... आणि कल्पनेचं वारू (कायमचं) खाली बसलं!

Submitted by ललिता-प्रीति on 17 November, 2008 - 00:23

'स्त्री' मासिकाच्या ऑगस्ट-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.

------------------------------------------

खाद्यपदार्थांच्या काही जोड्या या ऐकताक्षणी विजोड वाटतात. जसं पिठलं-पोळी. म्हणजे, वेळप्रसंगी भुकेला ही जोडी काही वाईट नाही पण पिठलं-भाकरी ची मजा त्यात नाही हे ही खरं. आमटीभात किंवा आमटीभाकरी खाणाऱ्याला पोट भरल्याचं समाधान नक्कीच वाटेल. पण आमटी-ब्रेड? झालं ना तोंड वाकडं? चिवड्यावर दही किंवा ताक अनेकजण घेतात पण चिवड्यावर दूध कसं लागेल? किंवा चकली दुधात बुडवून खाल्ली तर? तर काही नाही; फक्त दिवाळी, फराळ आणि एकंदरच मराठी खाद्यसंस्कृतीचा बट्ट्याबोळ ठरलेला!
... कल्पनेचं वारू चौखूर उधळवून सुद्धा या पलिकडे मला उदाहरणं सुचेनात. पण कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातच असे अनुभव येतात की ते वारू देखील उधळणं विसरून, आपले चारही खूर आवरून मटकन खाली बसतं. आता हेच पाहा ना...

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक उच्चशिक्षित उत्तर भारतीय कुटुंब राहत असे. (पुढे येणाऱ्या वर्णनाचा त्यांच्या उत्तर भारतीय असण्याशी काहीही संबंध नाही. तेव्हा कृपया... सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. ) माझ्याच वयाची असल्यामुळे म्हणा पण त्या गृहस्वामिनीशी माझी बऱ्यापैकी ओळख होती. बऱ्याचदा आमच्यात पदार्थांची देवाणघेवाणही चालायची. आपल्या मराठी पदार्थांचं मी नेहेमी तिच्याजवळ वर्णन करत असे आणि गप्पांमधून मला हे ही कळलं होतं की तिला विशेषतः आपले गोड पदार्थ खूप आवडायचे.
श्रावणातले दिवस होते. नारळीपौर्णिमेनिमित्त घरात नारळीभात केलेला होता. नारळीभाताचा नमुना तिच्याकडे पोहोचवायची मला हुक्की आली आणि तसा मी तिला तो दिला. दुसऱ्या दिवशी ती डबा परत करायला आली. गोष्ट एवढ्यावरच थांबवायची की नाही? पण नाही! त्या नारळीभातावरच्या तिच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची अजून एक हुक्की मला स्वस्थ बसू देईना. (कारण त्या कुटुंबानं तो पदार्थ प्रथमच पाहिला होता हे मला आदल्या दिवशी समजलं होतं. )
(मूळ संवाद हिंदीत होते. )
"कसा वाटला कालचा भाताचा प्रकार?"
"फारच छान. एकदम चविष्ट."
"त्यावर तूप-बिप घालून खाल्लंत की नाही?" (स्वस्थ बसू न देणारी) हुक्की क्र. तीन.
"नाही, नाही. आम्ही त्याच्यावर दही घालून खाल्लं. फारच मजा आली जेवायला!!"
... दही? मजा?? माझा चेहेरा कसानुसाच झाला. मला हसावं की रडावं ते कळेना.
’नारळीभात, दही आणि मजा’ हा तिढा मला आजतागायत सुटलेला नाही. तरी, दहीयुक्त नारळीभाताची ती सृष्टी दृष्टीआडच ठेवल्याबद्दल मी दैवाचे आजही आभार मानते. पण अजून एका विजोड जोडीचं तर ’थेट प्रक्षेपण’ पाहणं आमच्या नशिबात होतं, ते असं...

