... आणि कल्पनेचं वारू (कायमचं) खाली बसलं!

Submitted by ललिता-प्रीति on 17 November, 2008 - 00:23

'स्त्री' मासिकाच्या ऑगस्ट-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.

------------------------------------------

खाद्यपदार्थांच्या काही जोड्या या ऐकताक्षणी विजोड वाटतात. जसं पिठलं-पोळी. म्हणजे, वेळप्रसंगी भुकेला ही जोडी काही वाईट नाही पण पिठलं-भाकरी ची मजा त्यात नाही हे ही खरं. आमटीभात किंवा आमटीभाकरी खाणाऱ्याला पोट भरल्याचं समाधान नक्कीच वाटेल. पण आमटी-ब्रेड? झालं ना तोंड वाकडं? चिवड्यावर दही किंवा ताक अनेकजण घेतात पण चिवड्यावर दूध कसं लागेल? किंवा चकली दुधात बुडवून खाल्ली तर? तर काही नाही; फक्त दिवाळी, फराळ आणि एकंदरच मराठी खाद्यसंस्कृतीचा बट्ट्याबोळ ठरलेला!
... कल्पनेचं वारू चौखूर उधळवून सुद्धा या पलिकडे मला उदाहरणं सुचेनात. पण कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातच असे अनुभव येतात की ते वारू देखील उधळणं विसरून, आपले चारही खूर आवरून मटकन खाली बसतं. आता हेच पाहा ना...

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक उच्चशिक्षित उत्तर भारतीय कुटुंब राहत असे. (पुढे येणाऱ्या वर्णनाचा त्यांच्या उत्तर भारतीय असण्याशी काहीही संबंध नाही. तेव्हा कृपया... सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. ) माझ्याच वयाची असल्यामुळे म्हणा पण त्या गृहस्वामिनीशी माझी बऱ्यापैकी ओळख होती. बऱ्याचदा आमच्यात पदार्थांची देवाणघेवाणही चालायची. आपल्या मराठी पदार्थांचं मी नेहेमी तिच्याजवळ वर्णन करत असे आणि गप्पांमधून मला हे ही कळलं होतं की तिला विशेषतः आपले गोड पदार्थ खूप आवडायचे.
श्रावणातले दिवस होते. नारळीपौर्णिमेनिमित्त घरात नारळीभात केलेला होता. नारळीभाताचा नमुना तिच्याकडे पोहोचवायची मला हुक्की आली आणि तसा मी तिला तो दिला. दुसऱ्या दिवशी ती डबा परत करायला आली. गोष्ट एवढ्यावरच थांबवायची की नाही? पण नाही! त्या नारळीभातावरच्या तिच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची अजून एक हुक्की मला स्वस्थ बसू देईना. (कारण त्या कुटुंबानं तो पदार्थ प्रथमच पाहिला होता हे मला आदल्या दिवशी समजलं होतं. )
(मूळ संवाद हिंदीत होते. )
"कसा वाटला कालचा भाताचा प्रकार?"
"फारच छान. एकदम चविष्ट."
"त्यावर तूप-बिप घालून खाल्लंत की नाही?" (स्वस्थ बसू न देणारी) हुक्की क्र. तीन.
"नाही, नाही. आम्ही त्याच्यावर दही घालून खाल्लं. फारच मजा आली जेवायला!!"
... दही? मजा?? माझा चेहेरा कसानुसाच झाला. मला हसावं की रडावं ते कळेना.
’नारळीभात, दही आणि मजा’ हा तिढा मला आजतागायत सुटलेला नाही. तरी, दहीयुक्त नारळीभाताची ती सृष्टी दृष्टीआडच ठेवल्याबद्दल मी दैवाचे आजही आभार मानते. पण अजून एका विजोड जोडीचं तर ’थेट प्रक्षेपण’ पाहणं आमच्या नशिबात होतं, ते असं...

