मा.. हा आपल्या आनंदाचा आत्मा होता राव... कसाही का असेनात..."

"पण.. आ... आहे का?? .. काही कळलंच नाही... की... काही.. "

"हो ना.. त्याच्या घरीपण काही माहीत नसतं... बुवांनाही... "

"वन्या... अरे.. एकदा.. खरंच शोधायला हवे रे... कुठे आहे.. कसा आहे.. आहे की.. ना..??"

पुढचे बोलवेचना! टेबल एकदम गंभीर! आणि... तिसर्‍या का चवथ्या क्षणालाच इव्हिनिंग पार्कमधील सर्वात मोठा ऐतिहासिक स्फोट झाला...

"मैत्रीचे नाते असे तुटत नाही... शरीरे दूर असली आणि भेटत नसलो तरी एकमेकांच्या मनात... आहोतच की...???"

मिठ्या मारल्या मिठ्या चौघांनी! आत्म्याने केलेले पुर्वीचे सर्व प्रकार क्षणभर विसरल्याच बायका! दिल्या, अश्क्या आणि वन्याला झालेला अभुतपुर्व आनंद त्या प्रकारांच्या तुलनेत कितीतरी हजारो पटींनी मोठा होता...

यच्चयावत स्टाफ, गिर्‍हाईके आणि मॅनेजर तो मिठ्यांचा सोहळा विटनेस करत होते. एका स्टाफला हे कस्टमर्स असे मिठ्या मारत आहेत म्हणजे नक्कीच हे कस्टमर्सही खालच्याच दर्जाचे असणार असे समजून अनेकांनी नाके मुरडली. त्यातच आत्म्याने त्य तिघांदेखत सुरेखा, रशिदा व दीपाची मनापासून माफी मागीतली मागे झालेल्या प्रकारांबद्दल! आणि लांबून हे पाहणारी त्रिवेणी आपल्य होणार्‍या नवर्‍यासमोर कोणताही शिष्टाचार न पाळता मागून येऊन आत्म्याला बिलगली.. आणखीनच हल्लकल्लोळ! अलका अन त्रिवेणिचा नवराही धावले.

इव्हिनिंग पार्क म्हणजे बालोद्यान असावे असे झाले होते.

यादोंकी बारात या हिंदी चित्रपटाला लाजवेल अशा भेटी झाल्या होत्या सगळ्यांच्या!

तिथले दोन्ही टेबलांचे बिल आत्म्याने मॅनेजरला स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला सांगीतले आणि 'रजा घेत आहे' असे सांगून, म्हणजे 'घेऊ का' असे अजिबात न विचारता कपडे बदलून निघाला की??

टोळके दिल्याच्या बंगल्यावर पोचले.. वन्याच्या घरी फोन करून निरोप दिला.. आम्ही पहाटे येणार...

त्रिवेणीचा नवरा मात्र एकंदर हकीकत ऐकून चक्रावला होता. नंतर तो खूप हसू लागला. आत्म्याने त्याला जवळ घेतले. त्रिवेणीलाही! त्रिवेणी आज रात्रीच्या बसने जालन्याला जाणार होती. त्रिवेणीच्या नवर्‍याने बुवांना फोन करून 'ती आज माझ्या बहिणीकडे राहतीय रात्रीचा प्रवास नको म्हणून' असे सांगीतले. त्याची बहीण ही भूमिका फोनवर दीपाने पार पाडली. त्रिवेणीचा नवरा मात्र पार्टीला थांबला नाही.

अलकाला आणि त्रिवेणीला पाहून दिल्याने अशोक आणि वन्याकडे बघून नेत्रपल्लवी केली. 'दारू चालेल का' अशी! त्या नेत्रपल्लवीचा अर्थ समजल्यावर त्रिवेणी फुरंगटली तर अलका म्हणाली...

"हा जर मला अहो जाहो करणार असेल... तर पिऊदेत त्याला..."

आत्मा - नाही हो... अहो म्हणेन एकवेळेस.. जाहो कसे म्हणेन??

वन्या - आत्म्या.. तुमचं हे गौडबंगाल त्य दिवशी सांगीतलंस नंतर काही सांगीतलच नाहीस..

आत्मा - नंतर माझ्या आयुष्यात एक भयानक कालावधी आला.. जणू आंगनवाल्याचा मद्य विकण्याचा परवानाच रद्द व्हावा.. जणू सुरेखावहिनींच्या बंधुंनी दिलीप यांना नापसंतच करावे... जणू रशिदा व अशोक यांना एका गाडीत अपघात होऊच नये.. जणू वनदास यांनी राणा प्रतापवर कविता करताना दीपा यांच्यावर एक ओळही लिहू नये... अशी भीषण परिस्थिती उद्भवली माझ्यावर...

वन्या - आत्म्या.. सुवर्णा मॅडम भोसरीत राहतात माहितीय का??

दीपा - शी:

त्रिवेणी - कोण सुवर्णा मॅडम... ???

आत्मा - एक स्त्री!

त्रिवेणी - ते कळतंय..

आत्मा - मग बाकीच काहीही कळण्यासारखं नाहीये...

अशोक - पण आत्म्या.. तू आम्हाला का भेटला नाहीस रे??