काही वर्षांपूर्वीचा, जुलै-ऑगस्ट महिन्यातलाच एक दिवस. बाहेर पाऊस अक्षरशः ओतत होता. दुपारपासूनच वीज गायब होती. घरात पार गुडुप अंधार होण्यापूर्वीच मी रात्रीच्या जेवणासाठी ’फ्राईड राईस’ करून ठेवला होता - एक पदार्थ, एक जेवण! आणि स्वतःच्याच कल्पकतेवर खूष होऊन मजेत खिडकीतून बाहेर पाऊस बघत बसले होते. इतक्यात परगावच्या आमच्या एका स्नेह्यांचा "जेवायला आणि रात्रीच्या मुक्कामाला येत आहे" असा फोन आला. (ते त्यांच्या कामासाठी आमच्या गावात आले होते. आपण सोयीसाठी त्यांना काका म्हणू. )
जेवणात नुसता फ्राईड राईस काकांना आवडेल न आवडेल असा विचार मनात आला आणि पावसाची मजा वगैरे सगळं विसरून मी लगेच उठले. रोजच्यासारखाच साधा स्वयंपाक - म्हणजे पोळीभाजी, आमटीभात - मी मेणबतीच्या उजेडात उरकला.
... सगळे जेवायला बसलो.
"काका, मी खास काही केलेलं नाही. रोजचेच पदार्थ आहेत."
"अगं, असू दे. मला काहीही चालतं."
मग हे आधी नाही का सांगायचं? (मी, मनातल्या मनात! )
...गप्पाटप्पा करत जेवणं चालू होती. काकांना ’काहीही’ चालतं हे कळल्यामुळे मी त्यांच्यासमोर पांढरा भात आणि फ्राईड राईस असे दोन्ही पर्याय ठेवले.
"वाढ गं काहीही. मला काहीही चालतं." पुन्हा तेच!
’काहीही चालतं’ची वारंवार उद्घोषणा झाल्यामुळे मी त्यांच्या पानात फ्राईड राईस वाढला. माझ्या आंतरराष्ट्रीय पाककलेचा त्यांच्यावर प्रयोग करायची मलाच नस्ती हौस आली होती. आता काका तो फ्राईड राईस खातील आणि शिष्टाचाराला अनुसरून जरा "वा!" वगैरे म्हणतील अश्या स्वप्नरंजनात मी मग्न होते. इतक्यात...

... इतक्यात, काकांनी पानातली वाटीभर आमटी त्या फ्राईड राईसवर वाढून घेतली!!
’अरे, मुझे कोई बचा ऽ ऽ ओ! ’ असं मला ओरडावंसं वाटलं. (रामायणातल्या सीतेच्या "हे धरणीमाते मला पोटात घे" या उद्गारांचं ’बचा ऽ ऽ ओ!’ हे आधुनिक रूप समजावं. ) मी आणि माझ्या नवऱ्यानं पटकन एकमेकांकडे पाहिलं. (बॅटन-रीले शर्यतीत घेणाऱ्याच्या हातातून बॅटन खाली पडलं की ते देणारा आणि घेणारा एकमेकांकडे असंच बघत असतील. ) अश्या प्रसंगी ’हसावं की रडावं' हे दोनच पर्याय का उपलब्ध असतात? हसावं, रडावं की अजून तिसरंच काहीतरी करावं काही उमगेनासंच झालं. ’काहीही चालतं’ हे काकांनी प्रात्यक्षिकासह सिद्ध करून दाखवलं होतं. ’वाचवा ऽ ऽ’ चा मनातला आकांत काही थांबायचं नाव घेत नव्हता. त्यानंतरचं माझं जेवण मी कसं पूर्ण केलं मला काहीही कळलं नाही.

आजही चिंचगुळाची आमटी केली की मला हटकून फ्राईड राईस आठवतो. त्यावर ती आमटी ढसाढसा रडते. तिकडे कुठल्यातरी चिनी स्वयंपाकघरात तो फ्राईड राईसही उचकी लागल्यामुळे चिनी भाषेत वैताग व्यक्त करतो.

