गणेशोत्सव स्पर्धा २०१० - आमने-सामने - ३

Submitted by संयोजक on 29 August, 2010 - 21:41

आमने-सामने - खुमासदार चर्चा

2010_MB_Amane-Samane-3.jpg

या स्पर्धेसाठी संयोजक मंडळाकडून दोन व्यक्तींची नावे देण्यात येतील. त्यावरून प्रश्नोत्तरे स्वरूपात काल्पनिक संवाद लिहायचा आहे. जोडीतील व्यक्ती एकमेकांना प्रश्न विचारतील, म्हणजे सुरुवातीला व्यक्ती क्र.१, व्यक्ती क्र.२ ला ५ प्रश्न विचारेल. व्यक्ती क्र.२ या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि त्यानंतर व्यक्ती क्र.१ ला ५ प्रश्न विचारेल.

नियम :

१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. हा प्रश्नोत्तरे स्वरुपातील संवाद ही एखाद्या विशिष्ट विषयावरील चर्चा किंवा इतर काहीही काल्पनिक विषयावरील चर्चा असू शकते.
४. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
५. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
६. संवादासाठी दोन्ही मिळून कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १० प्रश्नांची मर्यादा आहे. दिलेल्या विषयातील एका व्यक्तीने कमी आणि दुसर्‍याने जास्त प्रश्न विचारले तरीही चालेल.
७. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जास्तीत जास्त ३ ओळींपेक्षा जास्त नसावे. [कमी चालेल]
८. सगळे संवाद खुसखुशीत/चटकदार असावेत. प्रश्नोत्तरांमधून कोणतेही वाद अपेक्षित नाहीत. सामाजिक वाद निर्माण करणार्‍या प्रवेशिका बाद ठरवून, स्पर्धेच्या धाग्यावरून काढून टाकण्यात येतील
९. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.
१०. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

--

शोएब(अत्यंत विचारमग्न) : "सानिया, एक विचारायचे होते"
सानिया: "काय ते पटकन विचार."
"मी क्रिकेट सोडून टेनिस खेळू का?"
"काय? हं तुला निलंबित केलेय आणि मॅचफिक्सिंगचा चांस हुकला म्हणून का?"
"तसंच काही नाही. पण तू तर आजकाल दुहेरीतच बरी खेळतेस. मग माझ्याबरोबर खेळायला काय हरकत आहे"
"तुझ्याबरोबर? दुहेरीत दोघांनी खेळायचे असते. त्यापेक्षा तू बॉल बॉय हो"
"सध्या माझे दिवस चांगले नाहीत म्हणून मला असे बोलतेस का?"
"नाही. पण माझ्याशी लग्न केलेस म्हणून तू पाकिस्तानात हिरो आणि मी भारतात व्हिलन झालेय, तेवढे पुरेसे आहे."
"मग मी करू तरी काय"
"आणखी लफडी सोडून काहीही कर. हवे तर रेस्टॉरंट काढ. आमच्याकडच्या अनेक क्रिकेटर्सनी काढलीत"
"बरं , तेच जमतंय का ते बघतो मी"
"शोएब, मला पण तुला काही विचाराचंय..."
"काय आता?"
"माझी आणि ऐसाम उल हक कुरेशीची जोडी कशी वाटेल?"
....."अरे अरे पडलास का एकदम, मी टेनिसबद्दल बोलतेय!"

