दोन डोळे

Submitted by मनाचा मालक on 25 October, 2010 - 17:35

सप्तरंग नकळत देऊन जातो उन्हात पाऊस येऊन
बरसणाऱ्या नभात तेंव्हा मज दिसतात दोन डोळे

आभाळाचे काळे अंगण जिथे घालीशी तारे पिंगण
लुकलुकणाऱ्या ताऱ्यात मजला दिसतात दोन डोळे

मज वाटते असे काही जग याहून निराळे नाही
जग विरघळले ज्यात माझे ते दिसतात दोन डोळे

हा भास कि काय जाणण्या मी मिटतो दोन्ही पापण्या
मिटल्या डोळ्यानाही पण आता दिसतात दोन डोळे

जुळवून कशाशी नाते मन पिसाट मोर होते
गळलेल्या पिसातही मज तेच दिसतात दोन डोळे

प्रीती जयात साचे दर्पण तिच्या अंतराचे
मज वेड लावणारे ते दिसतात दोन डोळे

नका म्हणू गड्यानो सोड वेड माझे मला हे गोड
मी आंधळा प्रेमात तिच्या पण दिसतात दोन डोळे

दिसतात किती भोळे ते हसतात दोन डोळे
स्वप्नातहि डोळ्यात माझ्या असतात दोन डोळे

गुलमोहर: 

या मालक