आत्मा - 'मी भेटण्याची' तुमची अजून पात्रता झालेली नव्हती..

अशोक - भो.. सॉरी.. काय बोलतो बे तू???

आत्मा - आपण तरी कोठे यत्न घेतलेत?? आम्हास शोधण्याचे??

अशोक - आता काय तुझा फोटो घेऊन स्वारगेटला उभा राहू काय??

दिल्या - त्यापेक्षा शकिलाचा फोटो घेऊन उभा राहायला हवे होतेस...

वन्या - या महिलेला सतत निरखणारा एक माणूस तुम्ही कुठे पाहिला आहेत का??? विचारायचं...

अशोक - पण त्या इव्हिनिंग पार्कमध्ये तू केव्हापासून आहेस??

आत्मा - ज्या दिवशी मी तिथे नाही ही परिस्थिती संपली त्या दिवसापासून...

अशोक - आत्म्या.. मी बाप होणार आहे..

आत्मा - काय हे दुर्दैव त्या निष्पाप जीवाचं ज्याला तुमच्यामुळे जन्म मिळणार आहे...

रशिदा - काय??????

आत्मा - त्यातल्या त्यात हे बरं आहे म्हणा की यांच्यापोटी मिळणार आहे...

दिल्या - आत्म्या भेटला या भयानक आपत्तीवर उपाय काय पण??

आत्मा - आरती.. जय देवी जय देवी वर्धिनी देवी...

सुरेखा - शी:.. अगं खरंच करायचे हे तिची आरती...

अशोक - हा उदबत्या ओवाळायचा.. सिगारेटच्या..

आत्मा - वहिनी.. हा तुमचा रोहन तुमच्यावर गेलाय...

दिल्या - ए*** सॉरी.. माझ्यावर गेलाय म्हणतात सगळे..

आत्मा - मग झालंच... भिंती दगडाच्या बांधा बंगल्याला.. फोडेल बुक्या मारून...

दिल्या - मी लग्न झाल्यापासून फुल्ल कपडे घालतो आत्म्या...

आत्मा - तेच तर खरं संकट आहे... लोक नेमके उलटे करतात..

सुरेखा - ई..

आत्मा - शिर्क्यांची बाहुली धडकली तो भाग आता बरा आहे ना??

अशोक - तिचा की याचा??

आत्मा - मी यांची चौकशी करतोय..

रशिदा - अलका.. तुम और त्रिवेणी मिलते थे क्या??

अलका - हां.. हम दोनो टचमे थी..

दीपा - लेकिन तुम टचमे कायको थी???

त्रिवेणी - हिला हा आवडतो...

अशोक - बोंबला तिच्यायला.. तुला आत्मा आवडतो... ??

वन्या - आणि अजून 'हा मला आवडतो' याच पातळीला आहात??

आत्मा - हीच पातळी चांगली... पण.. तुम्हाला मी आवडतो तर.. भेटला का नाहीत??

अलका - होतास कुठे ते तरी सांगतोस का??

आत्मा - सांगायचं कुठे ते सांगता का??

अलका - घर नाही माहीत??

आत्मा - तुम्हाला नव्हते हे तिघे माहीत??

अलका - तू अजून मला अहो म्हणतोयस हां????

आत्मा - मी तुम्हाला त्या दिवसानंतर आज भेटलोय म्हंटल्यावर मी काय म्हणणार??

अलका - मला नको बाई अहो जाहो...

वन्या - अरे बापरे?? दीपू.. बघ किती लाडात वागतायत..

रशिदा - ओह तो तुम इसे दीपू कहने लगे हो???

वन्या - टिपू म्हणायची वेळ आलीय आता..

दीपा - नालायक आहे हा...

सुरेखा - अलका... तुमचा बार आता उडवून टाकू या मौसमात...

दिल्या - ही एक हल्ली आत्म्यासारखं बोलायला लागलीय...

सुरेखा - ह्या..

अलका - माझ्या दोनच अटी आहेत...

अशोक - त्या कृपया विशद कराव्यात भावी वहिनी...

अलका - याने मला अहो जाहो करायचे नाही.. आणि....

वन्या - ... आणि???

अलका - आणि दारू प्यायची नाही...

वन्या - चला.. म्हणजे आता ठरले... आत्म्या.. मान्य आहे ना??

आत्मा - त्यागले मी मद्य.. या क्षणी... मला माणसंच हवी होते रे?? तीच सारखी तुटायची...

अशोक - मग आता ही बाब साजरी व्हावी असं माझं नम्र मत आहे... आत्मानंद?? आपल्याला काय वाटते??

आत्मा - अर्थात... हा एक सोहळाच म्हंटला पाहिजे...

दिल्या - मग?? आत्म्या आम्ही तरी ड्रिन्क घेणार.. तू??? तू काय घेणार??

आत्मानंदचे वाक्य ऐकून अलका त्याच्यामागे धावली आणि सगळेच हसू लागले...

