Submitted by विशाल कुलकर्णी on 13 October, 2008 - 01:15
आयुष्याच्या वळणावरचा..
अन्तिम टप्पा सार्थकतेचा!
पुर्णतेचा, परिपुर्णतेचा..
शुचितेचा, सुख-प्राप्तीचा..
उन्नतीचा...निवृत्तीचा !
आयुष्याच्या वाटेवरची...
सर्वोच्च पावती तृप्ततेची!
सुखाची, समाधानाची..
गोडी आगळी कर्तव्यपुर्तीची..
जाणीव सुखाची...निवृत्तीची!
मार्ग जिवनाचा, तृप्त मनाचा..
ऐहिकतेच्या विलोपनाचा!
भौतिकाच्या निरोपाचा..
पारमार्थिक प्रारंभाचा..
वेध तो अद्वैताचा..अनंताचा!
ज्ञानराज माऊली म्हणतसे..
मी वेडा 'सोपान' 'मुक्तीचा'..
हरीने कथिला मज..
मार्ग सुखाचा..
तो एकमेव ...निवृत्तिचा !!
या वर्षी माझे प्रिय आण्णा (वडील) नोकरीतुन निवृत्त झाले.
त्यावेळी त्यांना अर्पण केलेली ही कविता.
आपले अमुल्य अभिप्राय अपेक्षित!
विशाल.
गुलमोहर:
शेअर करा
शब्द सुरेख
शब्द सुरेख वापरलेस विशाला. अण्णा नक्कीच सुखावले असतील.
छान गिफ्ट
छान गिफ्ट दिलीस अण्णांना
. माझ्यातर्फे पण त्यांना निवृत्त आयुष्यासाठी शुभेच्छा.
धन्यवाद,
धन्यवाद, अश्विनी.
आपला,
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
धन्यवाद,
धन्यवाद, कौतुक.
आपला,
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
सुंदर...निव
सुंदर...निवृत्त आयुष्याची यापेक्षा छान सुरूवात कोणती होऊ शकते ?
मस्तच...:)
मनापासुन
मनापासुन लिहिले आहेस मित्रा ... मस्तच...