मायबोली-१

Submitted by आशिष पवार on 22 August, 2010 - 01:22

क्षणात इथे
क्षणात तिथे
मन हे, वेडेपिसे

कधी तळयात
कधी मळयात
पावसाच्या पाण्यात

खडकांची वाट
वाटेत लाट
शब्दांच्या प्रवाहाची

विचारांची झेप
पंचमहाभुतांचा मेळ
कवितेच्या स्वरुपात

कुणाची पसंत
कुणाचा बहिष्कार
साहित्याच्या अंगणात

गुलमोहर: 

माबोवरचा आरडा ओरडा चालायचाच. लक्ष देऊ नकोस. लिहत रहा.>>>>

मित्रा, जरुर लिहीत राहा. पण आरडाओरड्याकडे दुर्लक्ष कर असे मी नाही म्हणणार, जर दुर्लक्ष केले असतेस तर आज हे लिहू शकला असतास का? पुलेशु Happy

आशिष मित्रा,

मोजक्या शब्दात खुप छान काव्य लिहीलं आहेस. पण विशालला अनुमोदन.

मी जेव्हा मायबोलीवर नविन होतो तेव्हा मला ही प्रतिसाद होते. `अगदी ह्याला कुणीतरी आवरा अशा शब्दात'. पण स्पोर्टिंगली घे, त्याचा नक्की फायदा होतो. वा, मस्त ह्या १०० गोड प्रतिसादापेक्षा एखादा सुचना देणारा १ तिखट प्रतिसाद खुप मोठा असं मला वाटतं. आज ही माझ्या लेखनात चुका असतात. पण चुका आणि शिका हा मंत्र आपल्यालाच एका नव्या लिखाणास स्फुर्ती देऊन जातो. असो.

पु.ले.शु.

सस्नेह !!
देवनिनाद

कवीता ठीक आहे. आता तुला कुणी थांब म्हणनार नाही तरीही थांबून थांबूनच लिहीशील अशी अपेक्षा. याहून चांगल्या रचना कर ह्या शुभेच्छा!!!

सर्व प्रथितयश प्रतिसादकर्ते,

एरवी रकानेच्या रकाने भरुन लिहिता , कौतुकाच्या वेळी का हो हात आखडता ? खरच साधी सोपी पण छान अर्थवाही कलाकृती वाटली मला. अर्थात माझ्या सामान्य आकलनशक्तीचा भाग त्यात जास्त असु शकतो.. असो..

एरवी रकानेच्या रकाने भरुन लिहिता , कौतुकाच्या वेळी का हो हात आखडता ? >>> अनुमोदन. पण परेशभाऊ तुमचे हात काय भाड्याने दिलेत का? त्यानी आखडते घेतले तर घेऊ दे तुम्ही लिहा ना कौतुकाचा सात पानी निबंध.

मालक, मी एरवीही प्रतिसादांत फार लिहित नाही आणी आत्ताही लिहिल नाहिये. त्यात वेगळ काहिच नाहिये. असो. आणी खरच जिथे हातांची गरज पडते तिथे नक्की देतो .. तेसुद्धा निरपेक्षपणे म्हन्जे कुठलही भाडं न घेता... बाकी चालुद्या तुमचं....

खडकांची वाट
वाटेत लाट
शब्दांच्या प्रवाहाची

विचारांची झेप
पंचमहाभुतांचा मेळ
कवितेच्या स्वरुपात

- उत्तम आशयाच्या ओळी!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

खरच जिथे हातांची गरज पडते तिथे नक्की देतो >>>>

पर्‍या, हे मात्र आवडले रे..., सहकार्याची गरज लागली तर (अर्थात तू समर्थ आहेस म्हणा Wink ) आम्ही आहोतच...

एक हात तुझा
एक हात माझा
दोघांनी मिळून
हातभरून द्यायचा ! Wink

विशाल चारोळी मस्तच रे!!!

एक हात तुझा
एक हात माझा
दोघांनी मिळून
हातभरून द्यायचा !

शेवटची ओळ गडबडीत हात भरून घ्यायचा अशी वाचली.... म्हटल ते कवीतेतले दोघे आता रागारागात हातभर बांगड्या भरून घेणार की काय???? Rofl

असो. गमतीचा भाग सोड रे मित्रा. सहकार्याची गरज लागली तर मीही आहेच भावा. Wink

म्हटल ते कवीतेतले दोघे आता रागारागात हातभर बांगड्या भरून घेणार की काय????>>>>
त्यासाठी त्या लायकीचाच कासार लागेल मित्रा, येरा-गबाळ्याचे काम नोहे ते Wink

च्यायला म्हणजे खरोखरच बांगड्या भरायचा विचार आहे तर... असो तुम्हाला तो लायकीचा कासार लवकरात लवकर मिळो... माझा तो धंदा नाही नाहीतर मित्र म्हणून नक्की मदत केली असती. रच्याकने विशू तू सारखा तो डोळा मारणारा बाहुला का टाकतोयस.... त्यात हे बांगड्यांचं.... छाया-माया खुटेगावकरणीचा लावणीचा कार्यक्रम बघितलास की काय?

च्यायला म्हणजे खरोखरच बांगड्या भरायचा विचार आहे तर.>>>

तीच वेळ आलीय मित्रा आता. कुणीही उठतं आणि कविता करतं, कुणीही उठतं आणि कविता कशी असावी हे शिकवतं.... च्यामारी आम्हाला यातलं काहीच जमु नये? बांगड्या भरा लेको बांगड्या Proud

डोळे मिचकावून मिचकावून दमलो बाबा ह बा....! त्यासाठी छाया-माया खुटेगावकरणीचा लावणीचा कार्यक्रम बघायची गरज काय? माबोचा फड कमी आहे काय? फक्त सोंगाड्या कोण ते मात्र ठरवावे लागेल.... सगळे सारखेच दिसताहेत मला तर. 102.gif