शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ६

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:42

आपलं आणि उत्सवांचं नातं अगदी जवळचं. मग ती दिवाळीतली रोषणाई, सुंदर सजवलेल्या गौरी, एखादे सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री किंवा दाराची शोभा द्विगुणीत करणारी गुढी. ही आहेत आपल्या उत्सवांची प्रतिके. या अशा उत्सवांच्या प्रकाशचित्रांचा हा झब्बू.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - उत्सव

तुम्ही पाहिलेल्या/अनुभवलेल्या कोणत्याही सणाचे/उत्सवाचे छायाचित्र इथे टाका आणि त्यातला उत्साह, मजा, जिवंतपणा यासारख्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवा.

2010_MB_Utsav_Jhabbu.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mhorakya.JPG

आमच्याकडे लेझीमासारखाच दांडपट्टा हा खेळही खूप लोकप्रिय आहे. लग्नात ही दांडपट्टा पथकं आवर्जून आणतात. दांडपट्ट्याचा खेळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातल्या दांडपट्ट्याच्या काळजाचा ठोका चुकवणार्‍या अनेक करामती. अक्षरशः अंगावर शहारे आणतात बघणार्‍याच्या. त्या खेळातला हा म्होरक्या.

मिनी,
टोपलीभरून सोन्याचे दागिणे, सही आहे. रच्याकने इथे तुला लाह्या आणि बत्तासे कुठे मिळाले, इंडीयन स्टोअर मध्ये का?

ह्या वर्षीच्या गणेशचतुर्थीच्या दिवशीचं दाराचं तोरण.

गोव्यातील हिंदु घरासमोर तुळशी वृंदावन हवेच. तुळशीचे लग्न तिथे अगदी थाटामाटात साजरे होते. त्यापुर्वी वृंदावन असे सजवले जाते. या चार बाजूंना, गणपति, विष्णु, मारुती आणि गरुड यांच्या मुर्ति असतात. माझे काका दरवर्षी या मुर्तींना असे रंगवत असतात.

vrundavan.jpg

गोव्यातील साखळी (सांकलेम) या गावी विठ्ठलाचे आणि दत्ताचे सुंदर देऊळ आहे. या २ देवळांच्या मधून एक नदी वाहते. त्या नदीत, त्रिपुरारी पोर्णिमेला मोठा उत्सव असतो. तिथे बोटींच्या मॉडेल्सच्या स्पर्धा असतात. ही मॉडेल्स वर्केबल असावी लागतात, म्हणजे त्या मॉडेल्सना पाण्यातून एक फेरी मारावी लागते. या स्पर्धेशिवाय तिथे नाच, गाणी तसेच सरंगे सोडणे हा एक अनोखा प्रकार असतो. हा संपुर्ण परिसर त्या रात्री, पणत्यांनी सजलेला असतो.
तिथली एक स्पर्धक बोट.

boat_0.jpg

पुण्यात पाषाण ला बालाजी मंदिर आहे. तिथे झालेल्या "कल्याण उत्सव" चा हा फोटो. कल्याण उत्सव म्हणजे बालाजी चे लग्न Happy मधे असलेला बालाजी. हा सोहळा खूप छान असतो बघायला.

DSC01013.JPG

हो, हा सोहळा मस्तच असतो पहायला. मी पाहिलाय वाशीला बालाजी मंदीरात. किती तयारी करतात. आताच झाला वाटते(वाशीची मावसाअजी इती).

Pages