Submitted by जया एम on 27 October, 2010 - 02:15
शकुन
तुझ्या आवर्ती डोहाचा थांग लागता लागेना
जीव वाळवंट झाला माझी तहान भागेना
निघे स्वप्नांचा काफिला, वाट सरता सरेना
पुण्याईने अस्तित्वाचा कुंभ भरता भरेना
पोथी जन्माची वाचता मृत्यू शकुन सांगतो
कान्हा देवकीचा यशोदेच्या अंगणी रांगतो
देह वाहून थकला पूर्वसंचिताचे भार
होती बंद माझे डोळे, तुझे उघडता द्वार
गुलमोहर:
शेअर करा
<< तुझ्या आवर्ती डोहाचा थांग
<< तुझ्या आवर्ती डोहाचा थांग लागता लागेना
जीव वाळवंट झाला माझी तहान भागेना >> खूप हळुवार ! आवडली.
सह्हीच
सह्हीच
आवडली.
आवडली.
शेवटच्या दोनोळी फार फार
शेवटच्या दोनोळी फार फार आवडल्या.
शूम्पी +१ पोथी जन्माची वाचता
शूम्पी +१
पोथी जन्माची वाचता मृत्यू शकुन सांगतो >> निघोट
देह वाहून थकला पूर्वसंचिताचे
देह वाहून थकला पूर्वसंचिताचे भार
होती बंद माझे डोळे, तुझे उघडता द्वार
अर्थगर्भ.. सुरेख कविता !
देह वाहून थकला पूर्वसंचिताचे
देह वाहून थकला पूर्वसंचिताचे भार
होती बंद माझे डोळे, तुझे उघडता द्वार >>>> केवळ सुंदर ....
देह वाहून थकला पूर्वसंचिताचे
देह वाहून थकला पूर्वसंचिताचे भार
होती बंद माझे डोळे, तुझे उघडता द्वार >>> छानच.
शेवटच्या ४ ओळी फार गूढगर्भ
शेवटच्या ४ ओळी फार गूढगर्भ आहेत, तरल आहेत. जया एम यांच्या सर्व कविता सुंदर आहेत.