साधारण १९९७ सालापासून मी एक्सेल वापरायला लागलो. पहिल्यांदा विंडोज फ़ार
त्रास द्यायचे, आणि मला लोटस १२३ ची फ़ार आठवण यायची. माझ्या कंपनीने
मला लोटस चे, विंडोज व्हर्जन आणून दिले होते, पण दरम्यानच्या काळात
एक्सेल ची सवय व्हायला लागली होती.
त्या काळात मी एका फ़्रेंच कंपनीत नोकरीला होतो. आमचे सगळे प्रोग्रॅम्स
फ़्रेंच मधेच असायचे. त्यामूळे एक्सेल चे मेनू, ड्रॉप डाऊन बॉक्सेस, सगळे
फ़्रेंच भाषेत असायचे, आणि मला ते अंदाजानेच वाचावे लागायचे. माझा भर
असायचा तो, आयकॉन्स वर. ती चित्रभाषा मात्र, माझ्या पचनी पडायची.
कॉलेजमधे असताना प्राथमिक प्रोग्रॅमिंग शिकलो होतो (त्यावेळी त्याला कोड
वगैरे म्हणत नसत.) सी.ए. च्या अभ्यासात, सिस्टीम अनालिसिस पण शिकलो
होतो. सी.ए. एंन्ट्रन्स च्या वेळी, प्यूअर लॉजिक शिकून झाले होते.
पुढेही हौसेखातर मी, अनेक सॉफ़्टवेअर तसेच हार्डवेअर कोर्स केले. पण प्रत्यक्ष
कोड लिहिण्याची संधी कधी मिळाली नाहि.
ती हौस मी एक्सेल मधे अश्या काही वर्कशीट्स करुन भागवतो. कामाच्या
निमित्ताने, मला बॅंकाना अशी पत्रे नियमित लिहावी लागतात. सेक्रेटरीला
सांगितले तर ती वर्ड उघडून, झटापट करत बसते. क्षुल्लकश्या चुकीसाठी
परत परत टाईप करावे लागते. वर्ड मधे बेरजा, वजाबाक्या करण्याची
पण फ़ारशी सोय नाही.तसेच टॅब, अलाईन मधे खूपच वेळ जातो.
तर सोबत ही वर्कशीट आहे. मी वापरलेले लॉजिक अगदी प्राथमिक आणि
बाळबोध असायची(च) शक्यता जास्त आहे, पण काम निभावते.
यातल्या दुसऱ्या वर्कशीटमधे म्हणजेच, डेटाशीट मधे डेटा भरायचा आहे, आणि
पहिल्या वर्कशीटमधे लेटर आहे.
डेटाशीटमधल्या रेकॉर्डचा अनुक्रमांक, पहिल्या वर्कशीटमधल्या सेल इ१ मधे टाकला
कि लेटर तयार होते.
डेटावर काही प्राथमिक बंधने आहेत, जसे कि यू.एस.डी. ची रक्कम १००,०००/-
पेक्षा कमी असावी आणि रुपयातील किंमत, १,००,००,०००/- पेक्षा कमी असावी.
भारतीय पद्धतीने, म्हणजे दशसहस्त्र, दशलक्ष पद्धतीने संख्या लिहायचाही प्रयत्न
केला आहे. (मी वापरलेल्या एक्सेलच्या व्हर्जनमधे अशी सोय नाही. टॅली मधे
तशी सोय आहे.)
या पत्राचा मसूदा जो आहे, तो परदेशातील आर्थिक व्यवहाराशी सबंधित असल्याने
भारतात वापरल्या जाण्याऱ्या मसूद्याशी सुसंगत नसणार. तेव्हा त्या मसुद्याकडे
दुर्लक्ष करावे.
तर कुणाला हा फॉर्म फेरफार करुन वापरायचा असेल, तर खुशाल वापरा. यातले
लॉजिक वापरुन काही, इतर वर्कशीट्स तयार करायच्या असतील, तर अवश्य करा.
