माझ्या देशात राहणाऱ्या बाबास
किती वर्षे झाली
मी इथे परदेशात येऊन बसलो आहे बाबा
देश सोडून येण इतकं सोपं असतं का बाबा ?--
आपल्या मातीचा वास
आपल्या घराचा सहवास
गणपतीची आरास
हनुमानजयंतीला भल्या पाहटे उठून केलेली आरती
नि ते गुळखोबरे ….. !
मनात सेव्ह केलेले कसे डिलीट करता येईल आता ..??
आता माझा देश मी माझ्यातच शोधू लागलो
माझा चेहरा तुमच्यात बघू लागलो आहे
माझं मन क्लिक केलं कि प्रथम
तुमचाच चेहरा समोर येतो नं बाबा..!!
नि आईचा श्वास तर अख्खा स्क्रीन खाऊन टाकतो
मी तुम्हाला, आपल्या घराला
विसरेल असं वाटतं का तुम्हाला...?
मी अगदी लहान होतो
नि तुम्ही तर टारझन होता
माझं बोट धरून तुम्ही मला कोठे फिरवले
याची चव आहेना माझ्या आठवणीला
माझ्या आठवणीत तर तुम्ही असता
नि आईचा तर प्रश्नच नाही
तिची साडी तर असते माझ्या अंगावर
रोज रात्री झोपताना
ह्या बर्फाळ हवेत मला, शप्पत उब देते..!!
तुमचा दरारा माझी लक्ष्मन रेषा वाटते
एकटेपणाची भावना देश सोडल्याशिवाय
नाही कळत बाबा ......
एकटेपणाची भावना घालवण्यासाठी तुमच्या वयाची
माणसे दिसली कि त्यांच्या डोळ्यात
शोधत बसतो माझे आई बाबा ….!
डोळे मिटले कि आपलं गाव दिसतं
घर दिसतं
गुलमोहराचं झाड दिसतं
त्याची लाल फुले दिसतात
त्यावर बसलेला कावळा
कोंबड्याची बांग
खरच सांगतो बाबा :
तिन्ही सांजेला आईनं देवाजवळ लावलेला
दिवा नि म्हटलेली रामरक्षा
माझ्या मनात काहूर उठवतात …ssss
आता या परदेशात : माझ्या घरात
देवाचा देव्हारा मांडून ठेवलाय बाबा
शेंदूर लावलेला मारुती माझा प्राण झाला आता
माझी पहाट रामदासाच्या दासबोधाने सुरु होते बाबा...
नि थिरकत्या उदबत्तीची रेघ नेते
सातासमुद्रापलीकडच्या आपल्या देशात
नि चर्चच्या घंटेचा नाद
मला घेऊन जातो थेट आपल्या देवघरात...
दिवस येथे येऊन तर मी दिवस मोजतो आहे नं बाबा …..?
एक गम्मत सांगतो :
दिवस मोजायला लागलो कि तो लांब-लांब पळतो
किती वर्ष झाले मी तुमच्या जवळ होतो नं??....
नं कधी तुम्ही मोजले
न कधी मी
मग कधी काळ कसा हरवून गेला
कधी कळले तरी का ?
नि बाबा तुम्ही आता दिवस मोजायला लागलात ..??
डोळे मिटले कि आपलं गाव
डोळे मिटले कि आपलं गाव दिसतं.. घर दिसतं .. गुलमोहराचं झाड दिसतं..
माझ्या मनातले.. तुझ्या काव्यामधून ...
भावना पोचल्या मित्रा , आवडली
भावना पोचल्या मित्रा , आवडली
हम्म.... सही..
हम्म.... सही..:)
पक्का भटक्या , विशाल कुलकर्णी
पक्का भटक्या ,
विशाल कुलकर्णी ,
अमित
प्रतिक्रिया मिळाल्या .मनपूर्वक आभार
प्रकाश 111
भावना वास्तव
भावना वास्तव आहेत्,विस्तवासारख्या!!!!
भावना थेट मनाला भिडणारी, डोळे
भावना थेट मनाला भिडणारी, डोळे पाणावले.
छान . भावनाप्रधान कविता..
छान . भावनाप्रधान कविता..
सुंदर लिहीले आहे!
सुंदर लिहीले आहे!
अप्रतिम !!सुंदर !! डोळे ओले
अप्रतिम !!सुंदर !!
डोळे ओले झाले
फार फार सुंदर लिहिलेय
फार फार सुंदर लिहिलेय प्रकाश!!! खरोखर डोळे ओले झाले...
एकदम मस्त. खूप वेळेला
एकदम मस्त. खूप वेळेला अनुभवलय. खर असेल तर शब्दांकन फॅनटॅस्टिक.
मला कविता आवडली.
मला कविता आवडली.
भाव पोहोचला
भाव पोहोचला
प्रत्येक परदेश वासी मुलांची
प्रत्येक परदेश वासी मुलांची भावना...छान उतरलीए!
दूर देशी गेलेल्या
दूर देशी गेलेल्या लेकरानो-मायदेशात रहाणार्या माझ्यासारख्या बाबाची सुद्धा हीच खंत आहे रे बाळानो!!
भिडली! सुरेख!
भिडली! सुरेख!
सुन्दर कविता माला खुप आवड्ली,
सुन्दर कविता माला खुप आवड्ली, मनाला भिड्ली.
मित्रा, कवित फार अप्रतिम आहे
मित्रा, कवित फार अप्रतिम आहे कलजाला भिडलि, मला माज्या आइ वड्लाचि आनि घरचि आत्वन करुन दिलिस.....
मुक्तछंदातले स्वगत म्हणुन
मुक्तछंदातले स्वगत म्हणुन ठिक. पण अतिशय दांभिक वाटत आले आहेत हे विचार मला तरी.. असो..