गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १

Submitted by बेफ़िकीर on 25 October, 2010 - 10:27

"यू मे नॉट अ‍ॅग्री टू इट टूडे मोना... बट यू विल हॅव टू ट्रस्ट इट... इट्स अ फॅक्ट... अ मेल्स सपोर्ट इज मस्ट फॉर अ फिमेल इन लाईफ..."

अत्यंत मिश्कील डोळे, ज्यांच्यात एक अवखळ, बालकांना शोभावी अशी भुर्‍या रंगाची छटा होती, त्यांत मागच्या समुद्राच्या लाटांचे प्रतिबिंब पडलेले होते. पुरूष असूनही राकटपणापेक्षा त्याच्यात बॉयीश लूक्स अधिक होते. आणि चेहर्‍यावर कायम भुरळ पाडणारे स्मितहास्य! ज्यावर विश्वास ठेवायला कुणीही क्षणात तयार होईल! रेमंड्सच्या त्या ग्रे ब्लेझरमध्ये त्याचा गुलाबी गोरा रंग आता लालसर होऊ लागला होता. फॉस्टरचा टिन घोट घोट घशात उतरवत 'बघ कसे तुला चिडवले' असा लूक चेहर्‍यावर ठेवून जतीन खन्ना समोर बसलेल्या मोना गुप्ताकडे मिश्कीलपणे पाहात होता. पण त्याला अपेक्षित तो परिणाम झाला नाही. लहानपणी ती चिडायची आणि चिडून काहीतरी बडबडायची. पण त्या गोष्टीला आता वीस वर्षे झाली होती. त्यावेळेस ती फक्त पाच वर्षांची होती. आता पंचवीस! आणि जतीन तीस!

अचानकच, जतीनचा आत्मविश्वास किंचित डळमळावा असं काहीसं ठाम प्रकारचं स्मितहास्य मोनाच्या चेहर्‍यावर आलं! डोळ्यात मात्र त्या हास्याची भावना जेमतेमच उतरली होती. कारण डोळे काहीश्या निर्धाराने अधिक व्यापलेले होते.

मोना गुप्ता! अजून अल्लडच वाटावी अशी तरुणी! श्रीमंती मात्र तिच्या व्यक्तीमत्वातूनच जाणवत होती. तिची कार, युनिफॉर्ममधला ड्रायव्हर, तिचा पेहेराव, अ‍ॅक्सेसरीज, चेहर्‍यावरील भाव आणि त्वचेही झळाळी! सर्वातून श्रीमंती ओसंडून वाहात होती. मात्र चेहर्‍यावर एरवी जे स्वप्नाळू, मिश्कील भाव असायचे त्यांची जागा आता खूपच परिपक्व भावांनी घेतलेली होती. आणि आत्ताचे हे काहीसे मिश्कील, काहीसे निर्धारातून आलेले स्मितहास्य हा त्याच भावांचा पहिला आविष्कार होता.

"इझ इट? ओ आय डिडन्ट नो दॅट? बट व्हॉट आय डू नो इज.. अ मेल कॅन नॉट बॉर्न अनलेस अ फिमेल गिव्ह्ज हिम द बर्थ... चेक प्लीज..??"

थांबलेल्या मॅनेजरकडे पाहात मोनाने बिल मागीतले तेव्हा जतीनला आयुष्यात पहिल्यांदाच एक गोष्ट जाणवलेली होती. हा अल्लड गोरापान चेहरा, हे असे ट्रेंडी कपडे, या अशा अ‍ॅक्सेसरीज, कोणत्यातरी हिंदी किंवा इंग्लीश पिक्चरचा प्रभाव असल्याप्रमाणे केलेला मेक अप आणि हेअर स्टाईल आणि जणू जस्ट कॉलेजमधून बाहेर पडली असावे असे वाटावे असे वागणे.. या सर्वाच्या मागे एक व्यक्ती आहे... जिच्यावर पुर्वी... खूपच पुर्वी आपला कंट्रोल होता... आता मात्र... तो अजिबातच नसावा असे दिसत आहे..

