सम्पर्कातील वा आठवणीतील जवळचे-लांबचे नातेवाईक

Submitted by limbutimbu on 6 September, 2010 - 07:23

पूपूवरील चर्चा वाचत असताना एक जाणवत गेल की या निरनिराळ्या समाजामध्ये निरनिराळी नाती जपली जात असतील, तर किमान माझ्या (अन अर्थातच माबोकरान्च्या) माहितीतील किती नाती कशाप्रकारे जपली गेली आहेत याचा आढावा घ्यावा!
अपेक्षा अशी की येथे, सख्खे आईवडील व सख्खे भाऊबहीण वगळता अन्य बाकी कोणकोणत्या पैत्रुक, मातुल व (असल्यास) सासुरवाडीकडच्या नातेवाईकान्शी सम्पर्कात आहोत वा त्यान्ची आठवण तरी येते याचे वर्णन व्हावे
जसे की,
मला पाच मावश्या, त्यान्ची मुले/जावई/सूना/नातवण्डे/पन्तवण्डे इत्यादिक
चार काका, त्यान्ची मुले/जावई/सूना/नातवण्डे/पन्तवण्डे इत्यादिक
एक बायको, तिचे काका/मामा/आत्या/मावश्या, त्यान्ची मुले/जावई/सूना/नातवण्डे/पन्तवण्डे इत्यादिक
ही यादी एखाद्या वन्शावळी सारखी होईल, पण ती आहे, अन ती तशी आहे, म्हणूनच माझ्या अस्तित्वालाही काही एक अर्थ आहे! (असे माझे मत)
अन म्हणूनच याची उजळणी घ्यावी असे वाटले. आपणांसही तसे वाटत असेल, तर आपल्या सम्पर्कातील अथवा आठवणीतील नातेवाईकान्ची जुजबी नातेओळख इथे जरुर द्यावीत

(नातीगोती मध्ये मला हा धागा उघडायचा होता, पण ते न जमल्याने आत्ता जिथे कुठे आहे तिथे उघडला असे!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची एकत्र फॅमिली: मी + नवरा + साबा + साबु + धाकटा दीर + आजे सासरे (राहणार कल्याण)

साबुंच्या सख्ख्या भावाची फॅमिली: माझे चुलत साबु + चुलत साबा + चुलत दीर + चुलत जाऊ (राहणार कल्याण) + दीराचा मुलगा

माझे माहेर (आई + बाबा + धाकटी बहिण)

माझ्या चुलत नणंदेची फॅमिली: नणंद + तिचे पती + १ मुलगा

साबांचा सख्खा बंधु नं. १ : माझे मामे सासरे + मामे साबा + त्यांची मुलगी (माझी मामे नणंद) (राहणार कल्याण)

माझ्या साबुंच्या सख्ख्या बहिणीची फॅमिली : माझ्या आत्ये साबा + त्यांचे पती + त्यांची २ मुले व त्यांच्या बायका (राहणार कल्याण)

साबांचा सख्खा बंधु नं. २ : माझे मामे सासरे + मामे साबा (राहणार कल्याण)

साबांच्या सख्खा बंधु नं. २ चा मुलगा व सून व नात (राहणार उसगाव)

साबुंच्या मावस बहिण नं. १ ची फॅमिली : माझ्या मावस आत्ये साबा + त्यांची २ मुले व त्यांच्या बायका + या २ मुलांचा प्रत्येकी १ मुलगा (राहणार मुलुंड)

साबुंच्या मावस बहिण नं. २ ची फॅमिली : माझ्या मावस आत्ये साबा + त्यांचे पती + त्यांचा १ मुलगा व त्यांची बायको आणि मुलगी (राहणार पूर्वी बदलापूर आता सोलापूर)

साबुंच्या मावशी म्हणजे माझ्या नवर्‍याच्या मावशी आजी गेल्या वर्षीच निवर्तल्या. Sad

साबुंचे मामा (माझ्या आजेसाबांचे सख्खे बंधु) + मामी (माझे मामे आजे साबु + मामे आजे साबा) (राहणार पुणे)

साबुंच्या मामे बहिणीची फॅमिली : माझ्या मामे आत्ये साबा + त्यांचे पती + त्यांच्या ३ मुली (राहणार नाशिक)

माझ्या चुलत साबांच्या आई (राहणार ठाणे)

