कायच्या काय विडंबने

Submitted by केदार१२३ on 24 April, 2009 - 04:20

(सध्या गुलमोहोरवर चालणार्‍या कायच्या काय कविता किंवा कायच्या कायतरीच कविता वाचून 'कायच्या काय विडंबने' सुरू करावे अशी उर्मी मनात दाटून आली. त्यासाठीच हा प्रपंच)

१) कोंबू बाजारला जाते

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : गदीमांची क्षमा मागून 'रंगू बाजारला जाते' च स्वैर विडंबन

कोंबडी भुंकाया लागली भूंकू द्या
अंडी इकाया नेते इकू द्या

कोंबू डुलत डुलत चालते
गोऱ्या हातात लेखनी हालते
लेखन चोरावी एकदा वाटते, वाटते, वाटते, नको बा

जरा थांबून बोल ग कोंबू
(माझ्या डोस्क्यातल) तुझ्या डोक्यात कसं ग कोंबू ?
माजी कलेजी तुटते, तुटली तर , इकूया

कोंबू ओळख आहे मी कोण ?
माझ्या हातातला लेखण !
मी मनातल मनात ठेवते, ठेवते, ठेवते, ठेवु द्या

तुझा पाठलाग कोंबू करीन
अशी मुरडून कान मी धरीन
तुझं खानपट थोडं फोडते, फोडते, फोडु द्या

केली थट्टा अंगाशी आली
लाज कोंबूची माझ्या गेली
कोंबू थाटात कवन पाडते, चालते ? चालते तर , चालू द्या

२) बाई मी पळाली

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : प्रोफेसर आणि तमाम मायबोलीकर

(शहरातल्या स्त्रीची व्यथा मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न )

बाई मी गेली मॉलला
कार्ड घेऊन खरेदीला
मॉलच्या बाजुला ऑफर दिसली
भुंगा डसल्यासारखी पळत सुटली….

बाई मी गेली ड्रायव्हींग्गला
घेऊन पीयुसी हातात
कमीन्या गाडीची काचच फुटली
सोडली गाडी नी पळत सुटली….

बाई मी गेली डीस्कोला
पास नाय मिळाला पबचा
रस्त्यात श्रीरामसेनेची गर्दी दिसली
डीस्कोला न जाता पळत सुटली…..

बाई मी गेली मल्टीप्लेक्स्ला
तिकिट काढून थिएटरला
रामूच्या सिनेमानी नजर विटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..

बाई मी गेली पार्टीला
सोबत घेऊन नवर्‍याला
वाटेत त्याला खबर भेटली
इन्कम टॅक्स ची रेड पडली……
डोकं धरलं नी पळत सुटली……

३) नवाबाच लग्न

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : प्रोफेसर आणि तमाम मायबोलीकर

अडतीस वर्षाचा नवाब जुना
अहो पोरगी बघा ना
ह्याचं लगिन करीना
किती टशन हो ह्याच्या मना
कुठे जीव देइना
ह्याचं लगिन करीना

आमावश्येच्या चांदण्यात
हा झाडाखाली उभा ना
म्हणे 'अमृताहूनी गोड
नाव तुझे बेबो
अशा शहाण्या सैफाला
अहो पोरगी बघा ना

एवढ मोठं कुरण पाहुनी
चिंता होई त्याच्या मना
किती उंडरायच आहे अजूनी
म्हणून चरत राहेना
अशा उचापती नवाबाच
तोंड काळे करा ना

चमत्कार दोन्ही पायांनी
कसा करतो बघा ना
उभे राहेना जवळ कुणी
झाडे दुगाण्या बघा ना
अशा स्टाइलीश नवाबाला
अहो नवरी बघा ना

किती सहले हो ह्याला अमॄता
कोणीतरी समजावा हो आता
बिचाऱ्या गाढवाची वेदना
द्या हो प्रेमाची लाथ कुणी
त्याला आराम करु द्याना
ह्याचं लगिन करीना

अश्या ह्या गाढवाची
रींग टोन सेट करून द्या ना

समाप्त
आता कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर :
(हे वाचायला लागणार्‍या तमाम मायबोलीकरांची) Proud

गुलमोहर: 

केदारभाऊ, तुम्ही मनोगतावर 'केशवसुमार' नावाने वावरता का हो? तो ही बाप्या अशीच धमाल विडंबने टाकत असतो.