आणि ही भावना मनात नव्यानेच उगवल्यामुळे बॉयीश दिसणार्‍या जतीनच्या मनातला पुरुषी अहंकार काही प्रमाणात दुखावला गेला होता. वर्षानुवर्षे मामांच्या तालमीत तयार झाल्याने त्याच्या चेहर्‍यावर मनातल्या भावनांची पुसटही रेघ दिसली नाही.

आणि गुप्ता हेलिक्स लिमिटेडच्या अकाउंटमध्ये सही करून मोना उठली तसा जतीन यंत्रवत चालत तिच्या कारमध्ये तिच्या शेजारी जाऊन बसला.

"ग्रॅन्ड मराठा"

मोनाने ड्रायव्हरला सोडलेली आज्ञा ऐकून ड्रायव्हरलाही जरा बरे वाटले. आत्ताच ताजमधून बाहेर पडत होते. इथून स्ट्रेट सेव्हन स्टार हॉटेल! चला! पार्किंगमधून निदान भारी भारी पब्लिक तरी बघता येईल. एखादा नट किंवा नटीसुद्धा! आणि मग संध्याकाळी शांतपणे पुण्याला निघायचं! मॅडम एकदम भारीच आहेत. महिन्याभरापुर्वी आपल्याला सांगायच्या ब्ल्यू डायमंडला घे, सेंट्रलला घे! आणि तासनतास मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्या, खरेदी करायच्या आणि घरी यायच्या! कालपासून एकदम रंगच पालटला आहे. मुंबई! ताज! इथून ग्रॅन्ड मराठा!

हा ड्रायव्हर होता गुप्तांचा! त्याचे नांव पराग! असेल तिशीचा! पण भरपूर फिरलेला होता. आणि एस क्लास मर्सिडिझ तो त्या कारच्याच दर्जाप्रमाणे वापरायचा आणि हाताळायचा! शिडशिडीत शरीरयष्टीचा सावळा पराग सीट बेल्ट घालून ड्रायव्हिंग सीटवर बसला की सहज आठ आठ तास ड्रायव्हिंग करू शकायचा!

तिकडेही समुद्र अन इकडेही!

मात्र जायला लागणारा सव्वा तास फारच कटकटीचा! आले एकदाचे ग्रॅन्ड मराठा!

खाडखाड दारे उघडून मोना आणि जतीन बाहेर पडले आणि गेले ते थेट तिसर्‍या मजल्यावरच्या कॉन्फरन्स रूममध्ये!

नो कॅमेरामन्स, नो न्युजपेपरवाले!

नाही म्हंटले तरी गुप्तांची मुलगी आहे म्हंटल्यावर एक दोन नवीन मेंबर पटकन उठून उभेच राहिले. त्यात जतीनच्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाचाही परिणाम होताच! पण बाकी सगळ्यांसाठी मोना ही मोनूच होती.

अंगाखांद्यावर खेळलेली! त्यानंतर फक्त अ‍ॅन्युअल फंक्शन्सना दिसणारी! सगळ्यांशी सन्मानपुर्वक वागणारी आणि म्युझिक सुरू झाल्यानंतर मात्र डान्स फ्लोअरवर मैत्रिणींबरोबर धुंद होऊन नाचणारी!

लोहिया अंकल मेन सीटवर बसले होते. यात कुणालाच हरकत असू शकत नव्हती. ही वॉज जॉईंट एम्.डी.!

अ‍ॅन्ड ही वॉज देअर सिन्स द कंपनी वॉज फाउंडेड!

