Submitted by कौतुक शिरोडकर on 1 September, 2010 - 03:32
(हे तापात केलेले विडंबन आहे. कुणाच्या भावना दुखावल्यास कृपया कळवावे. शुद्ध असल्यास नक्कीच डिलिट करण्यात येईल. बाकी आमची प्रेरणा तुम्ही शोधालच. नेहमीच का लिंक द्यायची ? कधी कधी गझलाही वाचा राव !!!)
गाजावाजा करून मोठा आला रावण
ऐश अभीचे धरुनी कर अवतरला रावण
संसाराची अक्कल ना त्या 'बीरा'ला घर
'जंगल जंगल चड्डी पहने' ओला रावण
पाण्यामध्ये ती वेडी खेळत बसलेली
'बहने-बहने' आळवता भिरभिरला रावण
राम बिचारा जुन्या पुराणा थापत बसला
सीता भारी हुशार म्हणते, "माझा रावण"
मणि रडताना गालावर रत्ने ओघळली
हरला, खचला, धडपडला, आपटला रावण
गुलमोहर:
शेअर करा
कौतु>>क हे तर खर्रय
कौतु>>क
हे तर खर्रय अगदी.. वास्तव!!
मणि रडताना गालावर रत्ने
मणि रडताना गालावर रत्ने ओघळली
हरला, खचला, धडपडला, आपटला रावण
कौतूका...
विनोद बुद्धीला शोभेल असं विडंबन 
गाजावाजा करून मोठा आला
गाजावाजा करून मोठा आला रावण
ऐश अभीचे धरुनी कर अवतरला रावण
कुठल्या रावणाने ह्यांचा हात पकडला आहे :हाह:
छान. असेच हसवत राहा.
लौकर बरा हो रे..... आणी
लौकर बरा हो रे..... आणी अजून एक अशीच गझल येउ दे.....
मस्त विडंबन...
(No subject)
मला कशाचे विडंबन केले नाही
मला कशाचे विडंबन केले नाही कळले... पण तापात पण हे लिहीलेले रावण लै भारी..
मी चित्रपट पाहिला नाही पण
मी चित्रपट पाहिला नाही पण विडंबनातून पाहू नका हा संदेश मिळालाच.
खूप छान विडंबन!!!
आता गझल शोधतो.
कौतुक....... "मणिरावण योगात"
कौतुक....... "मणिरावण योगात" लिहिलेली कविता........
धन्स मित्रानो. आताच ताप
धन्स मित्रानो. आताच ताप उतरलाय. मुंबईच्या साथीने 'साथी हात बढाना' म्हटल म्हणून मग मीही 'हम साथ साथ है' ची कॅसेट आळवली. त्यात 'जनम जनम का साथ है निभानेको' असं म्हणत धर्मपत्नीही सामिल झालीय. आता ती तापात आहे.
बाकी या तापप्रकरणाचा सिनेमाशी काहीच संबंध नाही. कारण तो पाहीलाच नाही. हबांची गझल वाचली आणि नेहमीप्रमाणे विडंबनाचा कंड सुटला. पुन्हा भेटूच नव्या विडंबनासह. सर्व गझलकारांस माझ्या निरोगी शुभेच्छा !!!!
हबा... गझल काय शोधतोस.... हा
हबा... गझल काय शोधतोस.... हा तर आहे तुझाच श्रावण..
(No subject)
विडंबन होणे हा आपल्या गझलेचा
विडंबन होणे हा आपल्या गझलेचा सन्मान असतो. असे ऐकले आहे. तेच खरे समजून मी आनंदी होत आहे... धन्यवाद कौतूक!!!
>>मणि रडताना गालावर रत्ने
>>मणि रडताना गालावर रत्ने ओघळली
हरला, खचला, धडपडला, आपटला रावण
छान विडंबन, वेळ जात नव्हता
छान विडंबन,
वेळ जात नव्हता म्हणून कलर्स वर रावण पाहिला होता.. चॅनल वर इतक्या लवकर आला म्हणल्यावरंच त्या सिनेमाची लायकी समजली होती... वाट्टेल ते लॉजिक... फक्त सिनेमॅटोग्राफी बरी वाटली....
तुम्ही केलेलं विडंबन यथार्थ आहे अगदी... अजूनही बरंच काही अॅड करता येईल..
ताप उतरला पुर्ण की केलंत तरी चालेल.
कौतुक
कौतुक
>>>>मणि रडताना गालावर रत्ने
>>>>मणि रडताना गालावर रत्ने ओघळली
हरला, खचला, धडपडला, आपटला रावण
फारच छान!!!!
विडंबन ' जाणून ' घेण्यासाठी