हुब्या जागी पळपळ आन गंगीची चंगळ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

नमस्कार मंडली...वळख हाये का नाय ? आवो बगता काय...अवो म्या तरुप्ती...हितं काय समद्या बायाच जमल्या वाट्ट...असुदेत की..मला काय त्याचं...आयाय गं...अश्शी कळ येऊन र्‍हाईली का काय ईचारु नगा...आत्ता ईचारु नका म्हटलं तर काय झालं कोन म्हनतयं ? सांगु म्हन्ता...मंग ऐकाsss...

आमचं ह्ये बी महिती हाये की तुमा समद्यास्नी. तर त्येच्या सायबाकडं पारटी व्ह्तं. आमी दोगं बारक्याला घेउन गेल्तो. तिथं अजुक एक्-दोघाचं मंडली आन हापिसातल्या बाया बी जमलेल्या. समद्या निस्त्या मरतुकड्या. काय जीव हाये कुडीत का न्हायी. आन समद्या लान्ह्या पोरासुदिक इवलं इवलं आंगडं आन टोपडं घालुनशान आलत्या. काय ते हाट हाट म्हनं. म्या मातुर झ्याक पैटनी घालुन गेल्ते. तिथल्लीच येक बया मला ईचारतीया की म्या आमच्या ह्येंची आय हाय का. असा राग आल्ता. न्हायी म्हनायला बारक्या झाल्यापास्नं म्या यकदम गोलमटोल झालीये पन म्हुन काय ह्येंची आय म्हनावं ? काय जिभला हाड ? पन काय कर्नार, हापिसातल्या लोकास्नी काय म्हनायचं न्हाय म्हनं.

घरला आल्यावर ह्येस्नी म्या सम्दा किस्सा सांगित्ला. तर त्ये बी प्वाट धरु धरु हसाया लागलं. आत्ता ? म्हंजी म्या खरच की काय ह्येंची आय दिसते ? तवापास्न निस्त मन खात व्हतं. आमचं ह्ये मला म्हन्लं रोजच्याला वायम केला पायजे. आन त्ये करायचं तर ज्येममधी गेलं पायजे. मंग येक दिस आमी गानं ऐकायचं मिशीन, ढवळी बुटं अस काय बाय घेउन आलो. मंग त्ये मला ज्येममदी घेऊन गेलं.

इथल्ली बया बी तसलीच मरतुकडी आन लांडे कपडे घातलेली. गेल्या गेल्या ती म्हन्ली "हान!!". म्या मस्तपयकी काकणं सारली आन म्हटलं, "कुनाला हानु ?" पन आमचं ह्ये मधी पल्डं आन त्या बयेशी विंग्रजीत काय्-बाय बोल्लं. मंग बाकी गडीमानसांमधी जाउन हुब्या जागी पळाया लागलं.

हिकडं पयलं त्या बयेनं माझं माप घेत्लं आन म्हनाली, "आव !!". म्या म्हटलं, "हाये की हितंच हुबी, आजुन कुटं आव". म्या काय बी बोल्ले की बया निस्ती खिदळायची. मंग तिनं मला हुब्या जागी पळाया लावलं. तिथं येक मिन्टात वाट लाग्ली बगा. न्हायी, साळंत असताना गुर्जी मागं आन म्या फुडं असं लयी पळापळी केलं की पन हे असं हुब्या जागी काय जमना. पळता पळता लुगडं आटकलं ना. म्या आशी दाणकनी थोबाडावर आपटले की काय ईचारु नगा. वर पुना ती बया, "आव !!! दोन वारी..". म्या म्हटलं, "दोन वारी न्हवं, नऊ वारी हाये." तिच्या काय बी डोस्क्यात घुसलं न्हायी. मला म्हने शाईकल चालीव. त्ये बी हुब्या जागी. ह्ये जरा बरं हाये. तिथं म्या झ्याक पायडल मारत व्हते तर तिथं बी पदराचं टोक आटकलं. येवडी सोभा होईस्तवर आमचं ह्ये आलं आन बयेला टोमारो म्हनुन आमी तिथनं निघलो.

