देवळांच्या देशा - "शहाडचे बिर्ला मंदिर"

Submitted by जिप्सी on 11 July, 2010 - 01:57

उद्योगपती बिर्ला यांनी बर्‍याच ठिकाणी काहि मंदिरे उभारली आहेत त्यातीलच एक मंदिर "शहाड येथील बिर्ला मंदिर".
कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील कल्याणच्या पुढचे स्टेशन शहाड. स्टेशनपासुन चाल १०-१५ मिनिटावर, एका छोट्याशा टेकडीवर वसलेले हे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर. सेंच्युरी रेयॉन मिलच्या समोरून जाणारी वाट आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जाते.
आसनगाव (शहापुर) येथील "मानस मंदिर", शहाडचे "बिर्ला मंदिर" आणि अंबरनाथचे प्राचीन "शिवमंदिर" हे अर्ध्या दिवसात (सकाळी लवकर गेले असता) व्यवस्थित पाहुन होतात. Happy

==================================================
==================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

दशावतार
प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

हत्ती आणि बैल
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

गुलमोहर: 

छान फोटो... Happy प्रचि. २,१९,२१,३१ मस्त... फक्त काही फोटोंमधला तो स्टीलचा रॉड डोळ्यांना खुपतोय...
Sad

छान .. लहान असताना सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर ऊठुन प्रथम टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन घेतले की शहाडच्या मंदीराला भेट द्यायचो. दुपारी मंदीराच्या बाजुच्या उद्यानात भोजन करायचो. तेव्हा तेथिल toy train चे खुप आकर्षण होते.

योगेश,या फोटोंसाठी तुझी आभारी आहे .काल इतर देवळांचे फोटो पहाताना सारख शहाडच्या मंदिराचा
फोटो यावा अस वाटत होत .१९६८ साली स्.स्.सी.परीक्षा संपल्यावर वर्गातल्या मुली मिळून टिटवाळा
शहाड अशी ट्रीप केली होती .इतक छान वाटल होत .तेव्हा भर दुपारी आम्हाला स्टेशनपासून देवळाकडे
जायला वाहन मिळाल नाही .वस्ती एवढी नव्हती व मंदीर सुद्धा नवीन असाव.तेव्हा रंगीत बर्फाचे गोळे खात बैलगाडीतून गेलो .मंदीर इतक आवडल की पुन्हा लग्नानंतर जोड्याने गेलो .खूप फरक जाणवला .
सहा वर्षानी दगडांचा रंग काळवंडला ,काही शिल्पाना भेगा गेल्या होत्या .पोल्युशनचा परीणाम .हे जे
सावळ बांधकाम आहे ना ते अगदी संगमरवरी शुभ्र होत ,एक वेगळाच फील होता .पुन्हा एकदा धन्यवाद.

सुरेख आहे मंदिर! काय एकेक सुंदर मंदिरं आहेत आपल्या राज्यात! धन्यवाद ह्या मंदिराची ओळख करुन दिल्याबद्दल! Happy

झक्कास योगेश. कैक वर्ष लोटलीयेत ह्या मंदिराला भेट देऊन. हो पूर्वी टॉय ट्रेन होती खरी तिथे, आता काय परिस्थिती आहे कल्पना नाही.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!! Happy

हो पूर्वी टॉय ट्रेन होती खरी तिथे, आता काय परिस्थिती आहे कल्पना नाही.>>>>अजुनही आहे तेथे टॉय ट्रेन. Happy

योगेश.. पुन्हा लाजवाब फोटो.. वर्षाभरापुर्वी मी हे मंदीर प्रत्यक्षात पाहिले तेव्हा जेवढी सुंदरता नजरेत भरली नव्हती ती तुझ्या फोटोंतून दिसली.. धन्यवाद Happy

IMG_7325_ by Sandeep copy.jpgIMG_7325_ by Sandeep copy.jpgshrutiD | 11 July, 2010 - 03:16 नवीन
छान फोटो... प्रचि. २,१९,२१,३१ मस्त... फक्त काही फोटोंमधला तो स्टीलचा रॉड डोळ्यांना खुपतोय...

>>>>>> तो स्टिल चा रॉड काडला आहे

जानेवारीतच जाऊन आले बिर्ला मंदिरात. तिथल्या संगमरवरी लाद्या कित्ती थंड असतात..

बादवे, फोटो आवडले. ते हत्ती आणि बैलाचं शिल्प नेमकं कोणत्या बाजुला आहे??

किती वर्षांनी बिर्लामंदिर बधतेय.जवळजवळ १७-१८ वर्षांनी !! मी आंबिवलीला रहायला होते लग्नाआधी . ( टिटवाळा आणि शहाडच्या मधलं स्टेशन) त्यामुळे बरेचदा जायचो. अजुनही ते पांढरंशुभ्र मंदिर डोळ्यासमोर आहे. फक्त जातानाचा रस्ता मात्र भयंकर गलिच्छ होता. डुकरांच्या पिलावळिने भरलेला असायचा. आता कितपत स्वच्छ आहे तिथे?
अरे हो फोटो मस्त आलेत, हे सांगायचच राहिलं.