कोलेस्टेरॉल सम्बन्धी माहिती

Submitted by ashu on 19 February, 2010 - 14:29

मी आता बरेच दिवस मायबोली ची वाचक आहे.
नुक्तीच माझ्या ऑफिसमधे कोलेस्टेरोल स्क्रिनिन्ग झाले. आणि वाईट कोलेस्टेरोल थोडेसे जास्त आहे असे लक्शत आले.
मला दोन मुले आहेत ,programming मधे full time job करते.शिवाय बर्यापैकी घरिच l cooking करते.दोन मुलान्मुळे भरपूर हालचाल वैगेरे चालू असते.तर हे कोलेस्टेरोल चे निदान अनपे़क्शित होते.
माझे HDL चान्गले आहे, पण जास्तिचे LDL कसे कमी करता येइल हा खरा प्रश्ण आहे.
कोणाला या विषयी काही माहिती असेल तर क्रुपया सान्गावी.
cholesterol in marathi

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहारात सोल्युबल फायबरचे प्रमाण वाढवणे, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड चा वापर जास्त करणे, सॅचुरेटेड अन ट्रान्स फॅट कमी करणे, रोज २०-३० मिनिटे व्यायायम ( आठवड्यातून ५-६ दिवस तरी ) हे मुख्य उपाय.
यासाठी पालेभाज्या, कच्च्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये -सालासकट हे प्रकार रोजच्या जेवणात असावेत.
तूप, बटर, डालडा टाइप स्निग्ध पदार्थांचा वापर कमी असावा. चालत व आवडत असल्यास फॅटी मासे ( साल्मन, तार्ले, बांगडे ) आठवड्यातून दोन -तीनदा खायला हरकत नाही ( पण तळून , खोबरे घालून केलेले प्रकार खाल्लेत तर फारसा फायदा होणार नाही )

अक्रोड वा बदाम रोज २-३ खावेत,
मैद्याचे प्रकार, भात यांचे प्रमाण कमी करावे. पूर्ण स्निग्धांश असलेल्या दुधाऐवजी स्किम मिल्क वापरावे, दह्याऐवजी साय काढून केलेले ताक वापरावे.

कुठेतरी वाचलं की डाळिंबाचा ज्युस प्यावा. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आटोक्यात येतंच पण भरपूर अँटी ऑक्सिडंट्सही आहेत त्यात. त्यामुळे ब्लू/ब्लॅक/रासबेरीज खाण्यापेक्षा ह्याचा उपयोग जास्त होतो.

सॉल्युबल फायबर बाबत चांगला सल्ला आहे शोनु. फायबर सॉल्युबल नसेल तर कॉलेस्टेरोल त्याला चिकटुन त्याची विल्हेवाट लागत नाही. अर्थात सॉल्युबल नसलेलं फायबर ही फायद्याचं आहेच. व्यायामाबद्दल सुद्धा पुन्हा एकदा योग्य सल्ला. व्यायामाच्या इंटेन्सिटी पेक्षा किती वेळ व्यायाम केला हे अतिशय महत्वाचे आहे. जास्त वेळ केलेला धिमा व्यायामच चांगलं को. वाढवण्यास सगळ्यात जास्त मदत करतो हे संशोधनात दिसुन येतय. मला स्वतःला चांगला धक्का बसला होता चांगल को. अगदी कमी निघालं तेव्हा. व्यायामात बदल केल्यावर २ महिन्यात पुष्कळ फरक जाणावला.
चांगल को नक्की कशानी वाढतं हे जरा एक कोडच आहे पण सरवात चांगला उपाय म्हणजे वाईट को. असलेल्या गोष्टी खायच्या टाळाव्याच. चांगलं को. एक वेळ कमी असेल तर चालुन जाइल पण जास्त वाईट को. सरळ ह्र्दयालाच धोका आहे.

आहारात सोल्युबल फायबरचे प्रमाण वाढवणे, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड चा वापर जास्त करणे>>>>>>>> हे साधारण पणे कशात असतात?

आहारात सोल्युबल फायबरचे प्रमाण वाढवणे, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड चा वापर जास्त करणे>>>>>>>> हे साधारण पणे कशात असतात?

