थोडी डागडुजी मायबोलीची

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवर काही थोडे बदल केले आहेत.

१) एखादे फक्त ग्रूपपुरते असलेले पान जर ग्रूपबाहेरच्या सदस्याने वाचायचा प्रयत्न केला तर त्या सदस्याला
फक्त "या पानावरच जायची परवानगी नाही" असा संदेश येत असे. पण ते कुठल्या ग्रूपमधे आहे हे न कळल्यामुळे पुढे काहीच करता येणे अवघड होते.

आता त्यात थोडा बदल केला आहे. पूर्वीच्या संदेशाबरोबरच आता, ते पान कुठल्या ग्रूपमधे आहे आणि त्या ग्रूपच्या मुख्य पानाची लिंक दिसते. ती लिंक वापरून, ग्रूपच्या मुख्य पानावर जाऊन त्या त्या ग्रूपमधे सामील होण्यासाठी लागणार्‍या पायर्‍यांमधून जाता येईल.

२) मायबोलीवरची बहुतेक पाने सार्वजनिक वाचनासाठी आहेत. पण काही ग्रूपमधली पाने फक्त खाजगी वाचनासाठी (ग्रूपमधल्या सभासदांसाठी मर्यादीत ) आहेत. अशी पाने ओळखायला सोपी जावी म्हणून
त्या पानांवर मुख्य मजकूराच्या खाली "फक्त ग्रूप सभासदांसाठी" असे दाखवण्याची सोय केली आहे.
जी पाने सार्वजनिक आहेत ती पूर्वीप्रमाणेच (काही बदल न होता) दिसत राहतील.

३) बरेच मायबोलीकर "निवडक १०" हि सुविधा वापरत आहेत. पण एखादे लेखन किती जणांनी त्यांच्या निवडक १० मधे टाकले हे कळण्याची सोपी सोय नव्हती. तुमचे लेखन Top 20 मधे गेले तरच ते कळायचे. आता प्रत्येक पानावर मूळ लेखनाच्या खाली किती मायबोलीकरांनी ते लेखन निवडक १० मधे टाकले आहे ते पाहता येईल. बहुसंख्य पानावर ० मायबोलीकरांना हे आवडले हे दाखवण्यापेक्षा जर १ किंवा जास्त मायबोलीकरांना ते आवडले असेल तरच हा आकडा दिसेल.

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद अ‍ॅडमिन टीम !
>>वाह्ते बीबी ७२ तास तरी आर्काइव्ह होतील असे करा
नको. अजिबात नको.

अ‍ॅडमिन टीम, सुधारणान्बद्दल धन्यवाद Happy
(मला सगळेच बदल आवडलेत - खास करुन ३ नम्बरची सुधारणा TRP वाढायला उपयुक्त ठरेल Happy इन्टरेस्टीन्ग)

लई भारी !
थुत्तरफोड संदेशानंतर किमान योग्य ठिकाणी जाण्याचा मार्ग तरी मिळेल . Proud

अरे वा.

दुसरी सुधारणा मी "नवीन मायबोली: असे सुधारता येईल" या बीबी वर प्रतिसादात सुचवली होती. ती अमलात आणलेली दिसतेय. Happy धन्यवाद, अ‍ॅडमिन Happy

निवडक १० चा उपयोग मस्त. पण त्या अंकावर क्लिक केल्यावर कोणत्या आयडीज ने ते निवडले आहे त्याची लिस्ट दाखवली तर ते पान/ बाफ ही कुणाकुणाची आवड आहे हे कळून जास्त मजा येईल. Happy

मंजूडीला अनुमोदन. पहिल्यासारखीच विपु जर प्रोफाईलच्या खाली दिसली तर छान होईल.