Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 8 July, 2010 - 01:41
'' बरे दिसत नाही ''
गुडघ्यावरती तुझे रांगणे ,बरे दिसत नाही
पुन्हा पुन्हा हे तुला सांगणे,बरे दिसत नाही
'' 'गझल' न्यायची पुढे'' हेच खुंटीला बांधून घे
स्वता त्याच खुंटीस टांगणे,बरे दिसत नाही
पृथ्वी फिरणे,सूर्य उगवणे,तुझ्यामुळे नाही
वेळि अवेळी तुझे बांगणे,बरे दिसत नाही
चौकट '' बाराखडी'' आपली,समजुनी घे इतुके
चौकटीतुनी दूर पांगणे,बरे दिसत नाही
खळखळाट करणारा साधा झराच तू आहे
तुडुंब दर्यागत अथांगणे ,बरे दिसत नाही
किती किती पाहिली उधाणे,ह्या '' कैलासा''ने
त्यामधले हे तुझे भांगणे,बरे दिसत नाही.
डॉ.कैलास गायकवाड
गुलमोहर:
शेअर करा
गुडघ्यावरती तुझे रांगणे ,बरे
गुडघ्यावरती तुझे रांगणे ,बरे दिसत नाही
पुन्हा पुन्हा हे तुला सांगणे,बरे दिसत नाही
.
खळखळाट करणारा साधा झराच तू आहे
तुडुंब दर्यागत अथांगणे ,बरे दिसत नाही
मस्त. आवडले.
खुप आवडली..!!
खुप आवडली..!!
छान गझल!!! << '' 'गझल'
छान गझल!!!
<< '' 'गझल' न्यायची पुढे'' तू हे खुंटीला बांधून घे
स्वता त्याच खुंटिस टांगणे,बरे दिसत नाही >>
हा शेराचा अर्थ सांगाल का?
''गझल'' हा काव्यप्रकार पुढे
''गझल'' हा काव्यप्रकार पुढे न्यायचा हे आपले उद्देश्य आहे.... म्हणून ते तू खुंटीला बांधून घे.... म्हणजे मनाशी पक्के करून घे..... आणी त्याच खुंटीला टांगणे म्हणजे उद्देश्यापासून भटकणे असे आहे.
डॉ.कैलास
पृथ्वी फिरणे,सूर्य
पृथ्वी फिरणे,सूर्य उगवणे,तुझ्यामुळे नाही
वेळि अवेळि तुझे बांगणे,बरे दिसत नाही
प्रणयासाठी चित्तही चळते,दुनिया हे जाणे
तुझे त्यात असले लोटांगणे,बरे दिसत नाही
खळखळाट करणारा साधा झराच तू आहे
तुडुंब दर्यागत अथांगणे ,बरे दिसत नाही
सगळी गझल छान.
कैलासराव, अथांगणे शेर चांगला
कैलासराव,
अथांगणे शेर चांगला केलात की! मतला आवडला हे आधीच सांगीतले होते. र्हस्व दीर्घ मात्र अजूनही तपासाच!
एकंदर तुमच्या लक्षात आलेच असेल की मनातील विचार उतरवले की मस्त होते रचना! :-))
अभिनंदन! चांगलीच रचना!
सर्व शेर आवडले .
सर्व शेर आवडले .
गंगाधरजी,अमित जी,गणेश्
गंगाधरजी,अमित जी,गणेश् जी,हबा,भूषण जी, छाया.... आपणां सर्वांचे मनः पूर्वक धन्यवाद.
डॉ.कैलास
खळखळाट करणारा साधा झराच तू
खळखळाट करणारा साधा झराच तू आहे
तुडुंब दर्यागत अथांगणे ,बरे दिसत नाही
>> भारी शेर.
बर्याच आंतरजालीय मराठी लिखाणाला उपयुक्त.
बिना नायकाचि गझल हि
बिना नायकाचि गझल हि अशि,
त्यात डॉक्टरांनि लिहने....
बरे दिसत नहि.
संदिपजी,स्पष्ट लिहा आपणांस
संदिपजी,स्पष्ट लिहा आपणांस काय म्हणायचे आहे?काय अभिप्रेत आहे?
मस्तच.....
मस्तच.....
उपरोक्त गझलेतुन गझल कोनास
उपरोक्त गझलेतुन गझल कोनास उद्देशुन आहे याचा अर्थबोध होत नाहि.
तो स्पष्ट करावा हि विनंति.
गझल कुणाला उद्देशून नसते.
गझल कुणाला उद्देशून नसते. लावणी, अभंग असे काही काव्यप्रकार तसे असू शकतात / असतात.
कविता/गझल वाचून ज्याला ज्याला
कविता/गझल वाचून ज्याला ज्याला आपण या कवितेचे/गझलेचे नायक आहोत असे वाटते तो प्रत्येकजण त्या कवितेतला/गझलेतला नायक असतो/असावा बहुतेक.
मतला मस्त आहे... अथांगणे पण
मतला मस्त आहे... अथांगणे पण छान
(No subject)
ही गझल जरा वर आणतो.
ही गझल जरा वर आणतो.
डॉक. गझल छान आहे
डॉक. गझल छान आहे
डॉक. गझल छान आहेच वादच नाही
डॉक. गझल छान आहेच वादच नाही
पण खरं सांगू का .......ही गझल तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीसाठी लिहिली आहे असा फील आला !!(आणि कोणास ; हा अंदाज मी मनातल्या मनात बांधला देखील.......... आजकालच्या माबोवरच्या गझलेच्या सौन्दायाबोधाच्या चार्चेवरून बरका !! )
<< '' 'गझल' न्यायची पुढे'' तू हे खुंटीला बांधून घे>>>>>>>>ही ओळ ; आय थिंक वृत्तात बसत नाहीय .........इतर काही ठिकाणी पण वृत्त तपासायला हवेसे वाटले
खळखळाटाचा शेर टॉप क्लास झालाय
मक्त्यात नेहमी "कैलास" असे येणारे आपले तखल्लुस इथे "कैलासा" झाले आहे.
असो पण एकूणच या गझलेचा आशय विषय त्यामागचा निरागस उद्देश या सगळ्याचे मी १००% समर्थन करतो !!
मतला, बांगणे, अथांगणे हे शेर
मतला, बांगणे, अथांगणे हे शेर भारी आहेत.
वैभवा.. ही गझल 8 July, 2010
वैभवा.. ही गझल 8 July, 2010 - 09:41 या वेळेस लिहिली गेलेली आहे.
(No subject)
तेव्हां कदाचित तुम्हाला पुढचे
तेव्हां कदाचित तुम्हाला पुढचे दिसले असेल डॉक्टर... व्वा किती तो द्रष्टेपणा
झकास !
झकास !
हो अताच पाहिली मी तारीख असो
हो अताच पाहिली मी तारीख असो पण आज ही ती तितकीच चपखलपणे लागू होते हे मान्य काराल कि नै !!;)