काही वर्षांपूर्वीचा, जुलै-ऑगस्ट महिन्यातलाच एक दिवस. बाहेर पाऊस अक्षरशः ओतत होता. दुपारपासूनच वीज गायब होती. घरात पार गुडुप अंधार होण्यापूर्वीच मी रात्रीच्या जेवणासाठी ’फ्राईड राईस’ करून ठेवला होता - एक पदार्थ, एक जेवण! आणि स्वतःच्याच कल्पकतेवर खूष होऊन मजेत खिडकीतून बाहेर पाऊस बघत बसले होते. इतक्यात परगावच्या आमच्या एका स्नेह्यांचा "जेवायला आणि रात्रीच्या मुक्कामाला येत आहे" असा फोन आला. (ते त्यांच्या कामासाठी आमच्या गावात आले होते. आपण सोयीसाठी त्यांना काका म्हणू. )
जेवणात नुसता फ्राईड राईस काकांना आवडेल न आवडेल असा विचार मनात आला आणि पावसाची मजा वगैरे सगळं विसरून मी लगेच उठले. रोजच्यासारखाच साधा स्वयंपाक - म्हणजे पोळीभाजी, आमटीभात - मी मेणबतीच्या उजेडात उरकला.
... सगळे जेवायला बसलो.
"काका, मी खास काही केलेलं नाही. रोजचेच पदार्थ आहेत."
"अगं, असू दे. मला काहीही चालतं."
मग हे आधी नाही का सांगायचं? (मी, मनातल्या मनात! )
...गप्पाटप्पा करत जेवणं चालू होती. काकांना ’काहीही’ चालतं हे कळल्यामुळे मी त्यांच्यासमोर पांढरा भात आणि फ्राईड राईस असे दोन्ही पर्याय ठेवले.
"वाढ गं काहीही. मला काहीही चालतं." पुन्हा तेच!
’काहीही चालतं’ची वारंवार उद्घोषणा झाल्यामुळे मी त्यांच्या पानात फ्राईड राईस वाढला. माझ्या आंतरराष्ट्रीय पाककलेचा त्यांच्यावर प्रयोग करायची मलाच नस्ती हौस आली होती. आता काका तो फ्राईड राईस खातील आणि शिष्टाचाराला अनुसरून जरा "वा!" वगैरे म्हणतील अश्या स्वप्नरंजनात मी मग्न होते. इतक्यात...

... इतक्यात, काकांनी पानातली वाटीभर आमटी त्या फ्राईड राईसवर वाढून घेतली!!
’अरे, मुझे कोई बचा ऽ ऽ ओ! ’ असं मला ओरडावंसं वाटलं. (रामायणातल्या सीतेच्या "हे धरणीमाते मला पोटात घे" या उद्गारांचं ’बचा ऽ ऽ ओ!’ हे आधुनिक रूप समजावं. ) मी आणि माझ्या नवऱ्यानं पटकन एकमेकांकडे पाहिलं. (बॅटन-रीले शर्यतीत घेणाऱ्याच्या हातातून बॅटन खाली पडलं की ते देणारा आणि घेणारा एकमेकांकडे असंच बघत असतील. ) अश्या प्रसंगी ’हसावं की रडावं' हे दोनच पर्याय का उपलब्ध असतात? हसावं, रडावं की अजून तिसरंच काहीतरी करावं काही उमगेनासंच झालं. ’काहीही चालतं’ हे काकांनी प्रात्यक्षिकासह सिद्ध करून दाखवलं होतं. ’वाचवा ऽ ऽ’ चा मनातला आकांत काही थांबायचं नाव घेत नव्हता. त्यानंतरचं माझं जेवण मी कसं पूर्ण केलं मला काहीही कळलं नाही.

आजही चिंचगुळाची आमटी केली की मला हटकून फ्राईड राईस आठवतो. त्यावर ती आमटी ढसाढसा रडते. तिकडे कुठल्यातरी चिनी स्वयंपाकघरात तो फ्राईड राईसही उचकी लागल्यामुळे चिनी भाषेत वैताग व्यक्त करतो.

कल्पनेच्या वारूला झीट आलेली असते.

गुलमोहर: 

दक्ष Happy
रोज दोन वेळा खायचो ना, म्हणुन ५० म्हटले Happy
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

चहात चिरमुरे? ईईईईई

अरे काय मस्त लागते.......
गावी मिळणारे लालसर पोहे सुद्धा मी गरम चहात घालुन खाते.. आत्ताच तोंडाला पाणी सुटले....