(आणि मला कळवा.)
पण जे व्यावसायिक प्रोग्रॅमर्स आहेत, त्यांनी यात काहि सुधारणा सूचवायच्या
असतील, तर अवश्य सूचवा. (मी यात कुठलाही पासवर्ड वापरलेला नाही,
ओपन सोर्स आहे. सगळे सेल फ़ॉर्म्युले ओपन आहेत.)
दिनेशदा ! छान माहिती ! गेले
दिनेशदा !
छान माहिती !
गेले ८-९ वर्षे संगणक क्षेत्रात काम करतोय्,पण हे एक्सेल काही अजुन पुर्ण शिकता नाही आलं !
दिनेशदा, एक्सेल हे खरोखरच खुप
दिनेशदा, एक्सेल हे खरोखरच खुप Powerful आणि Underutilized साधन आहे. बरेचसे लोक हे तक्ता (टेबल) व किरकोळ आकडेमोडीतच धन्यता मानतात. मात्र तुम्ही दिलेल्या उदाहरणावरुन ह्याचा रुढार्थाने प्रोग्रामिंग न शिकता / करता किती चपखल उपयोग करता येतो ते दाखवले आहे.
ह्याचबरोबर एक्सेल मॅक्रो ने बेसिक प्रोग्रॅमिंग शिकुन आणखी कितीतरी करामती करता येतात.
तसेच पिव्होट टेबल, सब टोटलींग वापरुन चक्क कितीतरी रिपोर्टींग च्या गरजाही सहजच पुरवल्या जातात.
जसे आजकालच्या वाहनांपेक्षा मला 'सायकल' हे वाहन अजुनही मोहात पाडते तसेच एक्सेल च्या बाबतीत आहे.
तुम्ही लिहीलेले Figures in Words चे logic खुप आवडले. साधे, सोपे नि सुटसुटीत!
मी एक्सेल मधे EMI Calculator ही लिहिला होता जो प्रत्येक हप्त्यानुसार किती प्रिन्सिपल व किती ईण्ट्रेस्ट भरले जाते ते कॅलक्युलेट करेल. मला ती फाईल मिळाली तर मी ती इथे टाकेन.
EMI Calculator ही फाईल होम
EMI Calculator
ही फाईल होम लोन किंवा रिकरींग डिपॉ़झीट साठीही वापरता येउ शकेल.
EMI.xls (81.5 KB)
दिनेशदा, इथे आपण वेगवेगळ्या कल्पक एक्सेलच्या वापरासाठी हा बाफ वापरुया का?
जर तुम्हाला हे पसंद नसेल तर सांगा म्हणजे मी माझी पोष्ट काढून टाकेन.
आवडले तर बाफ चे नवे नामकरण करावे ही विनंती.
अरे वा!! छान दिनेशदा. मी
अरे वा!! छान दिनेशदा. मी तुमची एक्सेल फाइल पाहिली नाही अजुन निवांतपणे पाहुन परत प्रतिसाद देइन. पण मी स्वतः गेली ३ वर्षे एक्सेल VBA मधे प्रोग्रॅमिन्ग करते आहे. आणि एक्सेल मधे बेसिक ऑफिस टूल नक्कीच चान्गले बनु शकते. रोजची क्लेरिकल आणि मेकॅनिकल कामे खुपच पटकन ऑटोमेट करता येतात. आम्ही बर्याच मोठ्या सिस्टीम्स टेम्पररी म्हणुन एक्सेल मधे बिल्ड केल्या आहेत. ज्या नन्तर मोठ्या इआरपी सॉफ्टवेअर मधे कन्वर्ट होणार आहेत. पण जोपर्यत ते होत नाही तोवर लोकांचे काम एक्सेल वरच होतेय.