मेधा, वैद्यबुवा,सायो, सगळ्यान्ना खुप धन्स.
घरी सगळे आवरुन बाहेर पड्ताना खरेतर नियमित व्यायामाला वेळच मिळत नाही पण ऑफिसमधे मी रोज ३ वेळा, सकाळी चहा साठी म्हणुन , नन्तर एकदा lunch break मधे आणि नन्तर परत ३ वाजता १० - १५ मिन. चालते.
रोज तेवढे करायचेच असा प्रयत्न तर नक्कीच करते.तसेच मासे खात नाही. white bread पण तसा खाण्यात कमी असतो, २% दुधच चहाला वैगेरे वापरते.पण आता भात पण कमी करायचा प्रयत्न करणार आहे.थन्ड चा प्रश्ण आहे तोच माझाही, कि खाण्यात अजुन काय काय असावे?

हे सॉल्युबल फायबर युक्त आहेत. बाकी सॉल्युबल फायबर गुगल केलं तरी बरीच माहिती मिळेल.

Oat/Oat bran
Dried beans and peas
Nuts
Barley
Flax seed
Fruits such as oranges and apples
Vegetables such as carrots
Psyllium husk

ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड करडई, शेंगदाणा तेल, जवस (आळशी) यात मिळ्तात. चांगले को. वाढवण्यासाठी दोन कच्च्या लसणी व खालील चट्णी एक चमचा प्रत्येक जेवणात असावी. तीळ, सुक खोबर, शेंगदाणे व जवस समप्रमाणात घ्यावे. जवस न भाजता, बाकी सर्व भाजून मि़क्सरवर तिखट मीठ घालून वाटावे

हे बर्‍याच मागे दीपुर्झाच्या प्रश्नाच्या अनुशंगाने लिहिले होते
ते परत एकदा इथे टाकते आहे :

कोलेस्टेरोल विषयी अजून थोडी माहिती
मी पण डॉक्टर नाही. पण या विषयावर व एकंदरीत हार्ट डिसीझ वर थोडं वाचन केलंय.

१. कुठल्याही वनस्पतीजन्य पदार्थात कॉलेस्टेरोल कधीच नसते - तेलात , शेंगदाण्यात, नारळात सुद्धा कॉलेस्टेरॉल नसते.
पण या पदार्थांमधे कॉलेस्टेरॉल चे बिल्डिं ब्लॉक्स असतात म्हणून यांचा वापर कमी प्रमाणात करावा.

२. एका ठराविक प्रमाणात कॉलेस्टेरॉल शरीराला आवश्यक आहे. गरोदर स्त्रिया, खेळाडू, वाढत्या वयाची मुलं यांना काही जास्त प्रमाणात.

३. एकेकाळी डॉक्टरांचा असा समज होता की आहारातून मिंळणारे कॉलेस्टेरॉल कमी करणे हा कॉलेस्टेरॉल मर्यादेत ठेवण्याचा एकमेव उपाय आहे. आजकाल व्यायाम, हाय फायबर डायेट, स्ट्रेस मॅनेजमेन्ट अशा उपायांची जोड सुद्धा आवश्यक मानली जाते.

४. रक्तात कॉलेस्टेरॉल वाहून नेणारे रेणू प्रामुख्याने दोन प्रकारात मोडतात एक बारीक अन एक जाडे ( बारीक चं नाव एल डी एल अर्थात लो डेंसिटी लिपोप्रोटीन, कधी कधी यालाच लाउझी कॉलेस्टेरॉल ही म्हणतात. जाड्यांचं नाव एच डी एल अर्थात हाय डेंसिटी लिपो प्रोटीन ) बारके वाले ते वाईट- ते रक्तवाहिनीच्या भिंतींना आतून चिकटून बसतात अन हळू हळू रक्त वाहिनीची रक्त वाहण्याची क्षमता कंमी होते. शिवाय जिथे हे कण जास्त चिकटून बसलेले असतात तिथे रक्त वाहिनीच्या भिंतीवर पण ताण वाढून त्या भिंती कमकुवत होतात.

जाड्या रेणूंचे जे कॉलेस्टेरॉल असतं ते असे चिकटून बसलेले कण खरडून काढायला मदत करतं. म्हणून नुस्तं कॉलेस्टेरॉल कमी न करता जाडे रेणू वाढवणं अन बारके कमी करणं हे ही महत्त्वाचं आहे. अर्थात हे सोपं नाही.

