जातकाची कुंडली आणि वास्तु

Submitted by ज्योतिषशास्त्र on 8 December, 2009 - 06:32

जातक कुंडली आणि वास्तु ( कुपया आकृती http://vastuclass.blogspot.com वर बघण्याची विनंती.)
(कुंडली विवरण :- प्रथम स्थानी लग्नी राहु ( मकर लग्न ), २= काहीनाही, ३= हर्षल + प्लुटो , ४=काहीनाही, ५= नेप, ६= काही नाही, ७= मंगळ, बुध, रवि, केतु, ८= शनी, शुक्र, चंद्र, ९= काहीनाही १०= गुरु ११= काहीनाही, १२= काहीनाही )

आकृतीत दाखवल्या प्रमाणे जातकाची चंद्ररास मकर असून सुर्यरास (पाश्चात) धनु आहे. जेव्हा जातक आपली कुंडली घेऊन येतो तेव्हा आपण त्यांच्या कुंडलीच्या आधारे जातकाच्या वास्तुचे परीक्षण करावे लागते. श्री सहस्त्रबुध्दे ह्यांनी ह्याविषयी बरेच संशोधन करुन एक ग्रंथ सुध्दा लिहला आहे. आज आपण एका जातकाच्या कुंडलीची त्याच्या वास्तुशी सांगड घालणार आहोत.

दिलेल्या कुंडलीच्या आधारे आपण जातकाचे सुख-दुखः पाहु.

१. लग्न मिथुन लग्नस्वामी सप्तमात मंगळ + रवी + केतु युक्त म्हणजे त्याची सप्तमात दुष्टी लग्नात आहे. राहु लग्नी म्हणजे पुर्वभाग दुषित किंवा बंद आहे.

२. लग्नीराहु म्हणजे पुर्व-ईशान्य, पुर्व, पुर्व आग्नेय भागात संडास, बाथरुम नक्की असणार.

३. धनेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त राहाते घरची कमी जागा पण इतर जागा जास्त असणार. शनी मुळे बाह्य जागा बिल्डींगचे कंपाऊड यांचे (र्माझिन) अंतर पश्चिम व पुर्व बाजुस कमी असणार आहे.

४. द्वितीयेश सप्तमात मंगळ + बुध + केतु अधिक हर्षल + प्लुटो युक्त घराला उत्तर ते पुर्व दिशेला अनेक कट असणार.

५. चतुर्थ स्थान चंद्रनाडीच्या प्रभावाखाली येत असल्याने व त्याचा राशीस्वामी बुध, मंगळ + केतु युक्त झाल्याने दशमातील स्वगृही गुरु त्यांची चतुर्थात सातवी दुष्टी घराच्या उत्तरेस मंदीर असणार किंवा घरातुन मंदिर दर्शन होणार.

६. तसेच चतुर्थची बुधरास व गुरुची सप्तमात दुष्टी असल्याने मुख्य करुन घराचे प्रवेश व्दार उत्तरेस आणि संकुलाचे मुख्य प्रवेश द्वार दक्षिणेस असणार व मुख्य जीना पश्चिमे कडुन पुर्वकडे असणार कारण कु़ंडलीचा चंद्र मकर राशीत आहे. मकर शनी प्रधान रास असल्याने जीना पश्चिमेस असणार.

७. पंचमातील राशीस्वामी (शुक्र) पंचमेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त म्हणजे पश्चिम दिशा मोकळी, तेथे कचरा, झाडे-झुडपे, गटार असण्याची जास्त शक्यता आहे. तसेच घर गच्चीवर असण्याची जास्त शक्यता आहे.

८. सप्तम स्थांनात मंगळ + रवी + केतु + बुध सप्तमेश दशमस्थानात स्वगृही म्हणजे पश्चिम दिशा मोकळी तसेच पश्चिमेचा रवीचे किरणे पश्चिमे कडुन घरात प्रवेश. व पश्चिमेत खिडक्या असणार.

९. अष्टमेश अष्टमात शुक्र + चंद्र युक्त घरात सर्व प्रकारच्या सुखसोई असणार पण त्याचा योग्य उपभेग जातकाला स्वता: न मिळता त्याच्या परिवाराला मिळेल.

१०. भाग्येश शनी अष्टमात शुक्र + चंद्र युक्त भाग्येश च्या व्ययात भागेश म्हणजे घरातील सर्व पैसा घरातील सुखसोईवर खर्च झालेला असेल. शिल्लक राहाणार नाही. तसेच घरामधील सर्व उपकरणे जरुरी पेक्षा अधिक असणार त्यामुळे सुध्दा खर्च अधिक प्रमाणात होईल.