"ओल्ड मंक लार्ज.... ऑन द रॉक्स"

गुलमोहर: 

@सायो आणि सायलीमी : तुम्ही फ़क़्त तुमाच्यापुरते बोलत आहात. तुमचे नातेवाईक त्या काळात एवढे पुढारलेले होते याचे मला मनापासून कौतुक वाटते. माझ्या माहितीतल्या स्त्रिया सुद्धा नोकरी करायच्या पण ते प्रमाण फार तुरळक होत एवढेच मला सांगायचे आहे. आता जवळपास सर्वच करतात आणि मला त्याचा अभीमान देखील आहे.
आणि मला नाही वाटत हा वाद घालायचा मुद्दा आहे. त्यामुळे कृपया केवळ विरोधासाठी विरोध करू नका.

विरोधासाठी विरोध नव्हे. तुम्ही मध्यमवर्गीय समाज म्हणालात. आम्हीही त्याच समाजात वाढलो आहोत. लिहिताना जरा विचार करुन लिहा. जरा बघा काय बदल झाले होते तेव्हा. ९०, ९२ म्हणजे अगदी अलिकडचा काळ झाला. तेव्हा मुली परदेशी शिकायला नी असाईन्मेंटवरही जात होत्या. नोकरी फार दूरची गोष्ट झाली.

नितीन बोरगे १९९० साली कित्तीतरी स्त्रिया नोकरी करायच्या. माझी आई १९७७ पासून नोकरी करत होती. आणि नाईलाज/परिस्थीती वगैरे म्हणून नाही.
बेफिकीर, मी तुमची स्त्रीयांचे शोषण बीबी वरची मते वाचली नाहीत. पुर्वी तुमची एक कोणतीतरी कादंबरी वाचली होती. वेगळी वाटली म्हणून चांगली प्रतिक्रिया देखिल दिली. पण हे तुमचे आत्ताचे लेखन अतिशय सुमार वाटले. मी एक दोन भाग वाचले मग वाचूच शकले नाही. सु शिं च्या दुनियादारीची थोडी थोडी कॉपी वाटली पण दुनियादारीला काहीतरी गोष्ट होती. इथे नुसतच फक्त दारु , सिगरेट आणि बालीश संवाद..

लिहिण्याचे स्वातंत्र्य इथे सगळ्यांना आहे. आणि सार्वजनीक फोरम असल्याने आम्हाला प्रतिक्रीया देण्याचे स्वातंत्र्य देखिल आहे. तुमचे फॅन प्रत्येक वेळी म्हणतात वाईट प्रतिक्रीया देणार्‍यांनी एखादी चारोळी तरी लिहून दाखवावी पण असं सुमार लेखन करण्यापेक्षा न लिहिलेलं बर अस माझं मत आहे.
तुम्हाला आमच्या प्रतिक्रीयांनी त्र्रास होतो तर तुम्ही खरच तुमचा ब्लॉग सुरु करून त्यावर प्रतिक्रियांना फिल्टर लावा.

लोकहो, आम्ही काही अंध भक्त नाही आहोत!!! निदान मी तरी नाही... मला त्यांनी इतर बाफवर काय लिहिले याची मुळीच कल्पना नाही... मी मायबोलीवर तुम्हा लोकांच्या तुलनेने नवीन आहे. मी मायबोलीवर आले तेंव्हा सोसेस ही त्यांची पहिलीच कादंबरी सुरु होती... तिच्यातली नायिका अतिशय धाडसी, अन्यायाचा बुद्धीने सामना करणारी दाखवली आहे. ती कादंबरी मला आवडली. ती संपल्या संपल्या लगेच बेफिकीर यांनी त्यांच्या नवीन कादंबर्‍या सुरु केल्या आणि मला त्या आवडल्या. त्या कादंबर्‍यांकडे व्यक्तींच्या कथा म्हणून मी पाहिले. त्यातले सामाजिक, राजकीय, घटनात्मक अर्थ शोधायला मी गेले नाही. माझे इतकेच म्हणणे आहे, की बेफिकीर यांच्या ज्या काही कादंबर्‍या मी वाचल्या, त्यात स्त्रियांच्या बाबतीत हिन मते मला दिसली नाहीत. तुम्ही जर कादंबर्‍या वाचल्या असतील आणि तशी मते तुम्हाला दिसली असतील, तर तसे सांगा ना! विषय कादंबर्‍यांचा चालू आहे, त्यावरच बोला!
राहता राहिला स्त्रियांच्या जॉबचा प्रश्न, तर माझी आईसुद्धा ग्रॅज्युएट असून अनेक वर्षे गव्हर्नमेंट जॉब करुन रिटायर्ड झालेली आहे. आमच्या घरातही स्त्रीमुक्तीचे वारे वाहिलेले आहेत. पण त्या गोष्टीशी या कादंबर्‍यांचा काहीही संबंध नाही.

