शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:29

बाजारात गेलो की भाजीविक्रेत्याने नीट शिस्तीत लावून ठेवलेली भाजी पाहून घेण्याची इच्छा बळावते. एखादी झाडावरची अक्कडबाज मिरची पाहून तिचा फोटो घ्यायचा मोह आवरत नाही. एखाद्याला भाज्या नीट कापून ट्रेमध्ये सॅलड डेकोरेशन म्हणून रचायची आवड असते. काढा असे काही सुंदरसे फोटो तुमच्या पोतडीतून झब्बूसाठी.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - भाज्या

झाडाला लागलेल्या किंवा कलात्मक पद्धतीने मांडलेल्या भाज्यांचे फोटो इथे टाकावेत. भाज्या स्वत:च्या अंगणातल्याच हव्यात असा नियम नाही

2010_MB_Zabbu-Bhajya-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

झब्बू खेळताना तुमचा उत्साह कायम राहू दे, पण जरा ७ क्रमांकाच्या नियमावरही लक्ष राहू दे. Happy बाकी चालू द्या.

थँक्स मिनी, निवेदिता. निवेदिता, तुझा रुसला भोपळा पण जाम गोड आहे आणि जामचं रुसलेला दिसतोय. Happy

भाजीचा, आमच्या बॅकयार्ड मधल्या मी घरी गेल्यावर टाकेन. पण आत्ता हा माझ्या लॅपटॉपवर आहे. पुणे-नाशिक मार्गावर एका कुठल्यातरी छोट्या गावातील हा फळ बाजार. गावाचे नाव आठवत नाही आहे. ती फळे बघुन माझ्या मुलानी कार थांबावयाला लावली आणि आम्ही सिताफळे विकत घेतली. Happy

IMG_0717.JPG

घरच्या भाज्यांचे आणि हसर्‍या-रुसल्या वांगी-भोपळ्यांचे फोटो मस्तच. भाग्य, दुधीचा आकार मजेशीर आहे. पडवळ आणि शेवगापण मस्त. Happy

सर्वप्रथम संयोजकांचे अभिनंदन! सगळी पोस्टर अतिशय सुंदर झाली आहेत. केवळ ती पोस्टर बघून या वेळी मोह होतोय फोटो टाकायचा... Happy

घरच्या मिरच्या

Maayboli_17.jpg

Pages