कॉलेस्टेरॉल टेस्ट केल्यावर ओव्हरऑल कॉलेस्टेरॉल अन त्याबरोबर जाडे अन बारीक रेणू वाले किती आहेत हे सुद्धा माहिती असावं.

याशिवाय रक्तामधे ट्रायग्लिसराइड नावाचे रेणू असतात - सर्वसाधारण पणे यांना फॅट सेल्स चे बिल्डींग ब्लॉक्स असं मानता येईल. ट्रायग्लिसराईड किती प्रमाणात आहे हे सुद्धा महत्वाचं असतं.

साधारण १५-२० वर्षांपूर्वी फक्त ओव्हरऑल कॉलेस्टेरॉल किती हे पहात असत अन अमेरिकेत तरी २४० ते ३०० च्या दरम्यान असेल तर ते ठीक समजलं जात असे. हळू हळू हा आकडा २७५ च्या आत, मग २०० च्या आत, आता १६०-२०० अशा रेंजमधे आला आहे. शिवाय एलडीएल, एच डी एल अन ट्रायग्लिसराईड यांचं प्रमाण सुद्धा महत्वाचं मानलं जातं.

सर्वसाधारणपणे इन्-सोलुबल ( म्हणजे रक्तात /पाण्यात न विरघळणारे ) डायेटरी फायबर च आहारातलं प्रमाण वाढवल्याने कॉलेस्टेरोल कमी करायला मदत होते.
शिवाय प्रोसेसड फूड, सिम्पल कार्बोहाड्रेटस कमी करावेत .
(मैदा, भात, ब्रेड, पास्ता , साखर, कॉर्न सिरप इत्यादी ).

पालेभाज्या, कच्च्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये, मेथी, जवस या सर्वांचा आहारातला वापर वाढवावा. इकडे मेटाम्युसिल ( मला वाटते इसबगोल चा भाऊ ) वापरायला सांगतात. पपनस, पपनसाचा रस पण रेकमेंडेड आहे.

तेल / तूप अगदी वर्ज्य करू नये पण त्याचे प्रमाण नक्की कमी करावे.गोड पदार्थ सुद्धा कमी करावेत.अतिरिक्त साखरेचे मेदात रुपांतर होते.

नियमित व्यायाम असावा. त्याबद्दल पण सावकाश लिहीन.

डीन ऑर्निशचं एक पुस्तक आहे जे वाचून अभय बंग प्रभावित झाले होते. ते वाचण्यासारखं आहे.

वेब एम डी, मेयो क्लिनिक इत्यादी वेब साइटवर बरीच माहिती सोप्या भाषेत असते. ती वाचून काढावी.

ही एक साइट पण अन्न पदार्थातल्या घटकांबद्दल बरीच छान माहिती देते.
http://www.nal.usda.gov/fnic/foodcomp/search/

तेलाबद्दल थोडसं
वनस्पतीजन्य किंवा प्राणिज स्निग्ध पदार्थांमधे फॅटी ऍसिडस असतात. या रेणूंमधे प्रत्येक कार्बन अणूला किती हायड्रोजन अणू चिकटलेले असतात त्यावरून फॅटी ऍसिडस चे सॅचुरेशन चं वर्गीकरण असतं. सगळ्यात जास्त हायड्रोजन असतील तर ते सॅचुरेटेड फॅटी ऍसिड्स. खोबरेल तेल, लोणी, चरबी, या सगळ्यांमधे सॅचुरेटेड फॅटी ऍसीडस चं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. ऑलिव्ह ऑइल मधे जवळ जवळ नाहीच. रुम टेम्परेचरला गोठणारी तेलं किंवा घनरूपातच असणारे स्निग्ध पदार्थ - यांच्यात फॅटी एसिड्स जास्त असतात .
सॅचुरेटेड फॅट्स कमी असणारे प्रकार वापरावेत शक्यतो.
डालडा व त्या कॅटगरीतले प्रकार म्हणजे हायड्रोजेनेटेड फॅट्स - मुळच्या अन सॅचुरेटेड ( किंवा कमी सॅचुरेटेड तेलात ) साध्या तेलात रासायनिक प्रक्रियेने हायड्रोजनचे अणू ठासून भरले जातात. हे नॅचरली सॅचुरेटेड फॅट्स पेक्षा वाईट.
क्रिस्को किंवा इतर इथे मिळणार्‍या प्रोसेस्ड फूड मधे हमखास आढळणारं 'पार्शलि हायड्रॉजनेटेड व्हेजटेबल ऑइल' हे पण डालडाचे प्रकार अन तितकेच अपायकारक.

