Submitted by रैना on 10 October, 2010 - 11:43
चित्रकर्तीला हीच चित्रे पुन्हा अशीच काढता येतील की नाही ही शंका आहेच. तरीपण थोडीशी गंमत.
बदकाने नाकातले बोट काढुन डायरेक्ट कालपरवाच्या शिवाजीम्हाराजांच्या कथेतले शत्रु मारले आहेत असे अनुमान काढायला वाव आहे. चित्रकर्ती आणि तिचे (गरीब) मायबाप रजनीकांतांचे फॅन नाहीत, त्यामुळे असल्या gravity defying अचाट स्टंटसची स्फुर्ती कुठुन आली नकळे 
चित्रकर्तीचे वय- पावणेतीन वर्षे
नाकात बोट घालणारे बदक 

चित्रकाराच्या मते,
"हा बदक आहे, याचं नाव माहित्त्ताय? बदक. तो नाकात बोट घालतोय.
मग आईबाबा म्हणाला काय ' तू आत्ताच्या आत्ता घरी जा' (ओरडून)
बदक गेला. शत्रुला फटके दिले. हाकलून लावलं. "

'हा फिश आहे. तिकडे त्याचे इल्लुपिल्लुटिल्लु आहे. तो वेडाच आहे. सार्खा बिस्किट खातो.'
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खूप खूप गोडुली चित्रे.. फिश
खूप खूप गोडुली चित्रे.. फिश तर खासच.. गुड इमॅजिनेशन
मी चित्रांवर तर बेहद्द
मी चित्रांवर तर बेहद्द खूश आहेच ,
पण त्याहून मजेशीर तुझं चित्रवर्णन आहे . 
(No subject)
गोड.
गोड.
ही हि ही
ही हि ही
आई गं, किती गोड मी झब्बू देऊ
आई गं, किती गोड

मी झब्बू देऊ का ? आमची पाटी पण अगदी सेम टू सेम आहे
होहो अगो देना झब्बु. काय
होहो अगो देना झब्बु.
काय पोरांची डोकी अचाट चालतात ना !
धन्यवाद लोक्स. मी हे उडवावं का तोच विचार करत होते, तो तुमच्या प्रतिक्रिया आल्या.
हे हे हे,
हे हे हे, मस्तच...पावणेतीनच्या मानाने खूपच चांगली आहेत ही चित्रे. माझा पोरगा वाटोळ्या वाटोळ्या रेघोट्या मारतो आणि त्यातून चित्र ओळखून दाखविण्याचे कूट प्रश्न आई-बाबांना घालतो. (त्यात आम्ही बरेच वेळेस नापास होतो)

अगंबाई कित्ती गोड
अगंबाई कित्ती गोड !
माझ्याकडून खुप सगळी बिस्किटं दे त्याला
कित्ती गोड आहे . हे
कित्ती गोड आहे :). हे डिलिटण्यापेक्षा माझ्या तर्फे तिची एक गोड पापी घे
हा आमचा झब्बू रैनाने
हा आमचा झब्बू
रैनाने म्हटल्याप्रमाणे काही काही चित्रं परत काढता येतील की नाही ह्याची शंका असते. फुगे, फूल, पान आणि ढोबळ चेहेरे आता हुकुमी काढता येतात. हे काय काढलं आहे असं विचारल्यावरची उत्तरं त्याचीच आहेत.
फुगा हातात घेतलेला मोर ! ( त्यावेळी 'नाच रे मोरा' ची फारच चलती होती आणि फुगे तर ऑल टाईम फेवरिट )हे चित्र पावणे-दोन वर्षांचं असताना काढलं आहे. हा मास्टर पीस आहे. परत बघायला मिळालं नाही
वय वर्षं दोन. तो एक मुलगा असतो ना ( गोष्ट सांगताना तो अजूनही स्वतःचा उल्लेख 'एक मुलगा' असा करतो. ) त्याला फुगा आणला बाबाने काल तो ...
ह्या चित्राची गंमतच आहे. आम्हाला वाटले की त्याने दाढी-मिश्या असलेला बुवा काढलाय. पण तो तर सांगत होता की त्याने 'बाळ' काढलंय ( त्याच्याकडे खेळण्यातल्या खूप बाहुल्या आहेत. ) हे चित्र बरेचदा काढलं त्याने. एकदा बाहुली शेजारी ठेवून काढत होता आणि मला सांगत होता काय काढलंय तेव्हा कळलं की ती दाढी नसून बाळाचं टोपडं आहे
( वय वर्षं पावणे-तीनपेक्षा थोडे जास्त )
हे एकदम ताजं चित्र. दोन-तीन दिवसांपूर्वी काढलेलं ( वय वर्षं तीन वर्षं पाच महिने ) दोरीच्या उड्या मारणारा कॅटरपिलर
वा वा काय मस्त चित्र आहेत.
वा वा काय मस्त चित्र आहेत.