कल्पनेच्या वारूला झीट आलेली असते.

गुलमोहर: 

कोक गरम करून
-------------------
?????????????????

फ्रूटी घालून चहा !!! Lol

लेख भन्नाट आणि प्रतिसाद महाभन्नाट Lol

मला व्याsssक वाटलेले कॉम्बो

१.चहा भात
२.आमटी पापड
३.भात केचप
४.शिरा आमटी

Lol Lol

वर्षे Lol

**************************************************
कल रात मेरे हाथ से फिसलकर गिरा था मेरा चश्मा
आज सुबह से दुनिया लकीरों में बँटी दिखती है II
...कहते हैं, काँच और दिल का रिश्ता बड़ा पुराना है II
**************************************************

जुना लेख. पण आज वाचला.
चहा-भात कधी ट्राय केला आहे?

काय भारी भारी रेशीप्या जमल्यात.
<<<ओल्ड मॉन्क ऐवजी देशी चा कडक घोट (बिन पाणी/सोड्याचा) घेतल्यावर जस वाटेल तस वाटल!>>> लिंबु Biggrin

<<<मी फ्रुटी घालुन चहा प्यालोय एकदा (अंगात मस्ती दुसरं काय ) >>> इति राजा Biggrin

<<<कुणीकुणी आयोडेक्स देखिल पावाच्या स्लाईसवर लावुन खातात अस ऐकलय! >>> Sad

<<<बीअरवर श्रीखंडाचं टॉपिंग..... कुणी केलंय का ट्राय >>> इति जयवि ...कसं बसेल , तळाशी पोहोचेल.:(

<<<माझा नवरा आणि दीर, इडली/ डोसे चुरुन त्यावर चहा घेउन खातात!! ह्याहुन विजोड काय असेल? >>> इति रमणी ...... चहाची दया आली .:P

<<< चहात केळ बुडवुन खायची मला सवय आहे >>> च्चचोटु . च्च च्च च्च्च Sad

<<<एकदा एकाला m/w मधे कोक गरम करून त्यात ओटमिल्स पावडर घालून वरती Resin bran cereals खाताना बघितले होते त्यानंतर कसल्याच combination चे काही वाटत नाही.>>> वेडा तर नव्हता ना तो ?

<<<एकदा पहाटे खुप भुक लागली म्हणुन पातेल्यातील आमटी (फक्त आमटीच होती) स॑पवली...(आई सकाळी विचार करत होती की मा॑जर कस॑ आमटी पिऊन जाइल.....!!!) >>> अभिमन्यु . :हहगलो::हहगलो::हहगलो:

सही काँम्बोज आहेत एक एक... Lol

लहानपणी तळलेल्या पिवळ्या/पांढर्‍या नळ्या - 'बॉबी' म्हणायचो त्याला - तोंडात स्ट्रॉ सारख्या धरायच्या आणि त्याने चहा/कॉफी प्यायचो... भन्नाट आवडायच तेव्हा. आता इतक्यात ट्राय केल नाहिये.

माझी मामी अमेरिकन (ओरिजनल - गोरी) आहे. ती मुंबईला पहिल्यांदा मामा बरोबर आली तेव्हा आईने घरी श्रिखंड केले होते. मामी ने श्रिखंड + भात + चटणी आवडीने खल्ले होते. असं आई सांगते (मी तेव्हा अस्तित्वात नव्हते :)). मामीला आता श्रिखंड इतक आवडत की ती स्वतः घरी बनवते पण साखरे ऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा घालते Happy

इथे अनेक लोक सिगरेट ओढताना सोबत काळी कॉफी पिताना/कोक पिताना बघितलय... या......क..... :किळस वाटलेली बाहुली:

ब्रेड वर टुथपेस्ट, ओडोमॉस असले प्रकार लावुन पण खातात म्हणे.... ऐ. ते. न. Happy

एका बार्बेक्यु पार्टीत बघितल... ग्रिल्ड अननस आणि त्यावर टॉम सॉस + मेयॉनीज.....