नायिका नोकरी करतात की नाही यापेक्षा त्यांची विचारसरणी टोकाची 'बेजबाबदार' किंवा 'बालीश' वाटते. निगेटीव कॅरॅक्टर असेल तर बेजवाबदार जसे की 'बाप' मधली अनु . पॉझिटीव असेल तर बालीश, जशी ही अलका. अर्थात अशा प्रकारच्या टोकाच्या नीगेटीव / पॉझिटीव व्यक्तिरेखा अनेक कथा , कादंबर्‍या आणि विशेषकरुन सिनेमातून दाखवल्या गेल्या आहेत. आणि सध्याच्या डेली सोप मधे तर केवळ अशाच व्यक्तिरेखा असतात. त्यामुळे एकट्या बेफिकिरांचेच चुकतेय असे नाही. ( पण तिथे प्रतिसाद द्यायचा ऑप्शन नसतो , जो इथे आहे Proud ) अगदी करीअर वुमन दाखवायचा प्रयत्न केला तरी परत गाडी वळणावरच जाणार.
<<नव्या कादंबरीतील नायिका पुरुषाशिवाय सगळे काही जिंकत<<>> कुटुम्ब आणि करीयर या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. एक धरली तर दुसरी सोडायची , किन्वा दुसरीकडे दुर्लक्ष होणारच हे बायकांच्या बाबतीत विनाकारण गृहीत धरले जाते. खाजगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य याची गल्लत करायची गरज नाही. नविन कादंबरी वाचली नाहीये त्यामुळे जास्त काही कमेंट करत नाही. पण एकंदरीत सुर टोकाचा वाटतो. एकतर पुरुषावर पुर्ण डीपेंडंट स्त्री नाहीतर अगदी त्याला वार्‍याला सुद्धा उभी न करणारी.

करंजी, मी त्या फॅन्सपैकी नाही, ज्यांना विधायक प्रतिक्रियांचा त्रास होईल... मी आत्तासुद्धा कादंबरीशी संबंधित मुद्द्याला धरुनच बोलले आहे, याची नोंद घ्यावी... कौतुक करतांनाही कादंबरीतले काय आवडले, हे प्रत्येकवेळी- निदान जास्तीत जास्त वेळी लिहिले आहे. तुम्ही तपासून पाहू शकता.

तुम्ही त्यांची मतं वाचली नाहीत याला तुमचं सुदैव की दुर्दैव म्हणावं हे कळत नाही. इथे त्यांनी कितीही पुढारलेली मतं नी विचार असल्याचा कांगावा केला, आव आणला तरीही ज्यांनी त्यांचे खरे विचार वाचले आहेत नी वाद घातला आहे त्यांना हे नक्कीच रुचणार नाही. नी त्याला विरोध नक्कीच करणार, होणार.

हरकत नाही ना सायो.. त्यांची स्त्रियांविषयी मते हिन असतील, तर त्याला मी ही विरोध करेन... तसे माझ्या वाचनात आले नाही... मला त्यांच्याविषयी काही माहिती नाही... त्यांच्या कादंबर्‍या ही एकच गोष्ट मी वाचते. गझल सुद्धा आत्ता-आत्ता बघायला लागले आहे अधून मधून ते ही. तुम्ही सांगा ना ते काय बोलले. मला उत्सुकता आहे जाणून घ्यायची.

<<शब्दातच पकडायचंय काय डेलिया तुम्हाला??>> नाही हो, शब्दांचे खेळ करायला मी काही लेखिका वगैरे नाही. पण मनापासून तुमचे प्रतिसाद वाचून जे वाटतेय, ते सांगितले. अर्थात तुम्ही काही बोललात किन्वा नाही बोललात तरी माझी मते बदलणार नाहीत. जशी आमच्या बोलण्याने तुमच्या विचारात काही फरक पडत नाहीये तसेच. प्रत्येकाने स्वतःचा अनुभव स्वतःच घ्यायला पाहिजे , दुसर्‍यानी सांगुन कसे लक्षात येईल.

>>दुसर्‍यानी सांगुन कसे लक्षात येईल.

एकदम मुद्द्याचं बोललात. Happy
आता बेफ़िकीर यांनी जुन्या बीबीवर काय मते लिहीली अथवा न लिहीली, ती कृपया कादंबरीच्या पानावर लिहू नका अशी विनंती. कृपया वि.पू. वापरा.

<<तुम्ही सांगा ना ते काय बोलले. मला उत्सुकता आहे जाणून घ्यायची.>>
अहो ते इथे लिहिले तर अ‍ॅडमिनना हा बीबी पण बंद करावा लागेल. वर विषयाला सोडून लिहु नका अशी तंबी मिळेल ते वेगळच.

हरकत नाही ना सायो.. त्यांची स्त्रियांविषयी मते हिन असतील, तर त्याला मी ही विरोध करेन... तसे माझ्या वाचनात आले नाही. >> सानी तुम्ही ही कादंबरी सगळी वाचलीत म्हणालात ना? आणि तुम्हाला काहीच खटकले नाही?

जशी आमच्या बोलण्याने तुमच्या विचारात काही फरक पडत नाहीये तसेच.>>> डेलिया, आहो, तुम्ही मला अजूनही काही सांगतच नाही आहात... चर्चाच करायची तर मुद्द्यांवर करा ना... असे तुम्ही काय सांगितले, ज्याने माझ्या विचारात फरक पडेल?