११. कार्यस्थानातील गुरु मुळे खर्च जरी जास्त झाला तरी आवकसुध्दा व्यवस्थित असणार, दशमातील गुरु स्वराशीचा स्वगूही जातकाच्या घरात कधीही काही ही कमी पडु देत नाही.

कारण दक्षिणेच्या सुर्यनाडीतील गुरु स्वराशीत बसल्याने चंद्रनाडीचे दोष गुरुकृपेने कमी होतात. तसेच घरात व परिवारात गुरुसेवा परपरा असणार.

१२. लाभेश सप्तमात रवी + बुध + केतु युक्त घरचा मालकच्या सप्तमात मंगळ + रवी + बुध + केतु म्हणजे जातकाच्या पती/पत्नी चा स्वभाव रागीट पण बुधामुळे मनमिळावू कतृत्वशील, रवीमुळे सदासर्वदा कार्यरत, केतुमुळे गुरुसेवा + धार्मिकसेवा करणार असणारा आहे.

१३. व्यायातील वृषभ राशीचा स्वामी अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त घरातील स्वयपाकघरात अन्नजास्त शिजवत जात असणार, अन्न विपुल प्रमाणात ( चंद्र+शुक्र ), शनीमुळे त्यातील काही भागाची नाशाडी होण्याची शक्यता आहे. पण ह्या जागी शिजवलेले अन्न फार रुचकर आणि स्वादिष्ट मनाला तृप्त करणारे तसेच दहाजणाचा स्वयपाक वीस जणाना पुरेल इतका वरद हस्त दक्षिणेच्या गुरु व सप्तमातील व अष्टमातील ग्रहा मुळे अनुभवास येणार.

१४. सप्तमातील व अष्टमातील ग्रहाची संख्या दाटीवटीने असल्याने जातकाची राहाण्याची जागा फार कमी असणार पण जातक बाहेरील जागा वापरण्या मिळणार व तो त्याजागेत आंनदाने राहात असणार.

वास्तुस्थितीत जातकाचे घर :-
१. बिल्डींगचे प्रवेशद्वार दक्षिणे कडे आहे.

२. घराचे प्रवेशव्दार उत्तरे कडे आहे.

३. ईशान्य ते उत्तर भागातुन मंदिराचे दर्शन होते तसेच घरातुन सुध्दा मंदिराचे दर्शन होते.

४. ईशान्य पुर्व भागात बांथरुम व पुर्व आग्नेय भागात संडास आहे.

५. अग्नेय दक्षिण भागात स्वयपाक घर आहे.

६. चंद्रराशी स्वामी शनी व दक्षिणेचा गुरु असल्याने दक्षिण पश्चिम या स्थांनात देवघर असणार ( ज्या स्थांनात गुरु असतो त्या स्थांनात मुख्य करुन जातकाचे देवघर असते. )

७. घराचे क्षेत्रफळ ३८५ फुट आहे. तसेच जातकाचे घर सर्व सोईयुक्त व वातानुकुलीत आहे.

८. ईशान्य ते वायव्य पश्चिमेकडील घराबाहेरचा सर्व भाग मोकळा आहे. जातकाला गच्चीचा हा भाग मिळालेला आहे तसेच बिल्डींगच्या बाहेर सुध्दा मोकळे पंटागण आहे.

९. पश्चिमेस कचरा, व झाडेझुडपे आहेत. तसेच त्यामध्ये गटाराचे पाणी सोडलेले आहे.

१०. दक्षिणेला गेटच्या बाजुला कचरा कुंडी आहे.

९. जातकाचे घर गच्चीत आहे व ते संकुलाच्या दक्षिण प्रभागात आहे.

१०. जातकाचे घर विदिशेत आहे.

इतर अनेक गोष्टी आपणास जातकाच्या घरी नजाता कुंडली वरुन पाहाता येतात.
संजीव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्वितिय स्थान चन्द्र नाडिच्या प्रभावखालि येते म्हनजे कसे ते जरा समजावुन सान्गाल ल्पिज.

द्वितिया कर्करास आणि पुनर्वसू नीरनाडी, ( ४ चरण ) पृष्य जलनाडी, आश्लेषा अमृतनाडी आहेत. त्याच्या समोर अष्टमात = शनी, शुक्र, चंद्र, प्रत्येक काचे सप्तमस्थान तील योग कसे असतात ते तुम्हाला माहीत असतील कर्करास आणि राशीच्या सप्तमातील शनि शुक्र चंद्र ह्यच्याशी संयोग करत आहेत. त्यामुळे सर्व ग्रहामध्ये अधिक बलशाली चंद्र आहे. सर्वतोभद्र चक्रप्रमाणे तेथे चंद्रच्या मनाचा प्रभाव अधिक आहे. जला मध्ये सर्व मिळून येत असल्याने वास्तुशास्त्रच्या माझ्या अभ्यासा प्रमाणे चद्र नाडिस महत्व देऊन हे स्थान चंद्र नाडीच्या प्रभावा खाली आहे अष्टमातील शनी, शुक्र चंद्र हा धनस्थानातील कुंटुबातील निर्णय जातकाला बंधणकारक करतात. मनातील योजलेल्या गोष्टीची जातकाला मिळत नाहीत आणि कुटुंबासाठी आपले मन ( चंद्र ) मारावयास लागते ( मनाजोगत काही होत नाही ) त्यामुळे द्वितिय स्थानात चंद्र नाडीचा प्रभाव जास्त आहे.
संजीव

