Submitted by जया एम on 15 October, 2010 - 14:58
सावळती हलक्या छाया
पूरिया विणतसे शेला
मावळता सूर्य उगाचच
घोटाळत निघून गेला
ही वाट पूर्ण विजनाची
डोहाचे लाघव खोल
पाण्यात तळमळे तारा
सावरतो ढळता तोल
पाण्यात तरंगत मासा
डोळ्यात त्याचिया पाणी
पुसटशी आठवू गेला
तो गतजन्मीची गाणी
दूरात खिन्न बघताना
गाईचे डोळे भरती
पाण्यात बुडाली राधा
घागर डुचमळते वरती
गुलमोहर:
शेअर करा
आवडली. छान आहे. पण शेवटचे
आवडली. छान आहे. पण शेवटचे कडवे थोडे सविस्तर सन्गता का?? प्लीज
पूरिया त्यावेळी खरच जिवघेणा
पूरिया त्यावेळी खरच जिवघेणा आहे...
सुरेख!!
सुरेख!!
मस्त!
मस्त!
वा! खासच!!
वा! खासच!!
सुन्दर, चित्रदर्शी वर्णन.
सुन्दर, चित्रदर्शी वर्णन. अगदी तरल क्षण.
पाण्यात तरंगत मासा डोळ्यात
पाण्यात तरंगत मासा
डोळ्यात त्याचिया पाणी
पुसटशी आठवू गेला
तो गतजन्मीची गाणी >> विशेष आवडलं!
सुंदर..!!!!!
सुंदर..!!!!!
अप्रतिम!
अप्रतिम!
अहाहा... क्या बात
अहाहा... क्या बात है...
"डोहाचे लाघव खोल......." ..... !!!
वाह... अप्रतिम...!!!!!!!!!
वाह... अप्रतिम...!!!!!!!!!
किती सुंदर! लिहीत रहा.
किती सुंदर! लिहीत रहा.
अप्रतिम!
अप्रतिम!
(No subject)
सुरेख
सुरेख
सुरेखच!
सुरेखच!
अप्रतिम! लिहीत रहा.लिहीत
अप्रतिम!
लिहीत रहा.लिहीत रहा.लिहीत रहा.
सुंदर !
सुंदर !
सुंदर!!
सुंदर!!
किती किती सुंदर... सावळती
किती किती सुंदर...
सावळती हलक्या छाया... संध्याकाळच्या उन्हात सावल्यांचं हे सावळं होणं... च्च... किती लोभस रूप...
आज अजून काही वाचायचं नाही असं मगाशी जयाची मधाळ वाचून ठरवलं... पण मन वढाय वढाय झालं. पुन्हा जयाच्या कवितेच्या गावाची ओढ.
वॉव, ग्रेट ......
वॉव, ग्रेट ......
वाह..मस्त आहे.. पूरिया विणतसे
वाह..मस्त आहे..
पूरिया विणतसे शेला..आह!
दूरात खिन्न बघताना
गाईचे डोळे भरती
पाण्यात बुडाली राधा
घागर डुचमळते वरती>> वाह!
सुरेख!
सुरेख!