तुम्ही सांगा ना ते काय बोलले. मला उत्सुकता आहे जाणून घ्यायची.>>>> ह्या गोष्टीला दोनेक महिने होऊन गेले आहेत तेव्हा शब्द न शब्द लक्षात नाही. आणि मी सांगून त्यात मजा नाही. काये की लिहिताना माझे शब्द त्यात अ‍ॅड होऊ शकतील नी एक वेगळंच पिक्चर तयार होईल. एक वाचक म्हणून जे वाचलं असतंत त्याने नक्कीच फरक पडला असता. त्या वेळी ह्या सगळ्याचा पुढे उपयोग होईल हे माहित असतं तर स्क्रिनशॉट घेतला असता. ह्या पुढे लक्षात ठेवू.

सानी तुम्ही ही कादंबरी सगळी वाचलीत म्हणालात ना? आणि तुम्हाला काहीच खटकले नाही?>>> करंजी, मी खरंच कादंबरी वाचतांना ही चार हॉस्टेलची मुले आणि वहावत जाऊन व्यसनाधीन होणारा नायक यांची कथा म्हणून वाचली... त्यात त्यांच्या आयुष्यात काही मुली आल्या ज्या इंजिनिअरींग करत होत्या. शेवटी संसाराला लागल्या. आपण बरीच अशी जोडपी पहातो, ज्यांत मुली लग्न करुन संसार करतात... सगळ्याच मुली काही नोकरी करत नाहीत... त्यामुळे बेफिकीर यांनी मुद्दाम असे कथेतील मुलींना त्यांच्या बॅकवर्ड विचारांमुळे घरी बसवले असा विचार मी केला नाही...आपल्यासमोर हे घडते आहे, असा फील येत होता. आता तुम्ही कुठल्या दृष्टीने विचार केला, त्यावर खटकणे अवलंबून आहे. तुम्हाला त्यांची आधीची 'मुक्ताफळे' माहिती होती, म्हणून तुम्ही त्यांचा तसला दृष्टीकोन कादंबरीत परावर्तीत होतोय का ते पाहिले असावे.

तुम्ही सांगा ना ते काय बोलले. मला उत्सुकता आहे जाणून घ्यायची.>>>> ह्या गोष्टीला दोनेक महिने होऊन गेले आहेत तेव्हा शब्द न शब्द लक्षात नाही. आणि मी सांगून त्यात मजा नाही. काये की लिहिताना माझे शब्द त्यात अ‍ॅड होऊ शकतील नी एक वेगळंच पिक्चर तयार होईल. एक वाचक म्हणून जे वाचलं असतंत त्याने नक्कीच फरक पडला असता. त्या वेळी ह्या सगळ्याचा पुढे उपयोग होईल हे माहित असतं तर स्क्रिनशॉट घेतला असता. ह्या पुढे लक्षात ठेवू.>>> ठिक आहे सायो.... Happy
तुम्ही सगळ्यांनी असे आमच्याशी मोकळेपणाने बोलले पाहिजे.. संवादातूनच बर्‍याच गोष्टी बाहेर येतात... चर्चेसाठी सर्वांना धन्यवाद!!!

सानि,
अ‍ॅडमिन च्या सूचनेवरून दुसर्या बीबी विषयी जास्त काही सांगु शकत नाही पण मुळात कथेतल्या व्यक्तिरेखां वरून लेखकाचं व्यकित्मत्त्व कळेलच हे बरोबर आहे ?
कथे मधली कॅरॅक्टर्स ग्रे शेड ची असु शकतात, फॅन्टसी पण असु शकतात त्यामुळे लेखना वरून एखाद्याला पर्सनली जज करता येइलच असे नाही पण जेंव्हा व्ह्युज अ‍ॅन्ड कॉमेन्ट्स सारख्या बा.फ वर लोक स्वतःची प्रामाणिक मते मांडतात तेंव्हा तुम्हाला एखाद्याची मेन्टॅलिटी नक्कीच कळते म्हणून इथे सगळे "त्या" अत्यंत आक्षेपार्ह मतां विषयी बोलत आहेत.
असो, कथे पुरतच बोलायचं तर एखाद्या लेखकानी मधेच वैयक्तिक आयुष्या विषयी पब्लिक फोरम वर सांगितले कि मी स्वतः नाटेकर काकु इन्सिडन्स आत्म्या प्रमाणे स्वतः अनुभवला आहे वगैरे( शब्द वेगळे असतील पण या आशयाचे) ते गैर नाही वाटत तुम्हाला ?

धर्मांध लोकांच्या डोळ्यावरची पट्टी कधी निघते का? त्यांना जागं करणं कधीतरी शक्य असतं का? तसंच इथलं पब्लिक आहे. कोण कष्ट घेणार त्यांच्या मागे? पण चुकीचं काही लिहिलं तर दुरुस्त करायला नक्कीच येऊ.

पण तूम्हाला बोलावतोय कोण?

फूकटाफाकटी ढूढ्धाचार्य बनण्याचा सोस कशाला?

सगळ्या जगाचे न्याय् निवाडे करण्याचा अधिकार असल्याचा कशाला आणताय?

नाही पटत तर ईथे येऊन वाचताय कशाला? वाचू ही नका आणि ईतर वाचकान्च्या डोके पिकवणार्या प्रतिक्रिया ही देऊ नका. वाद येथेच सम्पतोय

असं होत नाही. बोलावायला ही कुणाच्या मालकीची जागा थोडीच आहे? तसं हवं असेल तर ब्लॉग वगैरे वर लिहिता येऊ शकतं. जिथे ब्लॉग मालकाला प्रतिक्रिया तपासून पब्लिश करता येतात.