छान
छान
छान उपयोग आहे एक्सेलचा. किरण,
छान उपयोग आहे एक्सेलचा. किरण, तुमची EMI calulation ची शीटही सुरेख आहे. अन लोटस १२३ माझेही favourite होते एके काळी
अरे व्वा दिनेशदा, बर झाल
अरे व्वा दिनेशदा, बर झाल तुम्ही ही फाईल इथे दिलीत

किरण, तुझी फाईल पण नक्कीच उपयोगी आहे!
वेगळा बीबी केलात तर फारच बरे!
डेलिया, जर व्हीबीचा उपयोग शिकवता आला तर सोन्याहून पिवळे!
किरण, छानच आहे हि फ़ाईल. लोक
किरण,
छानच आहे हि फ़ाईल. लोक अकारण एक्सेलला घाबरत असतात. अश्या प्रकारच्या
पत्रांसाठी, मला एक्सेल, वर्ड पेक्षा उपयोगी वाटते.
खरेच आपण, आपली अशी क्रिएशन्स, इथे टाकू या.
मी माझ्या सहकाऱ्याना हे लॉजिक शिकवायचा, प्रयत्न करतो, पण ते कष्ट घेत नाहीत
आयती वर्कशीट मिळाली, कि तीच वर्षानुवर्षे वापरतात.
>>दिनेशदा, एक्सेल हे खरोखरच
>>दिनेशदा, एक्सेल हे खरोखरच खुप Powerful आणि Underutilized साधन आहे. बरेचसे लोक हे तक्ता (टेबल) व किरकोळ आकडेमोडीतच धन्यता मानतात.
खरं आहे. दैनंदिन घरगुती वापर देखील बर्याच प्रमाणात होऊ शकतो.
अगदी अगदी. एक्सेल लै आवड्ते.
अगदी अगदी. एक्सेल लै आवड्ते.
40_excel rupees converter
40_excel rupees converter formulae.doc (38.5 KB)
भ्रमा, पान सापडत नाहीये
भ्रमा, पान सापडत नाहीये
पुन्हा अपलोड कर फाईल
मला एक्सेल मधले मॅक्रोज
मला एक्सेल मधले मॅक्रोज शिकायचे खूप इच्छा आहे...त्याचा खूप उपयोग असतो ना?
<< एक्सेल हे खरोखरच खुप
<< एक्सेल हे खरोखरच खुप Powerful आणि Underutilized साधन आहे. >> १००% अनुमोदन !!
लिम्बुटिम्बु ,भरत
एक्सेल मॅक्रोज शिकणे एकदम सोप्पे आहे.
समजा तुम्हाला एक्सेल मधल्या काही स्टेप्स ( उदा. रोज डीलीट करुन काही रोज अॅड करायच्या आहेत ) ऑटोमेट करायच्या आहेत त्यासाठी मॅक्रो लिहायचा आहे तर
१. Developer मधे जाउन record macro क्लिक करा.
२. मग एक्सेल मधे रोज डीलीट / अॅड करा.
३. तुमचे एक्सेल चेन्जेस झाले की 'stop recording' करा.
४. मॅक्रो च्या लिस्ट मधे जाउन 'edit macro' केले की तुम्हाला VB code दिसेल.
५. परत सेम मॅक्रो रन केली तर त्याच स्टेप्स execute होतील.
टीप : एक्सेल मधले कोणतीही गोष्ट जी आपण टूल बार वापरुन करु शकतो ( उदा. टेबल , ग्राफ , चार्ट , फॉर्मुला , रोज अॅड डीलीट ई. काहीही ) ती मॅक्रो मधे लिहीता येते. थोड्क्यात प्रत्येक टास्क ऑटोमेट करता येउ शकते.