मोना आली ती तडक स्वतःसाठी असलेल्या खुर्चीवर बसली. ही खुर्ची लोहिया अंकल यांच्या खुर्चीपासून दोन खुर्च्या सोडून होती. या दोन खुर्च्यांवर अर्देशीर इंजीनीयर आणि सुबोध गुप्ता बसलेले होते. अर्देशीर इंजीनीयर कंपनीचे सर्व बाबतीतले सल्लागार होते. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर! वय वर्षे साठ! तरीही ऑन रोल! आणि सुबोध गुप्ता होते गुप्तासाहेबांचे पुतणे! सख्या मोठ्या भावाचा एकमेव मुलगा! आता भाऊ आणि वहिनी तर केव्हाच मेलेले होते. पण त्याला दिलेले वचन गुप्तासाहेबांनी पाळलेले होते. सुबोधला मी माझ्या उद्योगात सेटल करेन! सुबोध कर्तबगार माणूस होता. मोनापेक्षा तो जवळपास दहा वर्षांनी मोठा होता. लहानपणी ते दोघे कधीच एकत्र नव्हते. सुबोध वडिलांबरोबर सिमल्याला असायचा! एखाद दोन वेळाच भेट झालेली असेल. सिमल्याचे हॉटेल काही कारणाने बंद पडले आणि वडिलांनी धसकाच घेतला. त्यात ते गेले आणि तीन वर्षांनी सुबोधची आई! मग सुबोध पुण्याला आला आणि गुप्तासाहेबांना भेटला. त्यांनी त्याला कन्स्ट्रक्शन आर्म बिझिनेस बघायला मुंबईला बसवले. हा बिझिनेस गुप्ता हेलिक्सचा कोअर बिझिनेस नव्हता. पण नवीन उदयाला येत असलेली शाखा होती ही!

सगळ्यांनी एकमेकांना विश करेपर्यंत हव्या त्या बेव्हरेजेसचे वाटप झाले. मोना सर्वांशी आत्मविश्वासाने बोलत होती.

दहा एक मिनिटांनी अर्देशीर बोलू लागले. सर्व संवाद इंग्लीशमध्येच होते.

"मित्र मैत्रिणींनो, एका फारच वाईट घटनेनंतर आपण सर्व पहिल्यांदाच भेटत आहोत. त्या दिवशी भेटलो होतो, पण तेव्हा त्या प्रसंगाचे अत्यंत वाईट सावट सर्वांच्या मनावर होते. ते तर आजही आहे. पण आज आपल्यापुढे गुप्ता हेलिक्स आणि त्यातील सर्व शाखांचे भवितव्य काय असेल याचा निर्णय घेण्याचा प्रश्न उभा ठाकलेला आहे.

मला आठवते.. मी, लोहिया आणि मोहन.. तिघेही त्या उमेदवारीच्या काळात खूप कष्ट करायचो.. अत्यंत कष्टाने उभारलेल्या या उद्योगजगताचा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ.. मोहन गुप्ता आज आपल्यात नाहीत.

सर्वप्रथम एक मिनिट शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहूयात!

.... धन्यवाद!

ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे. पण मोहन यांच्या विचारानुसार आपल्या सर्वांना पुढील वाटचाल करावीच लागणार आहे. आपल्या उद्योगावर आज जवळपास प्रत्यक्षरीत्या बाराशे तर अप्रत्यक्षरीत्या तीन हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. हा प्रचंड मोठा धक्का पचवून आपल्याला हे चक्र असेच चालू ठेवायचे आहे. आणि ही मोहनचीही इच्छा होतीच स्वतःची!

सगळे जण जमले आहेत. मोनाबेटीही आली आहे. आता मी मुख्य मीटिंगला सुरुवात करावी असा प्रस्ताव मांडतो "

कंपनीचे सर्व सी.ए., शासनाचे दोन अधिकारी, एक कंपनी सेक्रेटरी व बहुतांशी लहानमोठे भागधारक आलेले होते. जतीनने नेहमीच्या रिवाजानुसार सूत्रे हातात घेतली.

जतीन हा गुप्ताजींचा भाचा! बहिणीचा मुलगा! त्यालाही असेच बहिणीला दिलेल्या वचनामुळे उद्योगात घेतले होते त्यांनी! आणि गुप्ता हेलिक्सचा कोअर बिझिनेस हार्डंड अ‍ॅन्ड ग्राऊंड हेवी ड्युटी गिअर बॉक्सेसचे वेस्टर्न आणि साउदर्न झोनचे मार्केट एकट्या जतीनकडे होते.

