एक होती मुंगी......

Submitted by दीपाली on 14 July, 2010 - 07:19

ही माझी कथा नाही, पण तुम्हांसगळ्यांबरोबर शेअर कराविशी वाटली वाचल्यानंतर, म्हणून टाकतीये.

एक मुंगी होती. ती रोज सकाळी लवकर उठून काम सुरु करायची. खूप काम करणं आणि आनंदी राहणं हा तिचा स्वभाव होता. त्या मुंगीचा बॉस होता एक सिंह. एकदा सिंहाच्या मनात आलं, की मुंगीच्या कामावर कुणाचं लक्ष नसतानाही ती इतकं काम करते, तर सुपर्वायझर नेमला तर ती किती काम करेल!

सिंहाने मुंगीच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एका झुरळाची नेमणूक केली. विविध विषयांचा अभ्यास करून त्यावर अहवाल सादर करणे हे झुरळांच वैशिष्ट्य होतं. झुरळानं प्रथम काय केलं असेल तर घड्याळ लावून हजेरी घेणं सुरू केलं. अहवाल टाईप करण्यासाठी त्याने एक PA सुद्धा नेमला. झुरळाचा अहवाल पाहून सिंह खूष झाला. त्यानंतर त्याने उत्पादनातील वृद्धी आणि कल याचे विश्लेषण करणारे तक्ते झुरळाला तयार करायला सांगितले. ते तक्ते त्याला बोर्ड मिटींग मधे सादर करायचे होते. या कामासाठी झुरळानं एक कॉम्प्युटर, एक लेझर प्रिंटर विकत घेतला आणि हे आयटी डिपार्टमेंट सांभाळण्यासाठी एका माशीची नियुक्ती केली.

कधी काळी आनंदानं जगणारी आणि सहज प्रेरणेनं भरपूर काम करणारी मुंगी कागदांच्या आणि बैठकांच्या मार्‍याने वैतागून गेली. त्यात तिचा वेळ फुकट जाऊ लागला. मुंगी ज्या विभागात काम करत होती त्या विभागात एक इनचार्ज नेमण्याची गरज आहे अस मग सिंहाच्या लक्षात आलं. त्याने गांधील माशीची तिथे इनचार्ज म्हणून नियुक्ती केली. गांधील माशीला एक कॉम्प्युटर हवा होता. तो तिने घेतलाच शिवाय कामाचं नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनाचे अहवाल तयार करण्यासाठी एक PA सुद्धा नेमला.

या सार्‍या अवडंबरामुळे मुंगी जिथे काम करत होती, तिथे सगळे भयभीत झाले. कोणी हसेना, सारे निराश, दु:खी झाले. त्याजागी अवकळा पसरली. ते लक्षात येताच त्या विभागातील वातावरणाचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे गांधील माशीने सिंहाच्या मनावर बिंबवले. सिंहाने मग तशी व्यवस्था केली.अभ्यासात मुंगीच्या विभागातील उत्पादन पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे, असा निष्कर्श निघाला.

या सार्‍या प्रकाराचा आढावा घेउन उपाययोजना सुचविण्यासाठी सिंहाने घुबडाला कंसलटंट म्हणून नेमले. घुबडाने तीन महीने अभ्यास करुन एक भलामोठा अहवाल दिला. विभागात कर्मचार्‍यांची संख्या नको तितकी वाढली आहे, असा त्याचा सारांश होता. या सार्‍या घोळासाठी सिंहाने मुंगीला दोषी धरले. कामाच्या प्रेरणेचा अभाव आणि नकारात्मक मनोवॄत्ती असा शेरा मारून त्यानं मुंगीला घरची वाट दाखवली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण हे चालू घडामोडींमधे का आहे?
भारतीय कॉर्पोरेट जगताबद्दल शरु रांगणेकरांनी इंग्रजीत एक पुस्तक लिहिले होते, त्याचा मराठीत अनुवादही झाला आहे. त्यातल्या लेखांना अनुसरून इसापनीतिसारख्या कथा लिहिता येतील असे हे वाचून वाटले.

