प्रसवलोच नाही..........

Submitted by भुंगा on 27 October, 2010 - 08:38

कौतुकजी, डॉक्टरांच्यावतीने माझा हा झब्बू.......... चु.भु.द्या.घ्या.
राहावले नाही, विडंबन असले तरी काही मांडण्याचा प्रयत्न केलाय्...बघा रुचतो का????

मला मी कुठेसा, गवसलोच नाही
किती बार झाले, थबकलोच नाही

वेटरचे इशारे, मित्रांचे पिसारे
सुके मांस खाल्ले, कलंडलोच नाही

तसे पेग माझे, कुठे लार्ज होते
कळेना तुला का, चिकटलोच नाही ?

कसा वास माझा, खुणावेल तुजला
अजून एवढा मी, प्यालोच नाही

घर गाठण्याची, नशा धुंद वेडी
"तिच्या" उंबर्‍याला, अडकलोच नाही

कदाचित असावा नवा वास तोंडी
उभी बायको... मी, टरकलोच नाही

कधी आईला मुसमुसून सांगतो मी
"पोटी तुझ्या मी, प्रसवलोच नाही"

गुलमोहर: 

<< घर गाठण्याची, नशा धुंद वेडी
"तिच्या" उंबर्‍याला, अडकलोच नाही >>

<< कधी आईला मुसमुसून सांगतो मी
"पोटी तुझ्या मी, प्रसवलोच नाही" >>>

दोन्ही अप्रतिम. नंबर वन अगदी.

विडंबन असले तरी काही मांडण्याचा प्रयत्न केलाय्...बघा रुचतो का????>>> हा प्रामाणिकपणा आवडला. बाकी आवडण्यासारखे विडंबनात काहीही नाही. राग मानू नको. पण शब्दांच्या जागा भलत्याच चुकिच्या आहेत काही ठिकाणी. अर्थ शोधावा लागतो आहे. आणि शोधुनही समाधानकरकरित्या तो पोहोचत नाही.

हबा खरेय.
त्याने जास्तच घाई केलिये पोस्टायला असे मल वाटते.
पण आहे हेही छानंच की. हसण्याला उत्तम औषध!
भुंगा लिहित रहा.

भुंग्या, मित्रा प्रयत्न मस्त आहे. एक काम कर, विशल्याला कामाला लाव. तो देईल सुधारणा करून. मीच माझ्या गझलेला विंडबित करणं जरा संकेताना धरून जाणार नाही.
(अवांतर - तुला अस नाही वाटत की तू तुझे गुण येता-जाता जगजाहीर करतोयस. बारंबार बरे नव्हे.)

भुंग्या, शेवटच्या दोन ओळी .... , Hats off yaar !

त्या कौतुकचं काही ऐकु नको, त्याला काड्या लावण्याची सवयच आहे Wink

भुंग्या .. मस्त विडंबन..

कधी आईला मुसमुसून सांगतो मी
"पोटी तुझ्या मी, प्रसवलोच नाही"

ह्या ओळी जबरदस्त.. खरोखर नं- १ रे... Wink

मला मी कुठेसा, गवसलोच नाही
किती बार झाले, थबकलोच नाही

भुंग्या,
ही तुझी भन्नाट कविता वाचुन मी तर .."हबकलोच" गड्या !
Lol
घर गाठण्याची, नशा धुंद वेडी
"तिच्या" उंबर्‍याला, अडकलोच नाही

म्हणुनच म्हणतो नंतर आपल्याच घरी जावं ...!
Lol