नॉर्मली, मुंबईत झालेल्या मीटिंग्ज तोच अँकर करायचा.

"सर्व सन्माननीय सदस्यांनो.. मला अत्यंत खेद होतो की या मीटिंगला आपले स्फुर्तीस्थान गुप्ता अंकल नाहीत. एखादे जहाज बुडावे अशी आपल्या उद्योगाची अवस्था होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच आज एकत्र यायचे आहे आणि गुप्ता अंकलचे स्वप्न पुर्ण करायचे आहे.

अर्थातच, आजच्या मुख्य अजेंडाकडे वळत आहे. नवीन एम्.डी. नेमण्यासाठी जमलेल्या या सर्व सदस्यांना मी काही माहिती सांगू इच्छितो.

प्रथम लोहिया अंकल! गुप्ता अंकल यांचेच समवयीन, वय पंचावन्न व गुप्ता हेलिक्स व इतर सर्वच उद्योगांमध्ये गुप्ता अंकलंच्या खांद्यास खांदा लावून सुरुवातीपासून असलेले लोहिया अंकल आज २९ % भागधारक आहेत.

अर्देशीर सर! अर्देशीर सर आपल्या सर्वांनाच, इन फॅक्ट गुप्ता अंकल यांनाही सिनियर आहेत. ते ऑन रोल ई.डी. आहेत व दहा टक्के भागधारक! इतर सर्वांकडेच कमीअधिक प्रमाणात भाग आहेत.

मुख्य म्हणजे, गुप्ता अंकल यांचे सर्व ५१ % भाग हे त्यांची कन्या व माझी बहीण मोनालिसा गुप्ता यांच्या नावे नॉमिनेट झालेले आहेत.

विविध कायदेतज्ञांची मते घेऊन मी आता हा प्रस्ताव मांडत आहे.

की सर्वश्री सुबोध गुप्ता यांनी भागधारकांच्या मते नवीन एम. डी. पद कुणाला मिळावे याचा प्रस्ताव मांडावा. त्यावर सोळंकी यांनी अनुमोदन द्यावे.

सुबोध?? प्लीज.. "

सुबोध गुप्ता बोलू लागला.

" अंकल गेले.. काहीच बोलावेसे वाटत नाही.. पण.. शो मस्ट गो ऑन.. हे त्यांचेच वाक्य आहे... मी प्रस्ताव मांडतो की.. लोहिया अंकल यांनी या पदाचा भार स्वीकारावा व... त्यांना इतरांनी अनुमोदन द्यावे.."

"अनुमोदन... "

"... येस.. वी सपोर्ट.."

आता पुन्हा अर्देशीर सर बोलू लागले.

"एकंदर परिस्थिती पाहता, अत्यंत अनुभवी व कार्यक्षम नेतृत्व आपल्याला आज हवे आहे.. मी जरी अनुभवी असलो तरी माझी प्रकृती आता साथ देत नाही.. तेव्हा.. सर्वानुमते आपण..."

"अंकल...?? कॅन... कॅन आय से समथिंग??"

मोनालिसाने या क्षणी तोंड उघडणे अतर्क्य होते.

"येस मोनू???? "

ही काय बोलणार किंवा ही कशी काय मधे बोलली हेच आधी कुणाला समजत नव्हते.

सगळे तो धक्का पचवत असतानाच तिने आणखीन मोठा धक्का दिला सभागृहाला...

"इव्हन.. आय कॅन अ‍ॅक्सेप्ट दॅट पोझिशन.. इफ यू फील अ‍ॅप्रोप्रिएट.. आय मीन... इट इज लॉफुल टू... "

'तुम्हाला योग्य वाटलं' तर हा मोठेपणा देतानाच 'कायद्यानेही तेच योग्य आहे' हा शालजोडीतलाही दिला गेलेला होता.

स्टन्ड! एव्हरीवन वॉज सिंपली स्टन्ड!

