शेरास सव्वाशेर अर्थातच प्रकाशचित्रांचा झब्बू

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:14

2010_MB_Jhabbu_Poster.jpg

अरेच्या हे काय दिसतेय, हा तर पुण्याच्या दगडुशेठ हलवाई गणपतीचा फोटो, आणि हा, लालबागचा राजा..आणि हो हा कोणता आहे बरं, कमळावर विराजमान झालेला?? ...हा नक्कीच कसबा गणपती..नाही कळलं, अहो हे तर आपल्या मायबोलीकर दोस्तांनी टाकलेले फोटो आहेत. हो हो सगळ्यांनी स्वत: काढलेले, एखादा गणपती मंदिरातला तर एखादा गल्लीतल्या मंडळाचा सुबक देखाव्याबरोबरचा.

विषय तोच, फोटो काढणारी दृष्टी मात्र वेगळी. विषय एक पण त्याच्या छटा मात्र असंख्य. 'एकातल्या विविधतेचा' आनंद घेण्यासाठी सज्ज आहात का मग?
मायबोली गणेशोत्सव २०१० सादर करीत आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ - झब्बू.

सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ५
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ६
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ७
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ९
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १०
शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ११

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.