ह्ये मला घरला सोडुन हापिसात गेलं. येताना बयेनं यक कागुद दिल्ता. त्यात काय खायचं न्हाय लिवलं व्हतं. आन यक डब्बा बी दिल्ता. जेवाण म्हनं. घरला येउन बगते तर त्यात निस्तं घासफुस. यकदम करंट पेटला. माजी बाय ती, लई मायाळु हो. गंगीसाठी चारा दिल्ता की वो तिनं. गंगी कोन म्हन्ता ? आवो मागल्या महिन्यात शेरडु घेतलं. आता बरक्यास दुध्-दुभतं नको ? गंगी बी आशी खुस जाली बगा त्यो घासफुस खाऊन.

दुसर्‍या दिसाला कोनाला ठो मारायचं म्हुन मी जरा खुसीतच गेल्ते. पन कशाच खुशी आन काय. बयेनं माजा असा छळ मांडला की काय ईचारु नगा...आयाई गं...आदी हुब्या जागी पळ्-पळ केलं. मंग शाईकिल चालीवलं. मंग अजुन काय बाय मिशीनं दावली. त्ये निस्त बगुनच धाप लागल्यागत झाल्तं मला. पन बयेनं त्या समद्या मिशीनीवर्ती मला वर्ती-खाल्ती, हुबं-आडावं केलं. बाई हाये का कसाई. असा लयी येळा झाल्यावर पार माजा जीव जायला लागला तवा कुटं बया म्हटली, "फिनिस". म्या बी बिगी बिगी "ठोमारो" म्हटलं नी आले घरला. गंगीला त्ये काचंच्या डब्ब्यातलं चारा दिला नी म्या चांगलं वाटीभर तेल मारुन ठेसा, कालवन आन भाकर हानली तवा कुटं जीवात जीव आला. सारं अन्ग निस्त ठनकत व्हतं. दुपारच्याला बारक्यासोबत मस्त तानुन दिली. उटल्यावर मस्तपयकी चा आन दहा पाच भिस्कुट खाल्लं. आत्ता कशी जरा मानसांत आल्यावानी वाटलं.

सांजच्याला आमचं ह्ये घरी आलं. तवा म्या त्येस्नी समदं सांगितलं. मला वाट्लं ह्ये जरा अंग रगडुन देतील पन न्हायी. त्ये निस्तचं वरडत सुटलं. म्हनं गंगीसाटी दिलेलं जेवाण म्याच खायचं. म्या घास खायचं ? निसत्या ईचारानच प्वाट ढवळलं. अवो म्या भल्या घरची ल्येक हाये. पाच्-पन्नास येकर जिमीन हाये माज्या बा ची. बगितल्या बरुबर दिस्ते का न्हाय बागायतदाराची ल्येक. आन म्या घास खायचं ? माझं बी टकुरडं फिर्ल. म्या त्येस्नी सपस्ट सांगित्लं, "म्या त्ये घास खाणार न्हायी आन ज्येमला बी जानार न्हायी. मंग मला कुनी तुमची माय म्हनुदेत न्हायतर बा म्हनुदेत न्हायी तर गनपती बाप्पा म्हनुदेत" !!!!

विषय: 
प्रकार: 

व्वा! ह्यी भासा ब्येस जमती तुमास्नी .. काय पन लिवंता .. लई मजा येतीया वाचायला .. Happy

Lol Lol

लयीच बाई तू झ्याक लिवतीस!! प्वॉट लागलं की माझं दुखाया, इक्ती हसले न् काय!!