अवांतर: अनिल अवचट यांनी एक गंमतीशीर किस्सा सांगितला आहे. त्यांचे मित्र म्हणत की "हा शंतनु (चिंधडे) रात्री लोकमान्यनगरच्या मैदानावर निजतो आणि सकाळी जाउन आम्ही त्याला झालेल्या कविता गोळा करून आणतो.' तुमचे तसे काही नाही ना.

विडंबनसम्राटाना मुजरा

- (बिनशेंडीचा) शास्त्री.

तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद राघव, अकश्री Happy

राघव : तो मी नव्हेच Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

Rofl सगळेच विडंबन लै भारी केदार१२३! जियो!

========================
कुछ पढके सो ...कुछ लिखके सो
आज जागा जहां, उससे कुछ बढके सो

Rofl सगळेच विडंबन लै भारी केदार१२३! जियो!

========================
कुछ पढके सो ...कुछ लिखके सो
आज जागा जहां, उससे कुछ बढके सो

८) काही स्फुट विडंबने

आम्ही टीकांना भीत नाही धमक्यांना घाबरत नाही
करतो कवने आम्ही होई समीकक्षकांचा हिरमोड होई

राज्याभिषेक झाला सिंहासनावर बसलो आम्ही
पर त्यातही दुर्दैव हे आमुचे सिंहासन कमोड निघाला

ते पोर गुळांबी , जणू रानतल अळंबी
मन मह्ये बोन्साय हे खुळांबी झाले

छळ छळ छळीता काव्य धारा गळीता
जणू तमाखू मळीता होय भुई थोडी पळीता

थांब ना वासू जरा थांब ना वासू
अरे अश्या कविता पाडणे गून्हा आहे
आज जरी तुला टाळल तरी
भोग हा माझ्या नशीबी पून्हा आहे.

(आता कुणाची क्षमा मागायची उरलीये ? : समस्त विडंबनकारांची) Proud

-----------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केदारा, अफाट रे अफाट. मला असं झालंय -
मन वाह्यात वाह्यात
जशी केदाराची माशी
आत्ता होती कचर्‍यावरी
उडून तोंडावरी बशी

तुम्ही करा विडंबने करा ! एक जूननंतर आवाज बंद होणार आहे Proud
पण हसून हसून पोट दुखले मात्र Happy

धन्यवाद अनघा, चिमण, चेतन Happy

चेतन Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

भेंडी.. जबरी चाललय रे बाबा...:)
वे...ड

धन्यवाद देवदत्त Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

९) ''आय लव चप्पाती''

पोळ्यांचा नकाशा तिला
कळला नाही
पोळपाटाची अदा
मला वळली नाही
वाटत होत मला
(स्वयंपाक)घरात बोलायचं काम नसतं
पण नंतर कळलं
कितीही बोल्ल तरी
कणीकान फक्त तींबूनच घ्यायच आसत
आता असं वाटतंय
तिला भेटावं .सर्व काही सांगाव
(मी पीठ/पाणी घालाव)
तीने कणीक फक्त तेवढ मळाव
नाही मिळाली हेल्प तरी
बोलण्याच समाधान मिळणार आहे
''आज मी फक्त चपात्याच करणार आहे ''
असं (एकदा स्वप्नात तरी)मी तिला ठणकावणार आहे .