आता चिरमुरे चहात घालून खाल्लेच पाहीजेत. Proud

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

ईईईईईईईईई >> विसरलीस का ?

~~~~~~~~~~~~~~~~~~~
उरलो फक्त चहापुरता .....

चहात चिरमुरे मला देखिल खुप आवडतात. चहात चिरमुरे टाकायचे आणि चमच्याने लगेच खायचे, परत चिरमुरे टाकायचे आणि पटकन संपवुन टाकायचे. असे कपातील चहा संपे पर्यंत करत बसायचे.
by the way आमटी भाता बरोबर चपाती कुणी खाल्ली आहे का ? (भात चपातीत घेऊन)
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

कुणीकुणी मध देखिल पावाच्या स्लाईसवर लावुन खातात अस ऐकलय!>>>> कुणीकुणी आयोडेक्स देखिल पावाच्या स्लाईसवर लावुन खातात अस ऐकलय!

दही बुंदी माझा आवडता प्रकार.
असलं काही खायचं म्हटलं की नवर्‍याचं एक वाक्य ठरलेलं असतं, "धनगर बसला जेवाया, ताकासंग शेवाया".

कुणीकुणी आयोडेक्स देखिल पावाच्या स्लाईसवर लावुन खातात अस ऐकलय!

>>>

हे वाचून कुणी आयोडेक्स लावून पाव खाउ नका.. पस्तावाल

कुणीकुणी आयोडेक्स देखिल पावाच्या स्लाईसवर लावुन खातात अस ऐकलय!

----
हे एक प्रकारचं ऍडिक्शन असतं असे काही वर्षांपुर्वी पेपरमधे वाचलं होतं.

मस्तच लागतात चहात चिरमुरे, आणि लाल पोहे... अहा! मस्त! कालच सापडले इथे एका दुकानात मला Happy

काय मस्त लिहिलं आहेस गं....!!

मी एक प्रकार सांगू का.....बीअरवर श्रीखंडाचं टॉपिंग..... कुणी केलंय का ट्राय Wink

कॉर्न फ्लेक्स आणि मँगो/ऑरेंज ज्युस...यम्म्म्मी Happy
आइस क्रीम आणि सोडा (पार्ल्याला खासियत मधे मिळतो. इथे अमेरिकेत फ्लोटस् म्हणुन मिळतो) पण खूप मस्त लागते.

हे एक प्रकारचं ऍडिक्शन असतं असे काही वर्षांपुर्वी पेपरमधे वाचलं होतं >>>> हे सर्व प्रकार मेडिकल कॉलेजेस मधे खूप चालायचे किंवा चालतात.

सतिश,

आमटी भाता बरोबर पोळी मी खाल्ली आहे. Happy

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

<<<हे सर्व प्रकार मेडिकल कॉलेजेस मधे खूप चालायचे किंवा चालतात >>> मेडिकलचे स्टुडंट्स असून असं करतात ! ऐ.ते. न. मग त्यांना कधी आतून बाहेरुन बॉडी पेन होतच नसेल Proud

२ नवशिक्या डॉक्टरांमधला संवाद...
पहीला : काय रे? काय करतोयस?
दुसरा : ब्रेड आणि आयोडेक्स खातोय.
पहीला : का रे?
दुसरा : आतडी लचकलिएत... Proud

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

सोलापुरला चिवडा आणि चहा खाताना बघितलंय. पुरणपोळी ताकांत बुडवुन खातानाही बघितलंय.
>>मला अजिबात आवडल नाही ते म्हणजे अधिकृत पणे फाईव्ह स्टार हॉटेल मधे देत असलेले आईस्क्रिम वर घालायचे तपकीरी काळे कडूशार गरम चॉकलेट (की तसच कायसेसे, नेमके नाव आठवत नाही)! एकदम याक याक थू थू! आम्हाला आप्ले वाटले की चॉकलेटी दिस्तय तर कॅडबरी सारखच गोड गोड असेल, कस्ल काय????
ओल्ड मॉन्क ऐवजी देशी चा कडक घोट (बिन पाणी/सोड्याचा) घेतल्यावर जस वाटेल तस वाटल>>>> अगदी मलाही तसंच वाटतं.
सुनिधी, दह्यात कांदा व फोडणी घातलेली चटणी कशी करतात? वाचुन पाणी सुटले तोंडाला.

>>ओल्ड मॉन्क ऐवजी देशी चा कडक घोट (बिन पाणी/सोड्याचा) घेतल्यावर जस वाटेल तस वाटल >> ट्राय केलंयस की काय? Happy

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अडम -- तमिळ लोकांची कढी म्हणजे मोअर कुळंबन, त्यात वाटलेली चणा डाळ, दही आणि शेवग्याच्या शेंगा इतकं असतं. ती त्यांची पद्धत आहे कढीची. छान लागते. आपल्यात बेसन ताकात घुसळतात. त्यांच्यात नेहमी भिजवलेली डाळ वाटून दह्यात घालतात.

आमच्या सोलापुरात चहा-चिवडा हिच हिट जोडी आहे,खास करुन आमचा स्पेशल भाग्यश्री चिवडा आणी चहा(नटी भाग्यश्रीशी त्याचा काही संबंध नाही)
