मायबोलीकरांकडून गणेशोत्सवासाठी सूचना

Submitted by संयोजक on 9 August, 2010 - 00:46

मायबोलीकरांनो,

२०१० सालच्या गणेशोत्सवाला आता फक्त एक महिना राहिला आहे. संयोजक मंडळाची तयारी सुरु झाली आहे, तरीही तुमच्याकडूनही सूचनांचे स्वागत आहे. तेव्हा यंदा कुठल्या प्रकारच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम करावेत या संबंधीच्या सूचना इथे लिहा.

तसेच कोणाकडेही तुमच्याकडे झालेल्या गणपतीच्या आरत्या असतील तर त्या ऑडिओ फॉरमॅटमध्ये आमच्याकडे नक्की पोचवा.

विषय: 

मैत्रेयी ला अनुमोदन.

अजुन एक विनंती - गणपती ची आरास (प्रचि किंवा ideas), प्रसाद (रेसिपी सहीत :)), रांगोळी ह्याचा एक वेगळा धागा काढता येईल का? त्यामुळे सर्वांच्या घरी सुध्दा तयारी मस्त होईल.

नमस्कार, माझ्यामते सहजसाध्य गोष्टी असाव्यात. उदाहरणार्थः

१) गणपतीला आपण फुलांच्या माळा अर्पण करतो. तर वेगळ्या फुलांची वेगळ्या ओवणीतली माळ तिचे चित्र अशी स्पर्धा.
२) सार्वजणिक गणपतीच्या दिवसात केले गेलेले सांस्कृतिक कार्यक्रमाचे वर्णन व चित्रे.
३) माझ्या चाळी-कॉलनीतला गणपती.
४) गणपतीतील एक आठवण.
५) प्रसादाच्या वेगळ्या पद्धती.
६) माझ्याकडच्या गौरी.
७) देशाबाहेरचा गणपती.
८) माझे मंडळ्..आमचा गणपती.

हे खरचं नको:
१) STY फार बोर प्रकार आहे.

इको फ्रेंडली गणेशमुर्तीची थोडीफार माहिती देऊ शकेन. व्हाईटवॉशच्या आधीच्या स्टेपपर्यंतच्या कामात मदत केली आहे.

बी च्या सूचना चान्गल्या आहेत Happy
>>>>> निर्माल्याचे रिसायकलिंग ह्या विषयावरही काही स्पर्धा घेता येतील का?
याबाबत स्पर्धा घेता येईल की नाही शन्का आहे, पण तरीही, आपण निर्माल्याचे काय केलेत/काय करायचे ठरवलेत/काय कराल, या प्रश्नावर उत्तरे मागवुन ती प्रसिद्ध करता येतिल एका दिवशी! Happy
माझ्या दृष्टीने, निर्माल्य नदीत, वहात्या पाण्यात वा तलावात विसर्जन करणे हीच पूर्वापार चालत आलेली परम्परा "रिसायकलिन्गचीच" आहे. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार, पाणवठेच शिल्लक नाहीत ज्यान्ना निर्माल्याचा उपयोग होईल, तेव्हा मी तरी घरच्या पुजेचे निर्माल्य, वास घेऊन मग सरळ झाडान्खाली टाकतो. खड्डा वगैरे केला नाही, पण फ्लॅट मधे रहात असतो तर कुन्डीत टाकून त्यावर चिमुट चिमुट माती टाकत गेलो असतो Happy

>>>> इको फ्रेंडली गणेशमुर्तीची
हा विषय भयानकरित्या जिव्हाळ्याचा बनू शकतो.
माझ्यापुरते मी, पुढील उपाय योजतो
१) मिळेल त्या लाल्/काळ्या/शाडू मातीची मूर्ति स्वतः बनवणे
२) ते न जमल्यास विकतची मूर्ति मातीचीच घेणे
३) ते ही न जमल्यास, जी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ति असेल, तिचे अन्गणातल्या बादली/टबातील स्वच्छ पाण्यात विसर्जन करुन पाच मिनिटानन्तर पुन्हा बाहेर काढून पुसुन माळ्यावर झाकुन ठेवणे, जेव्हा पोरान्ना रन्गविण्याची "हुक्की" येईल तेव्हा रन्गवावयास देणे, जर चान्गली रन्गवली तर पुन्हा तीच मूर्ति बसविणे Happy
४) पैशा अभावी वा अन्य कारणाने मूर्ति आणताच आली नाही तर चान्गली छटाक दोन छटाक वजनाची ठसठशीत सुपारी घेऊन, तिजवरच सर्व संस्कार करणे

परिसंवाद ठेवता का?
मायबोली- रेट्रो असे नाव ठेवा, आणि V & C ठेवा. काय दणक्यात रिस्पॉन्स येईल. पण महत्वाच्या आयडींना आधीच भाग घ्यायला सांगा मात्र. >>

अनुमोदन. आणि काही आयडींना बंदी पण असावी. Proud

ऑन सिरियस नोट एखादा विषय द्यायचा व त्यावर लेख मागवायचे. उदा निंबंध लेखण स्पर्धा. पहिल्या दिवशी विषय आयोजक देतील अन मग पाच / सहा दिवस लेख लिहायला, सर्व लेख इथेच प्रसिद्ध होतील अन त्यावर पब्लिकचं मतदान. म्हणजे पारदर्शकता पण राहील.

Pages