'हे' अगदीच होऊ शकणार नाही असे लोहियांना किंवा इतरांना मुळीच वाटत नव्हते. पण ते या सभागृहात, या फोरमवर डायरेक्ट होईल असे मात्र मुळीच वाटत नव्हते. आजवरची सर्व रिलेशन्स लक्षात घेऊन मोना लोहिया आणि अर्देशीर सरांशी आधी बोलेल आणि ते तिला त्यातून बाहेर काढतील व तिला भरपूर फायदाही करून देतील असे वाटत होते सगळ्यांना!

पण! मोनाने प्रकरण पूर्ण तापल्यावरच हा घाव घातला होता.

अर्देशीर खाली बघत होते. सुबोध चक्रावून मोनाकडे! जतीन लोहियांकडे! सर्व मेंबर्स एकमेकांकडे ! आणि लोहिया???

"ओह ऑफ कोर्स बेटा?? ऑफ कोर्स.. हे तूच करायला हवे आहेस.. वुई जस्ट थॉट यू आर अ बिट इनेक्स्पिरिअन्स्ड... सो.. बाय ऑल मीन्स... लेडिज अ‍ॅन्ड जंटलमेन.. अवर न्यू एम्.डी. इज???

मिस मोनालिसा गुप्ता... द मोस्ट कॅपेबल... यंग... एनर्जेटिक लीडरशीप.. शॅल वुई क्लॅप??? "

टाळ्यांचा कडकडाट चाललेला असतानाच युनियन लीडर नाना सावंतचा प्रवेश झाला. तो सरळ एका खुर्चीवर जाऊन बसला. त्याने इतरांना आणि इतरांनीही त्याला अभिवादन केले. खरे तर या मीटिंगला तो असण्याची गरजच नव्हती. पण आलेल्या माणसाला हाकलणार कसे?

नाना - काय झालं काय? टाळ्यांचा कडकडाट??
सुबोध - नवीन एम. डी....
नाना - अभिनंदन लोहियासाहेब... आमचाही सत्कार स्वीकारा...
लोहिया - मै नही नाना... मॅडम हुई है एम. डी.

नाना हबकून त्या 'एवढ्याश्या' पोरीकडे अचंब्याने पाहात होता.

सात वाजता मर्सिडिझमधून मोना पुण्याला निघाली तेव्हा जतीन, सुबोध आणि अर्देशीर लोहियांच्या शेजारी उभे होते.

त्यांच्यातीलच कुणीतरी मिश्कीलपणे म्हणाले..

"आगे आगे देखिये... होता है क्या..."

आणि बरोब्बर तीन दिवसांनी पुण्याच्या पिंपरी एम आय डी सी मधील प्लॅन्टच्या आलिशान केबीनमध्ये मोनालिसाने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत व अभिवादने स्वीकारत प्रवेश केला तेव्हा...

... गेली दहा वर्षे मोहन गुप्तासाहेबांचा अत्यंत विश्वासू पी.ए. म्हणून वावरणारा गोरे आत आला आणि चकीत नजरेने मोनालिसाकडे पाहात म्हणाला..

"गुड मॉर्निंग मॅडम"

गुलमोहर: 

अहो,
काय भन्नाट speed आहे तुमचा,

सगळ्या कादम्बर्या वाचून झाल्या, ओल्ड मंक नन्तर काय याचं चांगलच उत्तर आहे Happy
keep going, lot of people are appreciating but not expressing here.

Sandip

वाह सुरूवात एकदम मस्त झालीये...आता कथा कशी कशी वळणे घेत जाते याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे...

मायबोलीवर मी नवीनच ...
वाचायची खूप हौस आहे ... तुमचं लिखाण वाचूनच site जॉईन केली ..
आत्तापर्यंतच्या सर्व लिखाण वाचलंय तुमचं... खरचं खूप आवडल .. अगदी save करून ठेवलंय मी ते आणि जमेल तसं माझ्या मित्रमैत्रिणीन्पर्यंत हि पोहचवते ..
ओल्ड मंक ... चा अंतिम भाग वाचला आणि काळजी वाटली...स्वतःचीच कि आता काय कराव ? ... पण धन्यवाद ...
नवीन कादंबरीच्या लेखनाला मनापासून शुभेच्छा ...
पुढील भागांच्या प्रतीक्षेत ...
अजून एक ... येथील सर्वांचे प्रतिसाद वाचायलाही मज्जा येते... छान लिहितात सगळे आणि छान भांडतात देखील (पहिल्या number साठी)... Happy

मस्त. मला हेच आवड्त तुमचे....पहिली कथा सम्पतनाच दुसरि तयार...वाट पहायला लावत नाहि तुम्हि...