हां, मात्र रंगीबेरंगी असेल तर नकोशा पब्लिकला/ साटोसंला 'ही माझी जागा आहे. इथे येऊ नका' म्हणून म्हणता येऊ शकेल पण त्याचीही काही गॅरंटी नाहीच. केदारच्या स्वतःच्या पानावरही वाद चालूच होते. तेव्हा पब्लिक फोरमवर काही चालत नाही हो प्रफुल्लाताई.

बेफिकीर यांच्या पहिल्याच कादंबरीतली मीना ही कादंबरीची नायिका होती... तिने नोकरीच काय पण राजकारणातही बरीच मोठी मजल मारली होती... >>

सानी, नोकरी वन्याची बहिणही करतेय. मीना पण करणार होती कारण तिला त्याची गरज होती. Anyways I will go with Befikir's explanation.

सर्वांचे मनःपुर्वक आभार मानतो. ज्या ठिकाणी मी ती मते मांडली होती तेथील मते मी स्वत्यःच उडवलेली होती व त्याचे कारण 'एक गैरसमज' इतकेच होते. बरोब्बर दोन तासांनी मी रुग्णालयात पोचलो की माझी सर्व मते व यामागची कारणे सर्वांसाठी लिहीन. तोवर अ‍ॅडमिन यांनी सांगीतल्याप्रमाणे कृपया येथे चर्चा करू नका अशी मीही विनंती करतो, अर्थात, अ‍ॅडमिन यांनी तशी सूचना केली म्हणूनच मी विनंती करू शकत आहे. मर्जी आपली.

श्री नंदन,

आपल्याला या वेळेस मध्ये पडावे लागले याबाबत वाईट वाटत आहे.

-'बेफिकीर'!

१. अ‍ॅडमिन व टीम, आपल्याला लक्ष घालावे लागण्याइतपत वाद झाले याचे वाईट वाटते. वाद माझ्या 'पुर्वीच्या' अथवा 'आत्ताच्या' लेखनावरून झाल्यामुळे मी नम्र विनंती करतो की माझा हा प्रतिसाद कृपया प्रकाशित होऊ द्यावात व तसाच राहू द्यावात. ही विनंती करण्याचे कारण असे आहे की सर्वच धाग्यांवर काही लोक आवर्जून लिहीत आहेत की माझी स्त्रियांबद्दलची मते 'अशी अशी' आहेत. येथेही त्यावर बरीच चर्चा झाल्यामुळे मी उत्तर येथे देऊ इच्छितो. सॉरी फॉर दॅट.

२. अरुंधती कुलकर्णी यांनी 'कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रियांचे लैंगीक शोषण व त्याबाबत स्त्रियांना सहाय्यकारक ठरतील अशा सर्व उपलब्ध कायद्यांची माहिती' असा एक धागा निर्माण केलेला होता. त्यातील माहिती खरोखरच उपयुक्तही होती व जॉब करणार्‍या स्त्रियांनी वाचायलाच हवी अशी होती. त्यावेळेस मी मायबोलीवर नवीन होतो व मला येथील विविध धागे काय असतात हे माहीत नव्हते. (उदाहरणार्थ, गुलमोहर च्या कविता विभागात गेले की समोर येणार्‍या लिस्टमधील प्रत्येक धागा ही एक कविता असते हे समजते. पण ती कविता जेव्हा आपण उघडतो तेव्हा उघडल्यावर मात्र कुठेही असे नोंदलेले दिसत नाही की ही कविता आहे. ) तसेच, त्यावेळेस मी कधीच 'नवीन लेखन' या पानावर जायचोच नाही. अजिबातच! तेव्हा मी गुलमोहर - कादंबरी किंवा गुलमोहर - गझल किंवा गुलमोहर - कविता इतकेच व याच मार्गाने पाहायचो. सहज मुखपृष्ठावर आलेला अरुंधतींचा तो धागा मला खरोखरच आधी एक 'चर्चाप्रस्ताव' वाटला. मागे इतरत्र मी असा एक चर्चाप्रस्ताव स्वतः मांडलेला होत त्याची मला आठवण झाली. ती लिंक येथे देत आहे.

http://www.manogat.com/node/15727

अरुंधतींचा तो धागा मला चर्चाप्रस्ताव वाटल्यामुळे मी एक बाजू इतकीच मांडली की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी आपले वर्तन व पोषाख याबाबतही काळजी घ्यायला हवी. दुसर्‍या शब्दात / प्रतिसादात मी असेही म्हणालो की काही वेळा / अनेकदा, स्त्रियांचे वर्तन व पोषाख यामुळेही शोषण होण्यास सुरुवात होऊ शकते. माझ्या या म्हणण्याला पुष्टी देणारे दोन प्रतिसादही आले. मात्र काही स्त्रियांनी प्रचंड हल्लाबोल केल्यानंतर माझ्या लक्षात आले की हा धागा चर्चा प्रस्ताव नव्हता. त्यामुळे मी माझे आधीच प्रतिसाद स्वतःच उडवून 'ही माहिती अतिशय उपयुक्त आहे' इतकेच लिहीले.