कुणाची क्षमा : झालेल्या आणि होऊ घातलेल्या नवरोबांची

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

अमोल Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

<<''आज मी फक्त चपात्याच करणार आहे ''>>
केदार, एव्हड्यापासुनच मनाची तयारी केलीस तर.. सुखी होईल ती Happy

केदार, एव्हड्यापासुनच मनाची तयारी केलीस तर.. सुखी होईल ती Proud

भावना , इन्द्रा Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केदार बुलेटप्रुफ जाकेट आहे ना रे तुझ्याकडे..
मस्त पेटला आहेस आणि पेटवतो आहेस Wink
____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

अरे च्यायला हा माणूस आहे की कवी?
लईच पेटले केदारभौ. Happy

धन्स विशाल आणि राघव Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

१०) पावटा पावटा पावटा

*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*

ती मला बोलली शेवटी
चावटा चावटा चावटा!

हात उरी तिने ठेवला
थांबना थांबना थांबना

मी मला त्रासलो फार हो
पावटा पावटा पावटा

थांबता (जरा मी) हॉल वाटे तिला (हा)
गारसा गारसा गारसा

मी च माझा सदा काढतो
'बार'हा 'बार'हा 'बार'हा
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
(चु भू द्या घ्या )

(कुणाची क्षमा : सर्व वातानूकुलीत सदस्यांची ) Proud

११) तीन फालतू इडंबने

१) कोण नेसतो कोणाचे,
सनी नेसतो कोझीचे ,
ब्रूनी सोडते त्या सार'कोझीचे ,

फ्रंटलाईन असतात सगळ्यात पुढे
अमुल मॅचो सरसर झाडावर चढे
गंजी ज्याम असते, (तरीही सुरू) दरवळ देणे सा-यांचे.........

२) रोग असतात आजाराचे,
भोग असतात आजार्‍याचे,
डेंगू नसतात त्या लसींचे ,
अश्रू असतात मगरींचे ,
आपलेच बील आपुणच भरायचे
हास्पीटलाचे खाते परत एकदा उघडायचे
त्यात मग झोकावून जायचे
सुया सुर्‍यांचे वण आठवायचे

त्यात मग वेडपट (काहीतरी कवन) स्फुरायचे
नवे म्हणून जुनेच काहीतरी लिहायचे
आणि हसत हसत उत्तेजून काहीतरी पाडायचे (कावन म्हणतो मी) ....

३) राष्ट्रकुल नसते कोणाचे
'कलम' असे ते 'आडीचे'
नवे म्हणून जुनेच ट्रेडमील आणायचे
खेळाच्या 'पॉवरा'त भुमीपूत्रांना गाडायचे
तरीही अपुरे आहोत दोघे हि
खाऊया किती (पैसे) तुझ्या माझ्या हक्काचे ....

(पुर्ण कवितेच्या जागी "...." घातल की आपल काव्य आणि वाचणार्‍याच मुखकमल छान रंगत) Happy

(कुणाची क्षमा : क्षमा कुणाची काय विचारता? ती तर पत्नी विलासराजांची ) Proud

आज-काल मला तुझी
'करुणा' वाटायला लागली आहे...
टूजीचा अमंगळ गजर
आता पाठलाग करायला लागला आहे...

उगाच वोट्स मागायला,
कितींदा रे येतोस?
डीबीच्या रीआलिटी शो मध्ये
बलवा मात्र 'शहीद' होऊन जातो

बोलयचं असतं मला, बरच काही
नजर सांगून जाते,
मिडीयासमोर येताच, का मग
माझी कणी मोळी होऊन जाते?

'दया' उरली नाही
उरली 'करुणा'ही नाही
एअर सेलच्या हवाबंद डब्यात
पुरेसा 'निधी' जमला नाही

बंधू- भगीनी नकोत मला,
भ्रष्टाचारात रमतो मी...
म्हणूनच देशप्रेमाच्या भावना
स्वस्तातच विकल्यात मी!

घोटाळ्यात गुंतून जाण्याचा
माझा स्वभाव नाही..
अडकलोच जरी मी
सुटण्यास प्रतीबंध नाही

(कुणाची क्षमा : तमाम भारतीयांची) Sad

Pages