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मला लहानपणी गावी गेल्यावर नवीनच कुटून आणलेले लाल गावठी पोहे नी मस्त दूधाळ चहा खायला आवडायचे आता नाही खात.
वरणफळे म्हणजे काहीतरीच बुळबुळीत खातेय असे वाटते. मला जराही नाही आवडत. आजारी आहे असे वाटते.
दही ईडली/साखर
कांदापोहे+ओले खोबरे+साखर
वगैरे वगैरे

कुणी साय, २ पारले-जी ची बिस्किटं, २ गुड्-डे ची बिस्किटं, जाम आणि गुलकंद एकत्र करून खाल्लंय का? हे सगळं फ्रिज मध्ये ठेवून खाल्लं तर अजून मस्त लागतं.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माझा नवरा आणि दीर, इडली/ डोसे चुरुन त्यावर चहा घेउन खातात!! ह्याहुन विजोड काय असेल?

ललिता खुप उशिरा वाचला लेख. पण सही आहे. फ्राईड राईस आणि आमटी अग चांगली लागेल. Proud
पण तुला अजुन एक भन्नाट कॉम्बीनेशन सांगु का? अर्थात तुला वाचुन चक्कर येईल पण खायला भन्नाट लागते. पोळी कुस्करुन त्यावर चहा घालायचा आणि त्यात लोणचं घालुन खायचे. Proud

मस्त आहे लेख....!!!

आणखीही काही कॉम्बीनेशन आहेत.....

१) थ॑ड पोहे आणि चहा कि॑वा दुध
२) पोहे आणि आमटी (मी थोडेदिवस शाकाहारी होतो आणि चुकून आमटी एवजी लाल रस्सा आणि पोहे खाल्ले.) Sad
३) चहा आणि चकली (चकली चे बारीक तुकडे करुन गरम चहात घालायचे आणि चमचाने एक एक तुकडा खायचा.) काय मस्त लागते टेस्ट.
४) एकदा पहाटे खुप भुक लागली म्हणुन पातेल्यातील आमटी (फक्त आमटीच होती) स॑पवली...(आई सकाळी विचार करत होती की मा॑जर कस॑ आमटी पिऊन जाइल.....!!!) Sad
५) भातात आमटी, दुध
६) इकडे मद्रासमधे चपाती सोडुन जे कहि पानात आसेल ते एकत्र करुन खातात आणि शेवटी दह्याबरोबर भात खाताना त्या दह्याचा ओघळ मनगटापासुन कोपरापर्य॑त येतो. (आक थु थु थु..हे मी नाही खात :))
७) इकडे मद्रासी लोका॑च॑ पाहुन मी भातात रस्सम घेतल॑ आणि चुकून ते जास्त झाल्यामुळे भात त्यात पोहायला लागला.

आता बास्.... नाहीतर लोक पळुन जातील.

अभिमन्यू

चहात चिरमुरे घालुन मी अजुनही खातो.

चहात केळ बुडवुन खायची मला सवय आहे.( आइला आवडत नाही ती शिव्या देते म्हनुन तिच्या माघारी).

''आजही चिंचगुळाची आमटी केली की मला हटकून फ्राईड राईस आठवतो. त्यावर ती आमटी ढसाढसा रडते. तिकडे कुठल्यातरी चिनी स्वयंपाकघरात तो फ्राईड राईसही उचकी लागल्यामुळे चिनी भाषेत वैताग व्यक्त करतो.

कल्पनेच्या वारूला झीट आलेली असते...''
सहीच लिहिलय!
अगं माझे एक असेच काका इडली सांबार वरण भात कालवल्यासारखं कालवून कालवून कालवून ....त्यात तुपाची धार सोडून खायचे....आणि सांबार मागताना हमखास अगं ए....जरा तुझी ती आमटी दे बरं जरा....असं मागायचे. असो....... काय करणार?

आणि ...पावात श्रीखंड घालून खाणार्‍यांसाठी..............
या सँडविचमधे खजुराचे बारिक कापलेले तुकडेही घालून पहा .....मस्त लागते.

ट्रेकला जाताना एक काँबिनेशन बर्‍याच वेळा पाहिलं होतं. मोस्टली ट्रक ड्रायव्हर हा प्रकार करतात. एक ग्लास भरुन चहा घ्यायचा, एक ग्लास पाणी आणि एक बिस्किटाचा पुडा. बिस्किटे पाण्यात बुडवुन खायची आणि वर तोंडी लावायला चहा.

श्रिखंडात लिंबु पिळुन खाल्लंय कुणी ? Happy

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

अग्गग काय भन्नाट काँबिनेशन आहेत एकेक, मला आपलं वाटल होत माझ्याच घरात एक रत्न आहे म्हणून Happy

बराच उशिरा वाचला लेख...मजा वाटली वाचुन.

अरे पुरण पोळी आणि आमटी खात नाही का कोणि? सगळे
नाव ठेवतात पण टेस्ट खुप छान लागते.

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

एकदा एकाला m/w मधे कोक गरम करून त्यात ओटमिल्स पावडर घालून वरती Resin bran cereals खाताना बघितले होते त्यानंतर कसल्याच combination चे काही वाटत नाही. Sad

Pages