मुक्ता, हे आधी कुठे प्रसिद्ध झालंय का? मी मेलमध्ये वाचलयं असे अंधुकसे स्मरतयं..

अरे तु सुरवातीला खुलासा केला आहेसच.. मी बघितला नव्हता , सॉरी.

वरिल लेखातील प्रत्येक शब्द माझ्या साठी खरा आहे.... आम्ही कन्सल्टंट साठी ४ दिवसाचे ३०,००० $ मोजलेत.... त्यांनी जो अहवाल दिला होता तो येथील मुंगीने १ वर्षाआधीच सांगितले होता.

consultants वर एक विनोद.
एकदा एक धनगर शेळ्या हाकत असतो तेवढ्यात बाजुने एक Rolls Royce येउन थांबते. तिच्यातुन एक
झकपक माणुस हातात laptop घेउन उतरतो.
धनगराजवळ जाउन तो म्हणतो.
"Hi I am Joe timepass, मी तुला तुझ्याक्दे किती शेळ्या आहेत हे सान्गितले तर तु मला एक शेळी देशिल?"
गांगारलेला धनगर हो म्हणतो.
थोडा वेळ laptop वर excel मध्ये काही आकडे घालुन Joe म्हणतो "१३६"
धनगर म्हणतो "बरोबर! "
Joe एक शेळी गाडीत ढकलू लागतो.
धनगर आतापर्यन्त सावरलेला "मी तुमचा व्यवसाय ओळखला तर ती शेळी परत द्याल"
Joe आश्चर्याने "हो जरुर"
धनगर "तुम्ही consultant आहात."
Joe शेळी परत देत नाराजीने "तुम्हाला कसे कळले?"
धनगर " एक तर तुम्ही न बोलवता इथे आलात. मला माहित असलेली महिती देउन माझ्याकडुन
शेळीचा सौदा केलात. त्यात तुम्हाला माझ्या व्यवसायाबद्दल काहीही माहित नाही कारण
शेळी म्हणुन तुम्ही माझा कुत्रा घेउन जात आहात. चला द्या इथे!"

ह्म्म्म्म तर या नविन पंचतंत्रातल्या गोष्टी वाटत आहेत Happy
या बाफचे नाव बदलून इकडे अशाच वेगवेगळ्या गोष्टींच्या पोष्टी येऊ द्या.

हम्म्म, हे माझ्याकडे पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन स्वरुपात आहे, संधी मिळाली तर बॉसला एकदा नक्की दाखवणार आहे Proud

कन्सल्टंट साठी ४ दिवसाचे ३०,००० $ ............. कन्सल्टंटला एवढे पैसे द्यायचे... त्याचे वारूळ केवढे मोठे असेल ..! Proud

<आम्ही कन्सल्टंट साठी ४ दिवसाचे ३०,००० $ मोजलेत.... >

तुमच्या कंपनीचा नाव पत्ता सांगता का?

पूर्वीच 'डिल्बर्ट' कॉमिक्स प्रसिद्ध झालि आहेत, नि काही वर्तमानपत्रात अजूनहि होत आहेत. जरी विनोदी म्हणून लिहीले होते तरी काही गोष्टी अत्यंत गंभीरपणे आमच्या कंपनीत करत असत. आम्ही म्हणत असू, यात विनोदी काय? हे तर आमचे मेथड्स नि प्रोसिजर्स!

वरील गोष्टी पण तशाच. आमच्या कंपनीत म्हणत की एक लाईट बल्ब बदलायला कंपनीचे किती लोक लागतात? तर एक डिव्हिजन मॅनेजर, एक डिस्ट्रिक्ट मॅनेजर, इ. इ. संख्या २५ च्या पुढे जाते, बजेट १ मिलियनचे नि काम पूर्ण व्हायला सहा महिने.