शोएब: हाय डार्लिंग, मी आलो फिक्सिंग करुन. हाऊ आर यु?
सानिया: मै ठीक हुं (घुश्श्यात)
शो: क्या बात है बेब?
सा: कुछ नही.
शो: क्या हुआ?
सा: काहिच नाही.
शो: काही घेतलस का?
सा: नाही.
शो: बर जेवायला काय केलय्स?
सा: जहर.
शो: जहर, अरे व्वा व्वा Happy
सा: त्याच्याबरोबर तंदुरी तंगडी पण हवी का?
शो: मग तर बेस्टच.
सा: लाज नाही वाटत मला विचारतोस जेवायला काय म्हणुन?
शो: लाज ... ती तर केव्हाच सोडलिये
सा: एव्हढे पैसे कमवतोस, फिक्सिंग करतोस घरात एक कुक नाही ठेवता येत?
शो: लग्न केलय की मी तुझ्याशी, आमच्यात बीवीच जेवण बनवते.
सा: बायको आहे मी, की मोलकरीण?
शो: तुम तो आसमान का चाँद हो Happy
सा: (लाजते), तो इस चॉद को उस चॉद पे ले चलो ना??? ब्रॅन्सन को बोलो ना, मेरे लिये एक सिट रख्खे (लाडाने) उसके व्हर्जिन फ्लाईट पे Proud

शो: समज, आता जर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच झाली, तर तु कोणाच्या बाजुने असशील?
सा: जुबांपे पाकिस्तान, दिलमे इंडिया...
शो: का म्हणे?
सा: एडा है क्या? सासर माहेर, असंच असतं... असा बोलतोय, जसा पहिलटकरच जणु!?!?
शो: बर, सांग.. तु 'पाकिस्तानकी बहु' म्हटल्यावर 'नाही' का म्हटलंस??
सा: मी एकवेळ तुझ्याकडे बघुन(?) हो म्हणेन रे... पण मग तु 'हिंदुस्तानका जावई' म्हणा म्हणशील, आणि 'खेळायला' घ्या म्हणशील...
शो: बर जाऊदे.. आपण रिसेप्शन करायचंय, ते मुंबईत करुया. चालेल ना??
सा: असं म्हणतोय्स, जसं की ये बात 'राज' रहेगी...
शो: तु सारखी कुठेतरी खेळत असतेस. आमच्याशी कुणीच खेळायला येत नाही. चल, हनीमुनला तरी जाऊया ना?
सा: थांब.. एक टुर्नामेंट आहे, मी तिथुन 'कप' घेऊन येते.. 'आले की चहा' पिऊ. 'टाटा चहा', आपलाच आहे...

सा: इंडीयन मिडीयावाले मला म्हणतात, 'तुला दुसरा कोणी भेटला नाही का?' त्यांना मी काय सांगु?
शो: "पदरी पडलं.... "
सा: बर... मला सांग ना.. तुला माझ्यातलं काय आवडलं??
शो: तन-मन-धन. सगळंच गं...
सा: पाकिस्तानी मिडीयावाले मला म्हणतात, तु आमच्या देशाकडुन खेळशील काय?
शो: अरे?? आपली पोरींची टेनिस टीम आहे~~ए??
सा: समजा 'नंतर' मी टेनिस वगैरे बंद केलं, तरी तुला काही हरकत नाही ना?
शो: 'किती' नंतर?? म्हणजे.. सॉरी... आय मीन... हळु हळु हे येडे लोक मला जावई मानतीलच. आणि मी बिनधास्त येऊ शकेन इकडे.. इथं मला कार्यक्रमाला वगैरे बोलावतील.... महेश जीं मार्फत एखादा-दुसरा पिक्चर पण मिळुन जाईल.. कोणाला पता पण लागणार नाही... तोपर्यंत 'कळ' काढ...
सा: बर, तु माझ्यासाठी एक उखाणा घेऊन दाखवणार नाहीस??
शो: हो, हे घे..
"सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, हिर्‍यांची रांगोळी ताटाच्या काठी.
प्रेमाने नांदवेन हिंदुस्थानची बेटी, झुरतो जीव माझा सानिया"च्या" साठी. "

* Light 1 खरं प्रेम वगैरे असलं तर असो बापडे. सुखात नांदोत. आमच्या मनात काही वाईट्ट नाही. शुभेच्छाच!!!

मतदान कसं करायचं? <<< बोट दाखवून .. मंद्या अजून तूला मतदान कसं करायचं ते माहीत नाही.