कार्डिओ व्हॅसक्युलर डिसीझ अन डायबेटीस हे जवळजवळ पूर्णपणे लाइफस्टाईल ने निर्माण होणारे रोग आहेत. निव्व़ळ अनुवांशिकता हे कारण अतिशय कमी टक्के केसेस मधे असतं.

मोड आलेली कडधान्ये - मटकी, चवळी, मसूर अशी ज्यांची सालं काढत नाहीत -ही अगदी बेस्ट. मेथी ची पूड थोडी थोडी पोळीच्या पिठात मिसळता येईल. मेथी ची पालेभाजी शक्य असेल तितकी खावी. सफरचंद सालासकट खावं.
होल दूध्,दही या ऐवजी स्किम्ड दूध्,बिनसायीचं दही वापरावं.

व्यायामामधे दोन प्रकारांकडे लक्ष असावं - एरोबिक अन स्ट्रेंथ ट्रेनिन्ग. सोप्या शब्दात म्हणजे एक व्यायाम हृदयाला/ फुप्फुसांना अन दुसरा स्नायू / हाडांना.

हार्ट डिसिझ च्या दृष्टीने सलग तीस मिनिटे एरोबिक व्यायाम करण्याचे सगळ्यात जास्त फायदे आहेत.

आठवड्यातून ३ ते पाच दिवस असा व्यायाम करावा. २०-२२ मिनिटात एक मैल या वेगाने चालायला हवं. अर्थात हे पहिल्याच दिवशी जमणार नाही . रोज दहा मिनिटांपासुन सुरुवात करुन दर आठवड्याला पाच पाच मिनिटे वाढवत न्यावीत. अगदी दमछाक न होता ३० मिनिटे चालायला जमायला लागलं की मग वेगाकडे लक्ष देता येईल. हा सगळ्यात सोपा, सहज जमणार प्रकार. मग शक्य असेल त्याप्रमाणे जिम,स्विमिंग वगैरे आहेच. पण त्याची गरज नाही.

जर व्यायामाची सवय नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरुवात करावी.
चालताना स्टर्डी, सेफ अन नीट मापाचे बूट असावेत. जेवल्याजेवल्या व्यायाम करू नये. मधूनमधून थोडं थोडं पाणी पीत रहावं. शक्य असल्यास चालताना एक-एक्-दोन-दोन मिनिटांकरता वेग कमी जास्त करावा ( इंटर्व्हल ट्रेनिंग म्हणतात त्याला)

स्ट्रेंग्थ ट्रेनिंग म्हणजे वजन पेलण्याचा व्यायाम. या साठी सुद्धा काही जिम किंवा महागड्या मशीन्स ची गरज नाही. अगदी भरलेला कोक चा कॅन किंवा पाण्याची बाटली घेऊन सुद्धा काम चालतं अन खूप फायदा होतो. शक्य असल्यास एक पाउंड, तीन पाउंड अशा वजनाची डंब बेल्स घ्यावीत. एक दोन चांगल्या लिंक्स आहेत अशा सोप्या व्यायामांच्या त्या शोधून देते. अगदी आपण शाळेत कवायतीला ज्या मुव्हमेंट करत असू त्या जरी एक्-दोन पाउंड वजन घेऊन केल्या तरी खूप फायदा होतो.

अमेरिकन हार्ट असोसियेशनच्या सौजन्याने

Select fat-free, 1 percent fat, and low-fat dairy products.
Cut back on foods containing partially hydrogenated vegetable oils to reduce trans fat in your diet.
Cut back on foods high in dietary cholesterol. Aim to eat less than 300 milligrams of cholesterol each day.
Cut back on beverages and foods with added sugars.
Choose and prepare foods with little or no salt. Aim to eat less than 2,300 milligrams of sodium per day.
If you drink alcohol, drink in moderation. That means one drink per day if you’re a woman and two drinks per day if you’re a man.
Also, don’t smoke tobacco — and stay away from tobacco smoke.

