तु

Submitted by VivekTatke on 15 March, 2008 - 11:50

बहरलेला गुलमोहोर मी पाहिलाय
तुझ्या गोड हसण्यातून

बरसलेला आषाढ मी पाहिलाय
तुझ्या अथक बोलण्यातून

बहकलेला मेघ मी पाहिलाय
तुझ्या पाठीवर सोडलेल्या मुक्त केसांतून

गरजणारा सागर मी ऐकलाय
तुझ्या किणकिण करणार्‍या कंकणातून

प्रतिध्वनी प्रेमाचा मी ऐकलाय
तुझ्या नाजुक अनावृत्त मनातून

नाचणारा मोर मी पाहिलाय
तुझ्या सुंदर मोहक पदलालीत्यातून

शामरंगी रंगलेली राधा मी पाहिलीय
तुझ्या शीतल,गंधीत,लाघवी रुपातून

भावविश्वात ईश्वर मी पाहिलाय
तुझ्या मनभावी अस्तित्वातून

गुलमोहर: 

छान. सुंदर आवडली...

तु च तेवढ तू कर. नाहीतर व्याकरणाच्या बाई ओरडतील Happy

अवश्य. धन्यवाद.
दहावीपर्यंत शाळेचे शिक्षक व्याकरणाबद्दल ओरडत असत. मी न चुकता चुकत असे.
नंतर ईंजीनियरींगला आणि नंतर १३ वर्षाच्या नोकरीच्या काळात लिखाण मागे पडले.
नोकरी ती सुद्धा परचेस आणि डेव्हलपमेंट या खडतर डिपार्टमेंटमध्ये केली.तिथे फक्त बोललो..

त्यामुळे व्याकरण आणि मी म्हणजे भोपळा व विळयाचे सख्य. असो

प्रकाशित कवितेत मी बदल करू शकतो का ? आणि असेल तर कसा?

खुप छान आणि खरं म्हणजे खुप निरागसता दिसतेय कवितेत असंच लिहीत रहा.

हो बदल करता येतो
आपल्या अकौंटमधुन 'माझे सदस्यत्व' नंतर कविता उघडुन 'संपादन'
मग हवे ते बदल करुन पुन्हा पोस्ट कर. ठिक आहे ?