सुरुवात छान झालीये..असेच पुढे लिहित रहा...

नवीन कादंबरीच्या लेखनाला मनापासून शुभेच्छा ...
Happy मस्त सुरुवात्..कार्पोरेट वर्ल्ड .. इन्टरेस्टिन्ग विषय

hi "befikir Ji"
yesterday only i messaged u regarding the last episode for the old munk....
And today when i reached office i was thinking what shall i read next...

But really thanks that already ur next story episode is here .....

I think.. " me apalyala punha phone kivha message karun tras devu naye mhanun, tumhi lavkarat lavkar he katha takali vatate......" Happy hahahah....

काय हो बेफिकिर... कादंबर्‍यांचा खजिना आहे काय तुमच्याकडे , काल शेवटच्या भागाची नशा उतरते ना उतरते तोवर नविन कादंबरी आली देखील... Happy

बोलले तर आवडणार नाही, पण कंपनीच्या एमडीची नियुक्ती अशी होत नाही. कंपनीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात. एमडी कोण होणार आहे हे आधी बोर्ड ठरवून मग भागधारकांना कळवले जाते. कंपनी लॉ म्हणून एक मोठा कायदा आहे. एमडीची नियुक्ती ही त्याखाली येते, ह्यात अनेक बाबींची कायदेशीर पूर्तता करावी लागते. असे सर्प्राईज एमडी कोणाला होता येत नाही. कोणाला व्हायचे असेल, तर मीटिंगमध्ये प्रचंड वेळ जाईल आणि गोंधळ होईल. मीटिंग संपायला किमान एक दिवस लागेल.

शिवाय कंपनी पॉलिटीक्स प्रचंड असतं. हे सगळं भागधारकांच्या मीटिंगमध्ये झालेलं न दाखवता बोर्डरूममध्ये झालेलं दाखवलं असतं, तर पॉलिटीक्स, सर्व पातळीवरच्या सर्व लोकांच्या खेळ्या जास्त प्रभावीपणे दाखवता आल्या असत्या. हे तुम्ही लिहिलेलं अगदीच फिल्मी आणि वरवरचं झालंय.

पुढे कथानकावर ह्याचा परिणाम होणारही नसेल कदाचित, पण पहिलाच भाग तोही कोणत्याही कंपनीच्या एमडी अपॉईंटमेन्ट संबंधी असलेला इतका वरवर हाताळलेला पाहून, थोडं कायद्याबद्दल सांगावंसं वाटलं.

बाकी, चालूदे.

धन्यवाद पोर्णिमा,

मी अजिबात संदर्भ न घेता लिखाण करत असतो. त्यामुळेच असे लिहीले जाते. बरे झाले आपण सांगीतलेत. आता लक्षही ठेवा. हे मात्र खरे आहे की या बाबीचा कथनकाशी खूप संबंध नाही आहे. बेसिकली मोनालिसा तेथे पोचली हे महत्वाचे आहे.

धन्यवाद आपले व सर्वांचेच!

बोललेले आवडणार नाही>>> हे आपण कसे काय गृहीत धरलेत? साटोसं मधील लोकांनी मला जितके बदनाम केले आहे तितका मी आडमुठ्या किंवा दळभद्री / टुकार (हे त्यांचेच शब्द) नाही.

साटोसं म्हणजे सामुहिक टोळीबचाव संघटना!