त्याच साईट वर व्यायाम करताना हार्टरेट किती असावा या बद्दल पण माहिती आहे. ती नीट लक्षात ठेवावी. रेंजच्या बाहेर हार्ट रेट जाईल असे व्यायाम करू नयेत .
http://www.americanheart.org/presenter.jhtml?identifier=3030999

खूप छान माहिती मेधा, मी साखर तशी विशेष खात नाही, मला वाटते माझे मीठ मला थोडे कमी केले पाहिजे.बाकीही व्यायामासम्बन्धी खूपच छान माहिती दिली आहेस, आता क्रुतित आणता यायला हवे.

शोनू खूप छान माहीती. आईचं तर डीटेक्ट झालेलंच पण नंतर कंपनीच्या अ‍ॅन्युअल चेकप मधे माझंही कोलेस्ट्रॉल हाय निघालं पण तीन्-चार महीन्यात मी काही गोष्टींच स्ट्रीक्ट पालन केलं, अभय बंगांचं पुस्तक वाचलं , रोज ५ किमी चालणे, ऑलीव्ह ऑइलचा वापर, शेंगदाणे खूप कमी केले शक्यतो नाहीच. चहा बंद केला. जवसाची चटणी रोज जेवणात तसेच झोपायच्या आधी इसबगोल नियमीत. वजन कॉन्स्टंट राहीले पण कोलेस्ट्रॉल कमी झाले. २५० पर्यंत गेले होते. हा आत्ताचा लेटेस्ट रीपोर्ट - को. १७५ , एचडील ५२ , एलडीएल १०१ आहे.

चांगली माहिती आहे. सायो, तुझ्या वरच्या एका पोस्टबद्दल - मला वाटते की कोणत्याही फळाचा रस पिण्यापेक्षा ते फळच खाणे जास्त चांगले असावे. आता डाळिंबाचा ग्लासभर रस मिळण्याएवढी डाळिंबे एका वेळेस खाणे शक्य नाही हे खरे, पण डाळिंब (किंवा ब्लू बेरीज वगैरे) खाण्याने आपोआप फायबर वगैरे ही मिळत असावे.

कोलेस्टेरोल कमी करायचे असेल तर भरपूर उकडलेल्या भाज्या खायच्या. कमी होतेच.

ब्रोकोली, ब्रसेल स्प्रॉउट्स्,कॉलीफ्लॉवर जरासेच उकडवायचे व किम्चीत तेलात धणा पूड, दालचिनी व लसून ठेचून मिक्स करायचे. कधी ते तेल घालून बेक करायचे. वरून लिंबू रस नी कोथींबीर.
नाहितर कधीकधी सगळ्या रंगाच्या पेपर्स्(भोपळी मिरची) असे करून खायच्या.

हमखास कमी झालेय माझ्या कित्येक मित्र मैत्रीणींचे. व्यायम हा पाहिजेच पण.

धणा पूड खूप उपयुक्त आहे . खरेतर आपण जे मसाले वापरतो त्याचा बराच फायदा असतो. पण तेल व तूप टाकून पार वाट लावतो.

अक्खे धणे रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजत ठेवायचे व सकाळी उपाश्या पोटी ते पाणी गाळून घेतले की जरासा ताजे आले ठेचून काढलेला रस प्यायचा. हा एकदम मस्त उपाय आहे. तुम्ही जर व्यायाम करत असाल तर त्याचब्रोबर हे वरचे उपायाने खूप फरक येतो. सतत तीन महिने करा मग रक्त चेक करा. अगदी कमी आलेले असेल.

अक्रोड नियमीत ३-४ खा HDL वाढेल.
भिजलेले बदाम ३-४ खा.
बल्गर उपमा, बारली सूप, अक्खे मूग सूप, लापशी खिचडीत भरपूर भाज्या घालून.

वरील सर्व गोष्टीत फायबर बरेच आहे त्याने फायदा होतो.

वरील उपाय माझ्या माहितीतल्या लोकांनी रिलीजियसली केले व त्यांना फायदा झाला. पण त्यांना साधारण कसलीच अ‍ॅलर्जी वगैरे न्हवती तेव्हा तुम्ही त्याचा विचार करून करून पहा.

मी बरेचसे प्रकार करुन बघितले आहेत. माझ्यामते काही खाऊन चांगले कोलेस्टरॉल वाढवणे जरा कठिणच आहे.(अर्थात वर दिलेल्या गोष्टी करुन बघण्यात काहीच हरकत नाही). कार्डियो सर्वात इफेक्टीव आहे. अगदी घरातलं उदाहरण म्हणजे माझी आई. बायपास सर्जरी झाल्यानंतर तिनी चालणं सुरु केलं (व्यायाम म्हणून). दररोज ती जवळ जवळ दीड तास चालते (सकाळी पाऊण आणि संध्याकाळी पाऊण तास). चांगलं कोलेस्टेरॉल पार ७० वर गेलय.