पॅनकेक + मेपल सिरप + फ्राईड बेकन रॅशर..........:अशक्य किळस आलेली बाहुली:

चिवडा-आमटी झक्कास लागते...

गोड शंकरपाळे, चहा/कॉफी मधे बुडवुन .. क्या बात है... Happy

गरम गरम वरणफळ/चाकोल्या/डाल-ढोकली - त्यावर तुपाची धार आणि कांदा-लसुण चटणी.... आ हा हा.....तोंडाला पाणी सुटले....

इडली + आईस्क्रिम = माझ्या लेकीला आवडते (तिला आईस्क्रिम कशाबरोबर ही आवडते म्हणा... :))

१) आमटी भात बरोबर चपाती काय मस्त लागते म्हणुन सांगु कधी खाऊन बघा,
२) रसगुल्ल्याच्या पाकात इडली बुडवुन खाऊन बघा (सेम टु सेम रसगुल्लाच वाटते),
३) ब्रेड मधे केळ्याचे वेफर भर्रुन खाल्ले आहेत,?
४) भाजी चपाती खाताना प्रत्येक घासागणिक चहाचा घोट घेऊन बघा
५) पार्ले बिस्किट पाण्याबरोबर खाण्याचा कधी योग आला आहे का (मला बर्‍याच वेळा आला आहे)
६) कधी कधी तर फोडणीच्या भातात थोडी साखर मिसळुन खातो
७) साबुदाणा वडा बरोबर गोड दही आणि इडली साठी बनवीलेली ओल्या खोबर्‍याची चट्णी एकत्र करुन खाल्ली आहे का?

वरील सर्व उपद्व्यापांमुळे आई मला नेहमी फूड मिक्सर म्हणते (असो, पण हा माझा छंदच आहे असे म्हट्ले तरी चालेल)मग बघा ट्राय करुन

मी खालिल प्रकार ऐकले आहेत :

गुलाजामुन + दही

भातची पेज + ग्लुकोज बिस्किट

चहा + आम्लेट

ब्रेड + बेसनाचा लाडु

आवडलं .... सही लिहिलय.

माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीनी स्विट कॉर्न सूप आणि रस मलई एकत्र करून खाल्ली होती. ... मला ते खाताना बघावलंही नाही आणि आजही आठवलं तरी कसंतरी होतं.

कढीमध्ये भजी घालून खाण्याचा प्रकार कोणत्या प्रांतातून आला, असे वरती कुणी तरी विचारले होते. तो उत्तर भारतीय प्रकार आहे. तिकडे त्याला कढी-पकोडे म्हणतात. छान लागतो.
पदार्थांचे कॉम्बिनेशन करून खाणे किंवा नव्या चवींचा शोध घेणे यात वाईट काय आहे? फक्त जिभेइतकेच पोटाकडेही लक्ष द्यावे, हे उत्तम.
चकोल्या किंवा वरणफळे या पदार्थाला कुणीतरी वर खूप कमी लेखले आहे. ज्याची त्याची मानसिकता. पण आमचे लहानपण गरीबीत गेले. महिना अखेरीचे चार दिवस ओढग्रस्तीचे असायचे. त्यातली एक रात्र चकोल्यांमुळे आनंदी व्हायची. सुके खोबरे किसून उरलेल्या पातळ चकत्या (आम्ही त्यांना म्हातार्‍या म्हणायचो) आई डब्याच्या तळाशी मुद्दाम साठवून ठेवत असे. त्या अशावेळी चकोल्यांची चव वाढवायच्या. परवा आमच्या कर्वेनगरातील पोटोबा नावाच्या हॉटेलमध्ये गेलो होतो. वरणफळांच्या बाऊलची किंमत ३५ रुपये. कढईभर चकोल्यांमध्ये कुटुंब पोटभर जेवत असे, ही आठवण झाली.
मी केलेल्या काही प्रयोगांवर घरातून टीका झाली ते म्हणजे १) आमटीत दही घालून खाणे २) साबूदाण्याच्या खिचडीत बारीक कापलेला कांदा घालून खाणे. ३) शिळ्या भातावर चमचाभर कच्चे तेल व तिखट-मीठ घालून खाणे
माझा बॉस इतका गोडघाशा, की तो त्यातही हाईट करायचा. त्याने एकदा पाकाने निथळणारी जिलबी मलईदार रबडीत घालून खाल्ली. घरी आमरस आणि पुरणपोळी, मालपुवा बासुंदीत बुडवून खाणे हे नित्याचे आहे, असे म्हणाला. शिकरणीत काकवी घालून खातात, की नाही ते समजले नाही.