माझ्या चुलत साबांच्या सख्ख्या बहिणीची फॅमिली: माझ्या चुलत दीराची मावशी + त्यांचे पती + १ मुलगी (राहणार ठाणे)

आझे मातुल आजी-आजोबा (राहणार खार)

माझ्या मामाची फॅमिली: मामा + मामी + १ मुलगा (राहणार कांदीवली)

माझ्या मावशी नं. १ ची फॅमिली: मावशी + काका + २ मुली (राहणार अंधेरी)

माझ्या मावशी नं. २ ची फॅमिली: मावशी + काका + २ मुलगे (राहणार खार)

हुश्श्श्श Uhoh

प्लिज फक्त एकुण सन्ख्या देखिल लिहीशील का? >>> फक्त आणि देखील हे २ शब्द एकाच वाक्यात का बरे?? Uhoh

फक्त संख्या लिहू का? नाती नकोत का?? Uhoh बोध नाही झाला नीट! मग तसं असेल तर "देखील" शब्द का? Uhoh

बर का निम्बुडा,
पैत्रुक घराण्याकडून, माझे वडील ३ नम्बरचे, सबब पुढल्या पिढीत वयपरत्वे मी बर्‍याच खालच्या स्थानावर.
पण मातुल घराण्यात आई मोठी, आधी लग्न झालेली, सबब आज्जीच्या नातवन्डात (थोरला भाऊ वारल्यानन्तर) मी सगळ्ञात मोठा! Happy

निम्बुडे, अग अमुक अमुक सन्ख्या "फक्त"/- (rupees xxxx xxxx xxxx only) अस लिहायची सवय असल्याने सन्ख्या म्हणल की फक्त शब्द आपोआप लिहीला गेला! Lol
असो, तो खोडलाय, चूक झाली होती

निंबुडे, वाचूनच दमलो >>>
आणि बरं का हे सर्व आठवणीतीलच नव्हे तर रेग्युलर संपर्कातीलही नातेवाईक आहेत. शिवाय उप उप नातेवाईक तर पुष्कळ आहेत.

उदा. मामे साबांची माहेरची फॅमिली,
चुलत नणंदेच्या सासरची फॅमिली (नणंदा व त्यांची मुले, माझ्या नणंदेच्या चुलत साबा इ.इ.)

दुर्दैवाने, माझ्या वडीलांकडचे (म्हणजे माझे चुलत) नातेवाईक (माझ्या वडीलांना सावत्र वडील बंधू आहेत. वय वर्षे ८५ अंदाजे Uhoh ) असूनही त्यांच्याशी संपर्क नाही. ३ चुलत बंधू आहेत. पण सगळे उसगावात आहेत. सावत्र काकाही उसगावात कुठल्यातरी एका मुलाकडे.

एक आत्या आहे माझी जी गावाकडे असते. पण त्यांच्याशीशी संपर्क नाही. माझ्या लग्नाला आली होती त्यांची फॅमिली इतकाच त्यांच्याशी संबंध.

शिवाय माझ्या आईचे आजोळ सोलापूरला आहे. तिथले आईचे सगळे चुलत बंधू + चुलत भगिनी + त्यांची मुले बाळे इ. कधी मुंबईत आलेच तर "काय कसे बरे आहे ना?" इतके विचारण्याइतपत संबंध.

बाप्रे. वंशावळ संपतच नाही.

निंबुडे, काय अशी सगळी इत्यंभूत माहिती इथे देत्येस नात्यांची? उजळणी करायची असेल तर स्वतःपाशीच कर किंवा घरच्यांजवळ कर. इथे लिहिलंस एवढं डीटेलवार तर एखादी व्यक्ती या माहितीचा दुरुपयोग करु शकते ना? उपयोग तर काही नाहीच होणार पण नसती पायावर कुर्‍हाड नको पाडून घेऊस.

लिंबूदा, रागावू नका, पण जे मनापासून वाटलं ते लिहिलंय.

लिंबुटिंबु राग मानु नका पण ह्या धाग्याचा उपयोग काय ? कोणाला किती नातेवाईक आहेत आणि त्यांची किती आठवण येते हे तिर्‍हाईताला कळुन त्याचा उपयोग काय ? माफ करा पण मला ह्याचा उद्देशच नाही कळला.

अश्विनीला अनुमोदन , निंबुडा अशी माहीती इंटरनेटवर देणं योग्य नाही.