पण त्या दिवसापासून जमेल तेथे माझ्या आय डी ला हाच रंग लावण्यात या लोकांनी सतत व स्वतःहून पुढाकार घेतला की 'बेफिकीर स्त्रियांच्या बाबतीत जन्टलमन नाहीत'! मी लक्ष देतही नव्हतो. पण त्याचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढले.

नंतर असे लक्षात यायला लागले की माझ्यावरचा राग काढता यावा यासाठी मुद्दाम व जमेल तेथे असे लिहिण्यात येत आहे. नेमका राग काय आहे हे मला माहीत नाही. पण आठवून आठवून सतत तेच लिहीले जात आहे यामागची भूमिका नक्कीच निर्मळ नाही असे मला वाटते.

३. माझ्या कादंबर्‍यांमधीळ संवाद हे वास्तव जगात घडणार्‍या (व तेही सामान्य माणसांमध्ये घडणार्‍या) संवादांपेक्षा / घटनांपेक्षा खूपच सौम्य आहेत. मी माझ्या कोणत्याही कादंबरीत स्त्रीचा अपमान केलेला नाही. करण्याची मला गरजही नाही. करण्याची माझी प्रवृत्तीही नाही. करण्याचा माझा हेतूही नाही. तसेच, केवळ स्वतःची किंवा इतरांची आंबट गरज पूर्ण व्हावी म्हणून मुद्दाम उत्तान प्रसंग घुसडले आहेत असे एकदाही झालेले नाही. खरे तर, एकही उत्तान प्रसंग कथानकाच्या बाह्य नाही. तसेच, अशा प्रसंगांचे वर्णन मुळीच उत्तान नाही. हे स्पष्टीकरण नसून माझा हा या अनावश्यक गदारोळ करणार्‍यांना प्रतिसाद आहे व दावा आहे की त्यांनी असे प्रसंग शोधून दाखवावेत.

४. मी लोकांची फिकीर करू नये असे अनेकांनी सुचवले. एक सांगा, या डेलिया, सायो. वगैरे मंडळींच्यां किंवा इतरही अनेक जणांच्या एकाही लेखनावर मी कधीही जाऊन काहीही नकारात्मक लिहीलेले नसताना या बायका व काही माणसे अगदी वाट पाहून नंबर लावल्याप्रमाणे येऊन येथे इतका गोंधळ घालतात आणि त्यांच्या प्रतिसादांमध्ये राग तर इतका ओतप्रोत भरलेला असतो की माझा पेशन्स संपणार नाही का?

५. अ‍ॅडमीन - मला आत्तापर्यंत असे समजले आहे की मायबोली सायलेन्टली वाचणारे संख्येने अधिक आहेत. उदाहरण म्हणून माझाच एक वाचक असा आहे, (त्याने परवानगी दिली तर त्याचे नावही लिहीन) जो २००२ पासून मायबोली वाचत आहे. त्याने व आणखीन अनेकांनी मला फोनवर सांगीतले आहे की या ग्रूपमुळे व त्यांच्या थयथयाटामुळे लॉगीनही करावेसे वाटत नाही. याला आळा बसावा अशी विनंती करण्याचा मला अधिकार नाही आहे. मात्र, या अशा लोकांनी साईटचे नुकसान अधिक केलेले आहे. कारण स्वतःकडे लेखनक्षमता नाही आणि इतरांना कधी एकदा दाबतोय याची घाई अशी प्रवृत्ती आहे व ती कित्येकांना (मला एकानेच सांगीतले असे नाही, मला स्वतःलाच यावर आठ फोन आले आहेत आजवर) त्यामुळे साईटवर प्रवेश घ्यायची इच्छाही होत नाही हे मी नमूद करतो. (एक दुसरे उदाहरण म्हणून सांगतो. आज सकाळी उठलो तर माझ्या मेलबॉक्समध्ये एक मेल. 'बेफिकीर, मायबोलीवर यायचा कंटाळा आला आहे, तुमचे लेख वाचण्यासाठी शांतपणे येणार फक्त' - नितीन बोरगे. हे अमेरिकेतच असतात बहुधा! वरच्याच काही प्रतिसादांमध्ये कारण नसताना त्यांच्याशी काही आय डी खूप भांडलेले आपल्याला दिसतीलच! त्याचे कारण एकच! ते बेफिकीरचे वाचक आहेत.)

६. आता मात्र मला असे वाटत आहे की उच्च मध्यम, उच्च वर्गीय, काही केसेसमध्ये परदेशस्थ अशा काही खूप वेळ असणार्‍या व इतर काहीही उद्योग नसणार्‍या अनेक बायका येथे असाव्यात व त्यांना अस्तित्व दाखवायची संधी मिळत असावी. हरकत नाही. आपले काय बिघडते??

सर्वांचे व अ‍ॅडमीन व अ‍ॅडमीन टीम यंचे मनःपुर्वक आभार!

श्री नंदन व अ‍ॅडमीन - हा प्रतिसाद जाहीर रीत्या लिहिल्याबद्दल क्षमस्व!

-'बेफिकीर'!