>>आमरस आणि पुरणपोळी, मालपुवा बासुंदीत बुडवून
हो, हे प्रकार सर्रास बघायला मिळतात (हो, आणि खायला पण :))
जिलबी रबडी, गुलाबजाम रबडी बर्‍याच ठिकाणी मिळतात..
आमरस आणि गरम पुपो तर खूप सुंदर लागते. कोरेगाव पार्कातल्या सिगडीमध्ये मध्यंतरी मालपुवा रबडी खाल्ली होती. झ का स होती!

एक एक प्रकार भन्नाट आहेत...माझी ६ वर्षांची लेक Mac'd मधे फ्रेंच फ्राइज + सॉस + आईसक्रीम अतिशय आवडीने खाते.

माझा नवरा नेहमीच भात + वरण /आमटी + श्रीखंड + लोणचं + भाजी + जे काही ताटात खाणेबल असेल ते एकत्र करुन खातो आणि मी हताश होऊन माझ्या पाककलेचा निर्घुण खुन होताना बघत असते Sad

इथे माबो वरच वाचलेले गुलाबजाम + आईसक्रीम एका गेट टुगेदर साटी करुन बघितले...खुप आवडीने खाल्ले सगळ्यांनी Happy

मस्तय की.

आमरस + भात = बालपणचं अत्यंत आवडतं जेवण.
मॅगी + आंब्याचं लोणचं + भाजलेला उडदाचा पापड = हॉस्टेलवरचं मध्यरात्रीचं जेवण.
गोड शिरा + आंब्याचं लोणचं
ब्रेड मध्ये पिकलेलं केळं घालून सँडविच

कुणीकुणी मध देखिल पावाच्या स्लाईसवर लावुन खातात अस ऐकलय!>>>>
मी सुद्धा खाल आहे लीम्बुदा त्यात काय नवल. एका slice वर Peanut / Almond Butter आणि एका slice वर मध. खूपच मस्त लागत.
आमटी-ब्रेड?>>>>>>>
मी सुद्धा खाते फ्रेंच ब्रेंड बरोबर कधी कधी. पोळ्या जास्त चांगल्या बनवता येत नाहीत म्हणून शोधलेला उपाय आहे हा.
चहात चिरमुरे? ईईईईई >>>>>>>>
दक्षणादि मी सुद्धा खायचे शाळेत असताना चहात चिरमुरे, पोहे, चकली आणि लक्ष्मि नारायण तिखट चिवडा.
माझी एक मैत्रीण coke मध्ये Ice cream घालून खाते. मला तर विचारसुद्धा करवत नाही.
मला आदल्या दिवसाची इडली दुसऱ्या दिवशी pan वर थोड तेल टाकून खरपूस भाजून सकाळच्या चहा बरोबर आवडते.

ललिता-प्रीती- लेख मस्त जमलाय..
खाली सर्वांच्या कल्पनांचे वारू अक्षरशः उधळलेत नुस्ते!! Rofl Lol
एकेक काँबीनेशन वाचून आता अतिशय निरनिराळ्या चवी आल्यात तोंडात.. Proud
चायनामधे घसा बसला असल्यास कोक ,भरपूर किसलेलं आलं घालून उकळ,उकळतात्.आणी मग गाळून गर्मागरम पितात... त्याने धरलेल्या घश्याला एकदम आराम मिळतो-ट्राईड एण्ड टेस्टेड
लहानपणी दुधात चिवडा भिजवून खायला फार आवडायचं..