बाकी चालुद्या >>> आपल्याला यातील काही डिलीट वगैरे करायचे असेल किवा रद्द करायचे असेल तर अवश्य करा! हे 'खासकरून' लिहिण्याचे कारण असे की मला व्यक्तीश: 'बाकी चालुद्या' असे कुणी म्हंटलेलं अजिबात आवडत नाही. हे काय तुमच्या परवानगीने चाललंय? की तुम्ही अती शहाणे आहात जे पोरा सोरांना 'खेळा पण आवाज करू नका' असे सांगताय! असे मी 'त्या' लोकांना म्हणतो. आपल्याला नाही. म्हणून म्हणालो, या लेखनाचा काही भाग दुरुस्त, संपादीत अथवा रद्द करणे जोवर एखाद्याच्या हातात नाही तोवर त्याने 'बाकी चालुद्या ' असे म्हणण्याची टिमकी गाजवू नये. मात्र, आपण दिलेल्या माहितीसाठी खरोखरच आभारी आहे .

-'बेफिकीर'!

पौर्णिमाच्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन.
मी चारवेळा ह्या बाफवर जवळपास असाच प्रतिसाद देण्यासाठी आले. पण अश्या प्रतिसादावर काय प्रतिक्रिया येणार त्याची कल्पना असल्याने 'जाऊ दे' म्हणून काहीच टाईप केले नाही. पण असे अवास्तव आणि अतर्क्य लिहायच्या अगोदर प्रत्यक्ष घटनांचे संदर्भ अभ्यासून ते प्रसंग रंगवलेत तर त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्‍यांवर कृपा होईल.

|| श्री ||
बेफिकीर जी, आपल्या सर्व कादंबर्‍यां मी नियमीत वाचतोय आणि फक्त प्रतिक्रिया देण्याकरिता मी माझे खाते सुरु केलय. खरोखर फार सुन्दर रितिने आपण सर्व लिखाण केलय़. मला तुमच्या लिखानातुण आनंद मिळतो. नविन कादंबरी देखिल उत्तम असेलच. शुभेछा.
तथा-कथित आपल ज्ञान , आपला अभ्यास म्हणुन सान्गणार्या जनतेशी एकदम असहमत.
प्रतिक्रिया देण्याची एक पध्दत असते, इथे प्रतिक्रिये ऐवजी ज्ञान पाझळ्लेल दिसत आहे.
शेवटी एकच.....
Who Cares where the Hell we Land up !!!!

धन्यवाद ओझरकर! मनापासून! आपण जर नवीन खाते ओपन केले असलेत तर मी जुना नसूनही स्वागत म्हणतो.

मात्र, आलाच आहात तर एक मित्रत्वाचा सल्लाही द्यायचे धाडस करतो.

कधी कधी साटोसं चे शक्तीप्रदर्शन कुठेही होते. ते करण्याचे कारण त्यांचे त्यांना माहीत! पण एका मागोमाग एक असे सर्व सरदार आपले घोडदळ, पायदळ व हत्तीदळ घेऊन दाखल होतात. हवेत तलवारी चालवतात आणि एकमेकांनाच विजयी घोषित करून इतरत्र रथ वळवतात. या साटोसं पासून बचाव करा! बचाव करण्याचे कारण हे की आपले बिघडत काहीच नाही, पण डोकेदुखी भयंकर होते.

आपला मित्र!

-'बेफिकीर'!

ह्म्म... इथे फक्त गोड प्रतिसाद देणं अपेक्षित आहे का?कोणीतरी चांगलं सांगितलं की त्याला "ज्ञान पाजळणे" म्हणे..
मी अजिबात संदर्भ न घेता लिखाण करत असतो. त्यामुळेच असे लिहीले जाते. बरे झाले आपण सांगीतलेत.याच संदर्भात पौर्णिमा यांनी लिहीलं होतं.. जर लेखक स्वतःच हे मान्य करत असेल तर "फॅन्स" ना इतका त्रास का होतोय.

साटोसं म्हणजे सामुहिक टोळीबचाव संघटना! >>>> Uhoh

रच्याकने मी पौर्णिमा यांना ओळखत नाही तर कंपुबाजीचे आरोप करु नयेत.

छान !!!!!!!!! जरा उद्योगधंद्याच चालू झालं... हे आणखी आवडेल.
बेफिकीरजी तुम्हाला __________/\___________

Pages