Submitted by nikhil_jv on 2 August, 2010 - 06:26
मैत्री म्हणजे प्रेम
मनाच्या चौकटीत जपलेली फ्रेम
मैत्री म्हणजे साथ
नकळत पडताना दिलेला हात
मैत्री म्हणजे साखरझोप
खतपाणी घालुन वाढवलेल रोप
मैत्री म्हणजे दाद
आपल्या हाकेला दिलेली साद
मैत्री म्हणजे विश्वास
मोकळ्या जागी घेतलेला श्वास
मैत्री म्हणजे दिलासा
शुष्क जागी किंचित ओलावा
मैत्री म्हणजे ध्यास
हवाहवासा वाटणारा सहवास
मैत्री म्हणजे चिंतन
असे क्षण ज्यांचे मनात जतन
मैत्री म्हणजे छाया
अतुट नाते अतुट माया
मैत्री म्हणजे गर्व
कधीही न संपणारे पर्व
Happy Friendship Day
(निखिल)
गुलमोहर:
शेअर करा
खुपच सुंदर
खुपच सुंदर
छान कविता मैत्री म्हणजे
छान कविता
मैत्री म्हणजे छाया
अतुट नाते अतुट माया
जितेंद्र, नीना धन्यवाद
जितेंद्र, नीना धन्यवाद
वा !! निखिल
वा !! निखिल
धन्यवाद देवनिनाद
धन्यवाद देवनिनाद
सुंदर.
सुंदर.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
गंगाधरजी, सहेलि धन्यवाद
गंगाधरजी, सहेलि धन्यवाद
खूप छान!!!
खूप छान!!!