फक्त एक्सेल च नाही तर वर्ड ,
फक्त एक्सेल च नाही तर वर्ड , आउटलूक , अॅक्सेस या सगळ्यामधे VBA मधे मॅक्रो लिहुन डेलि टास्क ऑटोमेट करता येतात. अर्थात या सगळ्यात एक्सेल ऑटोमेशन खुप सोप्पे आणि पटकन होउ शकणारे आहे. एकदा मॅक्रो रेकॉर्ड करुन त्यात थोडेफार बदल करुन वापरता यायला लागला की तुम्ही तुमची बरीच एक्सेल मधली कामे ऑटोमेट करु शकाल.
मी पण एक्सेल मधल्या मॅक्रो
मी पण एक्सेल मधल्या मॅक्रो वापरतो. पण त्यापेक्षा लोटस मधल्या
मॅक्रोज, खुपच सोप्या होत्या. आता आल्ट, या कीचा फारसा उपयोगच
उरला नाही. लोटसमधे त्या किने मॅक्रोज चालवता यायच्या.
अगदी, अप १, लेफ़्ट १, डाऊन १, राईट १ असे लिहून पडद्यावर भिरभिरं
दाखवता यायचे.
लिंबु, आता बघ!!
लिंबु, आता बघ!!
भ्रमा, ते चालले, लय भारी मी
भ्रमा, ते चालले, लय भारी
मी सेव्ह करुन ठेवलय
आता वेळ मिळेल तेव्हा कोडचा अभ्यास करतो, समजेल काहीतरी
आयला, मी दोन वर्षामागे व्हीलुक अप कमाण्ड वापरुन कन्व्हर्शन केले होते, अगदी देवनागरीतही, पण त्याकरता एक वर्कशीट राखुन ठेवायला लागतो,हे खुप भारीये
एक्सेल माझा पण आवडता प्राणी
एक्सेल माझा पण आवडता प्राणी आहे. लोटस १२३ शिकलो होतो खरा पण प्रत्यक्ष वापरायची वेळ आली नाही, कारण तोपर्यंत एक्सेल जन्माला आले होते. मॅक्रोज (थोडक्यात व्हिबी कोडच) खुप लिहिले.
मी पुर्वी एक प्रोग्राम केला होता त्यामधे कलर प्रमाणे रो सॉर्ट केल्या जात असत.
नंतर नविन व्हर्जन मधे ही सोय आली आहे. तशा बर्याच गोष्टी आहेत एक्सेल मधे, एवढ्या सगळ्या वापरल्या पण जात नाहीत. पिव्होट टेबल शिकायचे आहे. कोणाला येत असेल तर इकडे माहिती देणे.
१) स्पेल नंबर SpellNumber.doc
१) स्पेल नंबर
SpellNumber.doc (28 KB)
२) Word मधे Excel ची सोय.
Word & Excel.doc (34 KB)
मधुकर, वर्डमधे एक्सेल
मधुकर, वर्डमधे एक्सेल वापरताना, आख्ख्या शीट ऐवजी केवळ सिलेक्टेड रेन्ज टाकता येते का? असेल तर कशी? मला ते जमले नाहीये! आख्खा शीट येतो
एक्सेल एके काळी खुप वापरलं
एक्सेल एके काळी खुप वापरलं होतं. देशात एका कंपनीत फायनान्स वगैरे क्शेत्रात काम करताना बरीचसे रिपोर्टस बनविण्यासाठी टेंप्लेटस केल्या होत्या. बर्याच लोकांना ते वापरायला उद्युक्त केल होतं. गेल्या पाच सहा वर्षात फारच कमी वापरलः( त्यामुळे मिळालेली गती खुंटली आहे
पुन्हा एखादा शॉर्ट कोर्स करुन मॅक्रोज शिकायचा विचार आहे! दिनेशदा, तुमच्या लेखामुळे विचाराना चालना मिळाली! धन्यवाद!