कुन्डलीतील बारास्थाने दर्शवित असलेल्या दिशा इथे सान्गाल का? उपयोग होईल

दर रविवारी बी/३०१, वंदना सदन, मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व) ४०१३०५. येथे शिकवणी वर्ग चालतात.
(सेवा शुल्लक / गुरु दक्षिणा म्हणून फक्त रु १५१/- ) घेतले जातात. आठ ते दाह महिने शिकवले जाते. वेळ संध्याकाळी ०४.३० ते ०८.३०, ०९.३० ची आहे. टिपः- सर्व विद्यार्थ्यानां अल्पोहार दिला जातो. वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र चे ग्रंथ सर्व विद्यार्थ्यानां वाचना साठी उपलब्ध वेळ रोज संध्याकाळी ०७:०० ते ०९:०० पर्यंत सेवा शुल्लक नाही. ( फक्त वर्गात )

आपणास जर वरिल प्रश्न्ना संबधि माहिती हवी असल्यास आपण माझ्या शिकवणी वर्गाला भेट देण्याची विनंती. राग मानू नये. हा विषय महत्वाचा आहे. म्हणून मी येथे उत्तर देत नाही क्षमस्व..

आपला संजीव

लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली

तुलशी विवाह नंतर अनेक घरातून वधू-वराच्या शोध मोहीमेस सुरुवात होते. पण आजच्या जगात कुंडलीशास्त्राला महत्व न देता, विज्ञानशास्त्राला महत्व देतात. विवाह ही एक नैसर्गिक अशी सामाजिक व धार्मिक बाब आहे असे मानले जाते. हिंदुधर्मशास्त्रात शास्रकारांचे मते धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष यांनी एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार म्हणजे विवाह. सामाजिकदृष्ट्या पाहिले तर रजिस्टर विवाह म्हणजे कायद्याने सुसंगत असलेला स्त्री-पुरुषांचा पती-पत्नी या नात्याचा संबध होय.

भूतकाळाची विस्मृती आणि भविष्यकाळाचे अज्ञान या दोन शापवत वरदानामुळेच प्रत्येक व्यक्ति वर्तमानकाळात वावरत असते. अशा वेळी तिचे पूर्वसंचित, तिने केलेल्या पापपुण्याचा संचय त्या व्यक्तिवर अंमल करीत असतो आणि वर्तमानकाळ घडवीत असतो. त्याचे श्रेय त्याला उपभोगावयाला मिळत असते. हे झाले सामाइक जीवितासंबधी. पण वंशवृध्दीकरिता पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे. तसेच स्त्रीजन्माचे सार्थक व्हावे म्हणून स्त्री पुरुषाचा अंगिकार करते. हिंदू संस्कृतीनुसार विवाहाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

१. कुटुंबस्थापना २. शरीरसुख ३. संतानप्राप्ती ४. पारस्पारिक सहयोगी जीवन ५. धर्माचरण

या कारणास्तव अशा तर्हे ने दोन मनं एकत्र येऊन “शुभ मंगल सावधान” या बोधवाक्याने विवाहबध्द होऊन ते जगापुढे पती-पत्नी या स्वरुपात येतात. कारण त्याचे भूतकाळी घडलेले कर्मफ़ळ हे गुप्त असून या जन्मी उन्मीलित होऊन ते भोगावयास येते. त्यावरच मिळणार्यात सुखात किंवा दु:खात वैवाहिक जीवन समाविष्ट आहे. विवाहसंबंध केवळ विषयभोगाकरिता वा लौकिक व्यवहारकरिता घडत नाहीत तर धर्माचरणाकरिता दोन ह्रदयांचे जे दृढ संमिलन तोच विवाह होय. याकरिता अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे. म्ह्णून ज्योतिषशास्त्राधारे वधु-वरांच्या पत्रिकेची छाननि करुन विवाह केल्याने वृध्दि होईल.

कुंडलीतील मंगळदोषामुळे अनेक मुलामुलीची लग्ने अडून राहातात. याचा विचार करुन माझ्या साईटवर मंगळदोषाचे विवेचन व मार्गदर्शन करुन मंगळामुळे येणार्या अडचणींचे प्रश्न सुटतील व ज्योतिष्य सांगणार्याळ ज्योतिष्याना वधुवराची कुंडली नीट अभ्यासून आपल्या जातकाला योग्य मार्गदर्शन करावे एवढीच स्वामी चरणी प्रार्थना.