कल्पना पण मस्त आहेत. नाकात बोट घालणारे बदक, दोरिच्या उड्या मारणारा सुरवंट !!
आमच्याकडे सुरुवात होते एका चित्राने आणि संपेपर्यंत काहीतरी वेग्ळेच झालेले असते
लेकीला वरची चित्र दाखवली , तर
लेकीला वरची चित्र दाखवली , तर तीने त्यांना अशा प्रकारे ओळखले
कोंबडा, ढगोबा, माकड (?), मुलगी, काका , फुलपाखरु
रैना, उर्मी ...... कित्ती
रैना, उर्मी ...... कित्ती क्यूट चित्र काढलेत तुमच्या पिल्लांनी. त्याहूनही झकास त्यांची कल्पनाशक्ती!
रैना आणि उर्मी सही आहे एकदम
रैना आणि उर्मी सही आहे एकदम
लय लय भारी... चित्रकला अशीच
लय लय भारी... चित्रकला अशीच चालू राहूद्या.. आजिबातच बंद होऊ देऊ नका...
नाकात बोट घातलेलं बदक... एकदम फंडू...
बाळाला घातलेलं टोपडं.. एकदम क्यूट..
आणि उड्या मारणारा सुरवंट.. डेडली कल्पनाशक्ती..
अगो, लई भारी. शाब्बास अरुष!
अगो, लई भारी. शाब्बास अरुष! सुरवंट आणि दोरीवरच्या उड्या आणि सगळीच चित्र कमाल आहेत. वे टु गो !
आशूचॅम्प,
अगदी अगदी. आमच्याकडेपण पहिले काही महिने नुसत्याच रेघोट्या, फर्रा, फर्रा मारलेल्या.
लेकीची एक मैत्रिण आहे. ती साडेतीनवर्षाची असेल. कॉक्रोचचित्रे उत्तम काढते. पुन्हा तिने काढुन दिले तर टाकेन इथे. झुरळं पाहिली की मला डिफॉल्ट काफ्का आठवतो. (नाही,नाही, मी या कार्ट्यांना मेटॅमॉर्फोसीसचे रुपांतर करुन सांगीतले नाहीये)
सावली, झब्बू दे ना.
सह्ही चित्रं, सगळीच. सुखी
सुखी आइच्क्रीमचं चित्र काढते फक्त.
सहीचित्रे आहेत रैना, उर्मी
सहीचित्रे आहेत रैना, उर्मी !
दोरीच्या उड्या मारणारा सुरवंट एकदम झक्कास !
रैने, नेमकं कसं पहायचं गं
रैने, नेमकं कसं पहायचं गं चित्र? पाटी उलटसुलट फिरवायची की आपलं डोकं??
बादवे, झक्कास चित्रं आहेत लेकीची.
कसली ग्वाड चित्रं काढलीयेत..
कसली ग्वाड चित्रं काढलीयेत.. उर्मी.. दोरीवरच्या उड्या मारणारा सुरवंट.. काय मस्त कल्पना आहे
हे माझ्या बहिणीच्या ५ वर्षाच्या नातवाने काढलेलं चित्रं. तो टोटल कार क्रेझीये.. त्याला प्रत्येक गाड्यांचे मेक आणी किमतीपण माहित असतात.. वेळ जात नसला तर कॉम्पवर डाऊनलोड केलेल्या फॉर्मूला १ च्या रेसेस पाहात बसतो..
रैना आणि उर्मी, खुपच गोड
रैना आणि उर्मी, खुपच गोड आहेत सगळी चित्रे! एकसे एक मास्टर पिसेस! त्या गोष्टी तर एकदम भन्नाट!
आपापल्या मुलांना माझ्यातर्फे 'शाब्बास शाब्बास!' म्हणा बरं नक्की!
रच्याकने, गार्गीच्या 'परत कधीही बघायला न मिळणार्या' चित्रांचे फोटु घेऊन ठेवायचे लक्षात आले नाही पण आता राधाच्या मास्टरपिसेस चे फोटु नक्की घेऊन ठेवीन! या आयडीयेबद्दल धन्स!
अरे व्वा मस्तच .. माझ्याकडे
अरे व्वा मस्तच .. माझ्याकडे बरेच झब्बू सापडतील.
काय कल्पनाशक्ती आहे या
काय कल्पनाशक्ती आहे या छोटूल्यांची !!
बोधचित्रं मस्त आहेत!
बोधचित्रं मस्त आहेत!
बोध घेण्यासारखी चित्रे खरंच.
बोध घेण्यासारखी चित्रे खरंच. आपली कल्पनाशक्तीही किती चौकटबध्द झाली आहे त्याचा अदमास आला.
खूप छान सारी चित्रे!
डॅफो, वत्सला- झब्बु द्या
डॅफो, वत्सला- झब्बु द्या
वर्षू- चित्र गोड आहे अगदी. त्या चित्रावरची त्याची अशी एक खास गोष्ट असणार. अशा गोष्टी खरोखर सुपरभारी असतात.
रैना, उर्मी कसली भारी चित्रं
रैना, उर्मी कसली भारी चित्रं आहेत.... आणि त्या चित्राचं वर्णनही लै ग्वाड!
दोन्ही कलाकार छोटुल्यांचं खूप खूप कौतुक!
रैना पावणेतिन वर्षांच्या
रैना पावणेतिन वर्षांच्या मानाने खुपच छान चित्र काढते छोटूकली.
बरं झालं इथे टाकलीत ते
बरं झालं इथे टाकलीत ते चित्रं. एकदम धम्माल आहेत
भन्नाट इमॅजिनेशन ! नाकात बोट, दोरीच्या उड्या, बिस्किट 
Pages