मला एक मॅक्रो/ VB वापरुन एक
मला एक मॅक्रो/ VB वापरुन एक टेम्प्लेट तयार करायचे आहे त्यासाठी मदत हवी आहे .. करणार का? मला त्यातलं जास्ती काही येत नाही. मी ऑनलाईन शोधलं पण मला समजण्यासारखी माहिती नाही मिळाली. मी सध्या =MATCH(A2,'Test File'!A:A,0) याप्रकारे काम चालवतो. पण काय करायची इच्छा आहे ते थोडक्यात इथे सांगतो -
दोन वेगवेगळ्या Excel Workbooks आहेत. एक fixed आहे आणि त्यात माझ्या सर्वरची यादी आहे १००+. दुसरे जे workbook आहे ते मला बाहेरुन मिळतात त्यामुळे एका fixed format मध्ये नसते पण त्यात सगळ्याच सर्वरची यादी असते जवळपास १००० + वगैरे. तर मला एखादा मॅक्रो/ VB तयार करायचाय जो मी त्या दुसर्या workbook वर चालउ शकेल आणि मला दोन्ही मध्ये असणार्या सारख्या नावांची यादी मिळेल. याप्रकारे मला काहीही एका ठीकाणावरुन दउसर्या ठिकाणी कॉपी करायचं काम पडणार नाही फक्त मॅक्रो/ VB रन केला की रीसल्ट्स मिळतील
लिंबू, सिलेक्ट करताना, जेवढी
लिंबू, सिलेक्ट करताना, जेवढी रेंज हवीय तेवढीच, सिलेक्ट केली, आणि पेस्ट केली, तर व्हायला हवे.
किरण, भ्रमर आणि मधुकर,
खरे तर हि वर्कशीट इथे द्यायला कमालीचा संकोच वाटत होता. वाटले इथे सगळे व्यावसायिक आहेत, त्यांना हा पोरखेळच वाटायचा. मग विचार केला, आपलेच तर आहेत सगळे.
विश्वास सार्थ ठरवलात !!!
लिंबु, जेवढी पाहिजे तेवढी
लिंबु,
जेवढी पाहिजे तेवढी वर्कशीट वर्डमधे पेस्ट करता येते. पण वर्डच्या पेजच्या कपॅसिटीपेक्षा जास्त रो किंवा कॉलम्स पेस्ट केलेत कि जास्तीचे रो व कॉलम दिसत नाहि.
त्या पानावर मावतील एवढिच शिट द्सते.
दिनेशदा! ही साईट म्हणूनच तर
दिनेशदा! ही साईट म्हणूनच तर बाकीच्या साईटपेक्षा वेगळी आहे ना?
स्वप्निल, अगदी ह्याचसाठी मी दुसरी शीट केली होती. काल मी ती टाकली नाही कारण ते एवढे जनरिक वाटले नाही पण मी ती बर्याच वेळा वापरतो.
ह्यात २ लिस्ट (विशेष म्हणजे सॉर्टेड नसल्या तरीही) २ आउटपुट देतो.
म्हणजे (In List A But not in List B) आणि (In List B but not in List A)
Macro च्या अभ्यासकांसाठी ही अतिशय उपयुक्त आहे.
मात्र त्यात काही बग्ज असू शकतात. ते आपल्याल कोणत्या कामासाठी वापरायचेय त्यावर अवलंबून आहे. उदा: Comparison Case sensitive आहे कि नाही Whole Word हवा की नाही तसेच Triming हवे की नाही त्याप्रमाणे मॅक्रो मध्ये सूक्ष्म बदल करुन ते मिळवता येईल.
CompareLists.zip (39.62 KB)
अरे वा .. किरण धन्यवाद!
अरे वा .. किरण धन्यवाद! वापरुन बघितला .. कामी येईल. मी सध्या थोडंफार असच करतो. इथे बघा - Test_Test.zip (7.93 KB)
माफ करा पण मला जे करायची इच्छा आहे जर शक्य असेल तर ते थोडं इंग्रजीमध्ये सांगायचा प्रयत्न करतो -
All this is done for one workbook with 2 differrent columns on one spreadsheet or 2 spreadsheets with 1 column each.