सॉरी पण बेफिकिरांच स्पष्टिकरण पुन्हा एकदा अतिशय बालीश आहे !
हे काय लहान मुला सारखं कि मी सायो-डेलिया ला निगेटिव नाही बोललो तर ती का बोलली, म्हणाजे काय ?
जे तुमच्या लेखनाला छान म्हणतात त्यांनाच तुम्ही छान म्हणणार , जे नाही म्हणाणार त्या मागे अशी कारणं शोधणार !
पब्लिक मधे कादंबरी पब्लिश करता तेंव्हा गोडमिट्ट बरोबर निगेटिव्ह, रागीट, सगळ्या कॉमेन्ट्स ची तयारी ठेवा , ज्यांना येतोय राग वाचून ( लेखन किंवा हे असले स्पष्टिकरण) ते काय गोडवे गाणार का ?
बोरगेंशी कोण भांडलय म्हणे !
वर सगळे त्याचा विनोदी गैरसमज दूर करत होते, तुम्ही कशाला स्वतःला मधे आणताय !
पौर्णिमानी कॉर्पोरेट वर्ल्ड बद्दल इतका व्यवस्थित प्रतिसाद दिला होता, त्यतून पण तुम्ही उगीच नाहे ते अर्थ घेऊन स्वतःला मधे आणलेत !

बाकी त्या बीबी वर काय लेव्हल ची स्टेटमेन्ट्स केली होतेत तुम्हालाही माहितेय, "If m not wrong बायकांनी आधी धड वागायला शिकावे " टाइप ची काहीतरी कॉमेन्ट पण होती.
आणि हा मुद्दा नं ६ च बघा,

६. आता मात्र मला असे वाटत आहे की उच्च मध्यम, उच्च वर्गीय, काही केसेसमध्ये परदेशस्थ अशा काही खूप वेळ असणार्‍या व इतर काहीही उद्योग नसणार्‍या अनेक बायका येथे असाव्यात व त्यांना अस्तित्व दाखवायची संधी मिळत असावी. हरकत नाही.
सानि,
जे असंबध्द आणि ज्या लेव्हल ला जाऊन लिहिलय, वाटतायेत का तुम्हाला अजुन स्त्रियांबद्दल सन्मानानी बोलणारे?
असो, लेखकालाही लोक असच म्हणत असतील कि एकता कपुर स्टाइल रोज एक भाग पाडायला बराच रिकामा वेळ आहे Proud

वाकडी तिरकी,

तुमचे पोस्ट्स वाचून मी पुन्हा म्हणतो - बायकांनी खरोखरच आधी धड वागायला पाहिजे. (जर तुम्ही बाई असलात तर! नसलात तर जे काय आहात त्यांनी नीट वागायला पाहिजे.)

'मी नाय बोल्लो तर मंग ती का म्हून बोल्ली' अशा स्वरुपाचे ते बालीश विधान नाही हे आपल्याला समजणार नाही कारण तेवढी... जाऊदेत... प्रश्न असा आहे की य पाककृती बिककृती स्वरुपाच्य बायक जावा-जावांमधील भाम्डणे असल्यासारख्या कादंबरीवर का नृत्य करतात ते समजत नाही.

सानी - तुम्हाला काय वाटते? या असल्या वाकड्या, तिरक्या, आडव्या, सुजलेल्या मेंदूच्या, अतर्क्य हिणकस वृत्तीच्या, निरुद्योगी, बहुधा घरच्यांनी वार्‍यावर (म्हणजे मायबोलीवर ) सोडलेल्या, :राग': बिग चे बाहुले आणि ते निळे डोळे वटारणारे बाहुले वाक्यागणिक पाच पेरणार्‍या बायकांनी आधी धड वागायलाच पाहिजे की नाही??

हा हा हा हा!

मित्रांनो, गुड मॉर्निंग मॅडमचा तिसरा भाद आज मध्यरात्री प्रकाशित करणार!

आता आपण सर्वांनी या नतद्रष्ट व किरकोळ स्वरुपाच्या भुतुकल्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे आहे.

-'बेफिकीर'!

नवीन भागाच्या प्रतिक्षेत,

आभारी आहोत सान्गीतल्याबद्दल्...(न्.भा.प्र्.)...
खरच 'बेफिकीर' आहात......
हे अजुन एकदा सिद्ध झालय्......खुप छान्..नवीन कादम्बरी....."गुड मॉर्निंग मॅडम"

लिहीत रहा....

सावरी

सायो,

सूडाने आन्धळे झालेल्या व्यक्तीला समोर काहीही न पाहाता वार करायची सवय असते. तसे तूमचे झाले आहे.
नाहीतर तूम्ही " तेव्हा पब्लिक फोरमवर काही चालत नाही हो प्रफुल्लाताई" असा स्त्रीलिन्गी
करण्याच्या आधी माझे प्रोफाईल तपासून मी पुरूष आहे हे पाहीले असते तर तूमचा प्रतिसाद अधिक सयुक्तिक झाला असता.

पण जाऊदेत. काही व्यक्तिना आपण सर्वज्ञानी असून आपल्याला कूठेही आपली नसलेली अक्कल पाजळायची सवय असते, अश्या लोकाकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य असते.

"लोका सान्गे ब्रह्म ज्ञान, स्वत कोरडे पाषाण"

Pages