कोणाला किती नातेवाईक आहेत आणि त्यांची किती आठवण येते हे तिर्‍हाईताला कळुन त्याचा उपयोग काय ?
--- मलाही हाच प्रश्न पडला आहे.

रक्ताच्या नात्या पेक्षा माणुसकीचे नाते (जे बहुतेक वेळा रक्ताचे नसतातच) जास्त महत्वाचे असतात. ते कधी कुठल्या रुपात भेटतील अंदाज किंवा मोजदाद नाही करता येत. एका कडुन घ्यायचे आणि दुसर्‍याला द्यायचे एव्हढेच मध्यस्थाचे काम आपण करायचे.

<<ह्या बाफचा नक्की 'हेतू' काय ? (मलाही हाच एक प्रामाणिक प्रश्ण पडलाय) >>
अनुमोदन मनःस्विनी.
आपल्या आजोबा , पणजोबांनी लोकसंख्येची वाढ करण्यात कसा आणि कितपत हातभार लावलाय हे समजुन घेण्यासाठी की काय ? Biggrin Light 1

खरं आहे अश्विनी के यांचं.
मलाही समजलं नाही कारण / प्रयोजन...

लिंबुदा, निंबुडा Light 1 नेटवर इतकी पर्सनल माहिती देण्यात अर्थ नाही.

>>>> रक्ताच्या नात्या पेक्षा माणुसकीचे नाते (जे बहुतेक वेळा रक्ताचे नसतातच) जास्त महत्वाचे असतात.
हे एक आत्यन्तिक भयानकरित्या वापरुन घासून घासून गुळगुळीत झालेले वाक्य आहे असे माझे मत.
रक्ताची नाती साम्भाळता येत नाहीत अन चालले दुनियाभर माणूसकी शोधायला..... अन बरेचदा ती दुसर्‍या कुणीतरी आपल्याबद्दल करावि अशीच अपेक्षा! असे माझे मत आहे.
बीबी चा विषय रोखठोक आहे, असतील नाती, आठवणीत वा सम्पर्कात, तर मान्डा, पण मान्डाच अशी सक्ति नाही, वाचा अशी सक्ती तर त्याहूनही नाही.
हा विषय काढल्याने, इथे न लिहीतादेखिल अनेकान्च्या मनात जर एकदातरी आपल्या "जपलेल्या वा न जपलेल्या वा विस्मृतीत गेलेल्या" कौटुम्बिक-रक्ताच्या नात्यान्ची उजळणी झाली असेल, तरी माझ्या या "सार्वजनिक" बीबीचा उद्देश सफल झाला असे मी मानतो.
अन्यथा आहेच की नेहेमीचेच..... मी म्हणजे माझा राजा, माझी बायको म्हणजे माझी सम्राज्ञी, माझी पोरेपोरी म्हणजे माझे राजपुत्र-राजकन्या, अन माझा फ्लॅट्-बन्गला-झोपडे - जे काय असेल ते माझे राज्य!

अन मला नाही वाटत की निम्बुडाने वर दिलेल्या वा केवळ मला किती कोणकोणते नातेवाईक आहेत हे सान्गितल्यामुळे त्यामाहितीवरुन काही गैरफायदा घेता येऊ शकेल, अशा भित्या बाळगायच्या तर नेटवरच काय, घराबाहेर देखिल पडायला नको, कुणाशी काही बोलायला नको, सान्गायला नको. नै का? अन समजा कोण गैरफायदा घेऊ लागलच, तर कळेलच की अस्तनीतले निखारे कोण कोण ते!
असो,
हा धागा योग्य वाटत नसेल, वा माबो च्या सार्वजनिक शान्ततेला धक्का देणारा वाटत असेल, वा लिम्ब्याचा हा सहानुभुती वा प्रसिद्धी-प्रतिष्ठा वगैरे मिळविण्याचा प्रकार असे कुणाला वाटत असेल, वा या धाग्यामुळे कुणी दहशतवादी वगैरे अ‍ॅक्टिव्ह होऊन भविष्यात काही घातपात घडतील असे वाटत असेल, वा अन्य कसल्याही कारणाने हा धागा नकोच असे वाटत असेल तर हा धागा जरुर उडवावा, माझी कसलीही हरकत, आक्षेप, दु:ख, त्रागा वगैरे वगैरे असणार नाही!

