टेबलटेनीस

Submitted by रंगासेठ on 7 July, 2010 - 11:48

भारताच्य शरत कमलने प्रतिष्ठेची 'US Open Table Tennis Championship' जिंकत मानाचा तुरा खोवलाय. हे त्याचे कारकिर्दितील सर्वोच्च विजेतेपद आहे. शरतचे अभिनंदन.

http://www.dnaindia.com/sport/report_achanta-sharath-wins-us-open-table-...

टेबलटेनीस हा बर्‍यापैकी सर्वत्र खेळला जाणारा (निदान IT / इतर कॉर्पोरेट मध्ये आणि शाळा-कॉलेजात) खेळ आहे. अतिशय वेगवान असा खेळ असून याला प्रतिसादही चांगला मिळतो. या खेळात भारताने ऑलिंपिकमध्ये पण थोडीफार चांगली कामगिरी केली होती.

बाकी या विषयातील जाणकार सांगतीलच Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगासेठ...टेबल टेनिसमध्ये खरेच भारत आता चांगली कामगिरी करत आहे. अचांता शरथ कमल, सौरभ चक्रवर्ती, मौमा दास आणि पौलमी घटक यासारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे.
नेहा अगरवाल या दिल्लीच्या खेळाडूने ऑलिम्पिकला पात्र होण्याची कामगिरी केली होती पण त्यांनंतर तिला काही सूर गवसला नाही. सध्या तर तिची कामगिरी अगदीच खालावली आहे.
पुण्याच्या खेळाडूंचे म्हणाल तर दिव्या देशपांडे ही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ती काही महिन्यांपूर्वी भारतात टॉप रँकीगची खेळाडू होती. विशेष म्हणजे त्यावेळी भारतातल्या तिन टॉपच्या खेळाडू महाराष्ट्रामधून होत्या. (पूजा सहस्त्रबुद्धे ही आता टॉपला आहे आणि मधुरीका पाटकर).
पण अजूनही भारतीय खेळाडू फिटनेसच्या बाबतीत कमी पडतात. सध्या आपला राष्ट्रीय कोच इटालीयन आहे..मॅसिमो कॉन्स्टाटीनी म्हणून. त्याने या गोष्टीकडे चांगले लक्ष पुरविले आहे आणि त्याचे फायदे दिसून यायला सुरूवात झाली आहे.
पुण्यात झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तर भारतीय टेबलटेनिसपटूंनी वर्चस्व गाजिवले होते. आता दिल्ली राष्ट्र्कुल आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये काय होते ते पाहूच

शरथ कमलने इजिप्त येथील स्पर्धा पण जिंकलीय Happy अमेरिकन ओपन पाठोपाठ इजिप्त येथील स्पर्धा जिंकली आहे. प्रथम मानांकित ली चिंगला हरवलेय.

http://www.ndtv.com/article/sports/sharath-kamal-wins-egypt-open-36922

>>आता दिल्ली राष्ट्र्कुल आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये काय होते ते पाहूच<< राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी म्हणून टेबलटेनीस टेस्टचे आयोजन करण्यात आलेय. दिल्लीत ही स्पर्धा १५ जुलै पासून सुरू होणार असून यात जपान-कोरिया सारखे देश भाग घेणार आहेत.

http://www.ndtv.com/article/sports/table-tennis-test-event-to-commence-o...

यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धा आहेत दिल्लीत ऑक्टोबर मध्ये. एशियाड बहुतेक नाहीत यावर्षी.
अनिलराव मी हे सगळे खेळ (क्रिकेट व फुटबॉल वगळता) थोड्या-थोड्या कालावधी करता खेळलेत.
या खेळात भारताचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकल्याचा आनंद होतो व तो इतरांबरोबर वाटावा म्हणून ही बातमी दिलीय.

<<म्हणजे चीनी लोकं पुन्हा आपली आयोजनातील ताकद दाखवणार.>> १९८२चं दिल्लीतील एशियाडही आयोजनात कुठंही कमी पडलं नव्हतं ! [ स्वतः दिल्लीला जावून पाहिलंय म्हणून छातिठोकपणे सांगतोय ]

दिल्ली एशियाडचे दूरदर्शन वरील थेट प्रक्षेपणही तितकेच छान होते. तेव्हाच जास्त टीव्ही आले भारतात. त्यावरची सुहासिनी मुळगावकरांची लेखमालाही वाचली होती...लोकप्रभामधे....आपलं कुणीतरी (म्हणजे मुंबई दूरदर्शनचं, मराठी) हे काम करतंय हे वाचून छान वाटले होते.