मेधा एकदम मस्त माहिती. खुप साध्या-सोप्या भाषेत लिहिले आहेस.

बे एरियामधे असाल तर साऊथ एशियन हार्ट असोसिएशन भारतीय/पाकिस्तानी/बांग्लादेशी लोकांसाठी ब्लड टेस्ट करुन रिस्क फॅक्टर्स सांगतात. वर्षभर फॉलोअप करतात. या टेस्टचा बराच खर्च इंशुरन्समधे कव्हर होतो बहुतेक.

>>मी बरेचसे प्रकार करुन बघितले आहेत. माझ्यामते काही खाऊन चांगले कोलेस्टरॉल वाढवणे जरा कठिणच आहे.<<
तुम्ही किती consistently खाण्याचे पथ्य बाळगता व करता ते ही महत्वाचे आहे. व्यायाम पाहिजेच. पण खाण्याने सुद्धा फरक पडतोच. व्यायम कराल पण तरीही तसेच अरबट चरबट सकाळ खाणे ठेवले तर फरक हा कमीच आढळतो असे मी पाहिलेय.

एक जवळचे उदाहरण द्यायचे तर माझ्या आईची पेशंट जी ३२ वर्षाची होती, मुळात इतकी बारीक की हड्डी दिसेल अशी. पण लीवर नॅचरलीच कोलेस्टेरोल ज्यास्त प्रोड्युस करायचे तिचे(काहींना हा जेनेटीक प्रॉबलेम असतो, खूप कमी डॉक्टर सांगतात ह्याच्याबद्दल). त्यात गुजरती म्हणजे तेलकट्,तूपकट, जेवणात सगळ्यात साखर.. रोज दोन तास पळणे/stregnthning व्यायम करत होती पण मग तिचा पुर्ण आहार बदलला. तिला आहारातून अधिक कोलेस्टेरॉल घ्यायची गरज न्हवती. ते जितके कमी(पुर्ण कमी करुच शकत नाही आपण तसे व चांगलेही ही नाही) राहिल असा आहार व एरोबिक व्यायम करायला लावला. तीन महिने. HDL 64 आले. १५५ टोटल कोलेस्टेरोल. LDL चा नंबर लक्षात नाही. पण HDL मधला फरक खूपच लक्षात रहाण्यासारखा होता.

प्रयोग म्हणून तीन महिने तुम्ही (हे 'तुम्ही' म्हणजे सर्वांना उद्देशून) मटण,तळलेले पदार्थ खा, चीजकेक खा, पिझ्झा खा रात्री रिंग्स , थोडीफार फळे व भाज्या पण अर्धा तास रोज पळणे/चालणे. तुमचे कायच्याकाय LDL व trigycerides वाढले नसले तरी नंबर बर्‍यापैकी हाय असतो. नुसते एक दिवस आधी खावून दुसर्‍या दिवशी चेक केले तरी ट्राय्ग्लीसराईड्स हाय येतात.

मने , तुझा गोंधळ होतोय का ? नुसतं डायेट चेंज करुन एच डी एल वाढणे कठीण असं म्हणताहेत वैद्य. त्याकरता व्यायाम हवाच.
डायेट कडे लक्ष न देता नुस्त्या व्यायामाने ट्रायग्लिसराईड्स अथवा एल डी एल कमी होइल असं नाही म्हटलंय त्यांनी .

नुसते एक दिवस आधी खावून दुसर्‍या दिवशी चेक केले तरी ट्राय्ग्लीसराईड्स हाय येतात. >> एकदा ग्रिंचचे ट्राय ग्लिसराईड्स ८२० आले होते. डॉक्टरने स्वतः फोन करून लगेच दुसर्‍या दिवशी सकाळची अपॉइंटमेंट दिली होती. ब्लड टेस्टच्या आदल्या दिवशी फ्रेंच रेस्टॉमधे एस्कार्गो, लॉब्स्टर, अन फ्वा ग्रा वगैरे खाल्लं होतं त्याने ते आठवलं. मग परत महिन्याभराने परत टेस्ट केली तर सगळं व्यवस्थित होतं.