>>>> कोणाला किती नातेवाईक आहेत आणि त्यांची किती आठवण येते हे तिर्‍हाईताला कळुन त्याचा उपयोग काय ?
श्री, हाच जर मुद्दा असेल, तर येत्या गणेशोत्सवातील निरनिराळ्ञा स्पर्धात भाग घेण्यात तरी काय मतलब?
मला किती फोटोग्राफी येते हे माबोवरील "तिर्‍हाईतान्ना" कळून काय उपयोग? Wink
मला किती सेन्स आहे फोटोग्राफीचा, मी किती छान डेकोरेशन करतो, मी कसा मूर्तिकार आहे, मी कसा कलाकार आहे, मी कसे गायन वादन करु शकतो वगैरे वगैरे अनेक बाबी गणेशोत्सव वा दिवाळी अन्कात मान्डून मी काय बरे साध्य करत असतो? ते तरी माबोवरील तिर्‍हाईतान्ना कळून काय उपयोग? नै का? Proud
मूळात माबोवरील सर्वस्वी अपरिचित असे "तिर्‍हाईत" लोकं, काय गरज आहे मग इथे येऊन काही एक खरडायची? नै का? लोकल ट्रेनमधे प्रवास करताना जसे दोन मिन्टाचे सहप्रवाशाशी आपण गप्पा मारल्या तर मारतो, तसेच इथेही वागावे, नै का? इथे काही एक भावनिक शेअर करूच नये, तो सगळा खाजगी मामला! नै का?
अरे क्काय्ये!

श्री, हाच जर मुद्दा असेल, तर येत्या गणेशोत्सवातील निरनिराळ्ञा स्पर्धात भाग घेण्यात तरी काय मतलब?
मला किती फोटोग्राफी येते हे माबोवरील "तिर्‍हाईतान्ना" कळून काय उपयोग?>>>>>>>

लिंबु, स्पर्धात भाग घेणे आणि नातेवाईकांची यादी देणे या दोन्ही गोष्टींमागचा उद्देश नक्कीच भिन्न आहे.... स्पर्धेत भाग घेण्यामागे हौस, गंमत, टिपी हा उद्देश असू शकतो, तिथे कुणाला काही प्रुव्ह करायचं नाहीये... पण नातेवाईकांची माहिती पुरवण्यात काय उद्देश असणार आहे? (मला खरंच कळलं नाहीये म्हणून विचारलं... वाद घालायचा हेतू नाहीये Happy )

मलाही स्वतःला या बीबीचा उद्देश लक्षात येत नाहीये. लिंबू गणेशोत्सव किंवा अन्य उपक्रमांमधला भाग व या बीबीचा उद्देश यात गफलत करू नका. तुम्हांला किंवा आणि कोणाला किती नातेवाईक आहेत हे इतरांना वाचण्यात कितपत रस असेल? ह्म्म, त्यांची आठवणच काढायची असेल तर घरच्या घरी वहीतही लिहू शकतोच की.

अशा भित्या बाळगायच्या तर नेटवरच काय, घराबाहेर देखिल पडायला नको, कुणाशी काही बोलायला नको, सान्गायला नको. नै का?
><<<<<<<
स्वतःच्या प्रोफाइलात नाव/गाव वगैरेही माहिती अजिबातच न देता, उद्योजक बीबीवर वैयक्तिक माहिती द्यायला हवी अशी त्या बीबीची गरज असता तिथे त्यावरून वाद घालून, इथे मात्र अशी पोस्टे टाकायची (आणि लोकांनी स्वतःची वैयक्तिक माहिती इथे टाकावी अशी अपेक्षा ठेवायची) म्हणजे मजाच!

अनेक लोकांनी या बीबीचा उद्देश विचारला असता काहीतरी थातुरमातुर कारणं देऊन, विचारलेल्या लिहिलेल्या गोष्टींचा कशाशीही बादरायण संबंध जोडून जमेल तितकी टाळीबाज, भावनाप्रधान, इ. वाक्यं टाकायची<<<
हे एक आत्यन्तिक भयानकरित्या वापरुन घासून घासून गुळगुळीत झालेले वाक्य आहे असे माझे मत.
रक्ताची नाती साम्भाळता येत नाहीत अन चालले दुनियाभर माणूसकी शोधायला
<<<<
एवढेच इथे दिसून येतेय.