What I want to do if possible is like - something like source workbook and destination workbook. Source Workbook will be fixed with the server list. Destination workbook on the other hand will have multiple columns and may have multiple spreadsheets in one workbook. I will give destination workbook as a input to the macro and it will automatically search for all the matching names and give me the output. The output can be in any form. hope this helps.
अस काही करता येणे शक्य आहे का?
किरण, स्वप्नील धन्यवाद!
किरण, स्वप्नील धन्यवाद!
स्वपनिल, जर दुसरी वर्क्शीट
स्वपनिल, जर दुसरी वर्क्शीट बाहेरुन मिळत असेल तर त्यातील फॉर्मॅटींग वगैरे वेगळे असल्याने त्यावर मॅक्रो रन करणे त्यात बदल केल्याशिवाय कठीण आहे. त्यापेक्षा तू मी दिलेल्या फाईल मध्ये Column A मध्ये तुमची फिक्स्ड लिस्ट कॉपी कर नि Column B Blank ठेव. तुझ्या गरजेप्रमाणे मॅक्रोत बदल करणे अगदी सोपे आहे. ते करुन ती फाईल टेंपलेट म्हणून सेव्ह कर.
नंतर जेव्हा दुसरी फाईल येईल तेव्हा फक्त त्यातली लिस्ट कॉपी करुन Column B मध्ये पेस्ट करुन मॅक्रो रन केला की काम झाले.
तुझ्या दोन्ही पोष्ट वाचून मला जेवढे आणि जसे कळले त्याप्रमाणे मी उत्तर दिलेय, ते बरोबरच किंवा बेस्ट असेल असे नाही.
---x----
आत्ता तुझे टेम्लेट बघितले. बहुतेक तुझा प्रश्न मला कळला नाहीये. पण असे दिसतेय की तुला जी दुसरी लिस्ट येते त्यात तुझ्या फिक्स्ड लिस्ट्मधले सर्वरस किती वेळा (Count) आलेत ते पाहिजे. अधिक माहिती दिलीस तर बरे होईल.
>>स्वपनिल, जर दुसरी वर्क्शीट
>>स्वपनिल, जर दुसरी वर्क्शीट बाहेरुन मिळत असेल तर त्यातील फॉर्मॅटींग वगैरे वेगळे असल्याने त्यावर मॅक्रो रन करणे त्यात बदल केल्याशिवाय कठीण आहे.
अच्छा मग तर कठीण आहे .. कारण दुसरी वर्कशीट मला बाहेरुनच मिळणार आणि त्यात कुटल्यातरी कॉलम मध्ये सर्वर यादी असणार. ती खुप मोठी असल्यामुळे मला त्यातुन माझे सर्वर्स शोधायच काम सोपं करायचं होतं.
>>आत्ता तुझे टेम्लेट बघितले. बहुतेक तुझा प्रश्न मला कळला नाहीये. पण असे दिसतेय की तुला जी दुसरी लिस्ट येते त्यात तुझ्या फिक्स्ड लिस्ट्मधले सर्वरस किती वेळा (Count) आलेत ते पाहिजे. अधिक माहिती दिलीस तर बरे होईल.
सर्वर्स किती वेळा नाही तर जे आहे ते पाहिजेत. फिक्स्ड लिस्ट्मधले कुठले सर्वर्स त्या नविन लिस्टमध्ये आहे ते पाहिजे. मी तयार केलेल्या टेम्प्लेट मध्ये जर फिक्सड लिस्टमधुन नाव मॅच झालं तर त्यासमोर ते त्या सर्वरचा नविन लिस्टमधील रो नंबर दाखवते.
मी ते टेम्प्लेट वापरुन बघतो आणि मअॅक्रो अपडेट करायचा प्रयत्न करतो. मला नाही जमलं करायला तर विचारेण.
Pages