संदर्भ ग्रंथ :- विवाह योग, मंगळ कोश, मंगळाला घाबरु नका, आरोग्य जातक, जातकशिरोमणि, ज्योतिर्मयूरव, आपला योग कधी?, वैवाहिक जीवनात अडथळे आणणारे ग्रहमान, भारतीय फ़ल ज्योतिष, आरोग्य जातक, जन्म कुंडलीवरुन आपले भविष्य आपणच पहा, नवग्रह व त्याची फ़ळे इत्यादि पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करणार आहे यांची प्रकाशकानी व वाचकानी नोद घ्यावी ही विनंती.

पत्रिका जमते की न जमते हे कसे पहावे, या गोष्टीकडे आपण आता वळू, बर्याळच काळापासून वधूची पत्रिका घेऊन, ती वराच्या पत्रिकेशी जमते, की नाही, हे पहाण्याचा प्रघात व रुढी पडलेली आहे. पडलेली रुढी मोडण्यास फ़ार त्रास व विरोध होतो. पूर्वी काहीतरी प्रामाणिकपणे पत्रिका पाहिली जात होती. पण, आता तसे घडत नाही. मुलगी चांगली असली की, पत्रिकेत काही दोष असला तरी, पत्रिका जमतेय असे सांगून लग्न ठरविणॆच्या गडबडी सुरु होतात. मुलीचा विवाह कोठे जमत नसेल, तर पालक पत्रिकेत बदल करतात व पत्रिका देतात. अशा स्थितीत विवाह होऊन, पुढे काही अरिष्ट निर्माण झाल्यानंतर आयुष्याचा जो गोधळ उडतो, त्याला पारावार असत नाही. तरी सूज्ञ जनांनी तसे करु नये, थोडी रुढी मोडावी, ती दोघांच्या हितासाठी; ती अशी: वर व वधू पक्षांनी एकमेकांस वर-वधूच्या पत्रिका देऊन त्या एकमेकांशी जुळतात किंवा नाहीत, हे ठरवून मग पुढील वाटाघाटीस लागावे. काहीच न पाहाता योगायोग असेल तसे घडेल, असे म्हणावे हे सर्वात चांगले. ज्या लोकाचा पत्रिकेवर विश्वास नसेल त्यांनी वधूवराची रक्त गटाची नुसती चाचणी न करता त्याची डी.एन.ऐ. चाचणी करावी कारण ह्या चाचणीत सर्वगोष्टीचा उलघडा होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.

मंगळाची परिभाषिक माहिती स्वगृहे : मेष व वृश्चिक ( वृश्चिक राशीचे अधिपत्य पाश्चात्य ज्योतिषांनी प्लुटोकडे दिले आहे. )

मूल त्रिकोण रास :- मेष, मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश, स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश; उंच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ; नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश; मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज, संख्या - ९, देवता- कर्तिकेय; अधिकार- सेनापती; दर्शकत्व - शारीरिक बल; शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण; शरीरांगर्गत धातू - मज्जा; तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय; कर्मेन्द्रिय - हात; ज्ञानेन्द्रिय - नेत्र, त्रिदोषांपैकी दोष - पित्त, त्रिगुणापैकी गुण- तमोगुण, लिंग पुरुष; रंग- लालभडक, द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.

निवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर; दिशा - दक्षिण; जाती क्षत्रिय; रत्न - पोवळे; रस - कडू, ऋतू - ग्रीष्म, वय - बाल ४ वर्षेपर्यंत; दृष्टी - ऊर्ध्व; उदय - पृष्ठोदय; स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले, भाग्योदय वर्ष २८ वे. अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश. प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश; बाधस्थान : सप्तम स्थान; अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन; प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ; मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरु; शत्रु ग्रह: बुध; सम ग्रह ; शुक्र व शनि. नविन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्शल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण ) मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.

क्रंमश ………….. टिप आपले प्रश्न पाठविताना सोबत जन्मतारीख, वेळ व ठिकाण , दूरध्वनी क्रंमाक लिहण्यास विसरु नये. योग्य मानधन घेऊन कुंडली सोडवलि जाईल किंवा मानधनाच्या रुपात आपल्याला जवळच्या वैद्यकिय रुग्णालयात जाऊन तेथील गरजू व्यक्तिना औषधाच्या स्वरुपातील मद्दत करावी रुग्णालयाची किंवा गरिब रुग्णाची माहीती विचारल्यास आपल्या परिसरातील रुग्णालयाची किंवा सेवाभावि संस्थेची माहिती दिली जाईल.