श्रद्धातै, तुम्चे मत लै भारी अस्ते नेहेमीच! Happy (निदान "टाळीबाज" वाक्ये अस्तात येवढे मान्य केलेत हे ही नसे थोडके :डोमा) ) असो.
मी नातेवाईकान्ची नावगावपत्ते विचारले नाहीत कुठेही, "तर आपल्या सम्पर्कातील अथवा आठवणीतील नातेवाईकान्ची जुजबी नातेओळख इथे जरुर द्यावीत" हे ठळक केलेले दोन शब्द तुमच्या वाचनातुन कसे काय सुटले श्रद्धातै? [(की उगाच आपल, मिळाली सन्धी - घ्या वापरुन (खर तर मला झोडपून हा शब्द वापरायचा होता, पण मनातल्या मनातच वापरतोय Proud )]

नातेवाईक आहेत का, असल्यास सम्पर्कात आहेत का, कोणकोणते, कोण विस्मृतीत गेले ही माहिती दिल्याने तुम्हा लोकान्ना बराच त्रास होतोय्/होणारे असे दिस्ते!
मन्जिरी/आऊटडोअर्स व अन्य लोकान्च्या संयुक्तिक विरोधी मतान्चा आदर करुनही, मी माझ्या भुमिकेपासून ढळू शकत नाही.
एक विनन्ती , ज्यान्ना शक्य त्यान्नी सान्गावे, ज्यान्ना पटत नाही, त्यान्नी सोडून द्यावा विषय, वाचूही नये!
हां, पण कुणी इथे काही लिहीत असल्यास त्यास तो/ती कसा वेडेपणा करताहेत, ते कसे धोक्याचे आहे याबद्दल सावध करत रहायचे असल्यास मात्र याच धाग्याशिवाय दुसरी जागा नसल्याने, इथेच जरुर सान्गावे! माझी त्यासही काही हरकत नाही.

निम्बुडा, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
येवढ्या मोठ्या सन्ख्येने नातेसम्बन्ध - लई खास - मला तुमचा हेवा वाटतो. Happy

<<एकुण सन्ख्या देखिल लिहीशील का --- येवढ्या मोठ्या सन्ख्येने नातेसम्बन्ध - लई खास - >>
एकंदरीत लिम्बुदादांचा भर संखेवर आहे असे वाटतेय म्हणुन विचारतेय.
नातेवाईकांची संख्या आणि नातेसंबंधामधील गुणवत्ता यामधे संख्या महत्वाची की गुणवत्ता ? केवळ संपर्कात आहेत , वर्षातुन १० वेळा तरी भेटतो ई गोष्टी केवळ औपचारीकता म्हणुन पण घडतात. नाही गेलो , तर लोक काय म्हणतील या भीतीपोटी कार्यक्रमांना हजेरी लावली जाते. अडचणीच्या वेळी धावुन येणारा एखादा नातेवाईक जरी असेल तरी तो इतर १०० नातेवाईकांपेक्षा ( जे केवळ लांबुनच सहानुभुति दर्शवितात ) खुपच महत्वाचा.
तेव्हा संख्येला काही खास महत्व आहे असे वाटत नाही.

डेलिया, मुद्दा चान्गला आहे
माझ्यामते व्यक्ति/परिस्थिती सापेक्ष, सन्ख्या व गुणवत्ता, दोन्हीही महत्वाचे! Happy
वेळेस मदतीला धावुन येणारा एखाददुसरा नातेवाईक महत्वाचा तसेच, सहानुभुती दर्शविणारेही तितक्याच महत्वाचे - त्यान्च्या सदिच्छा पाठीशी रहातातच, अन त्या देखिल आवश्यक अस्तात असे मला वाटते.

(माझा भर सन्ख्येवर सहाजिकच अस्णार ना, तसेही आम्ही कोब्रा लोकं आपापले एकखाम्बी तम्बु घेऊन जगत अस्तो.... Proud त्यापेक्षा देब्रा बघा.... प्रचण्ड मोठा गोतावळा अस्तो, मला माहिते ना, लिम्बीकडे तसच अस्त)

आमचे असे अनेक लांबचे नातेवाईक आहेत की त्यांच्याकडे लग्नकार्य असले की आमंत्रणपत्रिका घेऊन येतात तेव्हाच ते दिसतात/भेटतात. लहानपणी तर अशा वेळी कळायचे की अरे वा हे पण आपले नातेवाईक आहेत(?) . यांनी आपला पत्ता शोधून कसा काढला असा पण प्रश्न पडे.
यापेक्षा शेजारी , मित्रमंडळी, सहकारी जे आमंत्रणाशिवाय चौकशी करतात, अडचणीला धावत येतात, त्यांचीच आठवण जास्त वेळा येते.