अवो शिन्ड्रेलाबाई.. हा लेख हाफिसात वाचू नये अशी सुचना द्यायला पायजेल व्हती.. लय झ्याक लिवलय. दोन वारी Happy

हायला, ही तर गणेशोत्सवातली गोष्ट आहे. तुम्ही वाचली नव्हती का ? असो, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद Happy

Lol
येकदम झ्याक लिवलया .. !

परागकण

आइगा... अग काय लिहितेस तु!!! हसुन डोळ्यात पाणीच आलय माझ्या.. too muchhhhhh

-
क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे

बगितल्या बरुबर दिस्ते का न्हाय बागायतदाराची ल्येक <<<< Lol

विनय

बगितल्या बरुबर दिस्ते का न्हाय बागायतदाराची ल्येक >> आता ए.वे.ए.ठी. आलात की कळेल आम्हास्नी. Happy
लई झ्याक. Happy
- अनिलभाई

लई ब्येस.........

मंग मला कुनी तुमची माय म्हनुदेत न्हायतर बा म्हनुदेत न्हायी तर गनपती बाप्पा म्हनुदेत" !!!!

Happy

............ अशी कल्पना करा की रंजना ( मराठी चित्रपटांमधली ) हे सर्व सांगते आहे.

Lol हे तुला मस्त जमतं. गणेशोत्सवात वाचले होते पण तेव्हा दाद द्यायची राहूनच गेली.

    ***
    Cole's Law : Thinly sliced cabbage salad rules.

    सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद Happy

    आता ए.वे.ए.ठी. आलात की कळेल आम्हास्नी >>>> होउनच जाऊ देत आता ए.वे.ए.ठी. Wink

    Happy
    सिंड्रेला, मस्त लिहील आहेस गं..

    छान ग! आवडली तुझी स्टाईल. Happy

    कथेच नावही मस्त दिलयसं.
    भाषाही छान जमली आहे. Happy

    सिंड्रेला, तुझ्या लिखाणाचे आम्ही पण पंखा झालोय आता Happy खुपच छान लिहिलस, अन गावरान ठसका तर एकदम जबरदस्त.

    खत्तरनाक -- मस्तच लिवलंय ग बाय .. आतापत्तुर हे वाचूनशान राह्यलोच नव्हतो !
    आवल्डं .. येक लंबर ब्येस येकदम !!

    आर्च, मीनाताई, च्यायला, संदीप धन्यवाद.

    चित्रे सायब हितं आलं पायजे तवा गावल सम्दं येळच्या येळी. तुमी काय त्ये मंडलामधी घोळ घालुन राह्यलं म्हनं Wink

    >> "आव !!! दोन वारी ..". म्या म्हटलं, "दोन वारी न्हवं, नऊ वारी हाये"
    >> "गंगीसाठी चारा दिला की वो तिनं "
    हे हे हे हे ... जबरीच. भाषा येक्दम फक्कड जमलीये. खूप आवडलं !!
    === I m not miles away ... but just a mail away ===

    मनाला एकदम हळूवार अलगद फुंकर घालून गेला .
    छान च

    मिहिर, धन्यवाद.

    apashchim, तुम्हाला हा प्रतिसाद नक्की माझ्याच गोष्टीला द्यायचा होता का ?

    >>तुम्हाला हा प्रतिसाद नक्की माझ्याच गोष्टीला द्यायचा होता का ?

    शिंडीबाय Proud मलाही तस्सच वाटून राह्यलं बघ!!

    Lol एकदम बेस...लई मजा आली बगा वाचुन..:)

    जबरी Lol

    इथं हापिसात सम्दी माज्याकडं बगत्यात, ह्येला कोण चावलं म्हणुन Happy

    माजी गंगी न्हायी डसायची...लयी गुनाची प्वार हायती Wink

    मी कालच पार्ल्यावर लिहिणार होतो की सिन्ड्रेलाची गंगी कुणाच्यातरी मनावर अलगद हळुवार फुंकर घालुन गेली म्हणुन Happy

    --------------
    The old man was dreaming of lions

    Pages