Lol मस्त लिहिलं आहेस.
<<चायनामधे घसा बसला असल्यास कोक ,भरपूर किसलेलं आलं घालून उकळ,उकळतात्>> तरीच. माझा घसा बसल्यावर एका चायनीज मैत्रिणीने हि रेसिपी दिली होती, मी कचर्‍यात टाकून दिली Lol <<धरलेल्या घश्याला एकदम आराम मिळतो>> कोक मधे पेस्टिसाईड्स असल्याने का काय ? Wink Light 1

बरं आपला अत्यंत प्रिय दही भात, माझ्या अनेक जपानी मित्र मैत्रिणींना डिसगस्टिंग वाटतो. Wink दहि हे फक्त डेसर्ट म्हणुन खायचे अस्ते म्हणे.

माझी एक मैत्रीण coke मध्ये Ice cream घालून खाते. मला तर विचारसुद्धा करवत नाही>> अनन्या हे कॉम्बिनेशन तर McD मधे फेमस आहे.. Happy

>>इतक्यात, काकांनी पानातली वाटीभर आमटी त्या फ्राईड राईसवर वाढून घेतली!!

काहीच्या काही लेख. हे दोन पदार्थ एकत्र खाल्ले तर त्यात काय एवढं आश्चर्य करण्यासारखं? अनेक लोकं खातात.

झकास लेख्...आवडला...:)

@Adm
मी पार्ले बिस्कीट चहात बुडवून खायच्या सवयीप्रमाणे इथे येऊन कुक्या आणि केक पण कॉफित बुडवून खातो... त्याबद्दल प्रत्येकवेळी माझे रुमीज खूप शिव्या घालतात...>>>>> कुक्या??चहा फसकन बाहेर आला पीता पीता... Happy
मी कॉलेज ला होते तेव्हा माझी मैत्रिण पार्ले बिस्कीट पाण्यात बुडवुन खायची...

माझ्या नेहेमीच्या बारचा मेनेजर दरवेळेला पिताना चहा पिणार का म्हणुन विचारायचा. एक दिवस कन्टाळा आला म्हणून एक घोट दारुचा अणि एक घोट चहाचा प्यालो मग त्यानि विचारचे बन्द केले.

माझ्या ओळखीचे एक जण कामानिमित्त रान्चीला गेले होते तिकडे त्यांनी चहात जिलेबी बुडवुन खाणारे बिहारी बाबू पाहिले आहेत.

चहा आणि मेंथॉल कसं वाटतं? पण चहात हॉल्सची गोळी विरघळवायची नाही बरंका! ती जिभेवर ठेऊन त्यावरून कटिंग चहाचे भुरके ओरपायचे. हळूहळू गोळी विरघळत जाते तशी चहाला एक वेगळीच चव येते. आणि शेवटी गरातले मेंथॉल सुटले की मग...!!!

-गा.पै.

काही प्रयोग मी पण केलेय, जसे -
चहात केळं बुडवून खाणे,
चहात डाळींबाचे दाणे बुडवणे व चहा पिवून झाला की ते खाणे
कॉलेजात एकदा चहात थम्सअप टाकून पिले होते, पैज लागली होती तेव्हा

आधी एकदा वाचलं होतं पण आताच्या नव्या भरपाईसह वाचायला आणखी मजा आली. Happy
मी कुठली भलतीसलती कॉम्बिनेशन करत नाही इमानदारीत (अर्थात मुकाट्याने ) खातो Happy
नाही म्हणता एक गोड शिर्‍याबरोबर लोणचं खाणारा प्राणी दिसलाय मला Happy

Pages