मला वाटले त्यांचा(वैद्यबुवाम्चा) गोंधळ झालाय की काय मी नुसते डायट बदलून कमी होतेय असे लिहिलेय माझ्या पहिल्या पोस्ट मध्ये. Happy मी काही उपाय सांगितले पहिल्या पोस्टीत तिथे लिहिलेय की व्यायम सुद्धा पाहिजेच व तो केला माझ्या माहितीतल्या लोकांनी पण खाण्यात फरक करून काही चांगली अ‍ॅडीशन केली की ओवरऑल मदत होते.

बरे असो...

बरोबर शोनू. Happy
मनःस्विनी, माझ्या लक्षात आलं की तुम्ही फक्त डायट मध्ये बदल करून को. वाढवता येतं असं म्हणत नाहीये ते. सांगायचा मुद्दा हा होता की चांगले को. वाढवण्यात आहारातून बदाम आणि अजून काय काय (वर दिल्याप्रमाणे) घेऊन आणि व्यायाम करुन ह्याची जर तुलना केली तर व्यायाम सरस ठरतो. अर्थात दोन्ही करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. Happy

वैद्यबुवा, मी तरी दोन्हींची तुलना करणारच नाही माझ्या अनुभवाप्रमाणे. it goes hand in hand. मी परत हेच म्हणेन भले तुम्ही रोजचा व्यायम तेवढाच करा पण तसेच चीजी, फॅटनींग खा. फायदा कमी होतोच. कारण रोजचे फ्लश (I mean trans fat, trigly) झाले तरी नवीन येतच रहाणार मग टोटल नंबरवर कसा काय इतका परीणाम होणार? एखादा माणूस व्यायम तरी रोज किती करु शकतो? ३५०० कॅलरीज रोज खाईल ज्यात सर्व वाईट फॅट आहे व फक्त त्याची व्यायामाची कॅपासीटी १०००-१२०० कॅलरीज burn करायची असेल तर कसा काय एवरेज नंबर वर परीणाम होइल?

पण जर २००० कॅलरीज खाईल जे योग्य आहे व अ‍ॅडिशनल कचरा साफ करायला लागेल असे खाणे नाही(I mean liver doesnt have to work too hard to absorb the more cholesterol introduced in the body per day) वर व्यायामाने १०००-१२०० कॅलरीज कमी करण्याचा करेल ज्याने शरीरातले फॅट निचरा होइल तर नक्कीच फरक असेल. व्यायामाने लीवरची निचरा करायची कॅपासीटी वाढू शकते पण रोज इतका कचरा डंप केला तर काय होइल?

असो.

(माझा हा अभ्यासाचा विषय होता, पण मी ह्यात लायसन्स न घेता दुसर्‍या विषयाच्या संशोधनात घुसले पन माझा आग्रह नाहीये की मलाच सगळं माहितीय पण एक मदत म्हणून शयेअर करतेय हाच हेतू. दुसरे म्हणजे आई मात्र ह्याच क्षेत्रात असल्याने अश्या बर्याच केसेस पाहिल्या आहेत. असो. स्वताचा काहिही सांगायचा हेतू नाहीये पन विषय आलाच म्हणून.. असो.)

अहो, मान्य आहे. तुमचं बरोबर आहे. आता शेवटचा प्रयत्न करतो. मी फॅटी किंवा चिजी खाण्यात बदल करु नका आणि नुसता व्यायाम करा, तुमचं को. वाढेल असं कुठे म्हणतोय.
तुमच्या पोस्टीत तुम्ही जे उ, ब्रोकोली, धणेपूड, अक्रोड खालली तर को. वाढण्यास मदत होइल असं दिलं आहे त्याबद्दल मी म्हणत होतो. हे सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियमीत करुन आणि परत तुम्हीच सांगितल्या प्रमाणे व्यायाम करून किती को. वाढतं ह्याची तुलना जर केली तर व्यायाम सरस ठरेल येवढच मी सांगत होतो. ह्या विधानात बाकी काहीही तेलकट, तुपकट, चिजी, फॅटी खायचं नाही हे गृहीत धरलेलं आहे आधीच.
I just wanted to stress the point that, working out (cardio) will get your good cholesterol up at a faster rate than eating almonds and consuming fish oil.
हे मा शे पो.