लहान असताना
दरवर्षी ऊरुसामध्ये एक पावेवाला यायचा.
दरवर्षी न चुकता एकच चाल वाजवायचा.
खुळा म्हणायचे त्याला सगळे, उगाचच
दरवर्षी नवा पावा घेऊनही
'तशी' चाल कधीच वाजवता आली नाही.
मग 'पावा खराब आहे' असं सांगून
तो बदलायला गेल्यावर म्हणायचा,
'बच्चा, गाणं पाव्यावर नाही,
'मना'त वाजवायचं असतं;
पावा तर फक्त सूर लावतो!
लहान आहेस, जमेल तुलाही.'
(असा राग यायचा, जो उठेल तो आपला लहान म्हणतो म्हणजे काय!)
पुढे जेव्हा लौकीक अर्थाने मोठा वगैरे झालो
तेव्हा केला प्रयत्न 'मन' शोधायचा.
ते सापडलं, जडलं आणि हरवलं.
पावेवाल्याची तिच चाल मात्र
घुमू लागली दिवसरात्र.
पाव्यावर चाल वाजवायचा प्रयत्न
त्यानंतर केला नाही .
कदाचित जमेलही.
आणि मी पण कुणाला तरी सांगेन,
'बच्चा, गाणं पाव्यावर नाही,
'मना'त वाजवायचं असतं...
मग आणखी एक खुळा पावेवाला
आणि त्याचा आणखी एक खुळा शिष्य...
-
निखिल.
वा! एक आतून
वा! एक आतून उतरलेली धून... मस्तय, निखिल!
आवडल
आवडल निखील. खूप सहज लिहीलस
धन्यवाद
धन्यवाद दाद आणि केदार!
मस्त अगदी .
मस्त अगदी .
आती उत्तम!
आती उत्तम!
मग आणखी एक खुळा पावेवाला आणि
मग आणखी एक खुळा पावेवाला
आणि त्याचा आणखी एक खुळा शिष्य...
फक्त एकच?