हे एक आपले सर्व नेट्वर मांडायचा काही एक काँप्लेक्स असतो त्याचे उदाहरण वाट्ते. सम थिंग्ज शुड रिमेन प्रायवेट. वाचणारे काय काहीही वाचतात.

>>>> वाचणारे काय काहीही वाचतात.
मामे, तू तर कविता देखिल वाचत असशील रोजच्या रोज डझनावारी! नै का? Proud

उपयोगी पडणार असेल, तरच ते ते नाते साम्भाळायचे असा काहीसा वीसाएकविसाव्व्या शतकातील नियम बनत चालला आहे का?
कोणत्याही नात्यास "उपयोजितेच्या" तराजूतच का तोलले जावे हा प्रश्न मला नेहेमीच पडतो! Happy

या थीमला थोडे दुसरे स्वरूप देऊया का?
आपल्या या गोतावळ्यातील काही व्यक्तींच्या ह्रुद्य आठवणी असल्या, ज्यामुळे त्यांचे जिवीत अस्तित्व असो वा नसो ,आपणास कसा आधार वाटतो,दिलासा मिळतो अथवा आपण त्यांच्याशी संवाद साधण्यास कसे उत्सुक असतो व त्यातून सकारात्मकतेचा साक्षात्कार कसा होतो हे लिहिले तर एक वेगळा हेतू साध्य होईल्,त्यांच्या स्मृतीस उजाळा मिळेल व पुनः स.म्पर्क वाढवण्यास उत्तेजन मिळेल.
पहा कसे वाटते ते!!

रेव्यु काहीच हरकत नाही Happy
किम्बहुना भरपुर सन्ख्येने असलेल्या नातेवाईकातील काही ठराविकच जास्त आवडत होते/आवडतात असे असते..... "नाव पत्ता" न घेता ते सान्गितले तर दुधात साखरच!
(दुधात साखरच... हे टाळीबाज झाल नाही तितकेसे, नै? Wink )

येवढच नव्हे, तर काही नातेवाईक बघितलेले/भेटलेले नस्तात अनेक कारणाने, पण त्यान्च्याबद्दल ऐकिव माहिती अस्ते, ती शेअर करायला देखिल हरकत नसावी
जसे की माझ्या आईचे आजोबा उत्कृष्ट ज्योतिषी होते, तर वडिलान्चे आजोबान्च्याकडे वेदविद्येची पाठशाळा होती जी एकुण सात पिढ्या चालली होती. माझे आजोबा व वडील दशग्रन्थी ब्राह्मण होते! (आता दशग्रन्थी म्हणजे काय ते कृपया मला विचारू नका, झक्कीन्ना गाठा!)
आईचे वडिलान्च्या आजोबान्ना बघण्याभेटण्याचा सम्बन्धच आला नाही, पण आईचे एक मामा, अभ्यंकर आडनावाचे, उत्कृष्ट संगित शिक्षक होते, त्या काळातील जेव्हा त्यान्चे शिक्षण पलुस्करबुवान्च्याकडे झालेले.
माझा एक मामा, चार वर्षाचा असतानाच तबल्याचे बोल कुणी बोलले असता त्याबरहुकुम वाजवू लागला होता, आज मात्र तो पेटीमधे रस घेतो, तर दुसरा मामा तबला-ढोलकी-मृदुन्ग-नाळ यावर हुकमत ठेवुन आहे.
आईची आई देखिल संगित - गाणे-वादन शिकवायची, तिच्या दोनतिन परीक्षा झाल्या होत्या. तसेच त्याकाळी इयत्ता दुसरी का चौथीपर्यन्त शिक्षण झाले होते - म्हणजेच तिला लिहिता-वाचता येत होते. पण त्यापेक्षाही जास्त ती व्यवहारकुशल म्हणूनच ओळखली गेली.
आईची एक थोरली मावशी, जी बालविधवा होती, नन्तर शिकून शिक्षीका बनली व तशीच दुसरे लग्न न करता राहीली होती. (तिच्यावर मागे कधीतरी एक स्फुट माबोवरच लिहील्याचे आठवते). ही खूप कडक खाष्ट स्वाभिमानी होती, आम्ही लहान मुले तिला वचकून असायचो. पण तशी ती स्वभावाने प्रेमळ होती असे इतक्या वर्षानन्तर जाणवते! आयुष्यात अकाली लादले गेलेले एकटेपण त्याकाळी त्यान्नी कसे निभावले असेल याचा विचार करतानादेखिल अन्गावर काटा उभा रहातो)
आईचे एक काका अविवाहित, पण उत्कृष्ट आचारी होते, व त्याकाळी पुण्यातील अनेक मन्गल कार्यालयामधे त्यान्च्या अख्त्यारीत मुदपाकखाना चालत असे. पैसे अतिशय कमीच मिळायचे. १९७१ च्या सुमारास आमच्या मुन्जीत देखिल त्यान्नीच देखरेख केल्याचे आठवते. पुढील वर्षीत ते वृद्धापकाळ म्हणा वा कष्टाच्या-हलाखीच्या आयुष्यातील तब्येतीच्या हेळसाण्डीमुळे वारले.
अशी जन्त्री अजुनही देता येईल, एकेकाच्या वैशिष्ट्यासहित.
पण महत्वाचे असे की आज मी जो काही जसा काही आहे, त्यात या सगळ्यान्कडून आलेल्या अनुवन्शिक गुणदोषान्चा देखिल सहभाग असावा असे मला वाटते.

इथे नातेवाईकान्ची जन्त्री देण्याच्या निमित्ताने का होईना, जर कुणाकुणाचि आठवण निघाली, अन त्यानिमित्ताने त्यान्च्या-आपल्यातील रक्ताच्या सम्बन्धातील साध्यर्म सापडले वा जाणवले वा पुन्हा उगाळले, तरी पुष्कळ झाले!
(मग त्याकरता अगदीच कधीतरी सटीसमाशी मुहूर्त काढून "महालय" करुनच समस्त पितरान्ची उजळणी करायला हवी, असे नाही ना? ) [च्यामारी, हे वाक्य तरी टाळ्याखाऊ झालय कि नाही? Proud ]

रहाता राहीला प्रश्न, हे इथे असे "सार्वजनिक" नेटवर का मान्डावे?
तर ज्यान्ना हा प्रश्न पडतो, त्यान्नी हे अजिबात मान्डू नये, कधीतरी जाणवलेच, तर मात्र जरुर इथे येऊन लिहा Happy तोवर मात्र, ज्यान्ना लिहीणे शक्य होतय, त्यान्ना लिहू दे!

लिंबुदा, तुमच्या या बीबीमुळे मी मात्र एकदा सगळ्या नातेवाईकाना - रक्ताच्या किंवा परिचयातल्या- मनातल्या मनात भेटुन आले! टायपायचा कंटाळा आल्याने आणि संख्येला तसे फारसे महत्त्व द्यावेसे न वाटल्याने ईथे टाकत नाहीये. पण काही लोकांच्या आठवणीने खरच छान वाटले.
त्यातला एक माझा मामा - आईचा मावस भाऊ. आम्ही नंदुरबारला आजोळी गेलो की तो आमच्यातलाच एक होऊन खेळायचा. तेव्हा तो एम एस ई बी मध्ये नोकरी करायचा. खुप मजा यायची त्याच्याशी पत्ते, कॅरम खेळताना. संध्याकाळी लस्सी, आईसक्रीम, गंगाजमना - आईसक्रीम चा गोळा लस्सीवर टाकलेला असतो यात, असं काहीबाही खाऊ द्यायचा. तो माझा सख्खा मामा नसुनही खुप जवळचा होता. १९९२ साली एका अपघातात तो वारला! Sad मामी आणि एक छोटी मुलगी मागे ठेवुन! मामी सात महिन्यांची गरोदर होती दुसर्‍यांदा. त्याचे जाणे ही कधीही न भरुन येणारी जखम आहे माझ्यासाठी.

असे बरेच प्रसंग /आठवणी जाग्या झाल्या. हाच जर तुमच्या बीबी चा उद्देश असेल तर तो माझ्यापुरता तरी सफल झाला आहे असे म्हणायला हरकत नाही.

Pages